उन्हाळी विहार बाग राज्य सम्मेलन...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हल्ली सम्मेलनाला सम्मेलन म्हणू नये असं काही आग्रही मंडळीनी माझ्या मागे तगादा लावलेला असला तरी कुणी गटग म्हणून तर कुणी एवेएठि म्हणून सम्मेलन करत असतातच. बागराज्याच्या ए.वे.ए.ठि.ची घोषणा जवळपास डीसीला झालेल्या सम्मेलनाच्या दिवशी येताना गाडीतच झाली कारण नयनीशला एक फड संपला की दुसर्‍या फडाची स्वप्ने दिसू लागतात. त्याला त्यादिवशीही घरी जाणे मुळातच मान्य नव्हते (तरी शिंडी गाडीत नव्हती आमच्या). 'आत्ताच मैत्रेयीचा हॉल बूक करू, आणि जास्तीत जास्त पाच सहा दिवस थांबून लगेच पुढच्या आठवड्याला गटग करू,' असं म्हणायला लागला. यावरून 'श्री. लालू' कोंबडाशेपटी (त्याला काही लोक कॉक्टेल म्हणतात) करण्यात फारच हूशार आहेत' असा आम्ही निश्कर्ष काढून कसेबसे त्याला समजावून घरी पाठवून दिलं.

या सगळ्या गडबडीत भाई गाडीच्या शेवटच्या सीटवर घोरत पडलेले असल्याने, त्यांना फक्त ए. वे. ए. ठि. हे शब्द ऐकू आले आणि त्यांनी बहुतेक त्याच संध्याकाळी नवीन बाफ काढून आपलं काम पूर्ण करून टाकलं. अरे व्वा.. नवीन बाफ पण काढला म्हणत तो बाफ अधिकॄत रित्या उघडून सायोने सुपारी उचलली. आता तिथे झुरळांपासून, कचर्‍याच्या पिशव्यांपर्यंत कहीही टाकायची सोय करून टाकली.

उन्हाळी सम्मेलन हे काही खास व्यक्तींच्या सोईसाठी असतं याचा पूर्वेतिहास बर्‍याच लोकांना माहीत आहे. झक्कींच्या घरी झालेल्या मागच्या सम्मेलनानंतर हुड हा आयडी चांगला वर्षभर मायबोलीवरून परागंदा झालेला होता. तसाच काहीसा प्रयोग पुन्हा एकदा करून पहाण्यासाठी झक्कींच्या घरी सम्मेलन ठेवण्यात आले. हा प्रयोग नेहमीच यशस्वी होतो याची खातरजमा हुडाच्या मायबोलीवर अनुपस्थितीने होत आहेच. खरंतर झक्कींनी त्यांचे धोतरे नाहीसे केलेत अशी वदंता आहे. पण आपण प्रेमाने विनंती केली तर आपल्याला काही मान्यवर लोकांकडून २५ लाख रूपये मिळतील आणि सम्मेलन करता येईल म्हणून झक्की तयार झाले.

ए. वे. ए. ठि. हवे पण मला (स्वतःला) येता येणार नाही, यावर बर्‍याच आजी, माजी आणि भविष्यतल्या बाराकरांचे एकमत झाले, पण एकदा ठरल्यावर होत नाही ते बाराकरांचे एवेएठि नव्हेच अशी सरळ 'हुकूमावरून' तंबी देण्यात आल्याने 'ज्याना चुकले त्यांचा दोष' असा नवीन नियम काढणेत आलेला आहे, अगदी भारतात बसून 'तय्यब अल्ली... ' चे गाणे म्हटलेत तरी.

बाकी चर्चा करायला बाराकर तसे फारसे उत्सुक नसले तरी त्यातले काही पारल्याच्या बाफवर पडीक असल्याने त्यांची फळी मेन्यू या विषयावर चर्चा करायला बरीच उत्सूक.. त्यामुळे त्या चर्चेवर जवळपास ६०० पोष्टे पडली, असे 'हह'ने त्रैराषिक (Statistics) मांडले आहे. तिच्या/त्याच्या आगामी लेखात यावर एक विशेष टिकाटिप्प्णी असण्याची शक्यता नाकारली जात नाहीय. तिथे जमलेल्या अनेक व्यक्तींपैकी एका आयडीवर तो 'हह' असल्याच्या संशयही उघडपणे व्यक्त केलेला आहे.

निघालो तेव्हा मी नेहमीप्रमाणे खात्रीने 'चुकीचा पत्ता' GPS मधे टाकून तो चुकतो की बरोबर नेतो याची परीक्षा घेतली. माझा GPS स्वातीची चूक दाखवत बरोब्बर चुकीच्या पत्त्यावर पोहोचला. कुणी ना कुणी राजभोग कडून पोळ्या आणाव्यात म्हणून तिने सगळ्यांना 'राजभोग' चा पत्ता दिला होता. खरा पत्ता मेल मधे टाकून केलेली ही दिशाभूल माझ्याही लक्षात आली पण मेल माझ्या GPS ला जात नाही, त्यामुळे फोनवरून पत्ता घ्यावाच लागला. बरं तिथे उतरून कुणाला विचारावं तर शॉटगन सीटवर भाई, आणि ते अगदी किर्तनकाराच्या वेशात आल्याने (बघा फोटो) त्यांना विचारायला पाठवावे तर लोकांनी त्यांना मराठी नाटकाच्या फडातले समजून तिकडे पाठवले असते. स्वातीचे घर नाही सापडले तर आपण चार, मागून येणारी मैत्रेयी आणि काही 'राजभोग' ला पोहोचलेले आयडी मिळून 'जेवणाचा ताबा असलेले बाराकर' असं मिनी ए. वे. ए. ठि. करू असाही एक विचार होता.

स्वातीच्या घरी गेलो तर यजमानीणबाई एकदम पूर्ण मराठी पोषाखात स्वागत करायला तयार. चि. आदित्यने डोक्यावर फेटा वगैरे घालून स्वागत केले, तेव्हा हजर असलेल्या बहुतेक अर्ध्या पँटीनी 'पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवू' असे नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन टाकले. 'शिट्टीकर घरून निघाले आहेत आणि काही विशेष पाहूण्यांना घेऊन पोहोचत आहेत' अशी घोषणा ही होत होती, पण ते 'रडं' नेहमीचंच असल्याने कुणाला काही फारसे वाटले नाही. 'म्हशीत म्हस' शिट्टीकरांची असतेच हे मागच्या एवेएठिपासून माहीतच आहे.

लालू, रॉनि, सुमंगल वगैरे मंडळीनी लगेच हजेरी लावली. मुख्य म्हणजे मैत्रेयीपण न चुकता वेळेप्रमाणे फक्त पाचच मिनिटे उशीरा आली. बटाटवडे गरम करायला गरम चुलीमधे सरकेपर्यंत 'राजाकोळी' ची पहिली फेरी संपून नयनीशने आणलेले 'मधमद्य' सुरू झालेलेच होते. फचिन पाच मिनिटात पोहोचणार तो आता 'दहा' मिनिटे म्हणायला लागला. तेव्हा तो दक्षिणेकडे निघाला असावा असे अनुमान करण्यात आले.

मी ज्या 'काहीतरी' करण्याचे ठरवले होते, ते 'कोळंबी सुका मसाला' असल्याचे सिध्द झाले. तर भाईनी 'कोळंबी भाजी' आणून यजमानीणबाईंना नाराज केलेच. त्यांच्या चिरंजीवानी उघडउघड तर यजमानानी मनातल्या मनात खुषी दर्शवली. याशिवाय फिशफ्राय, वांग्याची भाजी, पाट्-वड्या (याचा उच्चार अर्धा ट करूनच करावा .. हुकूमावरून) परागने पाठवलेल्या बाजारी चितळेवड्या यावर खाण्याची पहिली फेरी झाली.. मग शिंडी, परागजोडी आणि मामा पण उगवले आणि त्यांनी स्वत: बरोबर अजून बाकरवड्या आणल्या. विषेश उपस्थितीमधे 'केदार' चा उल्लेख करावाच लागेल कारण तो शिकागोवरून मुद्दाम आला होता. लालूने आणलेले गरमागरम बटाटेवडे स्वयंपाकघरामधे, तर मंडळी बाहेर बसून फुकट चर्चा करताहेत असं लक्षात आल्यावर, मी 'बटाटवडे मस्त झाले होते', अशी घोषणा केली आणि सगळे स्वयंपाकघरात शिरले. यजमान्नानी बर्‍याच लोकांना बाहेरच्या खोलीत बसण्याची विनंती करून पाहीली, पण मासे आणि वडे सोडून बाहेर जायला कुणी तयार झाले नाही.

आंबाडीची भाजी, आणि वांग्याची भाजी अश्या दोन भाज्या शाकाहार्‍यांसाठी होत्या. आंबाडीला गोंगुरा म्हणतात तेलगू लोक आणि त्याचे लोणचेही करतात. (दोन उल्लेख झाले अजून एक शिल्लक.) त्यात प्राचीने कोंथिबीरीचे लोणचे करून आणले. तेव्हा यानंतर, जिर्‍याचे लोणचे, मेथीचे लोणचे वगैरेही पुढच्यावेळी खावी लागतील असा एक अंदाज आहे. आंबाडीची भाजी मस्त झाली होती (तीन... ) असं श्री. सुमंगल म्हणाले. ते प्रत्येक भाजीकडे संशयाने बघत होते, मग मी त्यांना चिकन/मासा आणि भाजीतला फरक दाखवून दिला. म्हणजे नयनीश पानात घेईल ते चिकन्/फिश आणि तो न घेईल ती भाजी असा.

यानंतर तिथे नक्की काय घडले मला फारसे आठवत नाही. हा त्या मधमद्याचा परीणाम असावा. जमलेल्या मंडळीनी शिरस्त्याप्रमाणे सध्याच्या सगळ्या बाफंवर चर्चा करून घेतली. त्यात मधमद्याचा परीणामामुळे काही विधाने अशी ऐकू आली.

१. मैत्रेयी - 'लिंबु' चांगली चांगली पोष्टे लिहीतो.
२. झक्की - सगळ्या कविता बंद न केल्यास मी कविता लिहीणे सुरू करीन.
३. विकू - सोनियाबाईंच्या पुतळ्याला हार घातल्याशिवाय मी पुढचा घोट घेणार नाही (कशाचा ते कळले नाही).
४. भाई - शेवटचा थेंब पिल्याशिवाय मधमद्याचा सन्मान होत नाही (अपमान होतो).
५. केदार - शिकागोमधे बरेच म्हातारे लोक झक्कींप्रमाणे वागतात.
६. नयनीश - झक्कींचे वय १०६ वर्षे नक्कीच आहे.
७. भाई - असामी हा फक्त सातवर्षातून एकदाच सम्मेलनाला येतो (???)
८. आबे - मला चहा हवा.
९. मॄ - (हजर नसूनही) माझे कोणीच कसे ऐकत नाही.
११. झक्की - (यांची बरीच विधाने अगदी विषयाला धरून होती, त्याअर्थी ते नेहमीप्रमाणे रंपा मोडमधे होते)
१२. किरण सतराव्यांदा कायमचा भारतात जाणार आहे..

बाकीच्या गप्पा इथे सांगता येणार नाहीत, कारण त्या मलाच कळलेल्या नाहीत.
स्वातीच्या गाण्याने या(ही) ए.वे.ए.ठि.ची सांगता झाली. नयनीश, 'पुढचे सम्मेलन कधी' असे विचारण्यापूर्वी मी निघालो. यात बर्‍याच लोकांचा अनुल्लेख झालेला आहे पण त्याला असलेली कारणे स्पष्ट करण्याची जबाबदारी मी झटकून टाकलेली आहे. तरी काही खरी सत्ये.

१. कोथिंबीरीचे लोणचे होऊ शकते. (प्राची).
२. दहीभाताप्रमाणे मलाईसँडवीच घरी करता येते (वृंदा).
३. २३ जुलैला असलेला बुवांचा वाढदिवस चोवीसला केला तरी चालतो. (केक परागने आणल्याशी कारण)
४. पराग बायकोच्या तोंडावर 'खोड्या' काढतो. घरी गेल्यावर त्याचे काय होईल देव जाणे.
५. बाईमाणूस प्रॉम्टींग करू शकतात.
६. आबे 'चहा' व्यतिरिक्त फारसा बोलत नाही.
७. रावण पिठल्याचा उन्हाळ्यामुळे झुणका होतो (हा चर्चेचा विषय होऊ शकतो).

Light 1 Light 1 Light 1 Light 1

प्रकार: 

Proud
देसायनू! मांज्या धोत्राक का म्हणुन हात घालता? अवो तुकारामाकडून तुमच्या करताच पावशेर मध मारुन आणली होती तेचं इतक्यात विसरलात?

छान लिहीलत हो देसाई! Happy

चुकीची दुरुस्ती - सर्वात आधी मी आणि रॉनी पोचलो होतो. (११ वाजून ६ मिनिटे) आणि सर्वात शेवटी म्हणजे आज सकाळी निघालो.

बाकीचे सगळे बरोबर आहे. Wink

छान वृत्तांत. Happy
(काही शुद्धलेखनाच्या आणि काही तपशिलाच्या चुका वगळता. उदा. त्रैराशिक. तपशिलातली एक चूक लालूने दाखवली आहेच! :P)
अंबाडीच्या भाजीच्या त्रिवार उल्लेखासाठी विशेष धन्यवाद! Proud

सगळेच पदार्थ अतिशय रुचकर होते. (त्यामुळे) खूप मजा आली. Happy

तिच्या/त्याच्या आगामी लेखात>>>> काय हे!!! एवढा संशय बरा नव्हे Proud
भाईंवर्ही संशय घेऊन झाला. कोणाच्या नावाने ते भाईंना कळेलच.
पहिल्या पॅरामध्ये नयनीशबद्दल लिहिलेलं सगळं अगदी 'मम'. उद्यापासूनच तो हिवाळी गटगबद्दल बोलायला लागेल. (नव्हे, बोललाच फोनवर माझ्याशी)

स्वाती, त्याला 'अबे' म्हटल्याबद्दल त्याने काल उघड उघड नाराजी दर्शवलीये.

>>>> त्यात मधमद्याचा परीणामामुळे काही विधाने अशी ऐकू आली. <<<<, Lol
यातले पन्चेस जबरा आहेत, जाम आवडले

अबे, चहा मी नाही केला. मी आपले कप न्यायला मदत केली. गॅसवर दूध उकळत होतं त्यावर लक्ष ठेवलं. Proud

ह्या जुन्या मान्यवर सभासदांची आठवण निघाली होती - दीपांजली, स्तोरवी, मॅवरिक, मुकुंद, अज्जुक्का, द्_पुणेकर, अंताक्षरी सम्राट वैभव साठे

चांगला आहे वृत्तांत.

तरी तुम्ही बरेच लवकर घरी गेलात. त्यानंतर 'किंतु, फळी' इ. शब्द वापरून कसल्या तरी विषयावर गहन चर्चा झाली. मी तिथेच असूनहि मला त्यातला एकहि शब्द कळला नाही. तरी मी नेहेमीच्या सवयीने मधे मधे बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न केलाच होता.
असो.

एकंदरीत बा रा ते फ्लोरिडा पर्यंत पोचेल अशी एक हजार मैलाची फळी असून ती वाशिंग्टन डीसी गावातून जाते. त्यावर स्वाती, लालू नि मृ या वळचणीला आलेल्या कबुतरांप्रमाणे बसून गुटर्गू करत असतात नि तिथून डायरेक्ट भारतातील लोकांच्या मनात काही अगम्य किंतु निर्माण करतात, असा शोध भारतातील कुणितरी लावला आहे असे कळले. इन्सेप्शन सिनेमाची आठवण झाली. त्या हजार मैल फळीचा विचार करत मग मी घरी गेलो.

फळीपेक्षा वळचणीला आलेल्या कबुतरांचं गुटर्गु हा शब्दप्रयोग मला जास्त आवडला. Proud आता स्वातीला वळचणीला बसलेल्या तीन कबुतरांचा फोटो मिळतोय का बघायचं.

स्वातीला अगदी महाराष्ट्री वेषात पाहून दचकलोच. ड्रेस कोड दिला होता असे काहींनी घोषित केले पण त्याचे पालन स्वेच्छेने आम्ही सर्वांनी केले नाही, पण भाई व स्वातीने पूर्ण व काही अंशी फचिन व माणसाने केले. उरलेले सर्व टि शर्टात व काही चड्डीत आले. किरणने ते खास प्रतिपचंद्र वगैरे टि शर्ट स्वरुपात घातल्याने तोच एक शिवाजी महाराजांचा खरा मित्र असल्याची खात्री झाली. ब्रिगेडी लोकांची इथे शाखा नसल्याने शिवाजी महाराजांच्या मुद्रेला टि शर्टवर मिरवल्यामुळे किरणने मार खाल्ला नाही.

अखिल संयुक्ता किर्तन मंडळाने बराच वेळ वेगळ्या खोलीत किर्तन रंगविल्यामुळे झक्की तिकडे बायका काय बोलतात ते कळत नाही म्हणून इकडे आलो असे म्हणाले, अनुभवी बॅटसमन असा रिटायर्ड हर्ट झाल्यामुळे आम्ही किर्तन मंडळाकडे अर्धा तास दुर्लक्ष केले.

स्वातीचे आदरातिथ्य अगदी खास होते. अंबाडीची भाजी पण खास ( खास खास खास) अशी त्रिवार नोंद नसेल तर जेवायला मिळणार नाही अशी सोज्वळ सुचना होती. Happy ) पान देताना तिने स्वतःचे पान आधिच काढून घेतले, हा कदाचित चितळे बंधूंच्या ताज्या बाकरवड्याचा परिणाम असावा असे क्षणभर वाटून गेले पण आग्रहाने अनेकदा चहा दिल्यामुळे तो फक्त तात्पुरताच परिणाम होता हे लगेच लक्षात आले, कारण पान खाताना ३ वाजले होते.

आनंदरावांना भेटून मात्र खरच आनंद झाला. ते अझरुद्दिन असा आयडी घेणार असे त्यांनी सांगीतले. मी भिष्मप्रतिज्ञा प्रत्यक्षात पाहिली नाही, पण झक्कीप्रतिज्ञा पाहिली आहे असे सांगावेच लागेल. त्यांनी सुरेश वाडकरांपासून ते अजित वाडेकर ह्यांच्या आठवणी सांगीतल्या.

बाईमाणसाचा पंच उखाना मैत्रिनीने सहन केला हे पाहून खूप जनांना भरते आले. टाळ्या, शिट्यांचा वर्षाव झाला.

विकुंची भेट झाली. ते सोनियाचा फोटो खिशात ठेवतात व दर व्यक्तव्याला आधार घेतात हे पाहून मन भरुन आले. श्रद्धा असावी ती अशीच ह्याचा प्रत्यय बुप्रा विकुंनी दिला. (विनय ने उल्लेख केलाच आहे, पण मलाही करने भाग होते. Happy )

महाराष्ट्र सरकारने २५ लाख रु झक्कींना दिले आहेत ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी तसे फोटो घेतले आहेत.

सर्वांना भेटुन आनंद झाला. जाम धमाल आली. पार विकुंच्या सोनिया पासून ओबामा, महाराष्ट्र- आंध्र पाणी प्रश्न असे राजकिय तर मायबोली फळ्या, कंपू इ अराजकिय (अराजक माजवणारे ) विषय ह्यावर चर्चा झाली.

अरे ह्या वेळी सर्वांनीच स्वतः करता बनवलेले मधमद्याचे पेगचे साईज बघून, पुढच्या ए वे ए ठि च्या वृत्तांताच्या पहिल्या पॅरात खूप जण खपून जातील! Proud

मजा आली हां बाकी!
स्वाती आणि अजय यांचे विशेष आभार! Happy

बेडेकरांना कुणीतरी चहाचे योग्य रुप समजावून सांगा. स्वाती आणि सायोचा चहा म्हणजे जरा डेंजरस सिच्युएशन झाली Proud

रात्री आठ पर्यंत घरात ठिय्या देऊ दिल्याबद्दल स्वाती आणि कुटुंबियांचे आभार Happy (तरी पिठलं-भात राहिलाच ;))

मस्त वृत्तांत. एकूण धमाल.... अंताक्षरी सम्राटांना सांगितलं पाहिजे. आधीच ठेंगणं आसमान अजूनच ठेंगणं होईल त्यांना.

झकास वृत्तांत हां देसाई!

भाकरी, भरली वांगी, आंबाडीची भाजी आणि बटाटवडे!!!! प्रचंडच चुकवलं मी! Proud

झक्की, Lol तुम्हाला यायचंय का फळीवर? Proud

घरातल्या GTG चा व्रुत्तांत लिहिला देसाईंनी, नंतरच्या २ तास बाहेर झालेल्याचा कोण लिहिणार ? Happy

स्वाती चे सर्वांना धुमा़कूळ घालून दिल्याबद्दल खास आभार. सगळ्यांना ह्याची देही ह्याची डोळा भेटून मजा आली. बरेच जण हितगुजवर जसे बोलतात तसेच प्रत्यक्षात वागतात हा लक्षात घेण्याचा मुद्दा Happy

>>नंतरच्या २ तास बाहेर झालेल्याचा
आणि त्यानंतर २ तास पुन्हा आत झालेल्याचा Happy
मी लिहिणार आहे.

>> नंतरच्या २ तास बाहेर झालेल्याचा कोण लिहिणार ?
आणि त्यानंतरच्या दीड तास पुन्हा आत झालेल्याचा? Proud

>> बरेच जण हितगुजवर जसे बोलतात तसेच प्रत्यक्षात वागतात
झक्की, तुम्हाला काय म्हणतो बघा! Proud

फळी! Lol

विनय, चांगला वृत्तांत.
बरेच जण हितगुजवर जसे बोलतात तसेच प्रत्यक्षात वागतात हा लक्षात घेण्याचा मुद्दा >>> असामी नाव सांग कोण कोण असे वाटले ते Proud
लॉन वरच्या २ तासांच्या गटग नंतर परत घरात जावून अजून १-२ तास गटग झाले.

Pages