माझ्या आईची शिवणकला.
माझ्या आईला शिवणकामाची फारच हौस! सध्या तर तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलेलं आहे.
माझ्या आज्जीला (आईची आई) शिवणकामाची आवड. तोच वारसा आईकडे आला. मात्र, तिला मोठ्याचे कपडे वगैरे शिवायला आवडत नाही. तिचे स्पेशलायझेशन लहान बाळाच्या कपड्यामधे आहे. दरवर्षी तिचा चातुर्मासाचा नेम पाच बाळगोपाळाना "ड्रेस देणे" असा असतो. :)सध्या तिने एकूणात ८० दुपटी, २५ झबली आणि अजून बरंच बरं काय काय शिवलय. अजून इकडे तिकडे दुकानात जाऊन बघून यायचं आणी घरी येऊन शिवायचं हे तिचं चालूच आहे.
डिसेंबरमधे आईची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर फक्त आणि फक्त शिवणकाम, चालणे आणि आहारावर नियंत्रण यावर तिने शुगर,वजन, बीपी सर्व कंट्रोलमधे ठेवलय.
आईने शिवलेल्या काही बाळंतविड्याचे हे फोटो.
================================================
हे पिंपळपान.
=================================================
चॉकोलेट पाह्यजे???
=================================================
कार्टूनचा शर्ट!!
=================================================
ही कुंची.
=================================================
दिसतय ना छान??? बाळूच्या अंगावर घालायला शाल आहे.
=================================================
टोपडे आणि झबले.
=================================================
अजून दोन झबली.
=================================================
हे लाळेरं, बाळाचा रूमाल आणि हातमोजे.
=================================================
अजून एक टोपडं, झबलं आणि लंगोट.
=================================================
आणि ही लोकरीची शाल. माझी आईने नव्हे, माझ्या आत्याने माझ्यासाठी विणलेली. घरामधे असलेली सर्व उरलीसुरली लोकर घेऊन बसल्या बसल्या एका दिवसात तिने विणली.. म्हणे!!!
आता पुढच्या महिन्यात आत्या येणार आहे, तेव्हा "घरात उरले सुरले लोकर चिंध्या सर्व जोडून ठेव, मी येऊन शिवेन काय शिवायचे!!" असं पत्र आधीच पाठवलय. (आत्या अजूनपण पत्र लिहिते, वकिलाची पत्नी असल्याने "पत्राचा पुरावा राहतो, फोनवर बोलण्याचा राहत नाही" असा तिचा युक्तिवाद असतो)
=================================================
आणि ही आज्जीनेच शिवलेली कुंची. वेल्वेटचे कापड आणि त्यावर मोती लावलेले. खास माझ्या बारश्यासाठी आज्जीने शिवली होती. आता ती असती तर अजून एकदा तिने उत्साहात शिवली असती. आता ती नाही पण तिच्या अशा बर्याच आठवणी आईने जपून ठेवल्या आहेत.
=================================================
नंदीनी फारच सुंदर आपल्या
नंदीनी फारच सुंदर आपल्या जनरेशनेक्सट्ला अशी कलाकुसर बहुतेकदा एकतर नेट पहावी लागणार किंवा ग्राहक पेठेतल्या स्टॉलवर बढिया है
मस्तचे.. मला सगळं आवडलं! पण
मस्तचे.. मला सगळं आवडलं! पण कुंच्या सगळ्यात बेस्ट!!
खूप मस्त गं! मला खूप आवडतात
खूप मस्त गं! मला खूप आवडतात बाळांचे कपडे बघायला. ताई बाळंतपणानंतर घरी गेली तेव्हा आम्ही धाकट्या दोघी तिच्या छकुलीचा फ्रॉक कवटाळून रडल्याचं आठवलं!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला भरतकाम, विणकाम शिकायच
मला भरतकाम, विणकाम शिकायच आहे. मी मुंबईमध्ये बोरिवली येथे रहाते. या भागात शिकवणारं कोणी असेल तर नक्की सांगा. धन्यवाद.
शाल आणि दोन्ही कुंच्या सुंदर
शाल आणि दोन्ही कुंच्या सुंदर आहेत. ते चॉकलेट चं दुपटं आहे ना तसं भिरभिर्याचं दुपटं शिवलं होतं आत्या ने भावाच्या वेळी. मी पण निलय च्या वेळची दुपटी काढून देईन १ झब्बू १/२ दिवसात.
सुरेखच आहे सगळे!!!
सुरेखच आहे सगळे!!!
मस्त एकदम. आई इथे आल्यावर एक
मस्त एकदम. आई इथे आल्यावर एक दिवस सुद्धा स्वस्थ बसली नव्हती. रोज माझ्या मुलीसाठी फ्रॉक,स्कर्ट काहीना काही शिवायचीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिनू तुम्ही मिनोतीचा विणकामाचा ब्लॉग पाहिलाय का? बरेच टाके शिकता येतील तुम्हाला.
छान शिवलेत सगळे कपडे. ते
छान शिवलेत सगळे कपडे. ते पिंपळपान कित्ती जुना प्रकार आहे न. आईने माझ्यावेळेस शिवले होतं ते दुपटं. ते तिने इतकं जपून ठेवलं होतं. मी माझ्या दोन्ही लेकांच्या वेळी वापरलं.
कुंची एकदम क्युट आहे.
प्रज्ञा, टाक ग फोटो. आवडेल बघायला त्यांचं विणकाम.
कार्टूनचा शर्ट, अन आजीने
कार्टूनचा शर्ट, अन आजीने शिवलेली कुंची मस्तच !
मस्तच आहे नंदिनी. तुझ्या
मस्तच आहे नंदिनी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझ्या बाळाचि मज्जा आहे तर.
सर्वाना धन्यवाद!! सावनी,
सर्वाना धन्यवाद!! सावनी, बाळाला दुपट्यामधे पिंपळपान शिवतातच!! बाळकृष्ण पिंपळपानावर झोपतो ना म्हणून
पण शिवायला फारच किचकट प्रकार आहे म्हणे!!!!
अरे झब्बू देणार्यानो. लवकर झब्बू द्या!! आईला तितक्याच आयडिया मिळतील.
हा काल शिवलेला बदकाचे दुपटे. बदकाला डोळा आणि चोच विणायची आहे.
वॉव. एकदम मस्त.
वॉव. एकदम मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदिनी, माझ्या बहिणींच्या
नंदिनी, माझ्या बहिणींच्या बावि चे फोटो टाकले असते पण आता कधी जमणार..? तुला नुसतीच आयडिया देते.. त्यात फुलपाखराचे दुपटे, मनीमाऊचे दुपटे, सदगुणांची पत्रिका, a,b,c,d , अ आ ई, अक्षरांची दुपटी, पाटीचे दुपटे (हे बेस्ट दिसते. पांढर्या शुभ्र किंवा कोणत्याही फिकट पप्लेन कापडावर पाटीएवढे चौकोनी काळे कापड मधोमध पॅच करायचे. त्याला लाकडी रंगाची दिसेल अशी बॉर्डर कर. आणि त्यावर बारशाच्या वेळी जे नाव ठेवणार असाल ते रंगाने / भरतकामाने लिही. बारशाला नाव ठेवले की त्यावरचा रुमाल बाजूला करायचा.
).
अगं नंदिनी कित्ती गोड आहेत
अगं नंदिनी कित्ती गोड आहेत कपडे!
मस्त शिवलेत कपडे. आ़ज्जींनी
मस्त शिवलेत कपडे.
आ़ज्जींनी शिवलेला तो फ्रॉक कसला जबरी आहे.
नंदीनी खुप छान आहे आईची कला.
नंदीनी खुप छान आहे आईची कला.
झब्बु टाका रे. छान वाटत बावि
झब्बु टाका रे. छान वाटत बावि बघायला! माझ्याकडे एक पत्रिकेचं दुपट आहे. त्याचा टाकते १/२ दिवसांत. बाकी माझ्या मुलींचे ईथलेच आहेत त्यामुळे आपल्याकडे असते तशी विविधता नाही!
नंदीनी, सगळे आयटम्स झकास
नंदीनी, सगळे आयटम्स झकास झालेत म्हणून सांग तुझ्या आईला.
बदकवाले दुपटे मस्त ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या आईलाही विणकाम येते. आम्हा दोघी बहिणींच्या लहानपणीचे सगळे स्वेटर्स, मफलर्स तिनेच विणले होते. नंतरही किती तेरी जणांना विणून दिले तिने वेगेवेग्ळ्या डिझाईन्स चे स्वेटर्स. पण आता डोळे शीणतात तिचे म्हणून विणकाम सोडलंय. पण पूर्वी घरात शिलाई मशीन होतं तेव्हा बरेच कपडे घरच्या घरी बेतून शिवत असे ती. मध्यंतरी ती शिलाई मशीन विकून टाकली उपयोग फारसा होत नाही म्हणून. पण काही दिवसांपूर्वीच उषाचं जमिनीवर बसून शिवन्याचं शिवणयंत्र आणलंय तिने उत्साहाने.
अजून शिकतेय त्यावर शिवायला ती.
मी ही राजस साठी सगळी दुपटी आणि झबली शिवूनच घेतलली आहेत. आम्च्या वरच्या मजल्यावर एक काकू राहतात. त्या अशा प्रकारचे बावि तयार करतात. शिवाय एक ओळखीच्या आजी आहेत. त्यांनीही बरिचशी झबली शिवून दिली आहेत. मी पब झब्बु टाकेन उद्या-परवा कडे.
माझ्या पिल्लूला पण घेतले होते आम्ही पिंपळपानावाले दुपटे. वापरतोय अजूनही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदीनी, मी माझ्या मनाने काही झबल्यांचे पॅटर्न्स दिले होते त्या आजींना शिवायला. माझ्या हौसेसाठी म्हणून राजससाठी एक छान छान फ्रॉक पण शिवून घेतला होता मी. शिवाय मी लहानपणी शाळेत शिवणकाम शिकवायचे त्यावेळी बनवलेले एक झबले आहे जे पिल्लू ला आत्ता आता पर्यंत वापरत होतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या आणि बहिणीच्या कॉटनच्या ओढण्यांची दुपटी, टोपडी आणि झबली शिवून घेतली होती. या सगळ्यांचे फोटो टाकेन हं का मी
सर्वाना प्रतिक्रियेसाठी
सर्वाना प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
आशूडी, पाटीचे दुपटे लवकरच शिवण्यात येइल.
फुलपाखराचे आणी मनीमाऊचे बाळू झाल्यावर शिवले जातील. (माझ्या बारश्यातले फुलपाखराचे दुपटे अजून जपून ठेवण्यात आलेले आहे!!)
आता सध्या तरी जुन्या कपड्याची ढुखाली घालायला (:फिदी:) आणि अंगावर घालायला शिवण्यात येत आहेत. झबली देखील नंतरच शिवणार आहे (मुग्गा की मुग्गी हे समजल्यावर
)
पत्रिकेचे दुपटे (ह्म्म्म!!!) फोटो टाका!!
बदकाचे दुपटे मला शाळेत सातवीत
बदकाचे दुपटे मला शाळेत सातवीत शिवणाच्या पेपर ला होते. पत्रिकाचे दुपटे व पाटीचे दुपटे मस्त आय्डिया दिसतात. ग्रेट. कॉटन च्या ओढ्ण्यांची दुपटी खरेच मस्त होतात. मग बाळ मोठे होत गेले की आईच्या ओढ्ण्याच कामी येतात.
मस्तय खूप. आईने माझ्या
मस्तय खूप. आईने माझ्या बाळासाठी पण इतकी दुपती शिवली होती! पिंपळपान होतच. अॅक कॅरमचं पण होतं दुपटं.
कुंच्या बेस्ट आहेत.
जोरात आहे तयारी! मस्त आलेत
जोरात आहे तयारी! मस्त आलेत फोटो, माझी आई अनेक वर्ष शिवण्-क्लास घ्यायची, त्यामूळे माझ्या दोन्ही भाचरांच्या बाळंत विड्याला अनेक कल्पक प्रकार केले होते.माझ्या मुलिच्या वेळेला सुद्धा आईने दुपट्याचे वैगरे बरेच प्रकार आणले होते.
एक्-दोन आहेत अजुन्(फोटो टाकते)
भांच्यांच्या वेळेला केलेले आणि मला आठवतात ते प्रकार
१)पिंपळ्-पान
२)आईस्क्रिम कोनचे डिझाईन असलेले दुपटे
३)मांजरींच डिझाईन असलेले दुपटे
श्रेयासाठी जरिच्या काठाची कुंची आणली होती.
माझ्याकडे पण आईस्क्रीम कोन,
माझ्याकडे पण आईस्क्रीम कोन, पोपट, कोंबडी आणी तिची पिल्लं, ससुल्या, पिंपळपान अशी दुपटी आहेत. नेमका सध्या कॅमेरा नाहीये. जाम कडकड होतेय माझी. स्वेटर मधलं बाळ, दुपट्यावरचं बाळ, कुंची घातलेलं बाळ असे आहेत फोटो. मेल करते तुला वाटल्यास नंदिनी. हा एक मिळाला फोटो. बाकी बघते अजून काही ईथे देता येण्या सरखं असेल तर डकवीन ईथे. दुपटी सदाशिव पेठेत ( त्या अ. हा. सं मधल्या प्रसाद ओकच्या वाड्यात ) कुणी बाई रहातात त्यांच्या कडून शिवून घेतली होती.
प्रॅडी, नक्की मेल कर.
प्रॅडी, नक्की मेल कर.
{नाहीतर "त्या" बीबीवर टाक
}
प्राजक्ता, फोटोपण टाक गं. आईला हे सर्व वाचून अजून उत्साह वाढलाय. नविन नविन कल्पना मिळतायत ना!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम छान!!!
एकदम छान!!!
पोपट क्युटै.
पोपट क्युटै.
तयारी एकदम जोरात आहे नंदिनी.
तयारी एकदम जोरात आहे नंदिनी. छान आहेत सगळे प्रकार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती कलाकार आहेत तुझ्या
किती कलाकार आहेत तुझ्या घरातल्या सगळ्याच पिढ्यांमधल्या बायका... मला तुझ्या आज्जीने तुझ्यासाठी विणलेली कुंची विशेष आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा फार छान आहे सर्व अशि झबलि
वा फार छान आहे सर्व अशि झबलि विकत देखिल मिलत नाहि.
आमच्याकडे अगदी ऐतिहासिक
आमच्याकडे अगदी ऐतिहासिक म्हणता येईल अशी प्युअर सिल्कची धारवाडी कुंची आहे. अप्रतीम सुंदर !ती माझ्या सासर्यांची आहे. ती नवरोबांनी वापरली. माझ्या मुलांनी वापरली. आता ती जावेकडे आहे. आमच्या घरात सर्वात लहान तिचीच मुलगी आहे. कुंची अगदी छान ठेवली आहे. आता पाहू कोण वापरतं ते!चांगली मोठी आहे.
Pages