Submitted by अभय आर्वीकर on 14 August, 2010 - 15:53
गगनावरी तिरंगा ....!!
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
गंगाधर मुटे
................................................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भारतमाता की जय !
भारतमाता की जय !
कविता चांगली आहे.
कविता चांगली आहे.
खूप आवडली!
खूप आवडली!
नतमस्तक, तिरंग्यापुढे आणि
नतमस्तक, तिरंग्यापुढे आणि आपल्या प्रतिभेपुढे
-हरीश |
वा ! आल्या आल्या
वा ! आल्या आल्या राष्ट्रध्वजाच दर्शन घडल .कविता पण छान.
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली.
आवडली.
छान!
छान!
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान
ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!!
आवडली....!!:)
मुटे सर, एकदम सुंदर. खूप
मुटे सर, एकदम सुंदर. खूप आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त एकच सुधारणा अपेक्षित....
"ब्रम्हस्थान" आणि "ब्रम्हपुत्रा" यातला "ब्रम्ह " हा शब्द "ब्रह्म " असा लिहावा.
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान कविता. मंदार सांगितलेला
छान कविता.
मंदार सांगितलेला ब्रह्म करून घ्यावा.
वाह ! झंडा उंचा रहे हमारा !
वाह !
झंडा उंचा रहे हमारा !
प्रतिसादाबद्दल आभारी आहे
प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हबाजी,मंदारजी बदल केलाय. धन्यवाद.
वंदे मातरम्
वंदे मातरम्
तथास्तु!
तथास्तु!
अगदी अगदी... तथास्तु !!!! जय
अगदी अगदी... तथास्तु !!!!
जय हो !!!
Vande Mataram
Vande Mataram
असेच होवो.... तथास्तू...!
असेच होवो....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तथास्तू...! आवडली हे सांगणे नलगे
छान आहे.
छान आहे.
भारतमाता की
भारतमाता की जय...!
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो...
वंदे मातरम. कविता सुंदरम.
वंदे मातरम. कविता सुंदरम.
भारतमाता की
भारतमाता की जय...!
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो...!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो...
------------------------