क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहित शर्माकड गुणवत्तेला कमी नाही पण कुठेतरी बिनसतय त्याच, एकतर पार्ट्या, मजामस्ती कमी मारावी आणि खेळावर १००% लक्ष व डेडीकेशन द्याव.

बाकी सेहवागला शतकापासुन दुर ठेवुन लंकेन पुन्हा एकदा रडीचा डाव खेळलाय (सचिनला पण कटक मध्ये ९६ वर नाबाद ठेवलेल) अशान खेळाच स्पिरीट कमी होत Sad

संगापण बहुतेक फायनल बॉलच्या आधी रणदीवला कोण्या भाषेत ओरडुन ओरडुन तेच सांगत होता बहुतेक, "नो-बॉल टाक रे!!!" Happy

<<बाकी रोहीत, विराट युवकांवर ईथे तोफा डागल्या गेल्या आहेत.>> त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका नाही घेतलेली कुणी. १९ वर्षाखालील संघापासून त्याना आंतरराष्ट्रीय खेळाचा बरासा अनुभव आहे म्हणून त्यांच्याकडून अधिक जबाबदारीने खेळण्याची रास्त अपेक्षा इतकंच. सचिन कोवळ्या वयातच तडक मोठ्या लढाईतच उतरला होता तेव्हा त्याची तुलना इथं तितकीशी औचित्यपूर्ण नाही वाटत.

<<...रणदीव आणि श्रीलंका क्रिकेटने सेहवागची माफी मागितली.>> आत्ताच सौरव गांगुलीची यावरची मुलाखत वाचली. तो म्हणतो २००२मध्ये कँडी येथील कसोटीत तो ९८धावावर असताना श्रीलंकेने मुद्दाम "वाईड फुलटॉस" टाकून भारताला कसोटी जिंकायला देऊन त्याचं शतक हुकवण्यात आलं होतं. तसंच गेल्या वर्षीं कटक येथील एक दिवसीय सामन्यात सचिन ९६वर [१०४ चेंडूत] खेळत असताना मलिंगाने मुद्दाम लेगसाईडला वाईड चेंडू टाकून त्याचं शतक चुकवलं होतं.

इजा बिजा तिजा. आता बास म्हणावं चिडखोर पणा. पण ऑसी पेक्षा चिडके कोणी नाहीत. शेवटचा बॉल चॅपेलच्या टिम ने अंडरआर्म टाकला आहे न्युझिलंड विरुद्ध.

जडेजा हा मॅच हारवणारा प्लेअर आहे, असे माझे मत आहे. त्याला घेण्यात येउ नये. तो नेहमी मार खातो. १० ओव्हर्स ५० -५५ पेक्षा जास्त रन्स आणि बॅटिंगच्या नावाने बोंब. एक वेळ मला घ्या पण तो जडेजा नको!! Happy किंवा १० च प्लेअर ने खेळलेले बरे.

जडेजा हा मॅच हारवणारा प्लेअर आहे >> १००१ टक्के अनुमोदन, ईरफान युसुफ असताना याल घेणं म्हण्जे निम्मी मॅच आधीच हरणं

जडेजा हा मॅच हारवणारा प्लेअर आहे, असे माझे मत आहे. त्याला घेण्यात येउ नये. तो नेहमी मार खातो. १० ओव्हर्स ५० -५५ पेक्षा जास्त रन्स आणि बॅटिंगच्या नावाने बोंब. एक वेळ मला घ्या पण तो जडेजा नको!! किंवा १० च प्लेअर ने खेळलेले बरे.
>>
मोदक...

केवळ सचिन ची बॅट वापरून खेळलं की तेंडुलकर होत नाही हे समजवायला पहिजे जडेजाला कुणीतरी...

युवराजला आत्ता १० वर्षे झाली पदार्पण करून तरीपण मॅच्युअर होत नाहीये तो :-(, पेटला गडी तर क्लिअर टाइमिंगची अप्रतिम मेजवानी मिळते व एखाद्याच्यात किती टॅलेंट असावं याचं आश्चर्य वाटावं असा खेळतो. रोहित शर्मा पण असाच गुणवत्ता असलेला पण संघात स्थान पक्कं करण्यात अपयशी ठरलेला खेळाडू.

>>केवळ सचिन ची बॅट वापरून खेळलं की तेंडुलकर होत नाही हे समजवायला पहिजे जडेजाला कुणीतरी...<< Lol खरयं. जसं गांगुलीच्या संघात दिनेश मोंगियाने स्थान टिकवले होते (काही विशेष न करता) तसेच जडेजा सध्या धोणीच्या संघात आहे.

ही जाडेजाची आकडेवारी. (एकदिवसीय सामने)
फलंदाजी :सामने ३२ ,इनिंग्ज २० ,धावा : ५१८ ,अर्धशतके ४, धावगती : ७८.४८ , सरासरी : ३४.५३
गोलंदाजी इनिंग्ज :३१ बाद : २८ धावा/षटके : ४.८१.
इर्फान पठाण : फलंदाजी सरासरी २२.८० धावगती: ७७.६८ गोलंदाजी : धावा/षटके: ५.२५
युसुफ पठाण : फलंदाजी : सरासरी : २२.११ धावगती: १०३.०१ गोलंदाजी :धावा/षटके : ५.७५

विश्वचषक स्पर्ध भारतीय उपखंडात होणार असल्याने फिरकी गोलंदाजाला नक्कीच जास्त वजन. डावखुरा फिरकी गोलंदाज असल्याने विविधता. सचिन, सेहवाग, रैना, धोनी आणि गरज भासल्यास हरभजन इतके फटकेबाज खेळाडू असताना जडेजाच्या फलंदाजीची गरज भासू नये. फलंदाजी+गोलंदाजी दोन्हीचे मिळून त्याने केलेली कामगिरी सातव्या जागेसाठी नक्कीच विचारार्ह ठरते. आणि नाहीतरी धोनीचा त्याच्यावर विश्वास आहेच. नाहीतर आयपील३ मधे न खेळताही त्याला टी-२० विश्वचषकासाठी घेतले नसते. तो विश्वास त्याने सार्थकी लावावा.

ही जाडेजाची आकडेवारी. (एकदिवसीय सामने)
>>
ही कोणत्या देशांविरुद्ध आहे...??
माझ्यामते जडेजा आणि युसुफ यांचा परफॉर्मन्स हा कमकुवत देशांच्या विरुद्धचा आहे...
इरफाननी बलाढ्य देशांविरुद्धही चांगली कामगिरी केली आहे...
{चॅपेलनी पद्धतशीरपणे त्याच्या बोलिंगची वाट लावली...}
पण तरीही या तिघांमधे तोच उजवा वाटतो...

हर्ष भोगलेचा भारतीय संघ निवडीवरील लेख :
http://www.cricinfo.com/magazine/content/story/472066.html
रोहित शर्मा, रैना यांनी गोलंदाजी सुधारून सातव्या क्रमांकासाठी उमेदवारी द्यावी अशी त्याची एक सूचना.

>>> जसं गांगुलीच्या संघात दिनेश मोंगियाने स्थान टिकवले होते (काही विशेष न करता) तसेच जडेजा सध्या धोणीच्या संघात आहे.

बहुतेक वेळा भारतीय संघातल्या ११ जणात BCCI चा एक जावई तरी असतो. पूर्वी रवी शास्त्री असायचा, नंतर दिनेश मोंगिया आणि आता जडेजा! जडेजाने T20 १-२ सामने आपल्या संथ फलंदाजीने हरून दिले आहेत. रवी शास्त्रिने तर किती सामने हरून दाखविले याची गणतीच नाही. मधे काही काळ विजय भारद्वाज, अरूण भारतीय (बी. अरूण), डोडा गणेश असे नगही होते. फार पूर्वी पार्थसारथी शर्मा, गुलाम परकार, सुरू नायक, नरसिंह राव असे हीरो सुद्धा होते.

>>>>केवळ सचिन ची बॅट वापरून खेळलं की तेंडुलकर होत नाही हे समजवायला पहिजे जडेजाला कुणीतरी...<< खरयं. जसं गांगुलीच्या संघात दिनेश मोंगियाने स्थान टिकवले होते (काही विशेष न करता) तसेच जडेजा सध्या धोणीच्या संघात आहे.

सर्वांन्ना अनुमोदन..
साहेबांची पण कमालच आहे- नविन गोलंदाजाला आपली विकेट देणे अन फ्लॉप फलंदाजांना स्वताची बॅट देणे. (या वयात) शोभतं का हे? Happy
एक एक बॅटी किमान ईथे आम्हाला तरी द्यायच्या..

>>हर्ष भोगलेचा भारतीय संघ निवडीवरील लेख :
http://www.cricinfo.com/magazine/content/story/472066.html
रोहित शर्मा, रैना यांनी गोलंदाजी सुधारून सातव्या क्रमांकासाठी उमेदवारी द्यावी अशी त्याची एक सूचना.

काहीच्या काही.. रैना सातव्या क्र. वर? किमान चौथ्या क्र. वर आला तर तो नक्कीच मॅच विनर आहे अन्यथा कुजेल. रोहीत शर्मा देखिल ५-६ क्र. चा फलंदाज आहे असे मला वाटते. कारण ७ क्र. वर एकदीवसीय मध्ये येणार्‍याला सहसा सेट व्हायला वेळ नसतो. रैना, शर्मा दोघेही किमान १-२ षटके घेतात सेट व्हायला. युसूफ मात्र क्र. ७ साठी उपयुक्त वाटतो. कारण फारतर एखादे षटक सेट व्हायला घेतले तरी त्याने नंतर फलंदाजी केली तर २००% वसूल असते (his strike rate above).
सेहवाग, रैना, युवी, युसूफ हे मुळात अष्टपैलू आहेत. (युसूफ अन युवी अलिकडे फ्लॉप झाले असले तरी)
ईरफान च्या गोलंदाजीची धार पूर्वीसारखी असती तर ह्या चर्चेही गरजच नव्हती. असो.

>>मास्तुरे हा नवीन 'जावईशोध' लागला आज मला , आपल्या संघात कसले कसले नग भरलेले एके काळी!
अरे होय ना.. आणि अशा नगांबरोबर अनेक सामने सचिन ला खेळावे लागले. Sad

आणि अशा नगांबरोबर अनेक सामने सचिन ला खेळावे लागले>>> आणि दुर्दैवाने त्याच वेळेस तो बहुतेक कर्णधार पण होत संघाचा.. बिचारा...

सातव्या क्रमांकावर म्हणजे ५ फलंदाज, एक यष्टीरक्षक घेतल्यावर राहिलेल्या फलंदाजाच्या जागेवर. फलंदाजीचा क्रम नव्हे. चारच पूर्णवेळ गोलंदाज खेळवायचे हे गृहितक.

आपल्याच उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर सामने असल्याने सात फलंदाज व चार नियमित गोलंदाज पुरेसे आहेत हे ऐकायला बरं वाटत असलं तरी त्यात ग्यानबाची मेख आहेच. विश्वचषकासाठी येणारा प्रत्येक संघ इतर स्पर्धकांचा व येथील खेळपट्ट्यांचा अभ्यास करूनच येणार व तशी व्युहरचनाही करणार. चेंडू स्विंग होत नसेल [व आपल्याकडे तो तसा होणं दुर्मीळच !], तर आपले दोनही, निदान एक तरी, सलामीचे गोलंदाज ठरवून आक्रमक फलंदाजीचे लक्ष्य होणारच. खेळपट्टी अगदीच फिरकीला साथ देणारी एकांगी नसेल [अशी एकांगी असणं हल्ली आपल्यालाही महाग पडतं] तर एका तरी फिरकी गोलंदाजाला विरोधी संघाला धोका पत्करूनही झोडावं लागणारच. त्यामुळे आपल्या चार नियमित गोलंदाजांपैकी दोघावर तरी विरोधी संघ तुटून पडणं अपरिहार्य आहे व असा हल्ला खात्रीने परतवून लावणारे उच्चतम दर्जाचे गोलंदाज सध्या तरी आपल्याकडे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच, आपण सहा फलंदाज उरलेली दहा षटकं आपसात वाटून टाकतील असंही बाळबोध गणित मांडतोय ! आणि या सर्वाचं अधिष्ठान काय तर आपले सात फलंदाज प्रत्येक सामन्यात, कसल्याही खेळपट्टीवर, कोणाही विरुद्ध कोणतही धावांच लक्ष्य सहज पार करूं शकतील !!
मला तरी हे तर्कशुद्ध वाटत नाही. हुकमी ऑलराऊंडर्सच्या अभावी, प्रत्येक खेळपट्टीचं स्वरूप व विरुद्ध संघाची फलंदाजी/गोलंदाजीची कुवत पाहूनच संघाचं काँम्पोझिशन ठरवणंच आपल्या हिताचं ठरावं.

पण गांगुलीच्या काळापासून (तरी) हेच चाललेय. भारतीय संघ कसोटीत ५ गोलंदाज घेऊन खेळतो का तर एकदिवसीय सामन्यात खेळेल?

<<भारतीय संघ कसोटीत ५ गोलंदाज घेऊन खेळतो का तर एकदिवसीय सामन्यात खेळेल?>> मयेकरजी, भारतीय संघाने १९८२ नंतर विश्वचषक जिंकला नाही मग आता का जिंकेल, असंही कुणी म्हटलं तर ! आपल्याला प्रामणिकपणे वाटतं, तें आपण मांडावं; माझंच बरोबर असा माझा दुराग्रह मुळीच नाही. पण, सात फलंदाजापैकी ३ ते ४ जण सतत दुखापतग्रस्त असणार्‍या किंवा कामगिरीत सातत्य नसणार्‍या फलंदाजीच्या फळीला अभेद्य व अजिंक्य समजून संघ निवड करणं धोक्याचं आहे, असं अजूनही मनापासून मला वाटतं. ५० षटकात ३५० धावा काढण्याची या फलंदाजीची कुवत असेलही पण कोणत्याही संघाविरुद्ध, कोणत्याही खेळपट्टीवर त्यानी तसं करण्याची शाश्वती मात्र नाही; म्हणून विरुद्ध संघाला शक्यतो २५०च्या आसपास रोखण्याचीही तरतूद करणं आपलं शहाणपणाचं !!

भाउ मस्त मांडलत. पण मयेकर म्हणतात ते ही चुक नाही, आपण कायम ७ फलंदाज घेउन खेळलो आहोत. व्यक्तीशः मला आपण किती करु शकू ह्यापेक्षा विरोधी पक्षाला किती मध्ये थांबवू ह्यात जास्त रस आहे. म्हणून भाऊंचे बरोबर वाटते.

सेहवागने मागे एक विधान केले होते, बांग्लादेश ही चांगली टेस्ट टीम नाही कारण ते २० विकेट घेऊ शकत नाही, एक कसलेला, धुरंधर फलंदाज असे मत मांडतो तेंव्हा त्यातील तथ्य लक्षात यावे. विकेट घेऊन रन्स थांबवने फार महत्वाचे, आता दिवसही कमी राहिलेत.

हे नेमकं परत २००७ सारखं झालं आहे. त्या आधी दिड-दोन वर्षे आपली टीम एकदम फॉर्म मध्ये होती, आणि अचानक ८-१० महिने आधीपासून आपली वाट लागायला सुरुवात झाली.

केदार पण सुदैवाने इतर संघांचीही तीच स्थिती आहे. इंग्लंड चक्क टी-२० जिंकला. पाक ऑसीला हरवू शकतो. आपण लंगड्या/वासरू गोलंदाजांना घेऊन लंकेला कसोटीत रोखले, वन डेत पावणेदोनशेत गुंडाळले. आफ्रिकेचा रंग कळत नाही, पण भारतीय खेळपट्ट्यांवर आणि हवामानात त्यांचे फार चालू नये. आणि पुन्हा वर्ल्ड कपचा जिंक्स आहेच. ऑसीज फेव्हरिट असलेला वर्ल्ड कप बघायचा कंटाळा आलाय. त्यांची पण गोलंदाजी भारतात अनटेस्टेड आहे. पाँटिंगला नारळ द्यायला चांगला मुहूर्त आहे.

हो तुम्ही म्हणता तसे ऑसी मालिकेत काय होते ते महत्वाचे आहेच. पण वर सचिन, गंभिर, सेहवाग, घोणी, रैना, युवी असताना आणखी किती बॅटसमन खेळवणार? भज्जी कन्फर्म आहेच तो थोडेफार रन्स काढतो, उरलेल्यांपैकी प्रविण कुमार ज्यात फलंदाजी करण्याची क्षमता आहे तर आता प्रविण कुमार सोडून फास्ट बोलर्स मध्ये झहिर मस्ट Happy आणखी एक डेडीकेटड स्पिनर व उरलेले कोणीही बॉलर्सच घ्यावेत, नेहरा त्यात असणार्, परेशानी इशांतची आहे. जडेजा अवसानघातकी आहे, त्याने हातातल्या मॅच घातल्या आहेत. इरफानने फलंदाजीकडे लक्ष दिल्यामुळे गोलंदाजीची वाट लागली आहे, धाकटा पठाण फक्त गल्ली गोलंदाजीवर शतके मारतो, त्याचा धोणीने बॅटींग ऐवजी गोलंदाजीसाठीच वापर केलेला पाहिला. (बॅटिंग मध्ये फार चालत नाहीये तो.)

एकुण थोडे अवघड झाले आहे. सेहवाग, सच्या आणि गंभिर ह्यापैकी एकाचा जरी फॉर्म गेला तरी आपली वाट लागू शकते. त्यातल्या त्यात सेहवागचा भरवसा देता येणे अवघड आहे. (ऑफकोर्स त्याने तसेच राहावे. Happy ) वर विकेट गेल्यावर धोणी गिअर शिफ्ट करतो पण करे पर्यंत इतका हळू खेळतो की ज्याच नाव ते, अश्यात कसल्या कसल्या शॉट मारुन तो आउट झाला आहे, ते आठवलं तरी नको वाटतं.

वर विकेट गेल्यावर धोणी गिअर शिफ्ट करतो पण करे पर्यंत इतका हळू खेळतो की ज्याच नाव ते, अश्यात कसल्या कसल्या शॉट मारुन तो आउट झाला आहे, ते आठवलं तरी नको वाटतं.
>>
धोणीला गेल्या काही मोसमात हे गिअर शिफ्टिंग फार कठीण जातंय...

<<सेहवाग, सच्या आणि गंभिर ह्यापैकी एकाचा जरी फॉर्म गेला तरी आपली वाट लागू शकते.>> केदारजी, मला वाटतं या भितीपोटीच आपण संघात सात फलंदाज असणं गॄहीत धरत आलो. दुखापती, सातत्य यामुळे कामगिरीचा आलेख वेडावाकडा असला तरीही आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ७-८ आक्रमक फलंदाज आहेत हे निर्विवाद. जर फॉर्म असेल तर त्यातले चारही कोणत्याही संघाविरुद्ध [५० षटकांच्या सामन्यात] पुरेसे आहेत व फॉर्म नसेल तर ते सात- आठ घेऊनही फरक पडणार नाही. किंबहुना, मला तर असं जाणवतं कीं जेवढे अधिक फलंदाज तितकी जबाबदारीची जाणीव विभागली जातेय व त्याचाच परिणाम संघाच्या एकंदर कामगिरीवर होतोय. आपल्याकडे असलेल्या सहा प्रतिभावान, फीट व फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजावर बिनधास्तपणे फलंदाजीची धुरा सोपवणं हा त्यावर उपाय असूं शकतो. प्रत्येक सामन्यासाठी कोणत्या सहा फलंदाजाना संघात घ्यायचं, याबाबत लवचिकताही असावी व हे आधीच सर्व फलंदाजाना स्पष्ट करण्यात यावं. संघात येण्यासाठी फलंदाजांवर गोलंदाजी सुधारण्याचं दडपण आणण्यापेक्षा [हर्ष भोगलेंची सूचना], गोलंदाजाना फलंदाजी ही सुद्धा त्यांचीही जबाबदारी आहे, ही समज देणं व तसे प्रयत्न करायला लावणं मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी अधिक लाभदायक ठरेल.
मी तज्ञ असल्याचा फार आव तर आणत नाही आहे ना !

नाही हो. तज्ञ कोणीच नाही, नाहीतर भारताकडून खेळलो नसतो का? जडेजाला शिव्या दिल्यातरी त्याने ते अचिव्ह केले आहे.

आणि भाऊ त्याच कारणामुळे व्यक्तीशः मला तुमचे मत पटले, ७ बॅट्समन असूनही ८३च काढले, अन वरचे चार फॉर्मात असले की ३०० वर ४ असाही स्कोअर आहे, ६ बॅटसमन + भज्जी + प्रविणकुमार बास असे मलाही वाटते, थोड्या टॅक्टीक्स चेंज करायला हव्यात. आणि पिच पाहून बदल करता येतातच की. Happy

माझ्या मते विश्वचषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे असावा -

(१) सेहवाग
(२) सचिन
(३) गंभीर
(४) द्रविड
(५) रैना
(६) युवराज
(७) धोनी
(८) भज्जी
(९) प्रवीणकुमार
(१०) झहीर
(११) नेहरा
(१२) ईशांत
(१३) प्रग्यान ओझा
(१४) रॉबिन उथप्पा
(१५) मुनाफ
(१६) कोहली किंवा रोहीत शर्मा

सर्वांची मते पटतायत. मला वाटतं सौ बात की एक बातः
आपण आधी फलंदाजी केली तरच आपल्याला जिंकायला अधिक वाव आहे.
कारण निदान २७५+ करून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणुन तरी विकेट्स मिळवता येतात. अन्यथा आपल्या गोलंदाजांचा सद्ध्याचा फॉर्म, वेग, बळ अन मानसिकता अशी आहे की हेडन ने पुनरागमन केलं तर तोही पुन्हा डोळे झाकून कुटून काढेल.
थोडक्यात दोन्ही केस मध्ये- आधी फलंदाजी घ्या वा गोलंदाजी, आपली मदार फलंदाजी वरच आहे (आजवर तेच आहे). मग ७ फलंदाज घेतल्यावर ऊरलेल्या ४ जागा कोण भरतो यात मला तरी फार काही विशेष फरक दिसत नाही.
हा विश्वचषक आशिया मध्ये होणार हे खरं तर एका अर्थी वाईट आहे- बाहेर आपली गोलंदाजी अधिक चालते (फलंदाजी तर चालतेच!).

<हा विश्वचषक आशिया मध्ये होणार हे खरं तर एका अर्थी वाईट आहे- बाहेर आपली गोलंदाजी अधिक चालते (फलंदाजी तर चालतेच!).>

फक्त गोलंदाजी, फलंदाजी चांगली व्हावी म्हणून परदेशात जाणे बरोबर नाही. पैसे भारतातच जास्त मिळतात. शिवाय आय पी एल प्रमाणेच करमाफी दिली तर जनतेला तिकीटे स्वस्तात मि़ळतील. मग जास्त लोक, जास्त पैसा. अर्थात् शरद पवारचे पोट फुटेल की काय अशी भीति वाटते, पण तो आजकाल पोटा ऐवजी कुठे तरी दुसरीकडे लपवून ठेवत असेल. म्हणून बसायला त्याला तीन किंवा चार खुर्च्यांइतकी मोठी खुर्ची लागते असे म्हणतात.
Light 1 Happy

Pages