Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
युवराज जखमी झाल्यामुळे बाहेर.
युवराज जखमी झाल्यामुळे बाहेर. गंभीर आधीच जखमी झालाय. झहीर फारच क्वचित सलग ३-४ सामने खेळतो. एक्-दोन सामने खेळले की त्याचं काहितरी लचकतं आणि पुढचे सहा महिने तो बाहेर असतो.
विश्वचषकापर्यंत भारत अजून ८ कसोटी व २५ एकदिवसीय सामने खेळणार आहे म्हणे. तोपर्यंत निम्मे खेळाडू तरी जायबंदी झाले असतील. विश्वचषकाच्या किमान २-३ महिने आधीपासून भारताने सामने टाळावे.
बीसीसीआय प्रेस
बीसीसीआय प्रेस कॉन्फरन्स
सरावाच्या खेळपट्टीवर गवत वाढलं होतं हे खरंय. पण त्यातील डांसाना घाबरून सराव सोडून धोनी पळाला होता का याची चौकशी करावी लागेल; युवराजच्या बाबतीतही "डेंग्यू" आहे कीं "डच्चू", ह्याही प्रश्नाचं उत्तर आत्ताच नाही देता येणार !
भाउ, मस्त.
भाउ, मस्त.
भारतीय संघाचे अभिनंदन.
भारतीय संघाचे अभिनंदन. सेहवाग! बिचार्याला शंभरी पुरी करू दिली नाही?! मुद्दाम?!
पण आता उदंड बोनस पॉइंट्स मिळणार?
सेहवागची बॅट तळपली .
सेहवागची बॅट तळपली .
भारताच्या World Cup साठी प्रचंड चांगला शुभशकून .
रणदीव उगाचच मनातून उतरला . चांगला वाट्त होता
बिचार्याला शंभरी पुरी करू
बिचार्याला शंभरी पुरी करू दिली नाही?! मुद्दाम?! >> हो. मुद्दामच. जिथे नेहेमी फ्रंटफुट पडतो तिथे या माणसाचा बॅकफुट पडला (पाडला). वाईड तरी टाकायचा. शंका आली नसती. त्याआधी ४ रन्स बाय.
केदार , नात्या, नो बॉल च्या
केदार , नात्या,
नो बॉल च्या आधी दोन यस बॉल टाकले होते ज्यावर सेहवागला रन काढता आली नाही. त्यामूळे रणदीवचा दोष म्हणता येणार नाही.
आज खूप दिवसांनी दिनेश कार्तीकची बॅटींग पाहिली. धन्य झालो. ४ वेळेस इनसाईड एज ने आउट होता होता वाचला. बॅट सरळ खाली न आणता अॅक्रॉस आणली तर काय होणार. आणि रन काढल्या १०. त्रास होतो अगदी. दुसरा कोणी नाही का. रॉबिनने कुणाचे घोडे मारलेय न कळे. अगदी द्रवीड सुद्धा चालेल (सेहवाग , तेंड्यापैकी एक जण नसल्यास.)
अगदी द्रवीड सुद्धा चालेल >>
अगदी द्रवीड सुद्धा चालेल >> ईतका गयागुजरा नाही हो द्रविड
खरंय बिचार्याला चान्स द्यायला हवा वन-डेत
नो बॉल च्या आधी दोन यस बॉल
नो बॉल च्या आधी दोन यस बॉल टाकले होते ज्यावर सेहवागला रन काढता आली नाही. >> मॅचमध्ये पुर्ण १४ ओवर्स शिल्लक होत्या. त्यामुळे त्या दोन बॉलवर रन काढली नाही/काढता आली नाही हा मुद्दा होत नाही.
हा साधासुधा नो बॉल नव्हता तर एक फूट बाहेर होता. त्यामुळे हे मुद्दाम केले होते हे उघड आहे. तसेच श्रीलंकेने हे पुर्वीही केले आहे.
गौतम - माफी. युवराज व बाकी
गौतम - माफी.
युवराज व बाकी नविन गँग चा फॉर्म पहाता द्रविड व लक्ष्मण व डे च्या टीम मधे असले तर फायदाच होईल. At this age also they have something to re prove and are hungry.
नात्या > त्या दोन यस बॉल वर
नात्या > त्या दोन यस बॉल वर सेहवाग ला १०० करता आल्या असत्या. पण त्याने केल्या नाहीत. मग उगाच रणदीवला दोष देण्यात अर्थ नाही.
युवराज व बाकी नविन गँग चा
युवराज व बाकी नविन गँग चा फॉर्म पहाता द्रविड व लक्ष्मण व डे च्या टीम मधे असले तर फायदाच होईल. At this age also they have something to re prove and are hungry.
>>अनुमोदन!!! नुसते यंगस्टर असुन चालणार नाही, अनुभवाची शिदोरी हवीच्...तरच यंगस्टरपण डोक्यात हवा न जाऊ देता कंसिस्टंटली कस खेळायच ते शिकु शकतील.
तरच यंगस्टरपण डोक्यात हवा न
तरच यंगस्टरपण डोक्यात हवा न जाऊ देता कंसिस्टंटली कस खेळायच ते शिकु शकतील.>>न खेळता ?
हर्षा भोगलेचा आजचा एक
हर्षा भोगलेचा आजचा एक ट्विट
"If you think Randiv bowled that no-ball by mistake you will believe there is peace in Kashmir!"
न खेळता ? >> हे लिहिलच नाही
न खेळता ? >> हे लिहिलच नाही हो
नव्यांनी खेळायला तर पाहिजेच पण अनुभवी प्लेयरसोबत खेळुन लवकर तयार होतील.
नव्यांनी खेळायला तर पाहिजेच
नव्यांनी खेळायला तर पाहिजेच पण अनुभवी प्लेयरसोबत खेळुन लवकर तयार होतील.>>सेहवाग्, धोनी, युवराज, तेंडूलकर हे अनुभवी खेळाडू चालणार नाहित का ? कि द्रविड नि लक्ष्मणच हवेत ? ह्या दोघांना घ्यायचे तर मग कोणाच्या जागेवर घ्यायचे ? (कार्थिकला सोडून द्या) तेंडल्या, गंभीर, सेह्वाग, रैना, तुवराज, धोनी च्या ६ मधे नवे नि अजुन दोन जुने कसे बसवायचे World Cup साठी ?
कि द्रविड नि लक्ष्मणच हवेत ?
कि द्रविड नि लक्ष्मणच हवेत ? >> लक्ष्मणचा वर उल्लेखच केला नाहे वन्डे साठी, पण द्रविडला रोहित शर्मा, जडेजा या महान शिलेदारांच्यापैकी एकाच्या जागी घेतल तरी हरकत नाही, निदान वर्ल्डकपपुरत तरी.
पण द्रविडला रोहित शर्मा,
पण द्रविडला रोहित शर्मा, जडेजा या महान शिलेदारांच्यापैकी एकाच्या जागी घेतल तरी हरकत नाही, निदान वर्ल्डकपपुरत तरी.>>मूळात शर्मा टीममधे असण्याचे चान्सेस फार दिसत नाहित जर सगळे फिट असतील तर. जडेजा ला द्रविडने replace केले तर so called all round spot चे काय ? द्रविडने balling केल्याला ६-७ वर्षे तरी होऊन गेलीत. द्रविडला बघून शर्मा किंवा कोहली सुधारतील ह्या वेड्या अपेक्षा. दोन वर्षे ते gilchrist नि kallis, कुम्बळे बरोबर आहेत हो, काहि फरक दिसतोय का ?
मूळात पहिले ६ जण जवळजवळ फिक्स्ड आहेत तेंव्हा द्रविडला कसे घेणार ? सातवा म्हणून घ्यायचा तर रैना, सेहवाग नि युवराजमधे १०-१४ overs काढता आल्या पाहिजेत (best case scenario मधे). कठीण आहे हो.
मूळात पहिले ६ जण जवळजवळ
मूळात पहिले ६ जण जवळजवळ फिक्स्ड आहेत >> हे एकदम मान्य, पण ऐनवेळी यातील एकजण (जास्तसुध्दा) तरी फॉर्म, फिटनेस मुळे बसु शकतो. तर वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या टुर्नामेंटलातरी नवशिक्यापेक्षा अनुभवाला प्राधान्य दिल जाव...तसच द्रविड विकेट कीपींग ऑलराऊंडर म्हणुन पण चालु शकतो.
द्रविडने balling केल्याला ६-७ वर्षे तरी होऊन गेलीत. >> हे नाही पटल...
पण ऐनवेळी यातील एकजण
पण ऐनवेळी यातील एकजण (जास्तसुध्दा) तरी फॉर्म, फिटनेस मुळे बसु शकतो. तर वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या टुर्नामेंटलातरी नवशिक्यापेक्षा अनुभवाला प्राधान्य दिल जाव...>. T20 World Cup कोणी जिंकला होता ?
तसच द्रविड विकेट कीपींग ऑलराऊंडर म्हणुन पण चालु शकतो.>>नक्कीच पण धोनीला बसवायचे का मग ? जर मूळात द्रविड ज्यांची replacement म्हणून येणार ते थोडाबहुत हात फिरवू शकतात. द्रविड नाही. द्रविड सध्यातरी balling करत नाही. त्याचा किपिंग करण्याकडे preference नव्ह्ता.?त्याच्या form बद्दल पण प्रश्नचिन्हे आहेत्च. .. शर्मा किंवा कोहलीला सध्या पर्याय नाहि दिसत
T20 World Cup कोणी जिंकला
T20 World Cup कोणी जिंकला होता ? >> २० ओवर किल्ला लढवण विरुध्द ५० ओवर, बराच फरक आहे.
यात हात फिरवण म्हणाल तर बाकीचे ६ मधले किमान ४ तरी करु शकतात ( सेहवाग, धोनी, रैना, युवी ) पण मधल्या ईनींग बिल्डींग ओवर खेळायच टेंपरमेंट ईतका नाही चांगला यांच.
द्रविडचा बॅटींग फॉर्म नुस्ता १ टेस्ट सेरीज नाही खेळला म्हणुन संपला असतर नाही??
शर्मा किंवा कोहलीला सध्या पर्याय नाहि दिसत >> कोहलीला म्हणु शकतो, पण हा शर्मा बिचारा वीबी सेरीस नंतर
आयपीएल सोडुन कधी खेळलाय (झिंम्बाब्वे सेरीज २ सलग शतके, तेही दुय्यम टीम विरुध्द). एवढ्या खराब फॉर्म मध्ये द्रविड खेळला असता सलग... तर त्याला ३-४ वर्षापुर्वीच हॉल ऑफ फेम मध्ये न्याव लागल असत. पण त्याच्या कंसिस्टन्सीमुळ अजुन टिकलाय तो.
काल कोहली व शर्मा ज्या
काल कोहली व शर्मा ज्या तर्हेने बाद झाले [शर्माच्या बाबतीत निर्णय संशयास्पद असूनही] त्यात अक्षम्य बेजबाबदारी होती, असं वाटतं. त्यानी संघाला ३२-३ ह्या स्कोअरवर हरण्याच्याच वाटेवर नेवून ठेवलं होतं. हे दोघेही तसे नवोदित तर नक्कीच नाहीत व त्याना साहेब, द्रविड व लक्ष्मण या मॉडेलना जवळून बघण्याची खूप संधी मिळाली आहे. पण शेवटी या तरूण खेळाडूंना घेऊनच पुढे जायचं असल्याने, केवळ विश्वचषकासाठीच द्रविड,लक्ष्मण याना पुन्हा संघात आणणं हे कच्चं "पॅचवर्क" वाटतं; शिवाय, १]एक दिवसीय सामन्यांच्या संघात यामुळे आतां विसंवाद निर्माण होण्याचीच शक्यता अधिक वाटते [द्रविड तर कसोटी संघातही उपरा असल्यासारखा जाणवतो, यावरही इथेच चर्चाही झालीय] व २] "आऊटफील्ड" मधील क्षेत्ररक्षणावर त्यांच्या संघात येण्याने निश्चितच परिणाम होईल.
म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं कीं १] विश्वचषकाच्या संभाव्य संघात बदल करायचेच तर ते लवकरात लवकर करावे [कींबहुना, याला आधीच उशीर झाला आहे !] व २] बदलासाठी निवृतिच्या उंबरठ्यावरच्या खेळाडूंचा [त्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर असूनही] विचार न करता, नवीन प्रतिभावान व "डेडिकेटेड" खेळाडूंचाच विचार व्हावा; अगदी अनुभवाचीच गरज असेल तर सध्याच्या फॉर्मचा विचार करून ज्येष्ठतेत कैफच्या आसपास असलेल्या खेळाडूंचाच विचार व्हावा.
द्रविड सुद्धा चालेल अस मी
द्रविड सुद्धा चालेल अस मी सुरूवातीला म्हणल ते फ्रस्ट्रेशन म्हणून.
कधी ही कार्टी घेणार जबाबदारी.? युवराज आणि रोहीत शर्मा स्वतःकडे असलेल्या गुणवत्तेला न्याय देत नाहीत. दिनेश ची लायकी नाही. सौरभ तिवारीला चान्स नाही.
माझ्यामते, सचिन, वीरू, रैना आणि धोनी येवढेच आत्ताच्या घडीला नक्की आहेत. बाकी तीन जागा मोकळ्या आहेत.
इरफान फिट असेल तर त्याला ताबडतोप संधी देण चालू केल पाहिजे.
पाचवा बोलर म्हणून सेहवाग, रैना व तेंडू यांनीच कामगिरी करायची अस ठरवल पाहिजे व त्यावर प्रयास घेतले पाहिजेत.
<<पाचवा बोलर म्हणून सेहवाग,
<<पाचवा बोलर म्हणून सेहवाग, रैना व तेंडू यांनीच कामगिरी करायची अस ठरवल पाहिजे >> कदाचित साहेब विश्वचषकातल्या गोलंदाजीसाठीच हाताच्या खांद्याची काळजी घेत असावेत !
"सचिन, वीरू, रैना आणि धोनी
"सचिन, वीरू, रैना आणि धोनी येवढेच आत्ताच्या घडीला नक्की आहेत"
गंभीर नाही का? त्याने जबाबदारीची जाण पण दाखवलीय. त्याचा पर्पल पॅच आयपीएलच्या आधी संपला. पुन्हा फॉर्मात यायला हवाय.
फलंदाजीपेक्षा खरी बोंब गोलंदाजीत आहे.
...रणदीव आणि श्रीलंका
...रणदीव आणि श्रीलंका क्रिकेटने सेहवागची माफी मागितली.
http://www.thehindu.com/sport/cricket/article575792.ece
यस भरत, गंभिर ची जागा नक्की.
यस भरत, गंभिर ची जागा नक्की. तरी मला वाटतच होत काही तरी चुकतय. म्हणजे हे पाचही जण फिट असले तर दोन जागांसाठी चुरस आहे.
गोलंदाजीत दर्जापेक्षा फिटनेस चा प्रॉब्लेम अधिक आहे.
ईरफान च्या आधी युसूफ पठाण ला
ईरफान च्या आधी युसूफ पठाण ला संधी मिळेल बहुतेक. तो एकदा लागला तर फलंदाजीत सेहवाग सारखाच स्फोटक आहे. गोलंदाजी अन क्षेत्ररक्षण देखिल चांगले आहे.
wc साठी सर्व फिट असतीलच. सघ आधीच गारद झाला तर कुणितरी दुखरा खांदा, लचकलेला स्नायू वगैरे घेवून खेळले अशा बातम्या मागाहून बाहेर येतील
तेव्हा "फिट" संघ असा असेलः
गंभीर, वीरू, सचिन, रैना, युवी, धोणी, युसूफ, भज्जी, झहीर*, नेहरा*, ईशांत*
१२-१५ खेळाडू: मुनाफ, जडेजा, प्रग्यान, प्रविण कुमार
वैयक्तीक मला एकदिवसीय मध्ये ईशांत पेक्षा प्रविण कुमार अधिक उपयुक्त वाटतो.
*: फिट नसतील तर प्रविण, मुनाफ, जडेजा ला संधी आहे
युसुफ पठाण अत्यंत बेभरवशाचा
युसुफ पठाण अत्यंत बेभरवशाचा ठरल्यानेच जाडेजाला आजमावण्यात येत आहे.
>>युसुफ पठाण अत्यंत बेभरवशाचा
>>युसुफ पठाण अत्यंत बेभरवशाचा ठरल्यानेच जाडेजाला आजमावण्यात येत आहे.
त्यापेक्षा युसूफ ला डवखुरा खेळवून आजमावता आले असते तरी फायद्यात पडले असते.
त्यापेक्षा द्रविड सुध्धा चालेल. अरेरे काय ही वेळ यावी द्रविड वर. तो बहुतेक ही ऑफर घेणार नाही!
जडेजा संघात का आहे याचं ऊत्तर निवड(क) समितीच देवू शकते. माझ्या मते तो "फीट" आहे.
बाकी रोहीत, विराट युवकांवर ईथे तोफा डागल्या गेल्या आहेत. भावना समजू शकतो, तरिही हे लक्षात घ्यायला हवे की सचिन देखिल नविन होता तेव्हा अन पहिली काही वर्षे २५-४० करून बाद होत असे. याचे कारण त्याची मानसिकता फटके खेळण्याची होती, तग धरून ऊभे राहण्याची नव्हे. कालौघात जस जसा तो मॅचुअर होत गेला तसे तग धरणे अन फटके खेळणे दोन्ही जमू लागले.
विराट, रोहीत यांकडे गुणवत्ता आहे निश्चीत, फक्त अजून ते परीपक्व झालेले नाहीत. लवकरच त्यांना।इ जबाबदारीने फलंदाजी करण्याचे वैयक्तीक अन सांघिक फायदे लक्षात येतीलच.
**************************************************
काल सामना न पाहिल्याने ते सेहवाग प्रकरण मिसलं.. पण लंकेने अधिकृत माफीनामा दिला म्हणजे मुद्दामून नो बॉल टाकला असे समजायला हरकत नाही. अर्थात त्या एका धावेसाठी/शतकासाठी सेहवाग हळहळला असेल तर मला नवल वाटेल, किंव्वा ९९ वर विकेट फेकण्याची कसोटीमधील चूक त्याच्या जिव्हारी लागली असावी असे म्हणुयात. तसे असेल तर चांगलेच आहे- सेहवाग सारखा माणूस असा एक एक धावेसाठी हिरमुसला होवू लागला तर प्रतीस्पर्धी गोलंदाजांचे देव रक्षण करो!
Pages