माझ्या आईची शिवणकला.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या आईला शिवणकामाची फारच हौस! सध्या तर तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलेलं आहे.

माझ्या आज्जीला (आईची आई) शिवणकामाची आवड. तोच वारसा आईकडे आला. मात्र, तिला मोठ्याचे कपडे वगैरे शिवायला आवडत नाही. तिचे स्पेशलायझेशन लहान बाळाच्या कपड्यामधे आहे. दरवर्षी तिचा चातुर्मासाचा नेम पाच बाळगोपाळाना "ड्रेस देणे" असा असतो. :)सध्या तिने एकूणात ८० दुपटी, २५ झबली आणि अजून बरंच बरं काय काय शिवलय. अजून इकडे तिकडे दुकानात जाऊन बघून यायचं आणी घरी येऊन शिवायचं हे तिचं चालूच आहे.

डिसेंबरमधे आईची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर फक्त आणि फक्त शिवणकाम, चालणे आणि आहारावर नियंत्रण यावर तिने शुगर,वजन, बीपी सर्व कंट्रोलमधे ठेवलय. Happy

आईने शिवलेल्या काही बाळंतविड्याचे हे फोटो.

================================================
हे पिंपळपान.

DSC02545.JPG

=================================================

चॉकोलेट पाह्यजे???

DSC02546.JPG

=================================================
कार्टूनचा शर्ट!!

DSC02549.JPG

=================================================

ही कुंची.

DSC02551.JPG

=================================================
दिसतय ना छान??? बाळूच्या अंगावर घालायला शाल आहे. Happy

DSC02553.JPG

=================================================

टोपडे आणि झबले.

DSC02554.JPG

=================================================

अजून दोन झबली.

DSC02555.JPG

=================================================
हे लाळेरं, बाळाचा रूमाल आणि हातमोजे.

DSC02556.JPG

=================================================

अजून एक टोपडं, झबलं आणि लंगोट.

DSC02557.JPG

=================================================

आणि ही लोकरीची शाल. माझी आईने नव्हे, माझ्या आत्याने माझ्यासाठी विणलेली. घरामधे असलेली सर्व उरलीसुरली लोकर घेऊन बसल्या बसल्या एका दिवसात तिने विणली.. म्हणे!!! Happy

आता पुढच्या महिन्यात आत्या येणार आहे, तेव्हा "घरात उरले सुरले लोकर चिंध्या सर्व जोडून ठेव, मी येऊन शिवेन काय शिवायचे!!" असं पत्र आधीच पाठवलय. (आत्या अजूनपण पत्र लिहिते, वकिलाची पत्नी असल्याने "पत्राचा पुरावा राहतो, फोनवर बोलण्याचा राहत नाही" असा तिचा युक्तिवाद असतो) Proud

Dupate1.jpg

=================================================

आणि ही आज्जीनेच शिवलेली कुंची. वेल्वेटचे कापड आणि त्यावर मोती लावलेले. खास माझ्या बारश्यासाठी आज्जीने शिवली होती. आता ती असती तर अजून एकदा तिने उत्साहात शिवली असती. Sad आता ती नाही पण तिच्या अशा बर्‍याच आठवणी आईने जपून ठेवल्या आहेत.

DSC02550.JPG

=================================================

विषय: 
प्रकार: 

फोटो?????????????????????????>> नंदिनी आज परत PC बंद करुन फिरायला गेलीस कि काय ?

नंदीनी झोपली बहुतेक. किंवा लोडशेडिंग मुळे मध्येच पीसी बंद झाला असेल. किंवा बाळराजांना भूक लागली असेल किंवा.................. नंदीनीच सांगेल काय ते Wink

कुंची सुंदर आहे. अश्याच एक दोन जरा जरा मोठ्या कॉटनच्या शिवायला सांग आईला... 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत आंघोळीनंतर बाळाला वेढून घ्यायला छान पडतात.

शाल पण सही झालिये.

तू काय विणत्येस? Happy

मंजूडी, पाच सहा (विविध साईझमधल्या) कुंच्या शिवून झाल्या आहेत Happy

मी आई शिवण मशिनवर बसली की जोरजोरात ओरडते. (मला लहानपणापासून त्या मशिनचा आवाज सहन होत नाही Proud ).

नंदिनी खूपच छान शिवलय सगळं. नातवंड येणार म्हटलं की आजी आजोबांना चढणारा हुरूप काही और असतो. मग कुठलेही शारिरीक त्रास जाणवत नाहीत. उलट ही अशी तयारी म्हणजे टॉनिक असतं त्यांना.

भारीच की Happy ओ, पण झब्बु स्विकारले जातील का ? आमची आई पण फुल्ल बा. वि. स्पेश्यालिष्ट आहे हो Wink

मलाही खुप राग यायचा. कॉलेजात एवढे दिवे लाऊन दमलेला कुलदिपक दुपारी घरी जरा झोपावं म्हणतोय तर धाडाधाड्धाड... नाहीतर गाण्याच्या क्लासच्या पोरी.... Angry

ऋयाम, झब्बू इथेच दिलात तरी चालेल, नविन झब्बू दिलात तरी चालेल. Happy

प्रॅडी, हातमोज्याची आयडिया तुझ्याकडूनच उचलली. त्यात परत आईने थोडी कलाकुसर केलीच. ते शिवताना जे काही चुकले माकलेले असतील ते सर्व मोबाईल पाऊच म्हणून वापरायला दिले!!

खरंच मला पण झब्बू द्यावासा वाटतोय. आईने आर्या साठी इतके सुंदर सुंदर स्वेटर विणलेत. ती पण एका बैठकीत विणते. हातमोजे, दुधाच्या बाट़ली साठी कव्हर्स, टोपडी, स्वेटर, राँपर असं अगदी हा हा म्हणता विणून होतात तिचे.

कसले गोजिरवाणे दिस्तात बाळांचे कपडे!

सगळंच सुंदर आहे, पण कुंच्या आणि हातमोजे जास्त आवडले.

नंदीनी फारच सुंदर आपल्या जनरेशनेक्सट्ला अशी कलाकुसर बहुतेकदा एकतर नेट पहावी लागणार किंवा ग्राहक पेठेतल्या स्टॉलवर बढिया है

Pages