माझा भारत देश
सारे जहाँ से अच्छा असा हा माझा भारत देश
नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा एक समृद्ध प्रदेश
अनेक ऐतिहासिक, भौगोलिक घटकांचा असे हा उन्मेश
कविकल्पित भासो अशा वैविध्यतेने नटलेला माझा भारत देश
जगात शांततेचे पुरस्कर्ते अशी आपली ख्याती
मनात वैर ठेवणाऱ्या शेजारी राष्ट्राशीही जपली नाती
मैत्रिपूर्ण हात सदैव पुढे केला न ठेवता मनात कुठलाही द्वेष
थोरल्या भावाप्रमाणे कठोर परंतु क्षमाशील भूमिका घेणारा माझा भारत देश
आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी वाढवली देशाची शान
"प्रगतीबरोबर सर्वांगीण विकास" या आपल्या पद्धतीचा आम्हा अभिमान
२०२० लक्ष्य आपण गाठणार हि काळ्या दगडावरील पांढरी रेष
या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आदर्श पद्धत पेश करणारा माझा भारत देश
या नाण्याची दुसरी बाजू देखील आहे ती अशी,
गरीब होत आहेत गरीब अजून अन श्रीमंत बनत आहेत नबाब
तळहातावरील फोडाप्रमाणे जपले जात आहेत येथे कसाब
भ्रष्टाचारी कारभाराबद्दल केवळ चर्चेतच दाखवला जातो क्लेश
याच पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे का माझा भारत देश ?
आजच्या नेत्यांना राजकारणापेक्षा राज करण्यातच आहे जास्त रस
पैशाच्या अन गुंडांच्या जोरावर जनतेस छळण्यात झाले आहेत ते सरस
देश दुभंगण्याचे काम चालू आहे चढवुनी सदाचाराचा गणवेश
अशा परिस्थितीतही तग धरून उभा आहे माझा भारत देश
अन शेवटी
असंख्य बलिदानाचे स्मरण ठेवुनी स्वातंत्र्यदिन करूयात साजरा
देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करूयात सर्वेजन प्रार्थना
आशावादी अन प्रयत्नवादी राहिल्यास मनात राहणार नाही काही शंका शेष
सर्वांनी मिळून एकदिलाने घडवूयात आपला भारत देश !!!
- आशुतोष अजय कुलकर्णी
आलात? या!!! स्वागत आहे
आलात? या!!! स्वागत आहे माबोवर!
कवीता वाचली,
वा! वा! भन्नाट कसब आहे तुमच्याकडे. निबंधाला अक्षरशः कविता बनवलय तुम्ही. आता कादंबरीच्या चरोळ्या पाडायला घ्या. आणि गझलेची हादग्याची गाणी बनवा... काव्यमसाल्याचा धंदाच काढा हळू हळू... माबोवर गिर्हाईकही भरपूर आहे... वा वा छानच!!!
ह बा
ह बा
अमित तू हे निवडक दहामधे
अमित तू हे निवडक दहामधे टाकलेस का? अजून किती आहेत? नि उ,आ.प., जि.गा.
माझी सूचना: आपण सर्वांनी आपापल्या कविता काकाका मधे टाकत जाऊया.
भरत माझे "निवडक दहा"
भरत
माझे "निवडक दहा" यांच्याच कवितांनी "फुल्ल" झालेलं आहे....:)
आयला त्या बेफ़िकीरजींना सांगा
आयला त्या बेफ़िकीरजींना सांगा रे कुणीतरी म्हणावं यापुढे सगळ्या कादंबर्या इथेच टाकत जा
माझ्यामते ही एक चांगली कविता
माझ्यामते ही एक चांगली कविता आहे. व्यवस्थित वाचली जाऊ शकते. काही तांत्रिक बाबतीत कवी कमी पडतो हे खरे; पण त्यावरून इतकी टोकाची भूमिका घ्यायला नको.
"आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ
"आपापल्या क्षेत्रातल्या तज्ञ मंडळींनी वाढवली देशाची शान
"प्रगतीबरोबर सर्वांगीण विकास" या आपल्या पद्धतीचा आम्हा अभिमान
२०२० लक्ष्य आपण गाठणार हि काळ्या दगडावरील पांढरी रेष
या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आदर्श पद्धत पेश करणारा माझा भारत देश"
हे काव्य म्हणून कसं वाचायचं? व्यवस्थित? फक्त यमक म्हणजे काव्य?
आशुतोष, तुमच्या सारखे काही
आशुतोष,
तुमच्या सारखे काही देश प्रेमी लोक शिल्लक आहेत म्हणुन तर अजुन कसाब निदान जेल मध्ये तरी आहे ,नाहीतर कधीच सोडला गेला असता ...
मनात वैर ठेवणाऱ्या शेजारी राष्ट्राशीही जपली नाती
आता खुप झालं ...या पुढे तरी ही नाती तोडुन टाकु !