उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)
उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ
सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.
उकड काढण्याची कृती:
प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.
मोदक करण्याची कृती:
१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
२. या गोळ्याची वाटी बनवा.
३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------
टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi
व्वाव ! बघताना येवढे सही मोदक
व्वाव ! बघताना येवढे सही मोदक दिसतात !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खाताना कसले सही दिसत असतील , ह्या वर्षी ह्ह च्या घरी मोदक पार्टी
HH, अगं किती सुबक! आणा आणा
HH, अगं किती सुबक! आणा आणा आणा, पण साजूक तूप ओतून! :p
एच्चेच ! खतरनाक फोटो!! कसल्या
एच्चेच ! खतरनाक फोटो!! कसल्या सुरेख पाकळ्या आहेत एकेक मोदकाच्या.
दंडवत!
हवाहवाई, कमाल आहेत मोदक
हवाहवाई, कमाल आहेत मोदक
किती सुबक आणि देखणे ! खाण्यासाठी सुद्धा मोडायला जीवावर येईल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो बघायला सुंदरच आहेत पण शिकायचे असतील तर व्हिडियो क्लिप जास्त फायदेशीर ठरेल असे वाटले.
किती सुबक झाले आहेत. ही
किती सुबक झाले आहेत. ही माहिती अगदी हवीच होती. धन्यवाद. नक्की करणार. फोटो पण मस्त आले आहेत.
भन्नाट! वरील प्रमाणाचे किती
भन्नाट! वरील प्रमाणाचे किती मोदक होतील?
किती सुबक! बघतच रहावे (की
किती सुबक! बघतच रहावे (की खावे?)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
HH , खरचं अगं किती सुरेख केले
HH , खरचं अगं किती सुरेख केले आहेस मोदक. मस्तच.
तांदळाची पीठी वापरायची आयडीया आवडली.
क्लास!! अगो म्हणतेय ते खरय..
क्लास!! अगो म्हणतेय ते खरय.. इतका सुबक मोदक मोडायला खरच जीवावर येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकच शंका, उकडीचा गोळा पीठीमधे घोळवल्यामुळे मोदक कोरडा नाही का पडणार?
अमेझिंग आहेत मोदक.
अमेझिंग आहेत मोदक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हह, मस्तच दिसतायत मोदक. कळ्या
हह, मस्तच दिसतायत मोदक. कळ्या सॉलिड पडल्यायत.
मलाही शेवटच्या फोटोत मोदक कोरडे पडले आहेत असं वाटतंय. वाफवल्यावर मोडणार नाहीत?
मस्त दिसतायत .. पाकळ्या
मस्त दिसतायत .. पाकळ्या भन्नाट आल्यात.
पण पन्ना, सायो सारखा प्रश्न मला पण पडला. मोदक कोरडे वाटतायत, पिठाला थोडे तडे गेलेत असं वाटतय.
पण पिठ लाउन सोप जातं का वळायला. मी नेहेमी पाणी आणि तेल ह्यांचाच वापर करते मोदक वळताना.
वा, वा! गणेशोत्सव सुरु
वा, वा! गणेशोत्सव सुरु झाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह ह. आणि गणेशोत्सव संयोजक मदतीबद्दल धन्यवाद.
हह, कळ्या छानच आहेत.
इथे मागच्या वर्षीच्या पहा -
http://www.maayboli.com/node/10477
हवे! कसले जबरी आहेत दिसतायत
हवे! कसले जबरी आहेत दिसतायत मोदक.
हह, गुळ खोबरे कसे शिजवायचे
हह, गुळ खोबरे कसे शिजवायचे तेही लिहि ना?
मस्त.
जबरदस्त!!!!!! काय सही दिसतायत
जबरदस्त!!!!!!
काय सही दिसतायत मोदक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हह, फारच सुबक आणि सुंदर झालेत मोदक. फोटो आणि माहिती पण मस्त
अरे वाह! भुक लागली
अरे वाह! भुक लागली फुल्ल्ल्ल....
दोन पानी झब्बु.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
नोव्हेंबरमधे मिळतील आता परत...
हमार माँने बनाया हैं.
१. तळलेले.
२. उकडीचे.![modak_1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8901/modak_1.jpg)
.
.
इथे फोटो काढायच्या भानगडीत ते
इथे फोटो काढायच्या भानगडीत ते मोदक थोडे कोरडे झाले आहेत पण एरवी होणार नाहीत. ओलसर हलक्या कापडाखाली झाकून ठेवा उकड आणि झालेले मोदक सुद्धा.
बी गुळ खोबरे एकत्र करून गॅसवर ठेवायचे. मधून मधून हलवायचे.
या प्रमाणात १०-१२ मोदक होतील.
तसच मला फक्त मोदक चांगले 'वळता' येतात त्यामुळे त्याबद्दल माहिती देण्याचा उद्देश आहे. बाकी प्रश्नांना मायबोलीवरचे कूकींग एक्सपर्ट उत्तरे देऊ शकतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्ह, एक्दम छान.. ह्या
ह्ह, एक्दम छान.. ह्या प्रमाणात किती मोदक होतात?
खतरा दिसताहेत मोदक... हह एकदम
खतरा दिसताहेत मोदक... हह एकदम सही.
हह, सुबक मोदक. अमृता, मीपण
हह, सुबक मोदक.
अमृता, मीपण तेल आणि पाण्याचा हात लावूनच मोदक वळते.
सुंदर...देखणे
सुंदर...देखणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा काय सुंदर केलेस मोदक
वा वा काय सुंदर केलेस मोदक अगदी सुबक सुरेख. काय नाजुक कळ्या आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भन्नाट दिसतायत मोदक.. ट्राय
भन्नाट दिसतायत मोदक.. ट्राय करून पाहीन, पण असे मोदक जमायला अजुन २० वर्षं नक्कीच लागतील!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झकास मी मात्र पाच किन्वा सहा
झकास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मात्र पाच किन्वा सहा पाकळ्यान्चाच मोदक वळतो!
काय करणार? खाणारी तोन्डे किती त्यावर सन्ख्या अवलम्बुन, अन जितकी सन्ख्या जास्त तितके वेगात काम करावे लागते! हो की नै?
उकड चान्गली व्हावी तसेच उकड बनवायच्या पद्धती वेगवेगळ्ञा असतील तर त्याबद्दलच्या(ही) सूचना-मार्गदर्शन कुणी देईल तर बरे होईल
क्लासिक! कस्सली टायमिंगला
क्लासिक! कस्सली टायमिंगला माहिती दिलीस एच्चेच! धन्स अ लॉट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम दिसतायेत ते मोदक. तसच
अप्रतिम दिसतायेत ते मोदक.
तसच मला फक्त मोदक चांगले 'वळता' येतात>>>> इतके सुबकतेने मोदक मला आयुष्यात जमणार नाहीत.
एच्चेच, जबरी!! काय सुबक मोदक
एच्चेच, जबरी!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सुबक मोदक झालेत.. अप्रतिम!!
लेखाच्या शेवटी तुझ्या हातांचा (आणि पायांचा सुद्धा) फोटो टाक बाई
अत्यंत सुबक
अत्यंत सुबक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages