इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
इथे आधीच असेल तर मला पान नंबर
इथे आधीच असेल तर मला पान नंबर सांगा ना प्लिज
>> पलटून बघा प्लीजच
मिल्या Fiat Linea पण छान आहे
मिल्या Fiat Linea पण छान आहे ना! लुक्स तर मस्तच आहेत. >>> हो मस्त आहे... आपल्या एका माबोकराची आहे... मी शक्यतो पेट्रोल कार बघतोय... Linea चे पेट्रोल मॉडेल कसे आहे ह्याबद्दल अजून फारशी माहिती मिळाली नाहीये मला (साजिरा सांगेलच ) तसेच Fiat चा after sales service चा प्रॉब्लेम आहेच अजून
ground clearance 165 mm हा अजून एक प्रॉब्लेम आहे... ... मांझा आणि लिनिआ ची ७०-८०% assembly same आहे... size आणि interiors आणि किंमत ह्यात फरक आहे
डिजेल घेणार असशील तर
डिजेल घेणार असशील तर Fiat,Tata आनि मारुति मध्ये Fiat चेच ईंजिन असते. टाटावाले स्वत।चेही ईंजिन लावून देतात.
गिर्या इकडे कुणीकडे आज? आरे
गिर्या इकडे कुणीकडे आज? आरे पेट्रोल मध्ये पण Linea आणि मांझा ला एकच ईजिन आहे
रिमा अभिनंदन........... नवी
रिमा अभिनंदन...........
नवी सफारी बुक केलिस का........... सढ्या अॅड चालु आहे तिची.......
नवी सफारी बुक केलिस
नवी सफारी बुक केलिस का........... सढ्या अॅड चालु आहे तिची.......>>
धन्यवाद भ्रमर. अॅड मध्ये येतो तोच कलर आहे फक्त ड्युअल आहे. येइल पुढच्या शनिवार पर्यंत.
GS च्या मते... Chevrolet च्या
GS च्या मते... Chevrolet च्या गाड्या म्हणजे भंगार!
NDTV च्या car & Bike शो ला वेन्टो ची बरीच तारीफ केली.
वेन्टो,सिटी,फिएस्टा,वर्ना या गाड्या 1.6 L इंजिन च्या आहेत. तर लिनेआ,मांजा,डिजायर वगैरे १.३ ली इंजिनच्या.(सगळ्या पेट्रोल)
सिटी ला १५०० सीसी एंजिन असूनही पावर जास्त आहे.
अरे रिमा तुमचे अभिनंदन करायचे
अरे रिमा तुमचे अभिनंदन करायचे राहिले... हार्दिक अभिनंदन
गिरी बरोबर फक्त Dzire 1.2 ची आहे
मिल्या, होंडा सिटी का नाही
मिल्या, होंडा सिटी का नाही प़कडलीये म्हणे त्यात?
कितीही म्हटले, तरी पेट्रोल, की डिझेल - हे तुला आधी ठरवावे लागणार, यात शंका नाही. त्यानंतर खालीलपैकी काय महत्वाचे वाटते, ते ठरवावे लागेल.
युटिलिटी, मायलेज
कमी किंमत
लुक्स, कारचे दिसणे-असणे, सोशल स्टेटसची गरज
एखाद्या ब्रँडवरचा विश्वास
मेंटेनंस आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस
रिसेल व्हॅल्यु
फिएस्टा (पेट्रोल / डिझेल) घेऊ नये असे वाटते. २०१० च्या शेवटी किंवा २०११ मध्ये ऑल-न्यु-फिएस्टा येते आहे बाजारात. तेव्हा घेणार असशील, तर नक्कीच विचार करता येईल तिचा.
स्विफ्ट डिझायर ही बेसिक सेदान आहे. काही काँप्रोमायझेस स्वीकारून कमी किंमतीतली सेदान. म्हणूनच तिला मोस्ट-प्रॅक्टिकल-सेदान (नॉचबॅक) म्हणले जाते.
सर्वसाधारणपणे विचार केला तर, पेट्रोल वरना पेक्षा एसेक्स४ वरचढ ठरेल. त्यापेक्षा पेट्रोल लिनिया. आणि त्याहीपेक्षा होंडा सिटी. मिड-साईझ पेट्रोल सेदान मधला होंडा सिटी हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.
लुक्स आणि ऑनरोड प्रेझेंसचा विचार केला तर लिनियाचा रॉयल इटालियन आर्क आणि सिटीचे अल्ट्रा फ्युचरिस्टिक लुक्स- यांना तोड नाही.
मांझा आणि लिनियाचे फक्त इंजिन सारखे आहे. बाकी फॉर्म-फिट-फिनिश-लुक्स-साईझ इ. बाबतीत भरपूर फरक आहे. मांझाचे लुक्स थोडे बॉक्सी आहेत, पण डिझायरपेक्षा खूप चांगले. शिवाय इतर सोयीसुविधाही डिझ्गायरपेक्षा खूप जास्त आहेत. किंमत मात्र डिझायरपेक्षा थोडीच जास्त आहे.
अॅव्हिओ घेऊ नये, असे माझे मत. तिचे सारेच आऊटडेटेड वाटतेय आता.
व्हेंटोबद्दल अजून नक्की कल्पना नाही येत आहे. कधी येतेय, तेही कळ्ले नाही. पण मिड-साईझ सेदान मार्केट मध्ये तो एक सही पंच असेल, अशी आशा करायला नक्कीच जागा आहे.
***
सगळ्यांच्या टेस्ट-ड्राईव्ह करून, स्क्रिनिंग करून मोजक्या गाड्या शॉर्टलिस्ट केल्यास तर आणखी डिटेल्स मध्ये तुलना आणि चर्चा करता येईल बघ.
रिमा अभिनंदन. मी मागच्या
रिमा अभिनंदन.
मी मागच्या आठ्वड्यात दोन मांझा पाहिल्या नवीन. अगदी चमकत होत्या. छान दिसत होत्या. त्यांना पण गिराइक भेट्ते कि.
मिल्या, होंडा सिटी का नाही
मिल्या, होंडा सिटी का नाही प़कडलीये म्हणे त्यात? >>> अरे काही नाही बाकीच्यांपेक्षा किंमत फार जास्ती आहे तिची.... म्हणून लिस्ट मध्ये नाहीये...
नेहमीप्रमाणेच सविस्तर उत्तर दिलेस... तू म्हणतोस तसे जरा मोजक्या गाड्यांवर आलो की मग बोलता येईल सविस्तर
इन्डिगो LS कशी आहे? नॉर्मल
इन्डिगो LS कशी आहे?
नॉर्मल सेडान पेक्षा थोडीशीच छोटी आहे त्यामुळे किंमत कमी असं काहीतरी ऐकलं होतं.
मिल्या, मुंबईत असशिल तर माझी
मिल्या, मुंबईत असशिल तर माझी Honda City चालवून बघ. मी पण आधी किंमत जास्त म्हणून घेत नव्हतो. Hyundai Verna almost finalize केली होती. पण एकदा City चालवली आणि तिच घेउन टाकली.
एकदम मस्त गाडी आहे. Vento मधे काही काही फिचर्स चांगले आहेत पण एकदा चालवून बघितल्याशिवाय काही सांगण योग्य होणार नाही. कदाचित पुढच्या आठवड्यात Test Drive साठी जाईन आणि मग First Hand Review ईथे टाकेन.
Ford Figo बद्दल काय मत आहे?
Ford Figo बद्दल काय मत आहे? रिव्ह्युही वाचलेत, टेस्ट ड्राईव्हही करुन झालीय. कोणी Figo घेतलीय तर अनुभव शेअर करा प्लीज.
साजिर्या, तुझंही मत कळु दे या गाडीबद्दल.
रिमा अभिनंदन>> मामी धन्यवाद.
रिमा अभिनंदन>>
मामी धन्यवाद.
त्यांना पण गिराइक भेट्ते कि.>>
हो हो. मझा नवरा तर क्रेझि आहे सफारि साठी. आधि स्कोर्पिओ विचार करत होता. मग शेवटी सफारी वर अडकला.
त्यांना पण गिराइक भेट्ते
त्यांना पण गिराइक भेट्ते कि.>> अग मी ते मांझाबद्दल म्हट्ले होते.
Safari really is high on testosterone. So when are you taking the car out for a long drive? hv fn.
आशूतोष तू नुस्ती चॉकोलेटे खात
आशूतोष तू नुस्ती चॉकोलेटे खात बस्तोस. हा बीबी पूर्ण वाच मी फिगो घेतली आहे त्याचे पूर्ण रामायण इथे आहे यार पहिले होमवर्क तो करो फिर डाउटां पूछो. ( दिवे दिवे)
मामी, पण आता गाडी चालवती
मामी, पण आता गाडी चालवती झाल्यानंतरचे काय मत आहे? कशी वाटतीये गाडी आता? व्हॅल्यू फॉर मनी?
अमा पहिले होमवर्क तो करो फिर
अमा
पहिले होमवर्क तो करो फिर डाउटां पूछो. <<<<<<<शाळेत न गेल्याचा परिणाम आहे हा अमा
अमा, अभिनंदन,अभी तो आनाहीच पडेगा फिगोमे बैठने केलिये
माझी काहीच तक्रार नाहीए
माझी काहीच तक्रार नाहीए गाडीबद्दल. पेट्रोल घातले कि चालते. तेव्ढे नस्ते तर बरे झाले असते.
१०० किमी प्रती घंटा रफ्तार ला पण अगदी स्टेबल आहे. परंतु हा बीबी पूर्ण वाच आशू निर्णय घेण्याआधी. खूप इतर चांगल्या गाडया आहेत. विवेचन चांगले आहे.
मिल्या,मित्सुबिशीच्या लान्सर
मिल्या,मित्सुबिशीच्या लान्सर आणि सेडिया दोघी तुझ्या क्रायटेरिया मध्ये बसतील अश्या आहेत.
कुणी त्यांच्याबद्दल काही लिहिले नाहि. बर्याच rally मध्ये सेडिया आणि Esteem दिसतात.
तेव्ढे नस्ते तर बरे झाले असते
तेव्ढे नस्ते तर बरे झाले असते >>
आशूतोष, फिगो खरेच व्हॅल्यु फॉर मनी आहे. फोर्डने स्मॉल कार मार्केट मध्ये खरेच सही एंट्री मारलेली आहे. आणखी फीडबॅकसाठी मामींना विचारा. पण पूनम, तू का घेतेयस म्हणे फिगो?
मिल्या, सिटी-पेट्रोल आणि लिनिया-डिझेल-इमोशन यांची किंमत जवळजवळ सारखीच आहे. (किंवा थोदा फरक असेल). पेट्रोल व्हर्जन्स मध्ये मात्र लिनिया, फिएस्टा, एसेक्स४, वरना या चारही गाड्या कमीत कमी दीडेक लाखाने तरी कमी आहेत. आणि सिटी घेण्याचा निर्णय थोडा डळमळीत व्हायला हा फरक पुरेसा आहे. लिनिया तर एअर-बॅग्ज, ब्ल्यु अँड मी, माय कार फंक्शन्स, अलॉय व्हील्स, एबीएस-ईबीडी अशी सुखसोयींनी पॉवर-पॅक्ड आहे. नवीन 'वरना-ट्रान्सफॉर्म' मध्ये यातले काय काय आहे, ते बघायला पाहिजे. (इंजिन जुन्या वरनाचेच आहे.) सिटी ही एक फँटॅस्टिक कार आहे, सगळ्याच दृष्टीने- यात शंकाच नाही. तिचे नवीन टॉप एंड मॉडेल ११ लाखांच्या आसपास आहे. पण त्यात अॅलॉय व्हील्स आणि एअर बॅग्ज तरी दिल्या आहेत का, हे अजून मी पाहिले नाहीये.
लान्सर ही आता आऊटडेटेड म्हणता येईल. नवीन लुक्स सेडिया मध्ये देण्याचा थोडा प्रयत्न केलाय त्यांनी. पण या दोघींची इंजिने २ लिटर्सची आहेत. (याच कारणाने या गाड्या रेस आणि रॅलीज मध्ये दिसत असाव्यात). मायलेज बरेच कमी. मात्र किंमतही कमीच आहे. १० ते १२ लाख. १२०० ते १६०० सीसीच्या गाड्यांच्या रेंजच्या जवळपासच.
आजचे माझे मत व्ही. डबल्यू.
आजचे माझे मत व्ही. डबल्यू. व्हेंटो गाडीस. सप्टेंबर मध्ये लाँच आहे. तोपरेन्त पयशे बाजुला ठेवा. व व्हेंटो टेस्ट ड्राइव करून या. तिला अगदी सेडान फील आहे व अंतर्बाह्य चांगली दिसते. साइड्ने अगदी स्लीक दिस्ते. इंजीन व पर्फॉर्मन्स साठी टेड्रा जरुरी आहे.
एक पीजे.
पुणेकरांनी फोर्ड आय्कॉन घेतल्यास तिला काय म्हणतील?
द जोशी मशीन.!!!
ह्या ह्या ह्या दिवे घ्या.
माझ्याकडं SX4 आहे and I am
माझ्याकडं SX4 आहे and I am really satisfied. मी सेकंड हँड घेतली आहे (2007 ऑगस्ट चे मॉडेल). २०१० SX4 चे इंजिन अजून चांगले आहे (with VVT) त्यामुळं अव्हरेज अजून चांगले आहे (असा कंपनीचा दावा आहे). शिवाय SX4चा ग्राउंड क्लिअरन्स या सेगमेंटमध्ये बहुतेक सगळ्यात जास्त आहे. सिटीचा तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. शिवाय सीटची उंचीपण जास्त असल्याने ड्राइविंग कंफर्ट मस्त आहे SX4 मध्ये. आधिच्या सिटीच्या टॉप मॉडेलमध्येपण एयर बॅग्स नव्हत्या ज्या SX4 मध्ये आहेत. सिटीच्या टॉप मॉडेलमध्ये आता बहुतेक द्यायला चालू केलं आहे.
लिनिया आणि SX4 ची किंमत जर कंपरेबल असेल आणि फीचर्स पण सारखे असतील तर माझे मत SX4 लाच कारण त्याचे इंजिन १.६ लिटरचे आहे आणि लिनियाचे १.२/१.३.
manya2804 अरे सिटी चालवून तर
manya2804 अरे सिटी चालवून तर नक्कीच बघणार आहे.. व्हेंटो पण चालवून बघणार आपल्याला काय घाई नाही... निवांत डिसिजन घेणार
तिचे नवीन टॉप एंड मॉडेल ११ लाखांच्या आसपास आहे. पण त्यात अॅलॉय व्हील्स आणि एअर बॅग्ज तरी दिल्या आहेत का, हे अजून मी पाहिले नाहीये. >>> ऑन रोड १०.२५ ला आहे टॉप एंड मॉडेल अर्थात मॅनुअल...
वर्ना ट्रॉन्स्फॉर्म च्या कुठल्याच मॉडेल मध्ये पॅसेंजर एअर बॅग येत नाही.
मनीष बरोबर आहे तुझे म्हणणे. VVT अजून चांगले आहे असे ऐकले आहे... GC सगळ्यात जास्त, driving comfort पण मस्त आहे ( मी अॅटोमटीक चालवून बघितली त्यामुळे अजून असेल ) पण मागच्या सीटचा लोचा आहे... मागे ३ जण बसणार असतील तर मधल्या माणसाला अज्जिबात नीट बसता येणार नाही SX4 मध्ये. तुझा काय अनुभव आहे? तुला किती मायलेज मिळते सिटी मध्ये?
मामी : व्हेंटो च्या सविस्तर review साठी हे वाचा http://www.team-bhp.com/forum/test-drives-initial-ownership-reports/8715...
मागच्या सीटचा थोडा प्रॉब्लेम
मागच्या सीटचा थोडा प्रॉब्लेम आहे. मध्ये बसणार्यांना थोडं uncomfortable होउ शकतं. पण आमच्या घरात अजून कोणी तक्रार केलेली नाही. मी काही फोरम्सवर लोकांनी कोचिंगवाल्याकडून तो हँडरेस्ट काढून घेतल्याचं वाचलं होतं.
मी सिटीमध्ये चारचाकी फारशी घेउन जात नाही. हायवे वर मला १३-१४ kmpl मिळतं. सिटीमध्ये ११-१२ वगैरे मिळत असावं. खरं सांगायचं तर एकदा गाडी आवडली आणि घेतली की अॅव्हरेजकडं फार बघू नये (उगाच जिवाला त्रास नाही करून घ्यायचा)
सोशल स्टेटसची
सोशल स्टेटसची गरज
----------------------------------------
साजिरा,
वरील क्रायटेरीयाही असतो हे जरा विचित्रच वाटते. म्हणजे आपण कुठली गाडी चालवतो यावर स्टेटस ठरते का इथे? म्हणजे सोशल स्टेटस जपण्यासाठी/किंवा वाढवण्यासाठी २/४/६ लाख रु जास्त घालुन एस एक्स ४ च्या ऐवजी होंडा सिटी/सिविक/अॅकॉर्ड घ्यायची? म्हणजे ह्युंडाई आय १०, मारुती ए स्टार वगैरे घेतली तर लोक बोलणारही नाहीत का आमच्याशी?
असो. चर्चा छान सुरु आहे.
साजिरा, सीटीच्या सर्व
साजिरा,
सीटीच्या सर्व मॉडेल्सना एअर बॅग्ज आहेत.
ईतर लोक्स,
टॉपएण्ड मॉडेल मधे फक्त अलॉय व्हील्स, फॉग लँप्स, आणि क्रोम प्लेटेड हँडल्स आहेत. एव्ह्ड्यासाठी लाखभर रुपये अधिक देणे मलातरी योग्य वाटत नाही. S-MT हे मॉडेल सर्व दृष्टीने उत्तम.
मन्स्मी,
सोशल स्टेटस नाही, पण सीटी ही झीरो मेंटेनंस गाडी आहे. विषेश म्हणजे सीटीचे इंजीन हे १०% इथेनॉल कॉम्प्लायंट आहे. म्हणजे भेसळ युक्त पेट्रोल असेल तरी गाडीच्या परफॉर्मन्सवर काहीच परीणाम होणार नाही. What you buy by paying Rs. 100K more is peace of mind.
किती हायसं वाटतंय सिटी बद्दल
किती हायसं वाटतंय सिटी बद्दल हे सगळं वाचून. १ ऑगस्ट ला आम्ही सिटी S-MT घेतली. नवरा अतिशय भारला होताच, माझा धीर होत नव्हता आमची सेंट्रो सोडून इतकी महाग गाडी घ्यायचा. आमची सिटी ९,६६,००० ऑन रोड मिळाली. अम्हाला पण फक्त कॉस्मेटिक फरक साठी लाखभर रुपये ज्यादा देणे योग्य वाटले नाही.
एवढ्या मोठ्या चर्चेत एक
एवढ्या मोठ्या चर्चेत एक छोटासा मुद्दा मांडत आहे.
मला साधारण ३०~५० हजार पर्यंत एक मारूती ८०० हवी आहे,
प्रॅक्टीस साठी घ्यायचा विचार आहे,
मग पुढच्या वर्षी दिवाळी पर्यंत एखादी चांगली गाडी घ्यावी म्हणतो.
जर कोणाची मारूती ८०० बर्या कंडिशनमधे असेल (१५ वर्षांच्या आतली)
आणि नकोशी झाली असेल तर कृपया कळविणे.
Pages