हळवाचे लाडु.......!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पहिली माबोकर: ऑस्ट्रेलियात हळीव मिळते का हो?
दुसरी माबोकर: मी पण शोधतेय एका मैत्रीणीसाठी. मिळाले कि सांगते.

चार दिवसांनी...
दुसरी माबोकर: अग हळीव नाही मिळालेत, पण तुला भेटायला आवडेल. पत्ता कळवतेस?
पहिली माबोकरः नक्कीच! खुप छान वाटेल!

दोन दिवसापुर्वी..
दुसरी माबोकर: हॅलो, अग आम्ही येतोय, आहात ना घरी?

आज...
दुसरी माबोकर अन तिचे यजमान १०० किमी वरील दुसर्‍या गावातुन, आमच्या घरी आले. हळीव नाही आणले...........हळवाचे तुप-खोबरे घालुन केलेले डबा भरुन लाडुच आणलेत!! सोबतीला इतरही पदार्थ आणलेतच... गरज पडणार आहेच म्हणुन! Happy

पुन्हा भेटण्याचे अन तिकडे त्यांच्या घरी सहकुटुंब येण्याचे आमंत्रण देऊन गेलेत!

*****
माणसांतील माणुसकीचे प्रेम-बंध 'लाडवाच्या' रुपाने आमच्या समोर आहेत! जगभरातील महाराष्ट्रीयन रयतेला एकत्र 'बांधणार्‍या' 'मायबोली' ला सलाम! Happy

प्रकार: 

खरंच चंपक, चंपीची ह्यासंदर्भात पोस्ट वाचली आणि ऊर भरून आला. Happy
आमेन!!

वा! वा! वा!! मलाच बरं वाटल चंपीला हळीवाचे लाडु मिळाले म्हणुन! दुसर्या माबोकरणीचे आभार आणि माबो जिंदाबाद! ( माझ्याकडे हाळीव असुनही त्या ईंटरस्टेट भानगडीमुळे काहीच करता येत नव्हते त्यामुळे अजुनच वाईट वाटत होते.)

स्वतः ला गरज नसताना, मित्राची गरज ओळखुन त्यांना उपयोगी पडतो, तोच खरा मित्र! Happy

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

***

ही 'मायबोली लाडु' ची रेसीपी आहे Happy

चंपक,
मग आमचाही सलाम !,
जगभरातील महाराष्ट्रीयन रयतेला एकत्र 'बांधणार्‍या' या 'मायबोली' ला !
Happy

Happy सही...

स्वतः ला गरज नसताना, मित्राची गरज ओळखुन त्यांना उपयोगी पडतो, तोच खरा मित्र! >>> अगदी

ही 'मायबोली लाडु' ची रेसीपी आहे>>> Lol

>>>> हळीव नाही आणले...........हळवाचे तुप-खोबरे घालुन केलेले डबा भरुन लाडुच आणलेत!!
ग्रेट Happy त्या मायबोलीकरान्ना मानाचा मुजरा Happy इतकी समयोचित सुयोग्य कृति सुचल्याबद्दल अन ती प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल!

>>>> मला वाटलं चंपकला रेसिपी हवीये.
मला तस नाही वाटल
मला वाटल की चम्प्याने स्वहस्ते केलेल्या हळिवाच्या लाडवाची कृती लिहीली अन फोटो टाकले की काय Lol (चम्प्याच काय? तो काय पण करू शकेल! Happy )

Back to top