विंबल्डन - २०१०

Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53

ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.

हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडररला विचरावे खेळणार का बाबा या चॅलेंजरबरोबर, तो खेळला तर निकाल काही लागला तरी, फेडररला मोठा आणि त्या कुणाला तरी लहान चषक द्यावा, फेडरर जिंकला तर दुसर्‍या कुणाला काहीच देऊ नये.>>

भरत - रॉडिकने फार पुर्वी म्हणलय, " फेडरर असलेल्या जगात नं दोन असणे म्हणजे नं १ असल्या सारखेच".
पण हे फार पूर्वी, म्हणजे तो कंटाळवाणा प्लेयर नं १ व्हायच्या आधी, बर का पराग. Happy

मला तर यु.एस. ओपन झाली की डायरेक्ट विंबल्डनला जाग येते.

अरे मित्रांनो, आपल्याला इथे विंबल्डन २०१० वर चर्चा करायची आहे.. फेडरर किंवा राफावर नव्हे.. :).. कृपया बाफचा मूळ हेतू विसरू नका.. कोणाला कोणाचाही कितीही कंटाळा आलेला असला तरी.. Happy

बर्‍याच मॅचेस पाच सेट पर्यंत चालल्या आणि जोरात झाल्यात..>>> चांगलं आहे की.. अश्या मॅचेस पहायलाच खरी मजा येते ना.. Happy

रच्याकने यंदा खेळाडूंचा दर्जा घसरलाय की उंचावलाय.. बर्‍याच मॅचेस पाच सेट पर्यंत चालल्या आणि जोरात झाल्यात.>> मला फेडररची पहिल्या राउंडची मॅच पहाताना कधी कधी फ्रेन्च ओपन पाहिल्या सारख वाटत होत, किती त्या रॅलिज. कालही तसेच. काही कारणा मुळे कोर्ट स्लो झाली आहेत का? मला तरी असेच वाटतय.

मयूरेश - गेल्या वर्षा पासून राफाला विंबल्डनच्या चर्चेत घ्यायला लागतय, नाइलाज आहे.:)

अरे काय भयानक स्कोर आहे हा!... कोणी पाहीली का ही मॅच्(म्हणजे थोडासा भाग या मॅचचा.. अशी मॅच संपुर्ण बघणे कोणाला शक्य आहे? ती पण २ अननोन खेळाडुंमधे व तिही पहिल्या राउंडचीच!) आजपर्यंत विंबल्डनच्या इतिहासात बोर्ग-मॅकेन्रो यांच्यातल्या १९८० फायनल मधल्या २२ मिनीटांच्या व ३४ पॉइंट्स चाललेल्या मॅरेथॉन चौथ्या सेट टायब्रेकर पासुन ते गेल्या वर्षीच्या फेडरर-रॉडि़क च्या एपिक फायनलपर्यंतच्या बर्‍याच दिर्घ मॅचेस विंबल्डनमधे पाहील्या आहेत.. पण १० तासाची मॅच? छ्या.. कल्पनाच करवत नाही. टु बॅड... ही मॅच नादाल्-फेडरर फायनल किंवा फेडरर-रॉडिक सेमीफायनल नाही..

फेडररला काही कारणाने यंदा पहिल्या दोन फेर्‍यांमधे घाम गाळायला लागला आहे. फेडररला असे पहिल्या १-२ राउंडमधे स्ट्रगल करताना बघण्याची सवय नसल्याने यंदा विंबल्डनला सुर्य पश्चिमेला उगवला आहे की काय असे वाटु लागले आहे.... Happy

आणी हो... भरत.. तुम्ही ठिक आहात ना? फेडररला खेळताना बघताना तुम्हाला कंटाळा येतो?त्याच्यासारखे सहज सुंदर पण तितकेच पॉवरफुल, लिलया खेळणारा व अचुक पददालित्य असणारा टेनीसपटु अजुन मी तरी पाहीला नव्हता.. त्याचा खेळ बघण म्हण़जे एक निखळ आनंद व एक जॉयराइड आहे.. जोपर्यंत तो खेळत आहे तोपर्यंत जस्ट हॉप ऑन धिस जॉयराइड अँड एंजॉय.. परत आपल्या हयातीत इतका जबरदस्त टेनिस प्लेयर आपल्याला बघायला मिळेल की नाही ही शंकाच आहे..( सॉरी मयुरेश... राहवल नाही म्हणुन फेडरर बद्दल हे लिहीले.. आय नो.. हा बीबी २०१० विंबल्डनसाठी आहे)

हो परफेक्शनचा कंटाळा येतो, २ मर्त्य मानवांमधले सामने बघायला जास्त आवडते. आता तो जरा रोबोतून माणूस व्हायला लागलाय असे दिसतेय.
रिव्ह्यु सिस्टम्ची गंमत : विजय अमृतराजने एकदा म्हटले होते की रिव्ह्यु मधे फेडररच्या एरर्स इतक्या असतात, की त्याची स्कोर ठेवला तर त्याला एक गेमही जिंकणे अशक्य.
बापरे विंबल्डन मधली कडक शिस्त : शुभ्र कपडे, रॉयल बॉक्स समोर कर्ट्सी करणे इ.इ. या बा फ ला पण लागू आहे का?
सचिन कधी येतोय रॉयल बॉक्स मधे?

मयुरेश.. धन्यवाद.. Happy

बापरे विंबल्डन मधली कडक शिस्त : शुभ्र कपडे, रॉयल बॉक्स समोर कर्ट्सी करणे इ.इ. या बा फ ला पण लागू आहे का? >>>> नाही... पण त्रिविक्रमाच्या (इल्लॉजिकल) विधानांना त्यांच्या विपूत उत्तरं द्या. म्हणजे इथे चर्चा पुढे जाईल नीट.. Happy

राणी आलीये. फेडररचा ईंटरव्ह्यू होता आत्ता.. मस्त इंफॉर्मल गप्पा.. मरेची मॅच चांगली चालली आहे. शारापोव्हा पाहिला सेट जिंकली.

तुम्हाला फेडररला बघायचा कंटाळा आलाय आणि विंबल्डनमध्ये सचिनला बघायचेय ? Uhoh

परत आपल्या हयातीत इतका जबरदस्त टेनिस प्लेयर आपल्याला बघायला मिळेल की नाही ही शंकाच आहे..( >>>> मुकुंद, अनुमोदन. एक वर्षी यु एस ओपनच्या फायनलमध्ये फेडररला प्रत्यक्ष खेळताना बघितले तेव्हा असेच काहीसे वाटले होते.

भारतातले लोक विंबल्डन कुठे बघताहेत, स्टार स्पोर्ट्स आणि इएस्पीन वर फुटबॉल आहे तर स्टार क्रिकेट वर काल इंग्लंडची मॅच होती. परवा टेनिस दाखवले तिथे. मला राफाचे फक्त २ सेट्स पाहता आले. २ सेट्स कसा काय हरला तो?

भरत १० ते ११ या वेळात स्टार स्पोर्ट्सवर विंबल्डन दाखवतात... तेवढ्या वेळात नदालची मॅच बघायला मिळाली.. बहुदा उद्यापासुन परत स्टार स्पोर्ट्सवर विंबल्डन दिसायला लागेल.. सध्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दोन मॅचेस एकाच वेळी असल्याने हा प्रॉब्लेम झालाय..

आयला काय चाल्लय का?डेविडेंको आणि व्हर्डास्को स्पर्धेच्या बाहेर..
पहिल्या दोन फेर्‍यांतच जर इतके मानांकीत खेळाडु बाहेर पडतायत तर पुढे पुढे अजुन राडा होणार..

राणी ने फेडरर बरोबर लंच घेतला. बहूतेक राणी ने फेडररला साकडं घातलं असावं. "माझ्या हयातीत तरी एकाला ( मरे ला) विम्बल्डन जिंकू दे रे बाबा. पेरी जिंकला तेंव्हा मी लई लहान होते. (१९३६) आणि मरे आता मोठा होत चाललाय. तुला मी लवकर ओबीई करीन."

बाय द वे, क्रिकेट सारखे टेनिस खेळाडू काही फार ओबीई होत नाहीत, कारण काय असावं? कॉमन वेल्थ मधे ऑस्ट्रेलियन सोडले तर फारसे टॉप टेनिस प्लेयर नाहीत म्हणून का?.

पराग शेठ : आपण पुन्हा दुबई ला केंव्हा भेटणार आहोत?.:)

आयला काल नदाल आणि त्सोंगाला पण घाम गळावा लागला की... लय भारी चालू आहे यंदा विम्बल्डन.. मजा येणार. फायनल पर्यंत सगळ्यांची दमछाक होणार असचं दिसतय... त्यात अजून सीडेड खेळाडू समोर न येताच अशी अवस्था होतीये.. ते आल्यावर तर अजूनच दमछाक होणार..

भरत.. प्लिज राग मानु नका.. पण तुम्ही फेडररच्या ग्रँड स्लॅम मधल्या मॅचेस निट पाहता का? मला तरी संशय येतो.. मी गेली ८ वर्षे फेडररच्या ग्रँड स्लॅममधल्या मॅचेस नियमीत बघत आलो आहे. मला तरी ...तुम्ही व विजय अमृतराज म्हणतो तसे रिव्ह्यु सिस्टिम असली असती तर फेडररला एकही गेम जिंकता आला नसता.... असे कधीच दिसले किंवा वाटले नाही. फेडरर एकही गेम जिंकण्याच्या लायकीचा नाही असे विधान करणे म्हणजे जरा अतीच झाले.(मग ते जरी विजय अमृतराजने केले असले तरी!) तुम्हाला तो आवडावाच! असे माझे बिलकुल म्हणणे नाही पण त्याचा खेळ तुम्हाला आवडत नाही म्हणुन त्याच्याबद्दल काहीच्या काही लिहीणे बरोबर नाही.

(आता तुम्ही ते लिहायच्या आधी .. रिव्ह्यु सिस्टिमची गंमतः असे लिहुन पुढचे लिहीले आहे.आशा आहे की ते गंमतीनेच केलेले विधान आहे. खर म्हणजे गंमतीतही फेडररच्या खेळाबद्दल एवढे धाडसी व धादांत खोटे विधान करणे म्हणजे फेडररसारख्या खेळाडुचा अपमान आहे असेच मला वाटते)

आणी जर मला २ मर्त्य व सामान्य माणसांचे टेनीस सामने बघायचे असते तर मी शिवाजी पार्क जिमखान्यावर दोन हौशी टेनिसपटुंची मॅच बघत बसलो असतो... त्यासाठी विंबल्डन,यु एस ओपन किंवा फ्रेंच ओपन स्पर्धा बघत माझा वेळ वाया घालवला नसता. निदान मी तरी या मोठ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा फेडरर्-राफा सारख्या अव्वल दर्जाच्या टेनिसपटुंमधील रोमहर्षक लढतींसाठी व त्यांच्यात असलेल्या अप्रतिम व असामान्य टेनिस स्किलला अ‍ॅडमायर व अ‍ॅप्रिशिएट करण्यासाठी बघतो.

मुकुंद गोंधळ झालाय ते विधान फेडररच्या खेळबद्द्ल नाही आहे. त्याने मागितलेल्या रिव्ह्युमधे बहुतेक वेळा निकाल त्याच्या विरुद्ध दिसतो आणि त्याचे चॅलंजेस कमी होत जातात. त्या स्कोर वर अमृतराजने हा जोक केला होता.

दोन मर्त्य : याचा अर्थ इतकाच की फेडरर समोर त्याच्या तोडीचा खेळाडू आला की बघायला जास्त मजा येते.

भरत.. तस असेल तर ठिक आहे. माझा गैरसमज झाला. पण तुम्ही तुमचे ते आधीचे पोस्ट निट वाचले तर तुम्हाला समजेल की तुमच्या त्या पोस्टमधुन माझा जसा गैरसमज झाला तसा बर्‍याच जणांचा होउ शकतो.

बाकी...याचा अर्थ इतकाच की फेडरर समोर त्याच्या तोडीचा खेळाडू आला की बघायला जास्त मजा येते.... या तुमच्या विधानाशी १००% सहमत.(पण गंमत अशी आहे की त्याच्या तोडीचे खेळणारे फारच थोडे जण आहेत.. खर म्हणजे १च आहे (राफा!). गेल्या वर्षीच्या विंबल्डन व यु एस ओपन मधे अनुक्रमे रॉडिक व डेल पोट्रोनेही त्याच्या तोडीस तोड खेळ केला होता.. बट दॅट वॉज अ‍ॅन एक्सेप्शन!)

मयुरेश...पहिल्या दोन फेर्‍यांतच जर इतके मानांकीत खेळाडु बाहेर पडतायत तर पुढे पुढे अजुन राडा होणार.. राडा हा शब्द बर्‍याच वर्षांनी ऐकला... मुंबईत असताना..लहानपणी
नेहमी ऐकायचो हा शब्द.. ए टायकलवाडीत आज जबरी राडा झाला आहे.. जाउ नको तिकडे.. वगैरे. Happy

काल फेडरर क्लेमेंटविरुध्द सहज जिंकला.. आशा आहे निदान यावेळी तरी फेडी-नदाल ड्रीम फायनल पहायला मिळेल.. Happy

नदालविरुध्द कोण आहे आज तिसर्‍या फेरीत?

पुरुष दुहेरी : भारत

हर्ष मंकड पहिल्या फेरीत बाहेर.
लिअँडर पुरुष दुहेरात दुसर्‍याफेरीत बाहेर...५ सेट्स मधे पराभूत..
महेश आणि रोहन(वेगवेगळे) तिसर्‍या फेरीत पोचले.
सोमदेव पहिल्या फेरीत रोहन कडून पराभूत.
फ्रेंच ओपनच्या फायनलिस्ट जोड्या पेस-ड्लोही, नेस्टर- झेमोनिच गारद.

मिश्र दुहेरी :
रोहन बोपन्ना पहिल्या फेरीत पराभूत. पेस भूपती दोघे दुसर्‍या फेरीत पोचले.
भूपती दुसर्‍या फेरीत पराभूत.

लिंडसे डेव्हनपोर्ट नावाची आणखी कुणी खेळाडू आली आहे का> ती मिश्र दुहेरीत बॉब ब्रायनची जोडीदार आहे. आणि विंबल्डन.org लिहितेय की हे तिचे पहिलेच विंबल्डन आहे. तिचे स्टॅट्स आणि फोटू पण नाही त्यांच्याकडे.
३४ वर्षाची डेव्हनपोर्ट १९९५ पासून खेळतेय,१९९८ यु एस ओपन १९९९ विंबल्डन, २००० ऑ.ओपन जिंकलीय. विंबल्डन मधे २ वेळा उपविजेती.

जस्टीन वि किम बघताय की नाही कोणी ?
दोघींनी १ सेट जिंकलाय.. तिसरा सेट सुरु होतोय आता..

व्हिनस जिंकली.. छान खेळली..

Pages