गंमतीची गोष्ट

Submitted by नीधप on 31 August, 2010 - 23:48

मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं

हा आपलातुपला गंमतनाच!

नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?

जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.

'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून

आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!

स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.
लेख आवडला !

केश्वे, गुलमोहरवर काय चाल्लंय त्याचं नाही गं..
माझं जग माझ्यापुरतं आहे. हे माझं माझ्यापुरतं वर्णन आहे.

वर्षूताई Happy

निंबुडे, जाने दे ना... निरर्थक गोष्टी डोक्यावरून जाण्यासाठीच असतात. Happy

निंबुडे, जाने दे ना... निरर्थक गोष्टी डोक्यावरून जाण्यासाठीच असतात. >>> एकांत मिळाला की आपल्याच मनाच्या २ रुपांमध्ये झालेल्या संवादातून परिणती झालेली अशी ही कविता आहे का? म्हणजे मला तरी ही कविता वचल्यावर तसा फील आला. पण जरा बोजड झालं माझ्या बुद्धीला म्हणून सोडून दिला मी नाद रसग्रहणाचा. Proud

तुला वाटेल तो अर्थ योग्य. तुला मिळेल तो अनुभव खरा.
नाही वाटला अर्थ, नाही मिळाला अनुभव तर वस्तू निरर्थक.
इतकं सोपं गणित असतं बघ कुठल्याही कवितेचं.
खरंच... Happy

मला काय... मला लिहिण्यात गंमत येत होती. ती लिहिण्याला घेऊन पळून गेली. तर आता लिहिणं बोंबललंच ना असं काहीतरी वाटलं ते लिहिलं...

गंमतनाच... आता यापुढे हाच कोडवर्ड. लापि वाजवणार नाही अजिबात Wink

बाकी प्रतिक्रिया वाचायला मजा येतेय.. Happy

निंबुडा | 1 September, 2010 - 10:28 नवीन
अपने तो सर के उपर से गया बाबा!

मला पण असच काही वाटतय

Pages

Back to top