विजेते॑

मीमराठी.नेट कविता स्पर्धा (प्रथम क्रमांक)

Submitted by अभय आर्वीकर on 21 April, 2011 - 05:25

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?

किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे

गुलमोहर: 

जुन्या मायबोलीचे कपिल-सुनिल

Submitted by ऋयाम on 15 June, 2010 - 23:42

नमस्कार लोक्स.

मी इथे "नियमित"पणे "पडिक" रहायला लागुन ६-७ महिने झालेत.
पण आजकाल अनपेक्षितपणेच "दाद" यांचे काही लेख वाचायला मिळालेत.
मस्त वाटले वाचुन. त्यातले काही "जुन्या मायबोली वरुन" असेही आहेत.
तर या धाग्याचा उद्देश असा आहे, की हे "जुनं सोनं" नव्यांनाही दाखवा..."
म्हणजेच "जुन्या मायबोलीचे कपिल देव-सुनिल गावसकर" आम्हालाही भेटवुन
हे टॉप क्लास क्रिकेट वाचायला द्या आम्हालाही.

सध्या म्हणजे चुकुन कोणीतरी वाचलं की ते "वर" येतं आणि मग वाचायला मिळतं..

"जुन्या मायबोली" च्या काळापासुन तिथे असलेल्यांना आग्रहाची नम्र विनंती.
* आधीच असा धागा असल्यास सांगा. लग्गेच हे बंद!

विषय: 
Subscribe to RSS - विजेते॑