जुन्या मायबोलीचे कपिल-सुनिल

Submitted by ऋयाम on 15 June, 2010 - 23:42

नमस्कार लोक्स.

मी इथे "नियमित"पणे "पडिक" रहायला लागुन ६-७ महिने झालेत.
पण आजकाल अनपेक्षितपणेच "दाद" यांचे काही लेख वाचायला मिळालेत.
मस्त वाटले वाचुन. त्यातले काही "जुन्या मायबोली वरुन" असेही आहेत.
तर या धाग्याचा उद्देश असा आहे, की हे "जुनं सोनं" नव्यांनाही दाखवा..."
म्हणजेच "जुन्या मायबोलीचे कपिल देव-सुनिल गावसकर" आम्हालाही भेटवुन
हे टॉप क्लास क्रिकेट वाचायला द्या आम्हालाही.

सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..

"जुन्या मायबोली" च्या काळापासुन तिथे असलेल्यांना आग्रहाची नम्र विनंती.
* आधीच असा धागा असल्यास सांगा. लग्गेच हे बंद!

@आभार्स!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण ही' विषकन्या' ?
सगळ्या विषयात मलाच कळते आणि माझेच मत फायनल आहे आणि तुम्ही मूर्ख आहात वाली?

>>>> कोण ही' विषकन्या' ?
शोध अजुनही चालू आहे! सापडली/ला की सान्गतोच तुला लगेच्च Happy

tonagyaa, शिन्च्या एडिट नको की मारुस! अनुल्लेख करीन अशानं

आईगं! किती जुन्या आठवणी... मी एक नुसती वाचकच. अगदीच सामान्य. मायबोलीत किती गुंतत गेले. असे कितीतरी मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना ते माझ्यासाठी मित्र मैत्रिणी आहेत हेसुद्धा माहीती नाही. Happy पण कुठेतरी मनावर त्यांची छाप आहे. त्यांच्या लिखाणातुन, विचारांतुन, वादांमधुन जे काही मला शिकायला मिळालं त्याबद्दल कृतज्ञता आहे.
स्लार्ट्याचा लेख पुन्हा वाचतांना खरच त्यानं आत्ताच्या आत्ता परत यावं असं वाटतय. त्याच्याच भाषेत," जे लोक लिहीणं बंद झाल्याने माझं नुकसान झालं असं मला मनापासून वाटतं अशा लोकांमध्ये त्याचा नंबर वरचा लागेल."

स्लार्टी=अनीशा? टण्या, वेळ जात नाही म्हणून काहीही लिहित असतोस का? Happy

स्लार्ट्याला त्याची आयडेंटिटी काही कारणामुळे उघड करायची नसेल, तर त्याच्या या मताचा मान राखलाच गेला पाहिजे. या आयडीवरून घडीभर टीपी करणे ठीक आहे (ते तर बर्‍याच वेळा मीही करतो), पण स्लार्टी म्हणजे 'हा' आहे, किंवा 'ती' आहे, असे सर्रास आरोप पुपुवर पण नेहेमी चाललेले असतात. हे बरोबर नाही. एकवेळ स्लार्ट्याचा विचार बाजूला ठेवला तरी इथे नियमित येणार्‍या ज्या व्यक्तीला 'तूच स्लार्टी' असे म्हणतो, त्या व्यक्तीचा तरी विचार केला पाहिजे. Happy

कुणीतरी अंधारात मारलेला तीर निशाण्यावर बसलेला दिसतोय... Happy

असो. या बा.फ. च्या निमित्ताने "जुने ते सोने" पुन्हा नव्याने "वर" आले तर सर्वांचाच फायदा आहे नाही का? तेव्हडेच जुन्यांन्ना रमता येईल अन नव्यांन्ना (लेखनाचा) अभ्यास करता येईल कसे?

साजिर्‍याला अनुमोदन.

मी हेच गेल्या आठवड्यातही पुपुवर लिहिलं होतं. आधी स्लार्टी कोण, याची चर्चा. आता तो नाही, तर इतरांवर संशय. काय अर्थ या सगळ्याला? स्लार्ट्याने कधीही कोणाला त्रास दिलेला नाही. कोणाबद्दल चुकूनसुद्धा अपशब्द उच्चारला नाही. उलट, इथे प्रत्येकाला भरभरून आनंद दिला आहे. हे असे तर्कवितर्क करून आपण उगीच त्याची किंमत करत आहोत, असं वाटत नाही का?

शिवाय कोणी नवीन आलं की त्याच्याकडे संशयाने पाहण्याच्या वृत्तीला काय म्हणावं? मागे आर्फी माबोवर आला तेव्हासुद्धा हाच प्रकार झाला होता. कितीही दिवे दिले, स्मायल्या टाकल्या तरी हा प्रकार योग्य नाही.

>>>> स्लार्ट्याला त्याची आयडेंटिटी काही कारणामुळे उघड करायची नसेल, तर त्याच्या या मताचा मान राखलाच गेला पाहिजे. <<<<<
अहाहा! कित्ती छान ना? पटलं (पण हे कधी अनुभवल नाहि बोवा Proud )

आभार सर्वांचे! दुवे आणि दिवे, दोन्हीबद्दल. त्या निमित्ताने चांगलं वाचायला मिळेल. जुनं नवं वगैरेबद्दल नाही बोलत. मात्र हे जुन्यातलं 'सोनं' शोधुन दिल्याबद्दल आभार. 'ह्यांचे सर्व लेख' पेक्षा 'हा' लेख टाईपात लिमका मिळालं तर जरा सोस्तात दिल ठंडा होईल Wink हे जरा रच्याक Happy

स्लार्ट्याला त्याची आयडेंटिटी काही कारणामुळे उघड करायची नसेल, तर त्याच्या या मताचा मान राखलाच गेला पाहिजे. >>>> साजिर्‍या.. अरे कोण विचारतय स्लार्टीची आयडेंटीटी ? त्याने फक्त इथे परत येऊन पोस्टायला लागावं असाही हेतू असू शकतो ना लोकांचा..

मागे आर्फी माबोवर आला तेव्हासुद्धा हाच प्रकार झाला होता. >>>> हे गड की पुपु वर झालेलं.. त्यावेळी आर्फीने पण अशीच काहितरी उत्सुकता ताणणारी वगैरे पोस्ट्स टाकली होती.. तुला आठवत असेल तर तूच येऊन आर्फी माझ्या ओळखीचा आहे आणि आर्फीला अशी कंफ्युजन वाढवणारी पोस्ट्स टाकू नकोस वगैरे लिहिलं होतस.. उगीच कशाला भलतीच उदाहरण भलतीकडे ??

हे असे तर्कवितर्क करून आपण उगीच त्याची किंमत करत आहोत, असं वाटत नाही का? >>>> त्यात कसली आलीये किंमत करणं वगैरे.. स्लार्टी मायबोलीवर परत यावा अशी बर्‍याच जणांची इच्छा आहे. अनेकांना तो दुसर्‍या आयडीने इथे येतो असा दाट संशय आहे. तर्कवितर्क करून लोकं उगीच त्याला चिथावण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून तो परत पोस्टायला लागेल... मला वाटत नाही हे सगळं स्लार्टीला नावे ठेवणे किंवा कोणत्याही निगेटिव्ह हेतूने चाललेलं असतं..

उगीच जिथे तिथे पोलीसगिरी कशाला ती !!! Uhoh

पराग,
स्लार्टी परत यावा असं वाटत असेल तर त्याला सरळ बोलवावं. कोणीही नवीन आयडी आला तर तो स्लार्टी म्हणून आवई उठवणं हे चूकच. गेल्या आठवड्यात स्लार्टी = कुलु हे ऐकलं, आज अनीशा, हा काय प्रकार?

मी आर्फीचं उदाहरण दिलं ते योग्यच आहे. प्रत्येक नवीन आयडीने आधी स्वतःचं ओळखपत्र दाखवावं असा नियम नाही. या नवीन लोकांकडे प्रत्येकजण संशयानं पाहील, त्याचं काय? आर्फी आला त्याच्या काही मिनिटांपूर्वी भक्ती_रानडे नावाचा एक आयडी आला होता. तिला डुप्लिकेट आयडी म्हणून झाल्यावर ती परत कधी माबोवर आली नाही. हे अनीशाच्या बाबतीत होऊ नये. कारण अनीशा = चिनूक्स, अनीशा = अरभाट हेसुद्धा झालं आहे.

(एक दुरुस्ती - आर्फी कोण याची चर्चा पुपु आणि पार्ल्यात झाली होती. त्याने उत्सुकता ताणणारी काही पोस्टं वगैरे टाकली नव्हती, तो कोण, हे तिघाचौघांना माहीत होतं. ज्यांना शुद्ध लिहिणारी प्रत्येक व्यक्ती डुप आयडी आहे, असं वाटतं, त्यांनी शंका घेतली होती. माबोवर आल्यावर प्रत्येकाला आपली ओळख द्यावी असा नियम नाही.)

ही अशी पोस्टं वाचून, या पोश्टींमुळे चिथावून, स्लार्टी परत येईल, असं ज्यांना वाटतं, ते खरोखर स्लार्टीची किंमत कमी करत आहेत, यात शंका नाही.

असो. या बाफचा विषय वेगळा आहे. या विषयावर अधिक चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही.

>उगीच जिथे तिथे पोलीसगिरी कशाला ती !!!
अगदी...
१००० मोदक. (हा बा.फ. जुन्या मायबोलीवरील साहीत्त्य बदल आहे का अजून कशाबद्दल?)

त्याने उत्सुकता ताणणारी काही पोस्टं वगैरे टाकली नव्हती, तो कोण, हे तिघाचौघांना माहीत होतं. ज्यांना शुद्ध लिहिणारी प्रत्येक व्यक्ती डुप आयडी आहे, असं वाटतं, >>>>> माझ्याकडे स्क्रीनशॉट्स नाहीत... आणि अर्थात पुपु आणि पार्ले हे वाहते बाफ असल्याने ते पोस्ट्स पण नाहित.. त्यामुळे काय बोलणार आता.. तुम्ही म्हणता तसं !!

ही अशी पोस्टं वाचून, या पोश्टींमुळे चिथावून, स्लार्टी परत येईल, असं ज्यांना वाटतं, ते खरोखर स्लार्टीची किंमत कमी करत आहेत, यात शंका नाही. >>>> मुळात कोणी कोणाची किंमत करणं आणि ती कमी करणं म्हणजे काय तेच ह्या केस मला समजत नाहिये.. !

अनीशा = चिनूक्स >>>> Lol हे कधी झालं मला माहित नाही.. पण ती तू नाहिस ह्याची मला खात्री वाटते.. कारण ती बर्‍याच स्मायली वापरते पोस्ट्स लिहिताना.. Wink

असो..

बर्‍याच स्मायली वापरते पोस्ट्स लिहिताना >>> अरे डु आय ने आल्यावर तेवढा बदल करायलाच हवा Proud Light 1

>अनीशा = चिनूक्स >>>> हे कधी झालं मला माहित नाही.. पण ती तू नाहिस ह्याची मला खात्री वाटते.. कारण ती बर्‍याच स्मायली वापरते पोस्ट्स लिहिताना
जाऊदे ना पराग भाऊ...... Happy

बाकी अनीशा या केवळ पाच आठवड्यापूर्वी नोंदणी झालेल्या आयडीने स्लार्टी या आयडीने लिहीलेल्या २ वर्षापूर्वीच्या लेखाची लिंक तत्परतेने ईथे देणे हा योगायोगच नाही? Happy

बाकी स्लार्टी (किंव्व कुठल्याही आयडीची) ची किंम्मत वगैरे जरा अतीच झालं नाही.. तो काय आजचा सोन्याचा भाव आहे का? Happy

ऋयाम,
विषयांतराबद्दल क्षमस्व!

बाकी अनीशा या केवळ पाच आठवड्यापूर्वी नोंदणी झालेल्या आयडीने स्लार्टी या आयडीने लिहीलेल्या २ वर्षापूर्वीच्या लेखाची लिंक तत्परतेने ईथे देणे हा योगायोगच नाही? >>>>>>>
त्यात कसला योगायोग ?? मायबोलीवर जरा नॅव्हीगेटकेलं की येते शोधाशोध करता... एव्हडं काय रॉकेट सायन्स नाहिये ते.. यावरून लगेल निष्कर्ष कशाला काढायचे काहितरी ?

बर्‍याच स्मायली वापरते पोस्ट्स लिहिताना >>> अरे डु आय ने आल्यावर तेवढा बदल करायलाच हवा >> नक्कीच Wink Lol Proud Biggrin

बास का गं सिंड्रेला ? Wink

@ याम, धन्स हा धागा काढलास अन् ह्या लिंका मिळाल्या

मस्त बीबी. Happy
मी एकदा घरातल्या एका बापुभक्ताच्या बापुंबद्दलच्या मतांवर (?)कावुन नेट्वर गुगलुन पाहत होते तर त्यात "तो" बापुंवाला बीबी सापडला आणि मला मायबोलीचा शोध लागला! Happy

हेहेहे अरे आज मी वैतागलोय ज्याम. म्हटलं आपलाही वादास हातभार नको का? म्हणून रे.. शेवटी मी डुआय Wink

:सिरिअस मोड ऑन: हल्ली कुठेही वाद होतातच अन् ते तसे होणारच हे आता माझ्या चांगलच लक्षात आलय इथंही ते झाले गरज नव्हती पण... असो. :सिरिअस मोड ऑफ:

:सिरिअस मोड ऑन: २ मला तु झ्या नावातलं पहिलं [ रू / र्‍हू / र्‍ह्यू ] अक्षर काढता येत नाही Sad :सिरिअस मोड ऑफ: २

ऋ >> हे कॉपी पेस्टलंय Wink

मस्त धुरळा उडलाय इथे! ऋयाम, तुमच्या बाफ ला माझ्यामुळे हे वळण लागलं त्याबद्द्ल माफी.
बाकी स्लार्टीचा डुआय असा बहुमान दिल्याबद्द्ल धन्यवाद टण्या. इतक्या महान माणसाचा डुआय ही अभिमानास्पद गोष्ट. स्लार्टीला कधी रिक्षा फिरवावी लागली असेल असं वाटत नाही तेव्हा त्याचा डुआय का फिरवेल? असो.
या पोस्टीत स्माइली नाहियेत, आता त्याची सवय करून घेते.

अरे ए ... कपिल सुनील बद्दल बोलत असताना
बिशनसिंग बेदी का होताय मधेच?
[स्लार्टी यांना इथे काहीही म्हटले नाही आहे].

अरे लोक्स दिल पे मत लो. एव्ढे जुने पुराणे लोक्स जमलेत, थोडा टीपी होणारच. माफी तर बिल्कूल गरजेची नाही. आर यु वाय ए एम. आर कॅपिटल Wink

मला वाटत नाही टण्या किंवा मी सुद्धा ते अनीशा = स्लार्टी फार सिरीयसली म्हणलं होतं.
त्याला सगळेच शोधतायत. आणि त्यामुळे जरा थोडफार साम्य दिसलं की लगेच 'हा तोच तर नव्हे' किंवा नवीन आलेला प्रत्येक डुप आयडी आहे की काय याची पाल चुकचुकणं हे बर्‍याचश्यांचं होतंच आहे सध्या. त्यावर एक विनोद म्हणून ते म्हणलं गेलं होतं असं मला तरी वाटलं म्हणून मी इंटरेस्टींग असं म्हणाले.
त्याला एवढी मोठी परिमाणं द्यायची मला तरी गरज नाही वाटत साजिर्‍या आणि चिनूक्सा. आणि तुम्हाला दोघांना त्याच्याबद्दल वाटणारा आपलेपणा, आदर सगळं गृहित धरूनही एवढं नक्की म्हणावसं वाटतं की त्याच्याबद्दलच्या पोस्टसना त्यालाच defend करूदेत किंवा त्या पोस्टस तश्याच राहूदेत. तुम्ही इतके पझेसिव्ह कशाला होताय?

ह्या प्रतिसादाचा उद्देश एकच.
नव्या लोक्सनो, हे बघा Wink !
"चांगलं काहीतरी" "वर" आणलंय. (आभार "जुन्यांचे"!)

Pages