Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुंगा, मीही हेच लिहायला आले
भुंगा, मीही हेच लिहायला आले होते.
नेहमीची अंताक्षरीमधे
नेहमीची अंताक्षरीमधे लिहिलेल्या 'निसुलताना रे प्यार का मौसम आया

अरे हाय रे प्यार का मौसम आया'
या गाण्यात 'निसुलताना' म्हणजे काय?
मी तर आत्तापर्यंत 'निकल पडा रे , प्यार का मौसम आया.." असं ऐकत होते...
आणि प्यार का मौसम निकल पडा (मोहिमेवर) असा सोयिस्कर अर्थ काढत होते..
नि बलिये, नि सोणिये, नि
नि बलिये, नि सोणिये, नि सुलताना हे ऐकून नि म्हणजे अगं/ए असा अर्थ असेल असे वाटते.
भरत बरोबर, मलाही असंच वाटतंय.
भरत बरोबर, मलाही असंच वाटतंय.
भरत, तुमचे इथले पोस्ट्स मी
भरत, तुमचे इथले पोस्ट्स मी नियमित वाचते. तुमचा गाण्यांवरील, त्याच्या शब्दांवरील आणि अर्थांवरील अचूक अंदाज आणि गाढा अभ्यास पाहून मी नेहमीच थक्क होत असते...
स्वप्ना, तू फार मजेशीर लिहितेस बुवा...कितीवेळा मी तुला तेच तेच सांगते, पण मन भरतच नाही...:) आणि भुंग्या, तुझे आणि स्वप्नाचे आत्ताचे सगळे पोस्ट्स वाचले... भरपूर हसते आहे याचा अंदाज आला असेलच ना तुम्हाला???
सानी तुम्ही हे मनापासून
सानी तुम्ही हे मनापासून लिहिलेय ना?
गाण्यांच्या अभ्यासाचे म्हणाल तर शाळा कॉलेजचा सगळा अभ्यास विविधभारतीच्या सोबतीनेच केलाय...(तेव्हा एफेम नव्हते...मोअर बजाना नो पकाना -एफेम रेन्बो/गोल्डच्या शिवकुमारच्या भाषेत) तो अभ्यास किती लक्षात राहिलाय माहित नाही, गाणी मात्र आहेत असे दिसतेय!
धन्स सानी............मन, ऊर
धन्स सानी............मन, ऊर सगळे भरुन आले.........छाती अभिमानाने फुलुन "सलमान" एवढी झालिये...... पण मी मात्र "दबंग" नाही झालोय्........अजुनही दबक्या पावलानेच घरात शिरतो....

सानी तुम्ही हे मनापासून
सानी तुम्ही हे मनापासून लिहिलेय ना?>>>>>> असे का बरे वाटले तुम्हाला
एकदम मनापासून लिहिले आहे...
थोडे विषयांतर, मला कंपूशाही, खेचाखेची, खोचकपणा आणि वाद इ. प्रकाराचा अतिशय तिटकारा आहे...त्यामुळे चुकून वाचण्यात आलं तरी अशा कुठल्याही चर्चेत मी सहभागी होत नाही....मी माबोची सदस्य निर्भेळ आनंद मिळावा म्हणून झाले. मला माणसे जोडायला आवडतात, तोडायला नाही. त्यामुळे मी जे लिहिते, प्रतिसाद देते, त्यात दुसरे सूचक अर्थ शक्यतो नसतात...
....आणि मला तुमच्या गाण्याविषयीच्या ज्ञानाचे खरोखर मनापासून कौतुक वाटते
भुंग्या, काय रे हे???? दबक्या पावलाने घरात शिरतोस???:हहगलो: भुंगीला फार घाबरतोस वाटतं
तुमसे मिला था प्यार, कुछ
तुमसे मिला था प्यार, कुछ अच्छे नसीब थे
हम उन दिनों अमीर थे, जब तुम गरीब थे | .......
मला हे असं ऐकू यायचं आणि तो हिरो त्या हिरविणीला खिजवतोय असं वाटायचं (खरं तर शिणूमामात हिरो गरीब आहे). नंतर बर्याच वर्षांनी कळलं की ते 'करीब थे' आहे.
दोन्-तीन महिन्यापुर्वी झी
दोन्-तीन महिन्यापुर्वी झी मराठीवर्च्या "भाग्यलक्ष्मी"चं टायटल साँग ऐकलं होतं..शब्द नीट लक्षात नाहीत पण चाल लक्षात आहे..ते मी असे गुणगुणत होते: " येता भाग्याची लक्ष्मी, लागे अंगण पुसाया...."
झुबी डुबी झुबी डुबी पं
झुबी डुबी झुबी डुबी पं पारा
झुबी डुबी परम पं
झुबी डुबी झुबी डुबी नाचे क्यू
पागल "सुलेमान"
कितना प्यारा वादा है
कितना प्यारा वादा है "हिम्मतवाली" आखोन्का
>>हम उन दिनों अमीर थे, जब तुम
>>हम उन दिनों अमीर थे, जब तुम गरीब थे | .....>><<
खतरनाक हसले इथे नुसते इमॅजिन करून की हिरवीण कशी उपहासाने म्हणतेय.
नानबा तुझ्या भाचीचा दोष नाही... माझी भाची सुद्धा असेच म्हणायची.
फरक हाच की ती म्हणायची,
एक्युण टॅहॅण विसरून भ्याण असे काहीतरी ईकडच्या accent मध्ये म्हणते. माझ्या बहीणीला हे गाणे खूप एकायची सवय होती, भाची तेव्हा ३-४ वर्षाची होती. भाचीची पैदास इकडची असल्याने ते असे भयानक मराठी एकून हसायचो. पुढेही तिचे बरेच अॅडिशन असायचे ह्या गाण्यात, मीच विसरले.
प्रशांत मलाही ते कित्येक
प्रशांत मलाही ते कित्येक वर्षे 'हिम्मतवाली' आंखो का' असेच वाटायचे. अगदी अलीकडे youtube कृपेने एकून एकून कळले. तेव्हा अशी जुनी गाणी कधीतरी छायागीतातच लागायची. त्यामूळे चान्स न्हव्ता एकायचा पुन्हा पुन्हा.
ते 'इन मतवाली' आहे.
बोल रे पपीहरा - गुड्डी मधले
बोल रे पपीहरा - गुड्डी मधले वाणी जयराम यांनी गायिलेले गीत
त्या बोल रे पपी हरा पपीSSSSSSहरा
असे म्हणतात पपी आणि हराच्या मधला विराम, शांतता जाणवण्याइतकी स्पष्ट.
त्यामुळे पपीह्याला उद्देशून म्हणायचे गाणे ही बाई आपल्या कुत्र्याच्या हिरव्या रंगाच्या पिलाला उद्देशून का म्हणतेय असे वाटायचे.
असाच नको तिथे तोडलेला आणखी एक शब्द : ला जून हासणे
एकदा हे गाणे शंकर महादेवन कडून ऐकता आले. त्याने नाही बुवा लाजून हासण्याचे जून हासणे केले!
>>कितना प्यारा वादा है
>>कितना प्यारा वादा है "हिम्मतवाली" आखोन्का
>>त्यामुळे पपीह्याला उद्देशून म्हणायचे गाणे ही बाई आपल्या कुत्र्याच्या हिरव्या रंगाच्या पिलाला उद्देशून का म्हणतेय असे वाटायचे.
माझंही हे असंच व्हायचं. रच्याकने, पपीहा आणि पपिहरा ह्यात काय फरक आहे? भरत, हेल्प प्लीज.
>>स्वप्ना, तू फार मजेशीर लिहितेस बुवा...कितीवेळा मी तुला तेच तेच सांगते, पण मन भरतच नाही
हरकत नाही ग, तू जितक्या वेळा सांगशील तितक्या वेळा मी ऐकायला तयार आहे
काल ते टशन या टुकार
काल ते टशन या टुकार पिक्चरमधले गाणे ऐकले....कधीकधी सुखविंदर्ची काही गाणी डोक्यात जातात त्या पैकी हे एक.........
दिलहारा रे दिलहारा ........
मला तर वाटायचे श्रीलंकेत एखाद्या सिरिज मध्ये हे गाणे लावले तर सगळे प्रेक्षक "दिलहारा फर्नांडो" साठी हेच गाणे गातील्.........म्हणजे दिलहारा ९९ वर खेळतोय आणि अख्खे स्टेडियम हे गाणे म्हणतेय...
दिलहारा रे दिलहारा ........
असो. तर हे गाणे आणि तो टुकार पिक्चर ज्यात अ़क्षय खुंट वाढवुन वावरलाय आणि करीना चक्क वाटाण्याच्या शेंगेने अचानक गवारीसारखे व्हावे अशी दिसतेय..... कधी फार लक्ष दिले नव्हते गाण्याकडे आणि पुर्ण ऐकलेही नव्हते......... तेव्हा ह्या गाण्याची खिल्ली उडवायला मी ते असे म्हणायचो.... खरे शब्द माहीत नव्हते.
छप्पन तारे तोड नाचलु, मै तो "चादर ओढ" नाचलु, मै तो बंजारा रे
बनके आवारा मै..........
तर काल नीट ऐकल्यावर कळले ते चादर ओढ नसुन बहुतेक "ताबड्तोड" असे आहे.....
मला तर 'ताबडतोब' नाच लू...
मला तर 'ताबडतोब' नाच लू... असे ऐकू येई...
मामी "ताबडतोब"
मामी "ताबडतोब" काय............... अक्षय "खट्टामीठा" मध्ये मराठी हिरो झालाय, टशन मध्ये नै कै.....

(No subject)
आकाश पान्घरूनी जग शान्त झोपले
आकाश पान्घरूनी जग शान्त झोपले हे
घेऊन एक थाळी, खातो कबीर पोहे... असे मला वाटायचे... रात्रीच्या वेळी कबीर थाळी घेऊन पोहे का खात बसला आहे हे काही मला कळतच नव्हते...
भरत, ते बोले रे पपीहरा, मूळ
भरत, ते बोले रे पपीहरा, मूळ गंगुबाई हंगल यांच्या आवाजात आहे. (राग मिया मल्हार) कदाचित तालाशी तडजोड करावी लागली असेल, पण त्या गायनातही पपी नंतर विराम आहे.
रच्याकने, हाच राग, हिच चाल, लताच्या आवाजात, आनंद मधे आहे.
घिर घिर आयी सावली अखिंया
सावरीया घर आ
इथे आयी असा शब्द योजल्याने, लताला ते नको त्या ठिकाणी तोडावे लागलेले नाही.
>>घेऊन एक थाळी, खातो कबीर
>>घेऊन एक थाळी, खातो कबीर पोहे
कबीराचे दोहे ऐवजी कबीराचे
कबीराचे दोहे ऐवजी कबीराचे पोहे झाले
हे कदाचित मी आधी पोस्टलं असेल
हे कदाचित मी आधी पोस्टलं असेल "दो दिवाने शहरमे" हे गाणं लहानपणी जेव्हा ऐकलं तेव्हा "आबुदाना" हा शब्द ऐकूनही ठाऊक नसल्याने ते "साबुदाणा"च आहे आणि आपल्याला "आबुदाना" असं ऐकायला येतंय असं वाटायचं. पुढे संकष्टीच्या आदल्या दिवशी साबुदाणा नक्की कुठे ठेवलाय ते आठवत नसल्याने आई स्वयंपाकघरात शोधाशोध करायला लागली की आम्ही हे गाणं म्हणायचो.
गाणे चुकिच्या ठिकाणी
गाणे चुकिच्या ठिकाणी तोडल्याने चुकिचे ऐकु येणारे गाणे....
"फिरत्या चाका...... "वरती देशी"..........

स्वप्ना_राज, रच्याकने, ते
स्वप्ना_राज,
रच्याकने, ते "आबुदाना" नसुन आबोदाना आहे. आबोदाना म्हणजे दाणापाणी
>>"फिरत्या चाका...... "वरती
>>"फिरत्या चाका...... "वरती देशी".
__/\__
मंगेश धन्स, मला हे आशियाना सारखं काहीतरी प्रकरण वाटत होतं.
ते "आबुदाना" नसुन आबोदाना
ते "आबुदाना" नसुन आबोदाना आहे. आबोदाना म्हणजे दाणापाणी
मंगेश धन्स, मला हे आशियाना सारखं काहीतरी प्रकरण वाटत होतं. >>>>>
नशिब कोणी साबुदाणा ऐकलं नव्हतं
'दिल के झरोके में तुझको
'दिल के झरोके में तुझको बिठाकर' हे गान मला कधी लक्षातच नाही राहत
मी एकदा त्याच विडंबन वाचलेलं ते लक्षात आहे
" कचरेके डीब्बे में तुझको बिठाकर , उपरसे प्लास्टिक का ढक्कन लगाकर रखदुंगा घर के बहार."
Pages