Submitted by ऋयाम on 15 June, 2010 - 23:42
नमस्कार लोक्स.
मी इथे "नियमित"पणे "पडिक" रहायला लागुन ६-७ महिने झालेत.
पण आजकाल अनपेक्षितपणेच "दाद" यांचे काही लेख वाचायला मिळालेत.
मस्त वाटले वाचुन. त्यातले काही "जुन्या मायबोली वरुन" असेही आहेत.
तर या धाग्याचा उद्देश असा आहे, की हे "जुनं सोनं" नव्यांनाही दाखवा..."
म्हणजेच "जुन्या मायबोलीचे कपिल देव-सुनिल गावसकर" आम्हालाही भेटवुन
हे टॉप क्लास क्रिकेट वाचायला द्या आम्हालाही.
सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..
"जुन्या मायबोली" च्या काळापासुन तिथे असलेल्यांना आग्रहाची नम्र विनंती.
* आधीच असा धागा असल्यास सांगा. लग्गेच हे बंद!
@आभार्स!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेटीच्या कविता. पेशव्याच्या
बेटीच्या कविता.
पेशव्याच्या बर्याच कविता.
पेशवा आणि असामी ने लिहिलेली कादंबरी 'त्या वळणावर'
'जावा कसम' हा STY (जो मला अजिबात आवडत नसे कारण काहीच समजत नसे.. )
पण यातलं फारसं काहीच जुन्या माबो वर आता नाहीये. त्या आधीच ते सगळं वाहून गेलेलं आहे.
पेशव्याच्याच काही मिळाल्या तर. गुलमोहर बखर मधे.
आणि हो मधे एक असा धागा/ लेख स्लार्ट्याने टाकला होता बहुतेक.
थेरडं गायब आहे पण अकाउंट आहे. त्याच्या पाउलखुणात शोधावं लागेल.
नीधप , हे म्हणते आहेस का?
नीधप , हे म्हणते आहेस का?
१०००दा अनुमोदन! फक्त 'तेच का
१०००दा अनुमोदन!
फक्त 'तेच का म्हणून सुनिल-कपिल?' असले वाद होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
तुषार जोशींच्या कविता
तुषार जोशींच्या कविता चारोळ्या पुन्हा एकदा वर येवूद्यात.
बरोब्बर अनीशा!! आगावा,
बरोब्बर अनीशा!!
आगावा, सुनिल-कपिलच का? असंही नको व्हायला...
म्हणु दे हो म्हटलं तर.
म्हणु दे हो म्हटलं तर.
शेवटी चांगलं काहीतरी मिळेल. त्यात थोडा वाद असला म्हणुन काय बिघडलं?
धन्यवाद अनिशा.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/50309.html?1206028949
जुने दिवाळी अंक वाचून काढायचे असतील तर हे घ्या .... बेटीच्या काही कविता कथा असतील तिथे.
पहिली यादी मी दिली ना? मग मला
पहिली यादी मी दिली ना? मग मला म्हण की धन्यवाद...
ऋयाम, जुन्या मायबोलीवर
ऋयाम, जुन्या मायबोलीवर व्ह्युज अॅण्ड कॉमेण्ट्स असा विभाग आहे, हिम्मत असेल वादविवाद वाचायची, तर जरुर भेट दे.
अर्र्.. राहिलंच. तुम्हालाही,
अर्र्.. राहिलंच.
तुम्हालाही, आणि सगळ्यांना आभार्स !
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/34/52790.html?1190184854
आणि हे गणेशोत्सव. यातही खुप काही वाचण्याजोगे आहे.
>>>> अर्र्.. राहिलंच. <<<< अस
>>>> अर्र्.. राहिलंच. <<<<
अस कस राहिलं म्हण्तो मी?
हा सन्गतीचा परीणाम बरं!
www.maayboli.com/hitguj/messa
www.maayboli.com/hitguj/messages/board-topics.html
आयला.. बोलती बंद! लय लिंक
आयला.. बोलती बंद! लय लिंक आल्या! धन्यवाद सर्वांना.
लिंबुकाका, घाबरवताय काय राव...
चालायचंच.
आणि संगत वगैरे विषयांतर नको हां काय आणि समजलं नाहीये असंही मला... दिवा द्या दिवा...
जुन्या मायबोलीवर व्ह्युज
जुन्या मायबोलीवर व्ह्युज अॅण्ड कॉमेण्ट्स असा विभाग आहे, हिम्मत असेल वादविवाद वाचायची, तर जरुर भेट दे.
>>> येस्स... त्यामानाने नविन मायबोली अगदीच मिळमिळीत झालय!!!
आणि जमलंच तर बापू बीबी पण वाचून घ्या.
पुस्तक परिक्षणाचे ही धागे
पुस्तक परिक्षणाचे ही धागे आहेत इतर साहित्य मध्ये, ते पण वाचा.
परत एकदा नॉस्टॉल्जिक ह्यायला
परत एकदा नॉस्टॉल्जिक ह्यायला होणार आता....
काय रे 'कपिल' देवा?
रिक्षा मोड ऑन
स्लार्ट्यासारखाच लेख मीबी लिहिला होता... स्लार्ट्याच्या लेखाखालीच त्याची लिंक आहे ... पण माझ्या लेखात फक्त नावे सापडतील लोकांची. त्यांचे साहित्य नाही
रिक्षा मोड ऑफ
मिल्याने माझा अनुल्लेख केला
मिल्याने माझा अनुल्लेख केला होता म्हणून मी त्याच्या लेखाचा इथे उल्लेख केला नाही..
ज्जेब्बात! शेरास सव्वाशेरणी
ज्जेब्बात! शेरास सव्वाशेरणी
येस्स! अनीशा लिंकबद्दल
येस्स! अनीशा लिंकबद्दल थॅन्क्स!
आयला एस एल आरती अनीशा नावाने
आयला एस एल आरती अनीशा नावाने तर येत नाहियेत ना?
मिल्याने माझा अनुल्लेख केला
मिल्याने माझा अनुल्लेख केला होता म्हणून मी त्याच्या लेखाचा इथे उल्लेख केला नाही.. >>>:P
तुझे साहित्य त्यावेळेला एवढे दखलपात्र कुठे होते?
on serious note जुन्या गुलमोहरावर (२००२ च्या आधी कारण त्यानंतर मी गायब होतो) तू कुठे फार लिहायचीस? त्यानंतरच्या बर्याच जणांना मी मिसलोय माझ्या लेखात मीच इथे नसल्याने
तुझे साहित्या त्यावेळेला एवढे
तुझे साहित्या त्यावेळेला एवढे दखलपात्र कुठे होते?<<
हल्ली तरी कुठे असतं दखलपात्र....
आयला एस एल आरती अनीशा नावाने
आयला एस एल आरती अनीशा नावाने तर येत नाहियेत ना?
>>
मेरेकोभी यैच्च डाऊट आया...
अनीशा = एस एल
अनीशा = एस एल आरती???
इंटरेस्टींग....
>>सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी
>>सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..
वर मंजूडी ने लिंक दिली आहे अन मिल्या च्या लेखातही बरेच ऊल्लेख आहेत.. तेव्हा आता तुम्ही "खोलात" शिरून पहावे
फक्त एकच अडचण येऊ शकते ती म्हणजे जुने लेखांचे फाँट्स आता नीट दिसत नाहीत त्यामूळे वाचताना रसभंग होतो.
बेटी ही ईथल्या कवितांची "माऊली" आहे. तीच्या नंतर कितीतरी आले, येत आहेत, येतील पण तशा कविता न होणे!
(माझ्या माहितीत ईथल्या बर्याच जुन्या लेखकांनी (माझ्या सकट) त्यांचे जुने लिखाण स्वताच्या रंगीबेरंगी पानावर लिहायला चालू केले आहे. उद्देश एकच की ते आर्काईव्ह्ज मध्ये वाहून जावू नये किंव्वा नविन फाँट्स मध्ये दिसावे.)
बेटीच्या कविता मी थोड्याच
बेटीच्या कविता मी थोड्याच वाचल्या. पण क्षिप्रा, वैभव जोशी, निनावी(बाईबिबा) यांच्या कविता आवडायच्या. श्रद्धा,नंदिनी,ट्युलिप, सुमॉ, यांच्या कथा..
अजुनही बरेच आहेत. तिथे चक्कर टाकून आवडीचे साहित्य इथे नक्की मेन्शन करीन..
पण मला जास्त आवडणारे म्हणजे , नंदिनी, च्यायला, चाफा(याच्या भूत-गूढकथा देखील!) यांचे इरसालपणाचे
किस्से!! धमाल असायची ती!
माझे अनुभव व व्ही & सी वाचणे म्हणजे धमाल होती.
चांगला धागा आहे. जुन्या
चांगला धागा आहे. जुन्या मायबोलीत मुद्दाम जाऊन वाचण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत.. जुना अल्बम चाळल्यासारखं वाटेल.. इथे नक्की लिंक्स देईन..
काही कविता शोधण्यासाठी जुण्या
काही कविता शोधण्यासाठी जुण्या मायबोलीत शिरण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण तिथले फॉन्ट आणि चौकोन यान्नी काहीच कळत नाही
हल्ली प्रसिद्ध कवींच्या कविता नव्या मायबोलीवर टाकल्या जात नाहीत. प्रताधिकार कोतवाल लग्गेच धावत येतात आणि भीती दाखवतात. जुन्यामायबोलीच्या रेसीपी बीबीचेही असेच आहे. तु कुठला शिवाजी की सम्भाजी फॉन्ट होता म्हणे.
लिम्ब्या पूर्वी वाकड्या या आय डीने येत असे हे खरे आहे काय? (रे लिम्ब्या.?)
>>>> लिम्ब्या पूर्वी वाकड्या
>>>> लिम्ब्या पूर्वी वाकड्या या आय डीने येत असे हे खरे आहे काय? (रे लिम्ब्या.?)
नाही tonagyaa
.
.
.
.
.
.
.
wakdya लिम्ब्या या आयडीने यायचा असे म्हणले जाते!
बहुधा दोघान्नाही "विषकन्या" बाधली
Pages