पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल.

Submitted by निंबुडा on 4 June, 2010 - 03:39

पावसाळा आला, लोको.

आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.

बर्‍याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून Wink ), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.

तुम्हाला माहीत असलेली ठिकाणे (water parks, resorts, धबधबे, किल्ले, बीचेस्, प्रायव्हेट बंगले/फार्म हाऊसेस् इ.इ.) जी एक दिवसीय किंवा दोन दिवसीय (over night stay) सहली (पिकनिक/ट्रेक किंवा ववि) साठी साठी उपयुक्त असतील ती इथे सांगा. जर राहण्याची सोय असेल तर सोबत बुकिंग साठी आवश्यक तपशीलही द्या. जसे की:
contact numbers
email addresses
पत्ता
जाण्या-येण्याचा सोपा मार्ग
transport ची व्यवस्था
इ.इ.

(आपल्याला बर्‍याचदा विपत्रांमधून ही माहीती मिळत असते. ती इथे share करा. ही माहिती असलेली PDF किंवा word doc फाईल तुमच्याकडे असेल तर तसे लिहा. म्हणजे मग इच्छुक लोक तुम्हाला संपर्कातून लिहू शकतील.)

एकमेकां सहाय्य करू, अवघे जाऊ पिकनिकला!!!!!! Happy

[जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन खालील धाग्यावर पाहता येईलः
प्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा
]

+++++++++++++++++++++++++++++
आत्ता पर्यंत या धाग्यावर पडलेल्या पोस्ट्स मधून पिकनिकसाठी जे ऑप्शन्स मिळाले आहेत ते एकत्र करून एरियावाइज इथे देत आहे:

मुंबईजवळः
१) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.
खूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.
राहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.

२)
कर्जत मधील काही रिसॉर्ट
रीव्हरटच ** http://www.rivertouchresort.com/index.html
मोदी रिसॉर्ट** https://www.drmodisresort.com/contactus/
सत्या *** http://www.satyaresort.com/
रीव्हरगेट **** www.rivergateresort.com

कर्जत फार्म हाऊसेसची माहिती ह्या साईटवर पण मिळेल :
http://way2nature.com/index.asp
http://mumbai.click.in/classified/travels/hotels-resorts/karjat-farmhous...

३)
कल्याण -
विश्वासराव फार्म हाउस** http://vishwasraofarmhouse.com/
विसावा रिसॉर्ट - www.visawaresort.com

४)
अंबरनाथ - शांती सागर**
At Vasat, Near M.I.D.C. Pump House, Ulhas River Bank, P.O. Jambhul,
Ambernath(W). Maharashtra, INDIA.
For General Enquiries and call on Telephone No : (0251) - 2681999 / 2683210 / 3200728
(0251) 2682792 / 2685631 / 3200727 Mobile: 93204 09818 ( call timings 8.a.m. to 8p.m.)

५)
बदलापूर - रेनी रिसॉर्ट**

६)
ठाणे - टिकूजी-नी-वाडी ** http://www.tikuji-ni-wadi.com/
टिकुजीनी गुज्जू लोकांच फेव्हरिट त्यामुळे जेवण अगदी गोड गोड असतं.

७)
वसई- पालघर - भाईंदर

८) रोशिनी कृषी पर्यटन केंद्र
Post Karanjon,
Shiravali-Vajreshwari Road,
Vasai(E)
6808406, 9890376323,

९) केशवसृष्टी
Keshav Srishti Office
Uttan village, (on way to Essel World by road),
Bhayander (West), Thane: 401 106
Tele: +91 22 28450247/2855
Email: jagdish_rp@rediffmail.com
http://www.keshavsrushti.com

१०)
नेरळचे सगूणा बाग फार्म हाऊस: - http://www.sagunabaug.com/
नेरळला भडसावळे यांचा हा फार्म आहे. जवळ नदी पण आहे. घरगुती स्वरूपाची व्यवस्था आहे. पिलांना न्यायला मस्त आहे. खूप मजा करतात बच्चे कंपनी तिथे. बफेलो राइड मूळे तर अजुनच मजा येते त्यांना.
पण मोठ्यासाठी एंजॉयेबल पिकनिकची गॅरंटी नाही. एका माबोकराच्या अनुभ्वाप्रमाणे व्यवस्था काही खास नव्हती. नदीत नुसता चिखलगाळ होता. जागेचा नीट न ठेवलेला मेंटेनन्स, जेवणाची नीट न झालेली सोय यामुळे खूप मजा नाही आली . शिवाय जेवणाची चवही इतकी खास नव्हती.

११) खोपोली -
uncle's kitchen resort
खोपोली पासून केवळ काही मिनिटांच्या अंतरवर हे ठिकाण आहे. 2010 चा माबो ववि इथे झाला होता. फॅमिली व ग्रूप पिकनिकसाठी छान जागा.

पेण-खोपोली रस्त्यावरील SP Farmhouse - http://spfarmhouse.com/

१२) माथेरान:
http://matheranhotels.com/index.html छान हॉटेल आहे हे. स्टेशन पासुन साधारण १ कि.मी. असेल.
टॉय ट्रेनने जाणार असाल तर त्याचे बुकिंग मात्र आधीच करा. तिथे भली मोठी लाईन असते.

१३) रोहा:
कोलाड - सुतारवाडी डॅम जवळील Hans Adventure Resort
http://hansadventure.com/index_sw.asp
Hans Adventure Resort धम्माल आहे
फक्त भरपूर पाऊस झाल्यानंतर जावे. कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंग क्लास अनुभव आहे.

१४) नवी मुंबई जवळचे ठिकाणे... कल्याण वरून मलंगगड, पनवेल-पळस्पे फाट्यावरुन जवळ प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, कर्नाळा, इर्शाळगड, चंदेरी... अलिबागला कुलाबा, थळला खांदेरी-उंदेरी आहेत.

पुणे:

Picnic Spots Near Pune:

१)
गिरिवन रिसॉर्ट:

२)
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर , हाडशी (पौड पुणे )
(सुंदर अन शांत निसर्ग अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर इथे जरूर भेट द्यावी.)
जाण्याचा मार्ग -:-
पुणे-नळस्टॉप-पौड रोड - चांदनी चौक - पिरंगूट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण ६० किमी.

३)
मावळसृष्टी - http://www.mavalsrushti.com/
इथे २००९ चा ववि झाला होता. या स्पॉटविषयी माबोकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हे ठिकाण विशेष खास नाही असे kabhayk या माबोकराचे म्हणणे आहे.

४)
सूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.

५)
पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर जाधव गड आहे. आधी बुकींग केले तर बरे. जरा पीळ ड्राइव आहे पण मस्त जागा आहे. कॉफी शॉप मध्ये उत्तम बिर्यानी मिळाली. मुलांसाठी स्विमिन्ग पूल व तिथेच स्पा आहे आयांसाठी. एक रात्र तरी राहिले तर जास्त छान. बर्‍यापैकी महाग असेल बहुतेक.

६) अ‍ॅम्बीव्हॅली/ कोरिगड:
अ‍ॅम्बीव्हॅली देखिल आता सगळ्यांकरता खुलं झालं आहे. अँबी व्हॅलीलाच लागून कोरिगडाजवळ "क्लाऊड ९ आहे, ग्रूपनुसार बंगले मिळतात. अप्रतिम. स्विमिंग पूल पण आहे. फक्त व्हेज जेवण मिळते.

७) भोरजवळ भाटघर धरणचा लेक व्ह्यू असलेलं मंत्र ए ठिकाण पावसाळ्यात एकदम मस्त आहे. पुण्यातून तासाभरात पोहोचता येतं इथं सर्व माहीती आहे..

८) महाबळेश्वर
महाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी उत्तम शाकाहरी हॉटेल - गिरीविहार. (http://www.hotelgirivihar.com/). स्थलदर्शनासाठी तुम्ही जिकडे रहाला तिथेच वाहनाची सोय करण्याची विनंती करता येईल. क्षेत्र महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, महाबळेश्वरातले पॉईंट्स इत्यादी गोष्टी बघता येईल. महाबळेश्वरला जाणार असाल तर वाई सुध्दा कराच.

महाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी छान हॉटेल "andvanbhuva" - http://www.hotelanandvanbhuvan.co.in/
मिलिंद गुणाजीने पण या हॉटेल वर एका कर्यक्रमात सान्गितले होते. ईथले जेवण पण मस्त आहे.

खरेखुरे अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल हवे असेल तर इतर कुठला फार विचार न करता महाबळेश्वरला रामसुख रिसॉर्टला जा आणि earth star, blue heart किंवा florentine या तीनपैकीच एका कॉटेजमध्ये रहा. पावसाळ्यात गेलात तर Cullinan कॉटेज मध्ये. रेट्स थोडे जास्त वाटले(४२K /२ nights) तरी it's worth it. इथले जेवण उत्कृष्ट असले तरी 'फक्त व्हेज' मिळते हीच एक (माझ्या दृष्टीने) उणीव.

महाबळेश्वर जाणार असाल तर एक स्ट्रॉबेरी रिझॉर्ट पण छान आहे.

९) लवासा:

http://www.lavasa.com/
इथे तुम्हाला लवासाची माहिती मिळेल. हॉटेल्सचे फार ऑप्शन्स नाहीयेत. एकांत एका टेकडीवर आहे आणि इथून दिसणारा व्हू अत्यंत सुंदर आहे. इथून शेजारूनच एक छोटासा ट्रेल आहे.
फॉरच्युनमध्ये स्विमिंग पूलही मिळेल. इथून वॉटरस्पोर्टस जवळ आहेत. पण व्हू इतका चांगला नाही.
Ekaant – The Retreat: A scenic 20 room resort, which offers breathtaking views and a multi – cuisine restaurant, for reservation call 020 6675 7000.
Fortune select Dasve: An elegant 60 room, 4 star hotel on the warasgaon lake front, for reservation call: 020 30994444.
The Water Front Shaw serviced apartments: self-contained, fully equipped apartments that overlook the lake, above the promenade, for reservation call 020 66541414.
Mercure Lavasa: A 133 room hotel by the Accor Group, for reservation call 020 67929000
AC tents at X-thrill camp, for reservation call 020 20291310 / 9819443047

१०) खंडाळा:
ड्यूक्स रिट्रीट, खंडाळा. खूप कपल्स असतील तर कॉटेज घेता येइल नाहीतर रूम्स मस्त आहेत. स्पा आहे. स्पेशल डेट सारखे फॉरमल जेवणाची मस्त जागा आहे. पूल साइड आहे. सकाळी ट्रेल्स वगैरे आखतात ते लोक्स शिवाय ब्रेकफास्ट जेवण खाण मस्त आहे. पावसाळ्यात रॉक्स. वीकांताचे रेट्स जास्त आहेत. वीकडेला गेल्यास स्वस्त पड्ते. मुंबई/ पुण्यापासून दीड तासाची ड्राइव्ह.

११) लोणावळा:
लोणावळ्याचे लगूना सुरुवातीला चांगले होते. नंतर ते तसे राहिले नाही. लोणावळ्यालाच जायचे असेल तर फरियास चांगले आहे. पण शुक्रवार- शनिवार रात्री मुंबईकरांची गर्दी असते.
थोडेसे हटके पाहिजे असेल तर मचाण नावाचे आहे लोणावळ्यावरून अँबी व्हॅलीला जायच्या रस्त्यावर घुसळखांबकडे थोडी वाकडी वाट करून. तीन बेडरूमचे सुंदर घर आहे. एका जोडप्याला रहायलाही ते छान आहे. दरीच्या टोकाला बांधले आहे. आणि दरीकडे पूर्ण काचेच्या भिंती आहेत. त्यांचा स्वयंपाकी तुम्हाला जेंव्हा जे काही हवे ते बनवून देतो. फिरण्यासाठी पायवाटा आहेत. www.themachan.com
ड्यूक्स रिट्रीट पण फार छान आहे. तिथे तुम्हाला हवे तसे खास अ‍ॅनिवर्सरी डिनर प्लॅन करतात. विथ म्युझिक मला वाट्ते १० के आहे कि काय तरी. एक बोहले असल्यासारखे असते आणि डिनर, वाइन इत्यादी. मेन्यू आधी सांगता येतो. अगदी क्यूट ड्रीमी लोके शन आहे. हा अगदी नो कटकट आरामाचा रिसॉर्ट आहे. क्यूट से इन्डोअर रेस्ट. पण आहे. यम्मी ब्रेकफास्ट.

कोकणः
१) अलिबाग-नागाव:

वैद्य यांचे फार्म हाऊस
पत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ
पांढरा मारुती समोर
कवळे पाडा
फोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही )
बुकिंग साठी मुंबईचा पत्ता:
पोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)
फोनः ४३०९३७१

फार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे. खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम. वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस
जानेवारी २००९ मध्ये २५० रु. per head charge होता. किचन मध्ये तुम्हाला स्वत: स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल. अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच. अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.

++++++++++
मामी | 22 November, 2012 - 22:29
२०, २१ नोव्हेंबरला नागावला गेलो होतो. आयत्यावेळी ठरल्याने, बरेच जण असल्याने एकदम ४-५ रूम्स हव्या असल्याने, समुद्रकिनार्‍याच्या जवळच हॉटेल हवं असल्याने आणि नेटवरचे रिव्हू वाचून या सगळ्या क्रायटेरियात बसणारं 'डॉलफिन हाऊस बीच रिसॉर्ट' नावाचं रिसॉर्ट बुक केलं होतं. पण ते फारच बोअरिंग निघालं. एकतर नागावमध्ये शिरल्यावर छान छान वाड्या दिसतात. तशी एखादी वाडी असेल घरामागे अशी अपेक्षा होती ती मोडीत निघाली. एक नुसतंच घर. त्यात आजूबाजूला अज्जिब्बात जागा नाही. पण खोल्या बर्‍या होत्या आणि खूप अपेक्षाही नव्हती म्हणून ठीकाय. रिसॉर्टच्या मालकाची वृत्तीही 'हे आहे हे असं आहे. यात आम्ही बदल करणार नाही. तुम्ही उगाच सल्ले देऊ नका आणि कमेंटसही करू नका.' अशी होती. असो.
गेल्यावर लंच रिसॉर्टमध्येच केल्यावर इथे काही खरं नाही हे लक्षात आलं. त्यामुळे जेवल्यावर फिरायला बाहेर पडलो तेव्हा 'डिनर कुठे?' या प्रश्नाचं उत्तरंही शोधत होतो. आणि आम्हाला एक अत्यंत अमुल्य खजिनाच सापडला - 'अन्नपुर्णा' नावाचा. श्री व सौ चिटणीस त्यांच्या घरातून हे घरगुती पध्दतीचं जेवण देणारं रेस्टॉरंट चालवतात. ऑर्डर आधी द्यावी लागते (तसंही नागावला कुठेही आधी ऑर्डर द्यावी लागते). व्हेज - नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं अप्रतिम चवीचं जेवण इथे मिळतं. व्हेज थाळी रु. १०० आणि नॉनव्हेज रु. २५०.
आम्ही रात्रीकरता बोंबलाचं कालवण, कोलंबीचं लिपतं आणि तळलेलं पापलेट असा नॉनव्हेज बेत सांगितला होता तर कोबीची भाजी, फ्लॉवर-मटारची भाजी, डाळ असा बेत सांगितला होता. कोलंबीचे पैसे वेगळे होते कारण थाळीत दोनच नॉनव्हेज आयटेम असतात. पण जेवण भरपूर असतं आणि अत्यंत प्रेमानं वाढतात. जेऊन तृप्त होणं म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर 'अन्नपुर्णा' ला पर्याय नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळचा नाश्ताही अर्थात तिथेच. चविष्ट पोहे आणि ऑम्लेट-पाव.
अन्नपुर्णा : अलिबागहून नागावमध्ये शिरल्यावर मुख्य रस्त्यावरून शिवाजीचा पुतळा (उजवीकडे) आल्यावर तसंच पुढे गेलात की रस्ता डावीकडे वळतो. तिथे लगेच उजव्या हाताला तुम्हाला अन्नपुर्णाचा बोर्ड दिसेल. (अजून एक अन्नपुर्णा आमच्या सुप्रसिध्द रिसॉर्टजवळही होतं. त्यामुळे गोंधळ होऊ देऊ नका. ) फोन : ८००७४३९३७९, ९७६४५५७०७९, ७३५०५६७९८८, ०२१४१-२४५३२८. हे जवळपासच्या हॉटेलातून रहाण्याची सोयही करतात.

++++++++++++

अलिबागजवळ आवास म्हणुन एक बीच आहे. कुटुंबासाठी जायला छान जागा आहे...
तिथे जोगळेकर कोटेज मध्ये राहाण्याची चांगली सोय होते... मुलांसाठी खुप छान जागा आहे. शांत आणि निवांत...
जोगळेकर कोटेजची माहिति इथे मिळेलः
www.jogalekarcottage.com
अत्युत्तम जेवण. वेज नॉनवेज (अनलिमिटेड).

+++++++++++

दुर्वांकुर कॉटेज
नागाव वैद्य आळी.
कपिल वैद्य ९९२१९७४०५०
घरगुती जेवणाची सोय आहे, २ मजली आहे. + टॉयलेट + बाथरूम. + बेडरूम
मध्यवर्ती असल्याने काशीद बीच, नागव बीच, अक्षी बीच, जाता येते जवळच बिर्ला मंदीर सुद्धा आहे

२)
मुरुडला गोल्डन स्वान नावाचे बीच रिसॉर्ट आहे:
प्रत्येक कॉटेजच्या बाहेर मस्त व्हरांडा आहे... आणि तिथुन समुद्राचा व्ह्यु!
तिथला बीच प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.. तरीही मुरुडच्या मेन बीचपासुन चालत जाण्याच्या अंतरावर... अगदी किनार्‍यावर मस्त झोपाळे आणि बीच चेअर्स आहेत! शिवाय गोल्डन स्वानने रेंट वर सायकल्सही ठेवल्या आहेत... आणि बीचवर घोडा आणि घोडागाडी राईड्सही आहेत. जेवण थोडे महाग पण क्वांटिटी चांगली! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय नम्र आणि तत्पर स्टाफ. कॉटेजेस काही फार लॅव्हिश वगैरे नाहियेत आतुन पण फार वाईटही नाहीत! पुण्यापासुन ताम्हिणी घाटातुन १५६ किमीवर आहे. कपल्स साठी तर बेस्ट आहेच पण मुलांना खेळायला आणि फॅमिली गेट्-टुगेदर्सनाही चांगले आहे... अतिशय सुंदर लोकेशन - समुद्राच्या शेजारीच, स्वच्छ आणि पूर्णपणे सुरक्षित समुद्रकिनारा, टुमदार रिसॉर्ट, अतिशय आदबशीर आणि तत्पर स्टाफ, चविष्ट जेवण.
हे रिसॉर्ट पूर्वी एमटीडिसीचं होतं आणि आता गोल्डन क्लब लीजवर चालवत आहे. त्यामुळे खोल्या अगदी बेसिक आहेत. विशेषतः डि१, डि२ अतिशय छोट्या - केवळ दोन लोकांकरताच आहेत. तिसर्‍याला त्यात अगदीच वाव नाही (फारच लहान मूल असेल तर ठीक). डि१+डि२ आणि डि३+डि४ अशा एकत्र करू शकता कारण मध्ये कॉमन दार आहे.
डी३, डि४ या खोल्या १ आणि २ च्या शेजारीच असल्या तरी जरा मोठ्या आहेत. त्यामुळे रात्री अजूनएक बेड लावता येईल. पण त्यांच्याकडे फोल्डिंग बेड नाहीत त्यामुळे जमिनीवर गादी घालून झोपावं लागेल.
डि५,डि६ या खोल्यांमध्ये पोटमाळ्यावर बंकबेड बनवले आहेत. ते बरेच मोठे आहेत. तीनजण आरामात झोपू शकतात. बच्चेकंपनी या सोईवर अतोनात खुश होते.
याव्यतिरिक्त काही कॉटेजेस आहेत. पण त्यात ६ ते ८ माणसांकरता केवळ एकेकच बाथरूम आहे.
बाथरूम्सही छोट्या आणि 'सुधारणेला बराच वाव' टाईप्स वाटल्या.
तरीही, लोक्स, यातून आपल्याला त्यातल्यात्यात योग्य अशी रूम शोधा पण नक्की एकदा तरी जाच.

अधिक माहिती : http://www.goldenswan.com/beachresort/html/index.html

मुरुड्ला जाणार्‍या लोकांसाठी एक टीप - एकदा तरी पाटील खाणावळीत जेवा. veg अथवा non veg. खेकडा खा, मासे खा, prawns खा किंवा चिकन fry खा. या जन्मात विसरणार नाही. बिलपण फार नाही, कि जेवण्याची मजा अजुन वाढते. अप्रतिम जेवण मिळतं. आणि हे एका मस्तं नारळाच्या वाडीत बसुन हां ! छान जागा आहे एकदम.

३)
हरिहरेश्वरला रहायची सोय आहे बोड्सांच्या 'तपोवन' मधे. छान नविन स्वछ्छ आणि AC रुम्स आहेत. सावधान - ईथे खूप सारे बोडस आहेत. आपण योग्य ठिकाणी गेला आहेत ना चेक करा. दिलीप बोड्स यांचे तपोवन छान आहे. पण त्यांच्या घरी राहण्याचा एका माबोकराचा अनुभव फारसा चांगला नाही. service व Rooms खास नाही.
Dilip G. Bodas
9272943106

जर तंबुमधे रहायचं असेल तर सरळ MTDC गाठा. समुद्र पण जवळ आहे इथून. खाण्यापिण्याची पण सोय आहे.
घरगुती राहाण्याची सोय बर्‍याच ठिकाणी आहे, पण मग त्यात सुद्धा शेटे एकदम बेश्ट ! चांगला माणूस आहे. राहिलात कुठेही तरी शेटेंकडे एकदा जेवाच. अगत्याने चवदार जेवण मिळण्याची खत्रिशीर जागा आहे ही.
बोड्स आणि मोघे मंडळींचा सुळसुळाट आहे. त्यामुळे योग्य माणूस शोधा

हरिहरेश्वरला कुटुम्बे यान्च्याकडे ही मस्त व्यवस्था अस्ते. पण त्यांच्या कडे केवळ शाकाहारी जेवण असते.

हरिहरेश्वरचे दोन्ही किनारे स्वच्छ व सुंदर आहेत. हरीहरेश्वरचा समुद्र सुरक्षित नाही. समुद्रात पोहायला जाण्याचा विचार असेल तर तेथील रहिवाश्यांच्या सुचना दुर्लक्षित करु नका. येथले समुद्रकिनारे खडकाळ आहे. लाटा फार येतात.

हरिहरेश्वर समुद्र सुरक्षित नाहि हे सगळ्यानी लिहलेय पण तीथल्या खड्कांवरुन प्रदक्षिणा वर्थ आहे. तसेच MTDC चे लोकेशन मस्त आहे आणि त्या बाजुच्या किनार्‍यावर काही वॉटरस्पोर्ट्स चालतात.

४) दापोली:
http://mangalati.com
ज्याना कोणाला सी.ए. (Complete आराम) अथवा एम.बी.ए.(मस्त बसुन आराम) करायचाअ असेल तर हे ठिकाण फॅमिलीसाठी उत्तमच. पावसाळ्यात तर जाम धमाल असते... गेल्यावर्षी पावसाळ्यात गेलो होतो.. व्हेज आणि नॉनव्हेज ची उत्तम सोय असते..

५) सासवणे:
सासवण्याला रवि आपट्यांचं b&b आहे. उत्तम आहे. अक्षरशः अंगणात समुद्र आहे. एकदम सेफ. तो समुद्र किनारा फार खडकाळ आहे त्यामुळे पाण्यात जायची मजा येत नाही जास्त. MTDC चं रजि. आहे त्याला त्यामुळे इन्फो त्या साइटवर मिळेल. मुंबईहून लाँचने मांडवा जेट्टी आणि तिथून रिक्षा (२५-३० रूपये). रिक्षावाल्याला रवि आपटे, सासवणे सांगितलं की तो दारात नेऊन सोडतो. तसच उलट. रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवायचा म्हणजे परतीच्या लाँचला किती गर्दी काय ते तो सांगतो. या जेट्टीवाल्यांच्या बसेस सुद्धा आहेत. जोगळेकर कॉटेज अवास येथे आहे. मांडव्यापासून अर्धा तास. खरतर या दोन्ही ठीकाणी कार असलेली बरी जवळच्या समुद्रकिनार्यांवर जाता येते. रवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते .तुम्ही आधी सांगितलेलं असेल तर मांसाहारीही मिळते. रिसॉर्टमधे केवळ ब्रेफा व चहा बनतो. जेवण बाहेरून डब्यातून येते.

सासवणेला संसारे फार्महाउस ला गेलो. ति जागा पण MTDC अप्रुव्हड आहे. चांगली हिरवीगार जागा होती. दुपारच्यावेळी पण AC नसुन थंड होती. १ मोठ्ठी खोली होती. तिथेच आम्ही ८ जणी राहिलो. जेवण पण सगळ्यांना आवडल. सासवणे समुद्र किनारा अगदि २ मिनीटावर आहे. आणि मांडवि जेट्टी गाडीने १० मिनीटावर आहे.

कोकण नेचर ट्रेल्स
http://blog.krishivarada.in/nature-trails-of-the-season/

६) गुहागर
अश्विनी डोंगरे | 13 March, 2012 - 10:28
गुहागर मधे आम्ही एक पर्यटक निवास चालवत आहोत. हे एक पूर्ण घर आहे, जे आम्ही पर्यटकाना देतो.
घरात आधूनिक सोयी आहेत ( टी.व्ही. नाही- बरेच लोक त्यामुळे जास्त खूष होतात )
एक जोडपे देखभालीसाठी तिथे असते. १५-२० लोकांचा ग्रुप सहज राहु शकेल ( काही वेळा जास्ती लोकही तिथे राहिले आहेत).
घराच्या पुढे-मागे अंगण, मागे नारळी-पोफळीची बाग आणि बागेतुन पायवाटेने समुद्र किनारा अशी सुबक रचना आहे.
जेवणाची सोय घरात नाही, पण जवळपास भरपूर पर्याय आहेत.
अधिक माहितीसाठी मला विपू करा.

वेलावन बीच हाऊस- गुहागर
www.facebook.com/velavan.guhagar
कोकणवाडी गेस्ट हाऊस- कोतवडे, रत्नागिरी
www.facebook.com/kokanwadi

७) मालवणः
तारकर्ली बिच रिसॉर्ट.. MTDCच आहे. एका दिवसाला रु.२,०००/- फक्त. जर MTDC नको असेल तर बुकिंग न करता जा... खुप चांगली आणि स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.
तारकर्ली बीच जवळच 'गजानन'

seapearlresort.com
Sea Pearl Resort
Devbag ,Malvan, District Sindhudurg. Maharashtra, India.. Phone: +91 2365 248520. Sanika Wairkar: +91 9819447799. Shashank Wairkar: +91 9867755799 ...

सातारा:

१)
गुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .
२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम!!!! (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो )
http://www.gursaleresort.com/

२)
सातार्‍यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे. त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.

३)
ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....
तरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे! अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या!.... भन्नाट वारे असते तिकडे

औरंगाबाद:
औरंगाबाद च्या जवळ - खुलताबाद चा किल्ला, भद्रा मारुती आहे. तसेच वेरूळ, अजंठा लेणी आहेत. अगदी शहरात च - बिबिका मकबरा आणि पाणचक्की.. तसेच पितळखोरा लेणी, म्हैसमाळ हिलस्टेशन पण आहे. MTDC च्या वेबसाईटवर अजून माहिती मिळेल.

नाशिकः
भिमाशंकरच्या पायथ्याला जंगलात एक ब्लु मॉर्म्मोन नावाच रिसॉर्ट आहे.
तिथे जाउन आलेल्या लोकानी फार उत्तम आहे असा अभिप्राय दिलाय.

http://www.bhimashankarbluemormon.com/index.html
हे ही बघा

ट्रेकिंग ग्रूप्सः
१) Jungle Lore:
Trek Organizers
Mr.Kaustubh Upadhye. Mob – 9819756684
Mr.Tejas Abhyankar. Mob – 9821906046

उत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या वर्षी आम्ही अलिबाग-नागावला एका फार्म हाऊस मध्ये over night stay केला. तिथले details इथे देत आहे:

वैद्य यांचे फार्म हाऊस
पत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ
पांढरा मारुती समोर
कवळे पाडा
फोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही Uhoh )

बुकिंग साठी मुंबईचा पत्ता:
पोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)
फोनः ४३०९३७१

फार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे.
खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम
वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस
१ वर्षांपूर्वी २५० रु. per head charge होता.

किचन मध्ये तुम्हाला स्वतळ स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. (आम्ही रात्री १२ वा. मॅगी आणि ऑमलेट्स बनवले होते Wink ).

फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल.

अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच.

अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.

माझ्याकडे खालील info आहे:

१) Jungle Lore या नावाचा एक ट्रेकिंग ग्रुप आहे:
Trek Organizers
Mr.Kaustubh Upadhye. Mob – 9819756684
Mr.Tejas Abhyankar. Mob – 9821906046

आम्ही ३ वर्षांपूर्वी गोरखगड चे ट्रेकिंग या ग्रुप बरोबर केले होते. उत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.

२) एक BedandBreakfast.pdf नावाची PDF फाईल आहे. त्यात बरेचसे 1 day picnic spots आहेत. यात खालील माहिती आहे:
Houses registered under Bed & Breakfast Scheme through MTDC
in the State of Maharashtra

३) दोन PDF फाईल्स् आहेत maharashtratil kille ani itihas ! .pdf & forts.pdf. त्यात गडांची माहिती आहे.

४) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.
खूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.
राहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.

५) एक PICNIC_SPOTS.XLS म्हणून पण फाईल आहे.

पुणे मुंबई पासून जास्त दुर नसलेलं अन पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटायला गेल्यावर, एक यादगार मुक्काम करण्यासाठी उत्तम रिसॉर्ट म्हणजे .. गिरिवन रिसॉर्ट.

गुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .
२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम!!!! (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो :-))
http://www.gursaleresort.com/

जवळची ठिकाणे -
Koyna Wildlife Century
Ozarde Waterfall
Nehru Udyan
Shivsagar Lake
Vasota Fort
Ghatmatha
Dharmeshwar Temple
Windmill projects

कुणाला अलिबाग, मुरुड-जंजिरा जवळची चांगली बीच रिझॉर्टस माहिती आहेत का?
तशी नेटवर सर्च करुन गोल्डन स्वान आणि काशिद बीच रिझोर्टस अशी २-३ पाहुन ठेवली आहेत... पण अजुन कुणाला चांगले ऑप्शन माहिती असतील तर इथे लिहा...

ठोसेघरला गेलंय का? <<
ठोसेघर ला रहायची सोय अध्यापी नसावी. सज्जनगडावर आसरा मिळुशकतो, सातारा हे जवळचे चांगले ठिकाण तिथे काही चांगली सोय निस्चितच होऊ शकते.

ठोसेघर ला रहायची सोय अध्यापी नसावी. सज्जनगडावर आसरा मिळुशकतो, सातारा हे जवळचे चांगले ठिकाण तिथे काही चांगली सोय निस्चितच होऊ शकते.
>> सातार्‍यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे - मी ६ वर्षापूर्वी तिथे राहिलेले - मस्त होतं तेव्हा!

महाराजा आजुनही मस्तच आहे, त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.

मला मुम्बै आसपासचे चांगले रेफ द्या ना.. आम्हा भावंडांना पोरासोरांना घेऊन जायचयं. त्यामुळे १ रात्र रहाण्यासारखे किंवा एका दिवसात खूप धावपळ न करता होईल असे, हिलस्टेशन अथवा रिसॉर्ट्स.

समुद्रकिनारा नको शक्यतोवर .. पिल्लाना वारा सोसत नाही. Sad

>>कोणी ठोसेघरला गेलंय का? त्याच्या आसपास राह्ण्याची काही सोय आहे का?

ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....
तरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे!
अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या!.... भन्नाट वारे असते तिकडे Happy

रहायचे असेल तर सातार्‍यात खुप सारे पर्याय आहेत!

सूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.

ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला>>>>अगदी अगदी

हे घ्या सातारा दर्शन माझ्या कॅमेर्‍यातुन (ठोसेघरचा धबधबा, चाळकेवाडीच्या पवनचक्क्या, अजिंक्यतारा, सज्जनगड, यवतेश्वर, कास तलाव आणि कासपठार) त्यासोबतच कासच्या फुलांची देखील लिंक आहे.
http://www.maayboli.com/node/11063

मला मुम्बै आसपासचे चांगले रेफ द्या ना.. आम्हा भावंडांना पोरासोरांना घेऊन जायचयं. त्यामुळे १ रात्र रहाण्यासारखे किंवा एका दिवसात खूप धावपळ न करता होईल असे, हिलस्टेशन अथवा रिसॉर्ट्स.
>>

जाजु, कर्जत चे प्रकृती फार्म हाऊस छान आहे असे ऐकले आहे. internet वर माहिती मिळू शकेल. फॅमिलीसाठी छान ऑप्शन आहे.

एक सूचना:
जसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय नाट्यमहोत्सव अमेरिकेत केले तसेच ह्या सहली (ज्याला तुम्ही मराठीत पिकनिक म्हणता) ते अमेरिकेत का करत नाही?
येताना महारष्ट्र सरकारकडून २५ लाख रु. आणायला विसरू नका!

Happy Light 1

झक्की Happy

कर्जत मधील काही रिसॉर्ट
रीव्हरटच ** http://www.rivertouchresort.com/index.html
मोदी रिसॉर्ट**
सदा आनंद**
प्रकृती ***
पिकॅडीली***
सत्या *** http://www.satyaresort.com/
रीव्हरगेट **** www.rivergateresort.com

कल्याण -
विश्वासराव फार्म हाउस** http://vishwasraofarmhouse.com/
रिव्हर वाईन्डस***

अंबरनाथ - शांती सागर**
At Vasat, Near M.I.D.C. Pump House, Ulhas River Bank, P.O. Jambhul,
Ambernath(W). Maharashtra, INDIA.
For General Enquiries and call on Telephone No : (0251) - 2681999 / 2683210 / 3200728
(0251) 2682792 / 2685631 / 3200727 Mobile: 93204 09818 ( call timings 8.a.m. to 8p.m.)

बदलापूर - रेनी रिसॉर्ट**

ठाणे - टिकूजी-नी-वाडी ** http://www.tikuji-ni-wadi.com/

पालघर -

Pages

Back to top