विंबल्डन - २०१०

Submitted by Adm on 16 June, 2010 - 21:53

ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.

हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६-० Uhoh

चला फेडी जिंकला अखेर.. Happy फाया(की फल्ला??) मस्त खेळला.. एकदम २००८ च्या फायनलच्या वेळच्या नदालच्या खेळाची आठवण करून दिली फेडररच्या अंगावर सर्व्हिस करून... पण अखेर अनुभव कमी पडला..
आज फेडररचा फोरहँड पहिले दोन सेट कामच करत नव्हता नीट... ७ डबलफॉल्ट केले त्यात :(..
बॅकहँड मात्र आज मस्त काम करत होता... आणि शेवटच्या दोन सेट्समधले ड्रॉपशॉटसही अफलातुन... :).. शेवटच्या सेटमध्ये पुन्हा एकदा नेहमीचा फेडरर दिसला..

डेव्हिडेंकोने त्याच्या नेहमीच्या लौकीकाला साजेसा खेळ करून ५ सेट्मध्ये मॅच खेचुन आणली.. Happy
चिलिच आणि ल्युबिचीच पहिल्याच फेरीत बाद..

मूर्ख आहे फल्ला.. हातातली मॅच घालवली.. तिकडे रॉडिक देव पाण्यात घालून बसला असेल फेडी हरावा म्हणुन.. त्याने जाउन बहुतेक फल्लाला धुतले असणार.. Happy

रॉडिक, राफा यांना फेडररला दुसर्‍या कुणी हरवावे आणि आपला मार्ग मोकळा व्हावा यापेक्षा स्वतः त्याला हरवावे असे नाही वाटणार का?
फेडररला क्वार्टर/सेमी फायनलचा खेळ पहिल्या फेरीत खेळावा लागला.
राफाची सुरुवात नेहमी अडखळत होते, सामन्याची, सेटची किंवा स्पर्धेची..पण फेडररच्या बाबतेत असे झाल्याचे आठवत नाही.

पण फेडररच्या बाबतेत असे झाल्याचे आठवत नाही.... >>> विंबल्डनमध्ये पहिल्यांदाच फेडररला पहिल्या फेरीची मॅच जिंकायला इतका संघर्ष करावा..

फाया(की फल्ला??) >> काल समालोचक तर फाया म्हणत होता.. लॅटिन अमेरिकन असल्याने फाया च बरोबर आहे बहुतेक...

रॉडिक, राफा यांना फेडररला दुसर्‍या कुणी हरवावे आणि आपला मार्ग मोकळा व्हावा यापेक्षा स्वतः त्याला हरवावे असे नाही वाटणार का? >>>>> वेल.. मला नाही वाटत की त्यांना तसं वाटत असेल... शेवटी ते व्यवसायीक टेनीसपटू आहेत... त्यमुळे स्पर्धा जिंकणे, रँकीग उंचावणे हे महत्त्वाचं.. काही काही इच्छा, आकांक्षा नक्कीच असतील त्यांना.. पण इतरांनी ह्याला हरवण्यापेक्षा मी हरवेन वगैरे भावनिक विचार ते करत असतील असं वाटत नाही... फेडररशी खेळायची वेळ आली तर अर्थातच तयारी आहेच. पण जर त्याच अडसर आधी दुर झाला तर "अरेरे मला त्याला हरवायला मिळालं नाही" वगैरे विचार कोणीच करत बसणार नाही असं मला वाटत.. असे भावनिक विचार आपण करतो...

मी टीव्ही लावला तेंव्हा स्कोअर होता फेडरर दोन सेट डाउन, तिसर्‍या मधे ४-४ आणि ०-४० डाउन. डोळ्यावर विश्चास बसेना. योगा योगाने तिथूनच मॅच फिरली. त्याच गेम मधे ४०-४० वर फेडररने उचललेला ड्रॉप आणि नंतरचा उडी मारुन मारलेला बॅक हँड स्मॅश, केवळ अप्रतीम.

नंतरच्या मॅच मधे राम नावाचा अमेरिकन भारतीय, रॉडिक कडून हरला.:(

वावरिंका आणि टॉमी रॉब्रेडो पण बाहेर पडले पहिल्याच फेरीत.. आणि डोकोला पण बर्‍यापैकी संघर्ष करावा लागलाय दुसर्‍या फेरीत जाण्यासाठी..
बायकांमध्ये पण धक्के आहेतच की - फ्रेंच विजेती शिवोन बाहेर.. अ‍ॅना बाहेर.. सानिया बाहेर..

बायकांमध्ये पण धक्के आहेतच की .. सानिया बाहेर..
>>>> तिकडे शोएब मलिकची टीम हरली. इकडे ही. काय तो पतीला फॉलो करायचा उत्साह.

रॉडिक, राफा यांना फेडररला दुसर्‍या कुणी हरवावे आणि आपला मार्ग मोकळा व्हावा यापेक्षा स्वतः त्याला हरवावे असे नाही वाटणार का? >>>>> राफाला एकवेळ वाटेल पण रॉडिकला ?

असो, आज सेरेनाची मॅच बघितली. एक हाती घेतली.

ठोसरबाई हरल्या. >>> हो का? स्किवोनी पण हरली..

कुझनेत्सोवाची तीन सेटर वगळता आजचा दिवस फारच शांततेत गेला. काल फेडरर, जोको दोघांच्याही पाच सेटर झाल्या.. आज राफा, मरे आणि सोड्या जिंकले सरळ जिंकले, सेरेना आणि वोझनियाकी पण किरकोळीत जिंकल्या... सकाळी सेरेनाची दुपारी सोड्याची मॅच पाहिली थोडी.... त्सोंगाची पण बरी झाली मॅच..

सोड्या जिंकले सरळ जिंकले... दुपारी सोड्याची मॅच पाहिली थोडी... >>> पराग, तू आणि सोडर्लिंग एकाच बैठकीतले की काय?:फिदी:

रॉडिक, राफा यांना फेडररला दुसर्‍या कुणी हरवावे आणि आपला मार्ग मोकळा व्हावा यापेक्षा स्वतः त्याला हरवावे >> फेडररला कुणी हरवत नाही. तो स्वतः स्वतःला हरवतो, फार कंटाळा आला की, विशेष करून नाडाल विरूद्ध. Happy

मयुरेश, अरे सोड्या हे माबोवरील टेनिसप्रेमींनी सोड्याला दिलेले टोपणनाव आहे. तूपण आजपासून त्याला तसेच म्हण. Happy

"रॉडिक, राफा यांना फेडररला दुसर्‍या कुणी हरवावे आणि आपला मार्ग मोकळा व्हावा यापेक्षा स्वतः त्याला हरवावे >> फेडररला कुणी हरवत नाही. तो स्वतः स्वतःला हरवतो, फार कंटाळा आला की, विशेष करून नाडाल विरूद्ध. "
मग टेनिस पण बुद्धिबळासारखे करावे, फेडरर सोडून इतरांची स्पर्धा घ्यावी, फेडररला विचरावे खेळणार का बाबा या चॅलेंजरबरोबर, तो खेळला तर निकाल काही लागला तरी, फेडररला मोठा आणि त्या कुणाला तरी लहान चषक द्यावा, फेडरर जिंकला तर दुसर्‍या कुणाला काहीच देऊ नये.

त्रिविक्रम.. अचानक उगवून काहितरी उ आणि पां विधान करू नका... Happy

आज पण फेडरर एक सेट हरला..
व्हिनस, रॉडीक, किम, हेवीट, हेनीन वगैरे मंडळी पुढच्या फेरीत गेली.. आज सकाळपासून एकही मॅच बघता आली नाही !

शतक Proud

Pages