गंमतीची गोष्ट

Submitted by नीधप on 31 August, 2010 - 23:48

मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं

हा आपलातुपला गंमतनाच!

नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?

जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.

'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून

आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!

स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लापि म्हणजे लाडिक पिपाणी... लिहीssना म्हणताना अदृश्यपणे वाजते ती.. Happy

ह्या नीधपच्या भयंकर मागे लागावं लागतं, लिही लिही म्हणत. तिला वेळ नसतो हे एक खरोखरचं कारण... पण मूड आणि आळस हीसुद्धा महत्वाची कारणं.. काल परवामध्ये कधीतरी चिंतन मनन करताना नीधपला बहुतेक ते जाणवून गेलंय आणि ही कविता बाहेर आलीये...

बापरे!! इतक्या परखड आणि स्पष्ट रसग्रहणाबद्दल मी मार खाणारे... Happy

काल परवामध्ये कधीतरी चिंतन मनन करताना नीधपला बहुतेक ते जाणवून गेलंय <<<
काल-परवा यावर आक्षेप.. मला ते त्रेतायुगातच जाणवलंय. Wink

आपण काही लिहूच शकत नाही आहोत हे मात्र या महिन्याभरात जाणवलंय...
परत 'क्रिएटिव्हिटीच्या भुता....' वरच गाडी आली आहे. Happy

प्रतिभेला म्हणावं take your own time>>> तिला फार वेळ नाहीये काही करायला.. जेमतेम ५ वर्षच मिळतात.. आणि १ आधीच झालय तेव्हा अजून ४ वर्षच बाकी आहेत.. Lol

विषयांतराबद्दल क्षमस्व..

मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं

हा आपलातुपला गंमतनाच!

नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?

जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.

'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून

आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!

स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!

व्वा! आत्मपरीक्षण व काव्यप्रक्रियेबाबतचा अभ्यास फार आवडला. शुभेच्छा!

'त्याच्याशिवाय मी अन माझ्याशिवाय लिहीणं' ही ओळ फार आवडली.

आपल्यात एक स्वतःभिमुख परंतु अंशतः जागृत कवयित्री दडलेली आहे हे जाणवते. ती इंपल्सिव्हली कार्यान्वित होते. हाच प्रामाणिकपणा आहे असा अंदाज आहे. बाह्य जगतातील सौम्य ते तीव्र आघातांमधून निघणार्‍या कंपनाना मुर्त स्वरूप देऊन न्याय देणारी शब्दरचना!

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

Happy

Pages