उन्हाळी विहार बाग राज्य सम्मेलन...
हल्ली सम्मेलनाला सम्मेलन म्हणू नये असं काही आग्रही मंडळीनी माझ्या मागे तगादा लावलेला असला तरी कुणी गटग म्हणून तर कुणी एवेएठि म्हणून सम्मेलन करत असतातच. बागराज्याच्या ए.वे.ए.ठि.ची घोषणा जवळपास डीसीला झालेल्या सम्मेलनाच्या दिवशी येताना गाडीतच झाली कारण नयनीशला एक फड संपला की दुसर्या फडाची स्वप्ने दिसू लागतात. त्याला त्यादिवशीही घरी जाणे मुळातच मान्य नव्हते (तरी शिंडी गाडीत नव्हती आमच्या). 'आत्ताच मैत्रेयीचा हॉल बूक करू, आणि जास्तीत जास्त पाच सहा दिवस थांबून लगेच पुढच्या आठवड्याला गटग करू,' असं म्हणायला लागला. यावरून 'श्री. लालू' कोंबडाशेपटी (त्याला काही लोक कॉक्टेल म्हणतात) करण्यात फारच हूशार आहेत' असा आम्ही निश्कर्ष काढून कसेबसे त्याला समजावून घरी पाठवून दिलं.
या सगळ्या गडबडीत भाई गाडीच्या शेवटच्या सीटवर घोरत पडलेले असल्याने, त्यांना फक्त ए. वे. ए. ठि. हे शब्द ऐकू आले आणि त्यांनी बहुतेक त्याच संध्याकाळी नवीन बाफ काढून आपलं काम पूर्ण करून टाकलं. अरे व्वा.. नवीन बाफ पण काढला म्हणत तो बाफ अधिकॄत रित्या उघडून सायोने सुपारी उचलली. आता तिथे झुरळांपासून, कचर्याच्या पिशव्यांपर्यंत कहीही टाकायची सोय करून टाकली.
उन्हाळी सम्मेलन हे काही खास व्यक्तींच्या सोईसाठी असतं याचा पूर्वेतिहास बर्याच लोकांना माहीत आहे. झक्कींच्या घरी झालेल्या मागच्या सम्मेलनानंतर हुड हा आयडी चांगला वर्षभर मायबोलीवरून परागंदा झालेला होता. तसाच काहीसा प्रयोग पुन्हा एकदा करून पहाण्यासाठी झक्कींच्या घरी सम्मेलन ठेवण्यात आले. हा प्रयोग नेहमीच यशस्वी होतो याची खातरजमा हुडाच्या मायबोलीवर अनुपस्थितीने होत आहेच. खरंतर झक्कींनी त्यांचे धोतरे नाहीसे केलेत अशी वदंता आहे. पण आपण प्रेमाने विनंती केली तर आपल्याला काही मान्यवर लोकांकडून २५ लाख रूपये मिळतील आणि सम्मेलन करता येईल म्हणून झक्की तयार झाले.
ए. वे. ए. ठि. हवे पण मला (स्वतःला) येता येणार नाही, यावर बर्याच आजी, माजी आणि भविष्यतल्या बाराकरांचे एकमत झाले, पण एकदा ठरल्यावर होत नाही ते बाराकरांचे एवेएठि नव्हेच अशी सरळ 'हुकूमावरून' तंबी देण्यात आल्याने 'ज्याना चुकले त्यांचा दोष' असा नवीन नियम काढणेत आलेला आहे, अगदी भारतात बसून 'तय्यब अल्ली... ' चे गाणे म्हटलेत तरी.
बाकी चर्चा करायला बाराकर तसे फारसे उत्सुक नसले तरी त्यातले काही पारल्याच्या बाफवर पडीक असल्याने त्यांची फळी मेन्यू या विषयावर चर्चा करायला बरीच उत्सूक.. त्यामुळे त्या चर्चेवर जवळपास ६०० पोष्टे पडली, असे 'हह'ने त्रैराषिक (Statistics) मांडले आहे. तिच्या/त्याच्या आगामी लेखात यावर एक विशेष टिकाटिप्प्णी असण्याची शक्यता नाकारली जात नाहीय. तिथे जमलेल्या अनेक व्यक्तींपैकी एका आयडीवर तो 'हह' असल्याच्या संशयही उघडपणे व्यक्त केलेला आहे.
निघालो तेव्हा मी नेहमीप्रमाणे खात्रीने 'चुकीचा पत्ता' GPS मधे टाकून तो चुकतो की बरोबर नेतो याची परीक्षा घेतली. माझा GPS स्वातीची चूक दाखवत बरोब्बर चुकीच्या पत्त्यावर पोहोचला. कुणी ना कुणी राजभोग कडून पोळ्या आणाव्यात म्हणून तिने सगळ्यांना 'राजभोग' चा पत्ता दिला होता. खरा पत्ता मेल मधे टाकून केलेली ही दिशाभूल माझ्याही लक्षात आली पण मेल माझ्या GPS ला जात नाही, त्यामुळे फोनवरून पत्ता घ्यावाच लागला. बरं तिथे उतरून कुणाला विचारावं तर शॉटगन सीटवर भाई, आणि ते अगदी किर्तनकाराच्या वेशात आल्याने (बघा फोटो) त्यांना विचारायला पाठवावे तर लोकांनी त्यांना मराठी नाटकाच्या फडातले समजून तिकडे पाठवले असते. स्वातीचे घर नाही सापडले तर आपण चार, मागून येणारी मैत्रेयी आणि काही 'राजभोग' ला पोहोचलेले आयडी मिळून 'जेवणाचा ताबा असलेले बाराकर' असं मिनी ए. वे. ए. ठि. करू असाही एक विचार होता.
स्वातीच्या घरी गेलो तर यजमानीणबाई एकदम पूर्ण मराठी पोषाखात स्वागत करायला तयार. चि. आदित्यने डोक्यावर फेटा वगैरे घालून स्वागत केले, तेव्हा हजर असलेल्या बहुतेक अर्ध्या पँटीनी 'पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवू' असे नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन टाकले. 'शिट्टीकर घरून निघाले आहेत आणि काही विशेष पाहूण्यांना घेऊन पोहोचत आहेत' अशी घोषणा ही होत होती, पण ते 'रडं' नेहमीचंच असल्याने कुणाला काही फारसे वाटले नाही. 'म्हशीत म्हस' शिट्टीकरांची असतेच हे मागच्या एवेएठिपासून माहीतच आहे.
लालू, रॉनि, सुमंगल वगैरे मंडळीनी लगेच हजेरी लावली. मुख्य म्हणजे मैत्रेयीपण न चुकता वेळेप्रमाणे फक्त पाचच मिनिटे उशीरा आली. बटाटवडे गरम करायला गरम चुलीमधे सरकेपर्यंत 'राजाकोळी' ची पहिली फेरी संपून नयनीशने आणलेले 'मधमद्य' सुरू झालेलेच होते. फचिन पाच मिनिटात पोहोचणार तो आता 'दहा' मिनिटे म्हणायला लागला. तेव्हा तो दक्षिणेकडे निघाला असावा असे अनुमान करण्यात आले.
मी ज्या 'काहीतरी' करण्याचे ठरवले होते, ते 'कोळंबी सुका मसाला' असल्याचे सिध्द झाले. तर भाईनी 'कोळंबी भाजी' आणून यजमानीणबाईंना नाराज केलेच. त्यांच्या चिरंजीवानी उघडउघड तर यजमानानी मनातल्या मनात खुषी दर्शवली. याशिवाय फिशफ्राय, वांग्याची भाजी, पाट्-वड्या (याचा उच्चार अर्धा ट करूनच करावा .. हुकूमावरून) परागने पाठवलेल्या बाजारी चितळेवड्या यावर खाण्याची पहिली फेरी झाली.. मग शिंडी, परागजोडी आणि मामा पण उगवले आणि त्यांनी स्वत: बरोबर अजून बाकरवड्या आणल्या. विषेश उपस्थितीमधे 'केदार' चा उल्लेख करावाच लागेल कारण तो शिकागोवरून मुद्दाम आला होता. लालूने आणलेले गरमागरम बटाटेवडे स्वयंपाकघरामधे, तर मंडळी बाहेर बसून फुकट चर्चा करताहेत असं लक्षात आल्यावर, मी 'बटाटवडे मस्त झाले होते', अशी घोषणा केली आणि सगळे स्वयंपाकघरात शिरले. यजमान्नानी बर्याच लोकांना बाहेरच्या खोलीत बसण्याची विनंती करून पाहीली, पण मासे आणि वडे सोडून बाहेर जायला कुणी तयार झाले नाही.
आंबाडीची भाजी, आणि वांग्याची भाजी अश्या दोन भाज्या शाकाहार्यांसाठी होत्या. आंबाडीला गोंगुरा म्हणतात तेलगू लोक आणि त्याचे लोणचेही करतात. (दोन उल्लेख झाले अजून एक शिल्लक.) त्यात प्राचीने कोंथिबीरीचे लोणचे करून आणले. तेव्हा यानंतर, जिर्याचे लोणचे, मेथीचे लोणचे वगैरेही पुढच्यावेळी खावी लागतील असा एक अंदाज आहे. आंबाडीची भाजी मस्त झाली होती (तीन... ) असं श्री. सुमंगल म्हणाले. ते प्रत्येक भाजीकडे संशयाने बघत होते, मग मी त्यांना चिकन/मासा आणि भाजीतला फरक दाखवून दिला. म्हणजे नयनीश पानात घेईल ते चिकन्/फिश आणि तो न घेईल ती भाजी असा.
यानंतर तिथे नक्की काय घडले मला फारसे आठवत नाही. हा त्या मधमद्याचा परीणाम असावा. जमलेल्या मंडळीनी शिरस्त्याप्रमाणे सध्याच्या सगळ्या बाफंवर चर्चा करून घेतली. त्यात मधमद्याचा परीणामामुळे काही विधाने अशी ऐकू आली.
१. मैत्रेयी - 'लिंबु' चांगली चांगली पोष्टे लिहीतो.
२. झक्की - सगळ्या कविता बंद न केल्यास मी कविता लिहीणे सुरू करीन.
३. विकू - सोनियाबाईंच्या पुतळ्याला हार घातल्याशिवाय मी पुढचा घोट घेणार नाही (कशाचा ते कळले नाही).
४. भाई - शेवटचा थेंब पिल्याशिवाय मधमद्याचा सन्मान होत नाही (अपमान होतो).
५. केदार - शिकागोमधे बरेच म्हातारे लोक झक्कींप्रमाणे वागतात.
६. नयनीश - झक्कींचे वय १०६ वर्षे नक्कीच आहे.
७. भाई - असामी हा फक्त सातवर्षातून एकदाच सम्मेलनाला येतो (???)
८. आबे - मला चहा हवा.
९. मॄ - (हजर नसूनही) माझे कोणीच कसे ऐकत नाही.
११. झक्की - (यांची बरीच विधाने अगदी विषयाला धरून होती, त्याअर्थी ते नेहमीप्रमाणे रंपा मोडमधे होते)
१२. किरण सतराव्यांदा कायमचा भारतात जाणार आहे..
बाकीच्या गप्पा इथे सांगता येणार नाहीत, कारण त्या मलाच कळलेल्या नाहीत.
स्वातीच्या गाण्याने या(ही) ए.वे.ए.ठि.ची सांगता झाली. नयनीश, 'पुढचे सम्मेलन कधी' असे विचारण्यापूर्वी मी निघालो. यात बर्याच लोकांचा अनुल्लेख झालेला आहे पण त्याला असलेली कारणे स्पष्ट करण्याची जबाबदारी मी झटकून टाकलेली आहे. तरी काही खरी सत्ये.
१. कोथिंबीरीचे लोणचे होऊ शकते. (प्राची).
२. दहीभाताप्रमाणे मलाईसँडवीच घरी करता येते (वृंदा).
३. २३ जुलैला असलेला बुवांचा वाढदिवस चोवीसला केला तरी चालतो. (केक परागने आणल्याशी कारण)
४. पराग बायकोच्या तोंडावर 'खोड्या' काढतो. घरी गेल्यावर त्याचे काय होईल देव जाणे.
५. बाईमाणूस प्रॉम्टींग करू शकतात.
६. आबे 'चहा' व्यतिरिक्त फारसा बोलत नाही.
७. रावण पिठल्याचा उन्हाळ्यामुळे झुणका होतो (हा चर्चेचा विषय होऊ शकतो).
>> स्वाती चे सर्वांना
>> स्वाती चे सर्वांना धुमा़कूळ घालून दिल्याबद्दल खास आभार.
घालून दिल्याबद्दल का घालू दिल्याबद्दल?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भारी आहे चायला. एवढे लोक्स
भारी आहे चायला. एवढे लोक्स आहेत तिकडे. वाचुनच मस्त वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मज्जा आहे
झक्की बाकी डॉन दिसतायत.
ते घालु न दिल्याबद्दल अस आहे.
ते घालु न दिल्याबद्दल अस आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सगळ्यांचे पेग मॉनिटर करत
मी सगळ्यांचे पेग मॉनिटर करत होतो म्हणुन गोंधळ झाला नाही!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धमाल वृ देसाई!! बाकी फोटो
धमाल वृ देसाई!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी फोटो काढलेल्या सगळ्यांनी तिथे आलेल्या आमच्या अटलांटाच्या प्रतिनिधीला फोटो पाठवा, त्याला इथे वृत्तांताबरोबर प्रेझेंटेशन करायचे आहे!
देसाई, मस्त वृत्तांत.. मजा
देसाई, मस्त वृत्तांत.. मजा आली वाचायला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुम्ही लिहिलेला वृत्तांत हा ५०% एवेएठीचा आहे. असामी म्हणतोय तिथपर्यंत ७५% झाला असेल आणि आम्ही निघाल्यावर मग संपला एवेएठी...
शेवटी स्वाती म्हणाली, "खरंतर आता तुम्ही इथेच रहा आज..". मग लोकांना वाटलं की स्वाती उपरोधाने असं म्हणतीये, मग निघाले सगळे गपचूप. तरी दोन चिवट आयड्या तिथे राहिल्याच.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्या एवेएठीमध्ये सर्वात कमी बोलणारा म्हणजे अबे. तो फक्त गौतम बुध्दांसारखं मंद स्मित करुन सगळ्यांकडे कृपादृष्टीने पहात होता.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आमचा खाद्या एवेएठी शुक्रवारी रात्रीच सुरू झाला होता सिंड्रेलाकडे. तिने दहीवडे, गाजर का हलवा, बिरड्याची उसळ असं बरंच काही केलं होतं. एवेएठीलाही सगळे पदार्थ भारी होते. तिथे एवढे पदार्थ असतात की काय खाल्ले हे लक्षात रहात नाही. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे झिप-लॉक बॅगांमध्ये जमतील तितके पदार्थ घेऊन आलो आणि रविवारी अगदी चवीने खाऊन संपवलं सगळं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पानांचा अर्धा खर्च विकुंनी केला आहे. त्यामुळे पानांसाठीचे धन्यवाद त्यांना द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवेएठी ठेवल्याबद्दल स्वाती आणि कुटुंबियांचे आभार. स्वातीचे घरही छान आहे. या एवेएठीला मला बरेच नवीन लोक भेटले - अबे, केदार, असामी, शिल्पा इ. खरंच मजा आली पण.
तो फक्त गौतम बुध्दांसारखं मंद
तो फक्त गौतम बुध्दांसारखं मंद स्मित करुन सगळ्यांकडे कृपादृष्टीने पहात होता >>>
अगदी अगदी.
मला अबेडेकर हा आयडी टण्याच्या वडीलांचा आहे असे खूप दिवस वाटायचे.
<पानांचा अर्धा खर्च विकुंनी
<पानांचा अर्धा खर्च विकुंनी केला आहे.>
यावरून आठवण झाली. या संमेलनाची वर्गणी किती? कुणाला नि कशी द्यायची?
असामी नाव सांग कोण कोण असे
असामी नाव सांग कोण कोण असे वाटले ते>>तू हुशार आहेस असे झक्कींनी ठासून सांगीतले आहे तेंव्हा तूच ओळख बघू :p
मला अबेडेकर हा आयडी टण्याच्या वडीलांचा आहे असे खूप दिवस वाटायचे.>> :p
आमचा खाद्या एवेएठी शुक्रवारी रात्रीच सुरू झाला होता सिंड्रेलाकडे. तिने दहीवडे, गाजर का हलवा, बिरड्याची उसळ >>तुमच्या एकंदर तयारीला उशीर का झाला सकाळी ते आत्ता लक्षात येतेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शेवटी स्वाती म्हणाली, "खरंतर आता तुम्ही इथेच रहा आज..". मग लोकांना वाटलं की स्वाती उपरोधाने असं म्हणतीये, >> आम्ही दोनेक तास रेंगाळलो बाहेर, केदाराने ऐतिहासिक दस्तऐवज काढले तरी तेंव्हा असे काहि बोलल्याचे ऐकले नाही. शो ना हो. ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अबेडेकरने यावेळी झलक पाहिली
अबेडेकरने यावेळी झलक पाहिली लोकांची त्यावरुन त्याला पिक्चरचा अंदाज आला असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या जुन्या मान्यवर सभासदांची
ह्या जुन्या मान्यवर सभासदांची आठवण निघाली होती - दीपांजली, स्तोरवी, मॅवरिक, मुकुंद, अज्जुक्का, द्_पुणेकर, अंताक्षरी सम्राट वैभव साठे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<<< अबे,
धन्यवाद !
पण माझी आठवण कोणी काढली त्यावर अवलंबून आहे आठवण कशा साठी काढली असेल त्याचा
देसाई,
वृत्तान्त झकास पण भाई आणि स्वातीच्या ड्रेस चं वर्णन तज्ञां कडून माहिती घेऊन अपडेट करा !
नुसतं 'पारंपारीक महाराष्ट्रीय' म्हणणे म्हणजे स्वाती आणि भाईंच्या मेहनतीचा अपमान
मस्त वृत्तांत !
मस्त वृत्तांत !
ते पोशाख घालणे खरच मेहनतीचेच
ते पोशाख घालणे खरच मेहनतीचेच काम आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भाई तर सारखे कोणाचे लक्ष नाही बघुन पंखा हळूच तेंच्या धॉत्राच्या बाजूला करायचे. एक दोन जणांनी तंबी पण दिली त्यांना
डीजे, पग्याने काढली होती गं
डीजे, पग्याने काढली होती गं आठवण![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फच्या, सकाळी आलं घालून \चहा केला तो राहिला की लिहायचा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हा टण्या कोण?
हा टण्या कोण?
टण्या बेडेकर.. तसा आयडी आहे..
टण्या बेडेकर.. तसा आयडी आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणी सांगेल का प्लीज? "\चहा"
कोणी सांगेल का प्लीज?
"\चहा" म्हणजे काय?
रुयामा, तुझं वय किती ते सांग
रुयामा, तुझं वय किती ते सांग आधी. १८ वर्षाखाली असशील तर उगाच कोणाला तरी जेल व्हायची.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ऋयाम सकाळचा चहा नावाची कविता
ऋयाम सकाळचा चहा नावाची कविता येऊन गेली. त्यावरुन लै मोठा वाद झाला. तो स्वतःच वाच. करमणूक होईल. त्या कवितेत काही लोकांना चहाचे रुपक अश्लील वाटले, म्हणून खर्या चहाला फारेंडाने \चहा असे नाव दिले. आता लोकांना वारंवार ते \ लावू नका असे सांगूनही ते \ लावतातच.
विसु. - चहा घेण्यासाठी योग्य वय यावे लागते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला अबेडेकर हा आयडी टण्याच्या
मला अबेडेकर हा आयडी टण्याच्या वडीलांचा आहे असे खूप दिवस वाटायचे. >>>
मला पण सगळ्यात पहिल्यांदा माबोवर आल्यावर असच वाटलं होतं.. पण आमचे पिताश्री 486 आणि wordstarच्या पुढे न गेल्याने शंका लगेच फिटली..
आभार वैद्यबुवा आणि केदार. §
आभार वैद्यबुवा आणि केदार.
§ सकाळचा चहा वाचीन शोधुन. !!
बाकी, वय माझे २५ आहे.( जन्म १९८३. )
अरे तू ते वयाचे काय खरंच घेऊन
अरे तू ते वयाचे काय खरंच घेऊन बसलास का? ती कविता वाच मग अर्थ लागेल.
गम्मत केली हो. शोधतोय आता
गम्मत केली हो. शोधतोय आता ते...
अरेरे.. http://www.maayboli.com/node/8440
Pages