पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा,

तुमचे अनुभव, मत वा विचार बरोबर असतीलही. शेवटी घर घेणे हे एक मोठे प्रॉजेक्ट आहे. माझा अनुभव मी आधी लिहीला आहेच (घरखुळ). पण काही मुद्दे या वरील चर्चेच्या अनुशंगाने स्पष्ट करू ईच्छीतो:

>>>> काहीही झालं तरी रहाणार्‍या माणसाला त्रासच ना म्हणजे? आणि भारतात येणार येणार म्हटलं म्हणजे लाईन किती वर्षात येईल ह्याची काही गॅरंटी नसते असा माझा अनुभव आहे..
welcome back! Happy

>>आणि ते ही, 'मी ऐकलं आहे' असं लिहून
ऐकीव माहितीवर ईतके महत्वाचे निर्णय घेवू नयेत. त्यापेक्षा तिथे जे राहत आहेत त्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरतील. ब्लॉग वर शिव्या देणारे अधिक असतीलही पण ४०००+ घरे असलेल्या कॉम्प्लेक्स मधिल प्रातिनिधीक अनुभव काय हे विचारात घ्यावे लागेल. ऑरगॅनिक व इनऑर्गॅनिक वगैरे ऐकायला छान आहे. भारतात/निदान मुंबई, पुणे, ठाणे साकह्या शहरात त्याने फारसा फरक पडत नाही. (पुण्यात ३६०० चा रेट फार तर ३४००-३२०० वर येईल ईतकच.) आपली लोकसंख्या/गरज्/आणि इकोनॉमी सुध्धा वाढणारच आहे तेव्हा चिंता नसावी. बाकी कंस्ट्रक्शन वगैरे चा त्रास म्हणाल तर तो शहरात केव्हाही अगदी कुठेही अनुभवास येवू शकतो. you have to live with it.

मी वैयक्तीक १५+ वर्षे या व्यवसायाशी निगडीत असल्याने बरेच निकष, ओळखी, तांत्रिक बाबी, वगैरे तपासून घेवून तिथे घर घेतले. ("घरखुळ" Happy ) आणि एखाद्याने सल्ला विचारलाच तर मला जे योग्य वाटले तेव्हडेच सांगेन, that does not mean it works for other person, as everyone has different priority, constraints, and perspective.
असो. शेवटी तुम्हाला काय पटते त्यावर तुमचा निर्णय अवलंबून असतो. माझ्या तुटपुंज्या अनुभवावरून एव्ह्डेच म्हणेनः
१. सर्व प्रथम हे निश्चीत करा की- घर घ्यायच ते रहायला (१०+ वर्षे किमान), का भाड्याने द्यायला, का ईंवेस्ट्मेंट म्हणून. कारण प्रत्त्येक केस मध्ये governing criterias will be different.
2. बजेट निश्चीत करा. त्यापेक्षा अधिक किमतीच्या संकुलांमध्ये फेरीही मारू नका- वेस्ट ऑफ टाईम.
२. लोकेशन चे क्रायेटेरीया ठरवा (मुलांची शाळा, तुमचं ऑफीस, ईतर अ‍ॅक्टीविटीज ला वाव असणार्‍या indoor/outdoor लोकेशन पासूनचे अंतर, एक तरी ईस्पीतळ, भाजी माल खरेदी केंद्र वगैरे)
३. लोकेशन बरोबरच कुठल्या "वसतीत" रहायचे पसंत आहे ते ठरवा. निर्जन, वा कमी वाहतूक असलेले रस्ते, किंव्वा जिथे यायला जायला सहसा रिक्षा मिळत नाहीत (पुणेरी रिक्शेवाल्याला विचाराल तर यात अख्खे पुणे मोडते :), अशा ठिकाणी घेवू नये. मी तर यापूढे जावून असेही म्हणेन की एखाद्या संकुलात कोण्/कुठल्या प्रकारचे/समाजाचे लोक राहतात हाही महत्वाचा मुद्दा ठरू शकतो, विशेषतः तुमच्या मुलांच्या द्रुष्टीकोनातून- त्यांचे मित्र कसे असतील, शाळेत कुठल्या सामाजिक वर्गाबरोबर जातील, वगैरे वगैरे-- मुलांच्या वाढीत हा मुद्दा फार फार महत्वाचा ठरणार हे लक्षात ठेवायला हवे.
४. बाकी पुन्हा ईथे लिहीले तेच- समाप्त नंतरचा परिच्छेदः http://www.maayboli.com/node/2118

>>'recurring maintenance cost', ते मेंटेन होईल का, क्रयशक्ती थांबल्यावरही ते आपल्याला परवडेल >>का?, भाड्यानं द्यायचं असेल तर जाईल का? Target audience कोण?, त्या एरियातल्या किमती >>कशा रितीनं वाढतील

घर विकत्/मालकी हक्काचे घेवून तिथे रहायचे असेल (किमान १०+ वर्षे) तर या वरील गोष्टींन्ना तुमच्या आत्ताच्या निर्णय प्रक्रीयेत किम्मत शून्य आहे. भाड्याने द्यायचे असेल तर अर्थातच "लोकेशन" कुठले यावर बरेच काही अवलंबून आहे. ईंवेस्ट्मेंट म्हणून घ्यायचे तर एरीयातल्या किमती कशा वाढतील याला मह्त्व आहे. तेव्हा या सर्वांची ऊगाच सरमिसळ नको. आणि मोठ्या संकुलांमध्ये recurring maintenance cost वगैरे सर्व आधिच साधारणपणे ठरवले जाते.

(पुण्यात real estate consultant च्या व्यवसाय करायला हरकत नाही. ईथे मा.बो. वरच बरेच कस्ट्मर मिळतील) Happy

Thanks नानबा.
हा जो dynasty चा प्रोजेक्ट आहे ना तो वाकड मधे Hotel Ambience च्या जवळ आहे.
Sukhawani Chawala is the builder.

त्याच्या शेजारी Sonigraha Kesar प्रोजेक्ट आहे.

आणखीन एकः रवी करंदीकर रिअल ईस्टेट ब्लॉग लिहितो - तो इस्टेट एजंट नाही... त्याला फोन केला तर तो फुकट सल्ला देतो.. (घ्यायचा नाही, तुम्ही ठरवा.. मी फक्त माहिती करता सांगतेय.)

ऐकीव माहितीवर ईतके महत्वाचे निर्णय घेवू नयेत. त्यापेक्षा तिथे जे राहत आहेत त्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरतील. ब्लॉग वर शिव्या देणारे अधिक असतीलही पण ४०००+ घरे असलेल्या कॉम्प्लेक्स मधिल प्रातिनिधीक अनुभव काय हे विचारात घ्यावे लागेल.
>> आदित्य बिल्डरचा ऑल्रेडी अनुभव आहे - ब्लॉग्ज वर लिहिलेल्या काही गोष्टींचा अनुभव मी स्वतःही घेतला होता - त्यामुळेच इतर गोष्टींवर विश्वास ठेवला - आणि तुमच्या पोस्ट्मधूनही सध्या पाणी नाही (कारण कुठल्यातरी बांधकामामुळे लाईन टाकून झालेली नाही) हाच अर्थ ध्वनित होतो.. म्हणजेच मिळालेली माहिती बरोबर होती. Happy

घर विकत्/मालकी हक्काचे घेवून तिथे रहायचे असेल (किमान १०+ वर्षे) तर या वरील गोष्टींन्ना तुमच्या आत्ताच्या निर्णय प्रक्रीयेत किम्मत शून्य आहे. भाड्याने द्यायचे असेल तर अर्थातच "लोकेशन" कुठले यावर बरेच काही अवलंबून आहे. ईंवेस्ट्मेंट म्हणून घ्यायचे तर एरीयातल्या किमती कशा वाढतील याला मह्त्व आहे. तेव्हा या सर्वांची ऊगाच सरमिसळ नको. आणि मोठ्या संकुलांमध्ये recurring maintenance cost वगैरे सर्व आधिच साधारणपणे ठरवले जाते.
>> माझ्या बहिणीच्या २ बेडरूमच्या घरासाठी मेंटेंनन्स होता ५०० रू आणि तेव्हा माझ्या २ बेडरूमच्या घरासाठी मी १००० रु देत होते.. जेव्हा मी कमवते, तेव्हा ह्या गोष्टीनं खूप फरक नाही पडत.. पण मी कमवत नसेन तेव्हा माझ्या करता तरी खूप फरक पडतो..
लिहित रहा, कारण आपल्या चर्चेतले मुद्दे एखाद्याच्या डोक्यात आले नसतील तर तो त्यावर विचार करून त्याला योग्य वाटेल ते सोल्युशन स्वीकारू शकतो. Happy

महेश, तुमचा रोहन लेहेरबद्दलचा मुद्दा अगदी बरोबर आहे... म्हणूनच आम्ही त्याचा विचारही ड्रॉप केला.. नाहीतर लेआऊट/फिनिशिंग वगैरे खूप आवडलेलं.. (ठिकाणाबद्दलचे ड्रॉबॅक्स त्या आधीच्या पोस्ट मधे नमूद केले आहेत)

मला वाकड मध्ये घर घ्याय चा आहे.मला जुना घर पण चालेल्.नविन जर स्वस्तात मिळत असेल तर मला पण ग्रुप मध्ये सामिल करावे.

सिंहगड रोड्वर पु.ल. देशपांडे उद्यानासमोर नवशा मारुतीच्या गल्लीत आम्ही सध्या भाड्याने राहतो. एरीया छान डेव्हलप झालाय , दुकानं आहेत जवळपास गरजेची.

तिकडे सध्या २ नवीन प्रोजेक्टस चालू झाली आहेत, एका ठिकाणी बिल्डरचा बोर्ड लागलाय. मधे आम्ही विचरलं एका नवीन सोसायटीमधे तर ५५०० सांगत होते रेट.

प्राजक्ता.. तिथल्या बुट्टे पाटिल प्रोजेक्टची वाट लागणार आहे.. शेजारीच महानगर पालिकेची नविन छोटी इमारत होते आहे.. जिथे भाजी मंडई होणार आहे... आणि ते दुसरे ट्युलिपचे प्रोजेक्ट आहे ते चांगले वाटते आहे.... अर्थात त्याच भागात जर जुने घर कोणी विकणार असेल तर नक्की विचार करा..

बाणेरमधला प्राईड प्लॅटिनम प्रोजेक्ट (पॅनकार्ड क्लबजवळ) बघितला का?तो पण एक चांगला वाटला होता.
>> तू पाहिला असशील तर तूच माहिती सांग ना पूर्वा...

हिम्सकूल >> ट्युलिपची साईट माहीत आहे ? रिसेल पण ३५-४० सांगतात त्या भागात Sad

बुट्टे-पाटील म्हणजे बँक ऑफ इंडीया झाल्ये ती का ?

ट्युलिपची साईट नाही माहिती... प्रत्यक्षच जाऊन भेटावे लागेल.. बहुतेक संध्याकाळी ५ ते ८ ह्या वेळेत कोणीतरी असते तिथे...

बुट्टे-पाटील म्हणजे बँक ऑफ इंडीया झाल्ये ती का ? - हो तीच...

आणि रिसेल जरी ३५-४० सांगितले तरी परवडेबल आहे.. कारण आत्ता जे काही आहे त्या पेक्षा नविन काही होण्याचे चान्सेस शून्य आहेत... मुख्य गावापासून खूप लांब आल्यासारखे वाटत नाही.. आजूबाजूला चांगल्या सोयी झालेल्या आहेत..
मी वर्षभरा पूर्वी शरयू सरीता नगरी फेज दोन मध्ये रिसेलचा फ्लॅट घेतला.. आमचे डील झाल्यानंतर भाव बर्‍यापैकी उतरले होते... त्यामुळे आम्हाला थोडासा महाग पडला की काय असे वाटले.. पण एकूण विचार करता जी किंमत दिली ती रास्त आहे असे आता वाटते आहे..

ह्म्म , गावापासून लांब वाटत नाही हे खरं , आम्हाला पण आता सवय झाल्ये त्या एरीयाची , बघू मिळतं का कुठे रिसेलचं Happy

प्राजक्ता.. मी तिथेच रहाते. त्याच एरियात ३ बेडरूमचा रिसेलसाठी असेल तर मला पण सांगा
आमचा आत्ताचा २ बेडरूम आहे. तो विकून मोठा घ्यायचा विचार आहे.

साक्षी.

ही प्राईड प्लॅटिनमची वेबसाईट.
http://www.pridegroup.net/pride-platinum/
हा प्रोजेक्ट पॅनकार्ड क्लबजवळ आहे.क्वॉलिटी आणि फ्लोअर प्लॅन चांगले आहेत.
अमेनिटीज फेसिंग फ्लॅटचा रेट ३८५० आणि नॉन फेसिंग ३६५० (बहुतेक,नक्की आठवत नाही) आहे.
सध्या रस्त्याचे काम चालू आहे.एक्सप्रेस वे पासून आत साधारण ५-१० मिनिटे लागतात.
काही वर्षांत प्रोजेक्टपासून डायरेक्ट एक्सप्रेस वे ला जाता येईल.आजूबाजूला बरीच प्रोजेक्टस चालू आहेत.त्यामुळे येत्या ४-५ वर्षात हा भाग खूप डेव्हलप होईल.सध्या सुद्धा फार अडचणीचे नाही.

आम्हीदेखील पुण्यात फ्लॅट शोधत आहोत.
१) शक्यतो ३बीएचके नाहीतर मग २ बीएचके
२) आम्हाला रीसेलचाच फ्लॅट हवा आहे.
३) एरिया: कोथरुड, कर्वे रोड, पौड रोडच्या आसपास

कोणाला ठाऊक असल्यास सांगा

मला पुर्णपणे गुंतवणुक या निकषावर फ्लॅट घ्यायचा असल्यास कोणता एरिया विचारात घ्यायला हवा?मी उसगावात असते आणी सध्यातरी लगेच भारतात परत यायची शक्यता नाही.फ्लॅट घेवुन जमल्यास भाड्याने द्यायचा आहे.
नानबा! तु बरिच उपयुक्त माहिती देत आहेस, ईतरांनीही आपआपले अनुभव लिहा.

मायबोलीकरांनो नमस्कार,
मी देखिल पुण्यात २ किंवा ३ बेडरुम्स्चा Flat विकत घ्यायचा आहे (preferably resale is fine). कोथरुड, कर्वे नगर, बावधान, पाषाण, बाणेर या भागांत हवा आहे. शक्यतो कोथरुड मध्येच हवा. जुना देखील चालेल. मुलाची शाळा न्यु इंडिया स्कुल आहे.

तुमचाच,
राजहंस

माझे हडपसर मधिल घर विकणे आहे. कोणि घेण्यास इचुक असेल तर तसे कळवा.
४ रूम्स आहेत, नि रस्त्या पासुन ५० मिटर वर आहे. एकुण बान्धकाम १००० चो मि. आहे.

माझे हडपसर मधिल घर विकणे आहे. कोणि घेण्यास इचुक असेल तर तसे कळवा.
४ रूम्स आहेत, नि रस्त्या पासुन ५० मिटर वर आहे. एकुण बान्धकाम १००० चो मि. आहे.

आदित्य गार्डनच्या डाव्या साईडला अगदी लागुन कुठल्या बिल्डिंग झाल्यात कुणी खात्रीलायक सांगू शकेल का?
कानावर आलेल्या बातमीनुसार, कुठल्या तरी झोपडपट्टीवाल्यांना त्या बिल्डिंगमध्ये पर्यायी जागा दिलिये....
त्या बिल्डिंगमुळे आदित्य गार्डनचे (डाव्या बाजुचे) व्हेंटिलेशन अगदीच गेलेय Sad
खरे खोटे माहित नाही!

स्वरूप, तुम्हाला मिळालेली माहिती खरी आहे. मी स्वत: तिथे चौकशी साठी गेलो होतो तेव्हा तिथल्याच साईट दाखवणार्‍या माणसाने मला ही माहिती दिली. "त्यांचा 'आपल्याशी' काही संबंध नाही" असं तो म्हणाला होता.
ही जागा महापालिका अशा लोकांना देणार आहे ज्यांची घरं रस्ता रुंदीकरण इ. सारख्या कामात पाडली गेलीत

मला पुण्यात नुसता प्लॉट घ्यायचा आहे, त्यासंबंधी काही माहीती हवी आहे. नानबा, इथेच लिहीले तर चालेल का ? इथे फक्त घर्/फ्लॅट विषयी लिहायचे असेल तर ज्यांना काही माहीती असेल त्यांनी कृपया माझ्या विपूत लिहा. मी इथले पोस्ट काढून टाकेन.
१. मला हिंजवडी / वाकड भागात जागा घ्यायची आहे, गेटेड कम्युनिटी मध्ये. कोणाला चांगले प्रोजेक्ट माहीत असल्यास सांगा.
२. जागा घेताना काय काय काळजी घ्यावी. काय काय कागदपत्रे डेवलपर कडे असणे व खात्री करुन घेणे गरजेचे असते ?
३. मला सध्या फक्त प्लॉट घेऊन काही वर्षांनी त्यावर बांधकाम करायचे आहे. सध्या मी 'साईरंग डेवलपर्स' शी फोन वर बोलले तर त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे जे प्लॉट्स आहेत ते 'अ‍ॅग्रीकल्चर लँड' मधील आहेत. ते घेणे मग योग्य आहे का ? कारण मी तिथे कदाचित नंतर लायब्ररी किंवा तत्सम काही सुरु करायचे ठरविले आहे.
४. साधारण रेट्स काय आहेत ?
५. नुसती जागा घेऊन ठेवणे सेफ असते का, कम्युनिटी मधील जागा असेल तरी तिथे कोणी अतिक्रमण करु शकते का ?
प्रश्ण अगदी प्राथमिक आहेत, कारण मला यातील अजून काही माहीती नाही.

ही बातमी पाहिलीत का? http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=923...
अदित्य बिल्डर सारख्या कडुन अस होत असेल तर अवघड आहे.

ह्या संदर्भात काय काळजी घेता येइल बुकिंग करताना किंवा ताबा घेताना? जाणकारांनी माहिती दिल्यास बरे होइल.
धन्यवाद.

आदित्य बिल्डरसारख्या म्हणजे? गोयल, आदित्य हे एक नम्बरचे चोर आहेत्.पूर्वी मूर्ख लोक घरे बांधतात व शहाणे त्यात राहतात अशी म्हण होती ती आता ' भामटे घरे बांधतात आणि मूर्ख त्यात राहतात' अशी झाली आहे. आउट स्कर्ट मध्ये झालेले प्रकल्प म्हनजे फसवणुकीचे आगरच्.बार्‍याच प्लॅट्मध्ये वर्षानुवर्षे वीज मीटरच नसते. बिल्डरचे कमर्शियल कनेक्शनमधून वायरी ओढून वीज चालू केलेली असते. नन्तर त्याची कमर्शियल दराने बिले येतात. शेवटी बिल्डरचे काम झाल्यावर तो ते कनेक्शन बन्द करतो. मग अन्धार. हे एमेसीबीचे पैसे अ‍ॅडव्हान्समध्ये घेऊनही हं... निम्म्या योजनात म्युनिसिपालीटीचे पाणीच नसते. तिकडे कार्पोरेशनने पाईपलाईन टाकलेली नसते. मग पाइपलाइन नाही म्हणून मुळातच कार्पोरेशन बिल्डिन्ग परवानगी व प्लॅन मंजुरी नाकारते. मग हे बिल्डर आम्ही आमची पाण्याची सोय करून घेऊ असे अन्डरटेकिंग देऊन बिल्डिन्ग परमिशन मिळवतात व पुढचे रामायण सुरू होते. परप्रान्तिय व ** वाडी बिल्डर अशी फसवणूक करतात्.शिवाय त्यांचेकडे गुन्ड टोळ्याही आहेत. कुणी जास्त टर्टर करू लागला तर.

म्हणुनच नविन प्रकल्पा पेक्षा काही वेळा रिसेल बरा वाटतो ... facts समोर असतात.
पण आजकाल रिसेल चाही रेट नविन रेट च्या जवळपासच असतो ...

रिसेल चाही रेट नविन रेट च्या जवळपासच असला तरी मझ्या मते रिसेल नेहमीच चान्गला.
सगळ सेट्ल झालेल असत. पाण्याचा प्रोब्लेम नसतो.
बिल्डीन्ग मधे कोण कोण रहाणारे आहेत हे आधीच समजत.
त्यातुन डोर ग्रिल, खिड्क्याना ग्रिल आयत मिळ्त. पड्द्याचे रोड्,पन्खे, टुब लाइट. किचन मधली भिन्तितलि कपाट,पाण्याची टाकी अशा बर्याच गोश्टी घराबरोबरच मिळतात.ज्या करण्याचा त्रास आणि खर्च वाचतो.
फक्त बिल्डीन्ग खुप जुनी नसावी.असली तरी सुस्थितीत असली तरी प्रोब्लेम नसतो. फक्त लोन मिळायला कदाचीत प्रोब्लेम येउ शकतो.

Pages