Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53
ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.
हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किम पण आवडते पण विलियम्स पैकी
किम पण आवडते पण विलियम्स पैकी कुणीतरी जिंकवी असे इच्छिते >>> का ?
अमेरिकन आहेत म्हणुन मझे मत
अमेरिकन आहेत म्हणुन मझे मत त्यांना.
नोव्हाक ड्जोकोव्हिक आपल्याच
नोव्हाक ड्जोकोव्हिक आपल्याच चाललेल्या सामन्याकडे तटस्थपणे कसा पाहू शकतो? समोरच्या खेळाडूच्या चांगल्या खेळाला तिथल्या तिथे दाद कशी देतो.
टायब्रेक सुरु झाला (स्पे
टायब्रेक सुरु झाला (स्पे जेव्व्हा व्हीनस ४-० वरुन ४-४) तेव्हा हा सेट ग्रॉथ घेइल असे वाटत होते (मला तरी), अशा वेळी अनुभवी खेळाडु नेहमीच बाजी मारतात याचा प्रत्यय आला (तसा नेहमीच येतो) असो व्हीनस सलग जिंकली यात आनंद.
ग्रॉथने टायब्रेकरमधे
ग्रॉथने टायब्रेकरमधे मोक्याच्या वेळी खेळ उंचावला. परंतु तो तिला टिकवता आला नाही. व्हिनसचं कोर्ट कव्हरेज खूपच चांगलं होतं. ग्रॉथला मिळालेल्या संधीच रुपांतर विनर्स मधे करता आलं नाही. अनुभव महत्त्वाचा ठरलाच पण व्हिनस डगमगली असं कुठेही वाटलं नाही.
आजची शारापोव्हा सेरेना मॅच
आजची शारापोव्हा सेरेना मॅच मस्त झाली. पहिल्या सेटमध्ये दोघींनी जोरदार खेळ केला. विशेष म्हणजे शिव्या न देता, चिडचिड न करता खेळ म्हणजे खेळ केला. टाय ब्रेकरमध्ये शारापोव्हाने डबल फॉल्ट केला नसता तर मॅच तीन सेटमध्ये गेली असती. सेरेना फार ताकदवान फटके मारते. पहिल्या सेटमध्ये मारियाने तोडीसतोड फटके मारले. पण दुसर्या सेटमध्ये तिचा अॅटिट्युड ढेपाळलेला वाटला. तिने टाळता येण्याजोग्या चुका पण बर्याच केल्या.
फेररला हरवला की तुमच्या
फेररला हरवला की तुमच्या सोड्याने.
रॉडीक हरला !! उपांत्यपूर्व
रॉडीक हरला !!
उपांत्यपूर्व फेरीतले सामने स्पष्ट झाले आहेत.. पुरुषांमधे बर्डीच आणि लू हे अनपेक्षित चेहेरे दिसतायत..
त्यामुळे आता फेडरर वि बर्डीच, नोल वि लू, मरे वि त्सोंगा आणि राफा वि सोड्या असे सामने रंगणार..
महिलांमधे व्हिनस, किम आणि सेरेना एव्हड्याच अपेक्षित खेळाडू पोचल्यात..
सोड्या आणि नदाल पुन्हा
सोड्या आणि नदाल पुन्हा आमने-सामने..
रॉडीक कोणाकडून हरलाय? माहित सुध्दा नाही तो खेळाडू.. :|
हा बर्डिच अचानक चांगला खेळू लागलाय वाटतं. फ्रेंच ओपनमध्येपण चांगला खेळला होता. त्याची आणि फेडररची मॅच चांगली होईल.
थॉमस बर्डिच अनपेक्षित नाही.
थॉमस बर्डिच अनपेक्षित नाही. तो फक्त २४ वर्षांचा आहे, आणि ३ वर्षांपूर्वी त्याने करीअर हाय रँकिंग ९वे गाठले होते, सध्या १३ वा आहे. त्याला विजेतेपदी पोचण्यात अ़उन यश मिळत नाही..करीअर मधे ५ , २०१० मधे ० जेतेपदे. त्याचा देश बंधू रॅडेक स्टेपनेक कुठे हरवला?
शनिवारी राफाला बघून काळजी वाटत होती, की गेल्या फ्रेंच ओपनची पुनरावृत्ती नाही ना होणार? कालची मॅच बघून बरे वाटले. आता येऊ दे सोडर्लिंगला.
फेरर पाचव्या सेट मधे मॅच पॉइंट पासून एक गुण दूर असतानाही हरला. पण त्याने सोडर्लिंगला ५ सेट्स घाम गाळायला लावला.
पुरुश दुहेरीत भारताच्या दृष्टीने अनपेक्षित निकाल..एकटा बोपन्नाच(ऐसाम उल कुरेशी बरोबर) उप उपांत्य फेरीत पोचलाय. मिश्र दुहेरीत पेस शेवटच्या १६त आहे.
पराग/फचिन, तो बर्डिच 4th
पराग/फचिन, तो बर्डिच 4th राउंड विक्टिम आहे ह्या वर्षी त्याने फेडररला हरवले आहे ना कुठल्या तरी एटीपी टुर्नामेंटम्ध्ये ? फ्रेंच ओपनमध्ये पण सेमिज पर्यंत पोचला होता.
रॉडिकवाली मॅच भारी झाली. तो लु पण मस्तच खेळला. मला तो फार स्टर्डी वाटला कालच्या मॅचमध्ये. प्रेक्षकांचा अजिबात पाठिंबा नसताना, सपोर्ट करायला फॅमिली उपस्थित नसताना रॉडिक विरुद्ध पाच सेटर विंबल्डनमध्ये जिंकणे म्हणजे खरच कौतुकास्पद आहे.
विनस हरली
विनस हरली
रॉडिकवाली मॅच भारी झाली. तो
रॉडिकवाली मॅच भारी झाली. तो लु पण मस्तच खेळला. मला तो फार स्टर्डी वाटला कालच्या मॅचमध्ये. प्रेक्षकांचा अजिबात पाठिंबा नसताना, सपोर्ट करायला फॅमिली उपस्थित नसताना रॉडिक विरुद्ध पाच सेटर विंबल्डनमध्ये जिंकणे म्हणजे खरच कौतुकास्पद आहे.>>> अनुमोदन, मला ४था सेट टायब्रेक आणि ५वा सेट मिळाला पहायला. मस्त झाला.
फारच डिसअपॉईंटींग मॅचेस
फारच डिसअपॉईंटींग मॅचेस आजच्या..
व्हिनस आणि किम हरल्या !!! सेरेनाला फुलटू चान्स आहे आता परत..
किम आणि व्हीनस बाहेर व्हीनस
किम आणि व्हीनस बाहेर व्हीनस फक्त ५ गेम घेउ शकली मॅचमध्ये.
किमला जिंकायची चांगली संधी
किमला जिंकायची चांगली संधी होती पण तिने मोक्याच्या क्षणी चुका केल्या..
महिलांमध्ये उपांत्य फेरीत दोन बिगरमानांकीत खेळाडु पोहोचल्या आहेत..
व्हिनसला हरवणारी मुलगी छान
व्हिनसला हरवणारी मुलगी छान खेळत होती.
यावेळेस जोकोविच - फेडरर फायनल होइल असे वाटते. (या विधानात काहीही विनोदी, उ. पां. वा इल्लॉजिकल असे लिहिले नाही याची पराग ने व नादाल वि. फेडरर बद्दल लिहिलेले नाही याची मयुरेश व भरत यांनी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती) .
त्रिविक्रम.. ... पण असे का
त्रिविक्रम.. :)... पण असे का वाटतेय ते लिहिले तर बरं होईल..
विक्रम हरकत नाही आता सगळ्याच
विक्रम हरकत नाही आता सगळ्याच फायनल. जसे चुरशीचे सामने झालेत त्यावरून...
बोपन्ना कुरेशी उप उपांत्य फेरीत. जिंकले तर सामना ब्रायन बंधूंशी.
मयुरेश - जोको आणि फेडरर खरच
मयुरेश - जोको आणि फेडरर खरच खूप चांगले खेळत आहेत असे वाटतेय. नादाल ला अजूनही त्याचा नेहमीचा फॉर्म सापडलाय असे वाटत नाही. मरे फारच अन्प्रेडिक्टेबल आणि इनकन्सिस्टंट आहे. बघू पुढे.
विक्रम हरकत नाही आता सगळ्याच फायनल. जसे चुरशीचे सामने झालेत त्यावरून >> भरत : यु आर राईट.
विक्रम, सहमत रे तुझ्याशी..
विक्रम, सहमत रे तुझ्याशी.. आत्तापर्यंतच्या खेळावरून असा अंदाज बांधायला हरकत नाही. पण नदाल त्याचा खेळ मोक्याच्या क्षणी उंचावुही शकतो. त्यामुळे तो आणि जोको सेमीजमध्ये जर समोरासमोर आले तर नक्कीच एक चांगली मॅच पहायला मिळेल...
विक्रम, पण जोकोविक आणि फेडी
विक्रम, पण जोकोविक आणि फेडी यांची तर उपांत्य सामन्यातच भेट होऊ शकते. त्यांच्यात अंतिम फेरीची लढत कशी होइल?
रंगा, फेडरर आणि मरे , नदाल
रंगा, फेडरर आणि मरे , नदाल आणि जोको समोरासमोर येतील सेमीजमध्ये त्यांचे विंबल्डन रॅंर्कींग पहाता....
मया हे आजचे सामने आहेत..
मया हे आजचे सामने आहेत.. http://www.wimbledon.org/en_GB/scores/draws/ms/r5s1.html
Roger Federer SUI (1)
v
Tomas Berdych CZE (12)
Novak Djokovic SRB (3)
v
Yen-Hsun Lu TPE
Jo-Wilfried Tsonga FRA (10)
v
Andy Murray GBR (4)
Robin Soderling SWE (6)
v
Rafael Nadal ESP (2)
तू म्हणतो आहेस तसे खरे तर सीड १ विरुद्ध ४ आणि सीड २ विरुद्ध सीड ३ असे सामने सेमीफायनला व्हायला पाहिजेत पण यंदा ड्रॉ तसा नाहीये.. त्यामुळे सीड १ विरुद्ध सीड ३ आणि सीड २ विरुद्ध सीड ४ असे सामने सेमीला होऊ शकतील...
जर का असे सामने झाले तर असे कितव्यांदा असेल की सीडींग मधले पहीले ४ खेळाडू अपेक्षेनुसार सेमी फायनलला एकमेकां विरोधात उभे ठाकले आहेत?
हिम्या,अच्छा असं आहे का? ओके.
हिम्या,अच्छा असं आहे का? ओके.
हे विंबल्डन च्या साइटवरूनच
हे विंबल्डन च्या साइटवरूनच आहे तेव्हा 'मला' मारू नका.
Wednesday’s fast facts Eight players, eight different nationalities. Same as last year and at this year’s Aus Open. Rog is the oldest at 28 (pfff, call that old? I’m the same age as Kimiko Date Krumm…), Nole and Andy are the youngest at 23. We have the top four seeds in the quarters for the first time since 2007 (last year Nadal dropped out just before the tournament so we had seeds 2 – 33 as opposed to 1 – 32). Murray has yet to drop a set and is the only one with a clean sheet. He has dropped a mere 38 games, while his opponent Tsonga has dropped twice as many. Well 75 actually, but it’s near enough
पुरुषांच्या उप उपांत्य फेरीत ८ वेगवेगळ्या देशांचे ८ खेळाडू. गतसालाप्रमाणेच आणि यंदाच्या ऑ.ओपन प्रमाणे. रॉजर वयाने सगळ्यात मोठा २८ आणि नोल व मरे सगळ्यात लहान २३. २००७ नंतर प्रथमच अग्रमानांकित चार खेळाडू उप उपांत्य फेरीत. मरे हा एकटाच आहे जो एकही सेट अद्याप हरला नाहीए आणि सगळ्यत कमी म्हणजे ३८ गेम्स हरलाय.
या विधानात काहीही विनोदी, उ.
या विधानात काहीही विनोदी, उ. पां. वा इल्लॉजिकल असे लिहिले नाही
>>
विक्रम, चुकून इल्लॉजिकल लिहिलेस की रे. जोको आणि फेडरर दोघेही एकदम फायनलमध्ये येऊ शकत नाहीत.
मरेने एकही सेट गमावलेला नाहीये का.. बरा खेळतोय वाटतं.. पण तो हरेल अधेमधे कुठेतरी..
यावेळेस जोकोविच - फेडरर फायनल
यावेळेस जोकोविच - फेडरर फायनल होइल असे वाटते. >>>>> त्रिविक्रम लॉजिक गंडलच की परत..
फेडेक्सला आजची मॅच जड
फेडेक्सला आजची मॅच जड जाणार... सेट ची बरोबरी आणि तिसर्या सेट मध्ये ३ - १ नी मागे..
नोल आरामात जिंकेल असं आत्तातरी वाटतय सेट २ - ० आणि तिसर्या सेट मध्ये २ - १...
अगा आया आया.. फेडेक्स तिसरा
अगा आया आया.. फेडेक्स तिसरा सेट ६ - १ नी हारलाय..
Pages