Submitted by Adm on 15 May, 2010 - 17:31
फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>फ्रेंच ओपनचे प्रेक्षक किती
>>फ्रेंच ओपनचे प्रेक्षक किती पक्षपाती. << अगदी खराय त्या मॉनप्लिसच्या मॅचमध्ये पण प्रतिस्पर्ध्याची , फॉग्निनिची कित्ती हुर्र्यो उडवत होते. बिचारा एकटाच लढत होता तो. शेवटी त्याने मॉनफ्लीसला २-६, ४-६, ७-५, ६-४, ९-७ असे तुडवले व पक्षपातीपणा करणार्यांचे तोंड बंद केले
सेरेना आऊट !!! सकाळी बघितलं
सेरेना आऊट !!!
सकाळी बघितलं तेव्हा स्टोसूर चांगली खेळत होती...
तिकडे यांकोविक पण जिंकून सेमी मधे पोचली... यांकोविक बाईंनी संधी साधून पहिली ग्रँडस्लॅम जिंकली पाहिजे आता... पण स्टोसूर पुढे अवघड वाटतय.. !!!
आणि नोव्हाक कडे कुणाचे लक्षही नाहीए. >>>> कोण म्हणे लक्ष नाहिये.... लक्ष ठेऊन आहोत आम्ही त्याच्यावर.. आत्ता मॅच चालू आहे..
आणि नोव्हाक कडे कुणाचे लक्षही
आणि नोव्हाक कडे कुणाचे लक्षही नाहीए. >>>>
लक्ष देऊन काही उपयोग नाही. हरला तो आज. पहिले दोन सेट किरकोळीत जिंकूनही मॅच हरला.
फ्रेंच ओपन मध्ये खरंच काहीही होऊ शकते. माहितसुध्दा नसलेले खेळाडू येऊन चांगल्या नावाजलेल्या खेळाडूंना हरवून जातात.
फ्रेंच ओपन मध्ये खरंच काहीही
फ्रेंच ओपन मध्ये खरंच काहीही होऊ शकते. माहितसुध्दा नसलेले खेळाडू येऊन चांगल्या नावाजलेल्या खेळाडूंना हरवून जातात...>>>>हेच तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे..
त्सोसुर छान खेळतेय.. जिंकायची चांगली संधी आहे तिला.. सेरेनाला हरवल्यामुळे तिचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल..
महिलांमधे एक नवी विजेती
महिलांमधे एक नवी विजेती मिळणार्...सलग तिसर्या वर्षी.
स्पेन कडे किती पुरुष खेळाडू आहेत? राफा, फेरर, व्हर्डास्को, रॉब्रेडो, फेरेरो, मोया(निवृत्त झाला का?) अल्मेग्रो.
कालची मॅच पहाताना वाटत नव्हते की दोघे एकाच देशाचे आहेत.
फेडरर व जस्टिन हेनन.. दोघेही
फेडरर व जस्टिन हेनन.. दोघेही हरले...
फेडरर्-सोडर्लिंग मॅच बघीतली नाही पण राफा व अमेग्रो मॅच पाहीली.. राफा ३ स्ट्रेट सेट मधे जिंकला खरा पण मॅच एकदम अटितटीची झाली. पहिले दोन सेट अमेग्रो जिंकु शकला असता.. पण शेवटी नादालला त्याच्या इथल्या अनुभवाचा फायदा झाला.
फचिन.. इथे नामाकिंत खेळाडु कन्सिस्टंटली विजेते झालेले हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.. गेल्या ४० वर्षात बोर्ग्-क्युरेटन व नादाल हे ३च खेळाडु आहेत की ज्यांनी ही स्पर्धा ३ किंवा जास्त वेळा जिंकली आहे. त्यापैकी बोर्ग इथे ६ वेळा जिंकला आहे व त्याच दरम्यान ५ वेळा सलग तो विंबल्डनलाही जिंकला आहे.. एकाच वर्षी फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर जिंकल्यावर १ महिन्यात विंबल्डनच्या ग्रास कोर्टवर जिंकण्याचा पराक्रम त्याने एकट्यानेच मल्टिपल वर्षी केला आहे.
एक गंमत म्हणुन सांगतो.. इथे न जिंकलेले खेळाडु आहेत.. जिमी कॉनर्स, जॉन मॅकेन्रो,बोरिस बेकर्,स्टिफान एडबर्ग व पीट सँप्रास!..... व इथे जिंकलेले खेळाडु आहेत.. अँड्रेस गोमेझ्,सर्जे ब्रुगेरा,थॉमस मुस्टर,युव्ह्जेनि कॅफेल्निकॉव्ह,अल्बर्ट कोस्टा व गॅस्टॉन गॉडिओ.... गो फिगर!:)
भरत.. स्पेनचे खेळाडु तिकडे त्यांच्या देशात मुख्यत्वे क्ले कोर्ट्स असल्यामुळे तसल्या कोर्टवर ते लहानपणापासुन खेळुन खेळुन तावुन सुलाखुन निघालेले असतात. त्यामुळे त्यांच्या देशात तु वर नमुद केलेल्यांसारखे क्ले कोर्ट स्पेशलिस्ट खोर्याने निर्माण होतात. त्यामुळेच गेल्या १७ वर्षात ८ वेळा स्पेनचाच खेळाडु इथे रोलँड गॅरसवर बाजी मारुन गेलेला तुला दिसेल.
आणी हो.. व्हिनस व सरिना.. दोघी बहीणी हरल्या ते बरेच झाले.
पण फेडरर-नादाल फायनल परत एकदा बघायला मिळणार नाही याचे खुप वाइट वाटत आहे..:( लेट्स होप वुइ कॅन सी देम इन द विंबल्डन फायनल.....
मुकुंद -गेल्या ४० वर्षात
मुकुंद -गेल्या ४० वर्षात बोर्ग्-क्युरेटन व नादाल हे ३च खेळाडु आहेत की ज्यांनी ही स्पर्धा ३ किंवा जास्त वेळा जिंकली आहे.->> Ivan Lendl ने पण ३ वेळा जिंकलीये ना फ्रेंच ओपन?
अनीशा.. एकदम बरोबर.. इन्फॅक्ट
अनीशा.. एकदम बरोबर.. इन्फॅक्ट लेंडलच नाही तर स्विडनचा मॅट्स विलँडरही इथे ८०च्या दशकात ३ वेळा जिंकलेला आहे. माझी चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल खरच धन्यवाद.
पण खर सांगु? इव्हान लेंडल मला खुप आवडायचा पण ८० च्या दशकात लेंडल व विलँडरच्या इथल्या अनेक मॅचेसमधे झालेल्या ..मशिनसारख्या..मोठमोठ्या रॅलीजमुळे ८० च्या दशकात शेवटी शेवटी फ्रेंच ओपन बघताना खुप कंटाळा येउ लागला होता. म्हणुनही कदाचित त्या दोघांची नावे माझ्या डोक्यात पटकन आली नसावीत.
अनीशा..इथल्या रेग्युलर टेनिसप्रेमी क्राउडमधे तुही सामील झाली ते बरे झाले..:)
आगासी ने पण फ्रेंच ओपन जिंकले
आगासी ने पण फ्रेंच ओपन जिंकले ना..त्याने करीअर ग्रँड स्लॅम केली की. खरे तर तो फ्रेंच ओपनच जिंकेल असे सगळ्यांना आणि त्यालाही वाटायचे, पण सगळ्यात आधी त्याने विंबल्डन जिंकले.
उगाच मेंदूला त्रास देऊ
उगाच मेंदूला त्रास देऊ नका..
http://en.wikipedia.org/wiki/List_of_French_Open_Men's_Singles_champions
इथे जाऊन बघा सगळे तपशीलवार मिळेल पुरुष विजेत्यांसंदर्भात..
आणि इथे http://en.wikipedia.org/wiki/List_of_French_Open_Women's_Singles_champions लेडिज विजेत्यांसंदर्भात.
हिमांशु.. अरे मेंदूला त्रास
हिमांशु.. अरे मेंदूला त्रास देण्याचा प्रश्न नाही रे.. पण अश्या इथल्या जुन्या आकडेवारीनी मला तरी नोस्टाल्जिक वाटते व परत एकदा त्या जुन्या खेळाडुंच्या आठवणी ..डोळ्यासमोरुन तरळुन जातात... व त्या आठवणींनी उलट मेंदुला बरे वाटते. हे खर आहे की आजच्या गुगलींगच्या जमान्यात पटकन सगळी नावे व रेकॉर्ड्स तुला तपशीलवार एका ठिकाणी जरुर पहायला मिळतील... पण मी म्हणतो त्या लेंडल्-विलँडरच्या कंटाळवाण्या रॅलिज म्हणा किंवा एडबर्ग-बेकर्-सँप्रास्-मॅकेन्रो-कॉनर्स सारख्या लेजेंडरी खेळाडुंनी.. इथल्या रोलँड गॅरसवरच्या त्यांच्या भगिरथ.. पण.. अयशस्वि.. प्रयत्नात केलेल्या खेळाच्या आठवणी म्हणा.. त्या मात्र तुला तु वर दिलेल्या लिंक्समधे सापडणार नाहीत. उदाहरणार्थ.. १९८९ मधे स्टिफान एडबर्ग त्याच्या कारकिद्रीच्या अत्युच्च शिखरावर असताना इथे मायकेल चँगसारख्या नवख्या व तरुण खेळाडुकडुन ५ सेटमधे हरला.. हे तुला कुठल्याही रेकॉर्डबुकमधुन कळेल.. पण तो हरत असताना.. त्याच्या चेहर्यावर असलेले आश्चर्यवजा-फ्रस्ट्रेशन.. की बाबा.. आय कान्ट बीलिव्ह.. आय अॅम लुजिंग अगेन्स्ट धिस गाय!(जे मीच काय पण ज्यांनी ज्यांनी तो सामना बघीतला ते कधीच विसरु शकणार नाहीत!) हे तुला कुठल्याही रेकॉर्ड साइटवर दिसणार नाही. तिच गोष्ट १९८६ विंबल्डन फायनलमधल्या लेंडलच्या चेहर्यावरच्या अगतिकतेची व दिनवाणेपणाची.. बोरिस बेकरबरोबरच्या अंतिम सामन्यात.. पंचानी दिलेल्या कॉलवर उद्विग्न झालेला लेंडल.. अक्षरशः डोळ्यात पाणी येउन.. पंचांना दिनवाणेपणे म्हणाला होता की ....एक तर किती महत्प्रयसाने.. अनेक वर्षांच्या अयशस्वी प्रयत्नांनतर मी फायनलपर्यंत एकदाचा आलो आहे व आता तुम्ही तुमच्या अश्या चुकीच्या कॉलने माझे काम अजुनच कठीण करत आहात.. त्या वेळचा लेंडलचा रडवेला चेहराही तुला कुठल्याच रेकॉर्ड बुकमधे दिसणार नाही.. असो.
अरे हे काय? फेडरर्-हेनन.. दोघेही बाहेर पडल्यामुळे सगळे उदास झाले वाटते?
पण राफा आपले इथले ५वे विजेतेपद मिळवतो की नाही यात मात्र मला अजुनही इंटरेस्ट आहे. आज सकाळी ११ वाजता एन. बी. सी. वर(अमेरिकेत) नादालचा उपांत्य फेरीचा सामना आहे.
इथले निकाल खरंच मजेदार
इथले निकाल खरंच मजेदार आहेत!!
फेडी हरल्याचं वाईट वाटलं पण सॉडर्लिंगने चांगली फाईट दिली.
मुकुंद, अशा आठवणी तुम्ही खरंच खूप छान लिहिता.. वाचायला मजा येते.
मुकूंद.. त्या अपरीचित
मुकूंद.. त्या अपरीचित विजेत्यांच्या यादीत अजून एक नाव म्हणजे सर्जी ब्रुगेरा.. तो तीन वेळा फायनलला आला आणि दोन वेळाअ कुरियर विरुध्द जिंकला.. तेव्हा कुरियरच्या चेहेर्यावरही अतिथय helpless भाव असायचे.. !
कालची सेमी फायनलपण स्टोसुर भारी खेळली.. इटालियन बाई पण फॉर्म मधे आहेत एकदम... !
मुकुंद तुम्ही म्हणताय त्यात
मुकुंद तुम्ही म्हणताय त्यात काहीच प्रश्न नाही... आणि तुम्ही ज्या पद्धतीने सामन्यांचे वर्णन रंगवून लिहिता त्याला तर तोडच नाहीये..
मला एव्हढंच म्हणायचय की ह्या गोष्टींवर जास्त चर्चा करण्यापेक्षा सरळ जिथे विदा उपलब्ध आहे ती बघून प्रश्न मिटवून टाकायचा...
आणि तुम्ही जे वर्णन करता ते वाचून त्यावर जास्त समाधानी व्हायचं..
तुम्ही म्हणताय ती एडबर्ग - चँग फायनल बघितली आहे मी... का माहित नाही पण चँग तेव्हा माझा आवडता खेळाडू होता आणि जनरल टीपी म्हणून टेनीस खेळताना त्याच्या सारखी सर्व्हीस वगैरे करायची नक्कल पण करायचो.. अर्थात तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनी वर्णन करता ते पूर्ण पणे कळण्याचे वय नव्हते.. ते आत्ता तुम्ही लिहिल्यावरच जास्त प्रकर्षाने जाणवले..
पराग असेच अजून एक नाव गुस्ताव कर्टन.. तोही जिंकलाय तीन वेळा... परवा त्याचा सत्कार वगैरे केला रोलाँ गॅरो वर...
रच्याकने... सोडर्लिंग बाहेर जातोय बहुतेक....
बेर्डीच ३-६, ६-३, ७-५, १-२ (३०-३०) असा पुढे आहे...
गडबड..... चवथा सेट सोडर्लिंग
गडबड..... चवथा सेट सोडर्लिंग जिंकलाय... ६-३ असा.. आणि पाचव्यात पहिलाच गेम ब्रेक केलाय..
सोडर्लिन्गने सामना जिन्कला.
सोडर्लिन्गने सामना जिन्कला.
सोडर्लिंग जिंकला बरे झाले. तो
सोडर्लिंग जिंकला बरे झाले. तो नदालला जरा टफ देऊ शकेल. मागच्यावेळी त्याने हरवले होते नदालला. सेमीफायनल तर नदाल सरळ सेटमध्ये जिंकतोय असं दिसतंय सध्यातरी..
फचिन,नदाल मागच्या वर्षीच्या
फचिन,नदाल मागच्या वर्षीच्या पराभवाचा वचपा काढायला यावेळेस उत्सुक असणार त्यामुळे तो जास्त आक्रमकपणे खेळेल सोडर्लिंगविरुध्द.. त्यामुळे सोडर्लिंग त्याला कितपत टफ देऊ शकतो ते पहायचे आता...
बोर्गने असं भाकीत केलय की सोडर्लिंग हा फेडरर आणि नदाल यांना मागे टाकुन लवकरच पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल..
सोडर्लिंगने गेल्या फ्रेंच ओपन
सोडर्लिंगने गेल्या फ्रेंच ओपन पासून या फ्रेंच ओपन पर्यंत काय केले? (मलामाहीत नाही म्हणून विचारतोय) तो ग्रास कोर्ट, हार्ड कोर्ट वर तसाच खेळतो का?
पण काल नदालने तिसरा सेट पार
पण काल नदालने तिसरा सेट पार टायब्रेकरपर्यंत जाऊ दिला हे ठीक नाही वाटलं. मध्येच पार निष्प्रभ झाला होता, त्याच्या अपोनन्टने सलग पाच पॉईण्ट घेतले आणि नेटजवळ जास्त प्रभावी खेळत होता. सॉडरलिंग विरूद्ध अशा चूका करून चालणार नाहीत राफाला, तो जबर्या फॉर्मात आहे, फेडीला हरवलंय नुकतंच, राफाला गेल्या वर्षी हरवलंय, आता तो नक्कीच जिंकण्यासाठी उत्सुक असेल.
पौर्णिमा.. बरोब्बर बोललीस बघ!
पौर्णिमा.. बरोब्बर बोललीस बघ! कालची नादालची मॅच मी संपुर्ण बघीतली. पहिल्या दोन सेट्मधे इथल्या क्ले कोर्टवर कसे खेळायचे याचे जळजळीत प्रात्यक्षिक मेल्झरला दिल्यावर.. तिसर्या सेटमधे आपला स्वतःचा सर्व्हिस गेम..सामना जिंकायची संधी असताना.. ०-४० असे हरणे नादालला शोभले नाही. त्या गेमच्या शेवटच्या पॉइंटला.. सर्व्हिस करताना.. त्याच्या डोळ्यासमोर माशी आल्यामुळे त्याचा डबल फॉल्ट झाला हे जरी मान्य केले तरी त्या संपुर्ण गेममधे तो एकदम ढिला खेळला. तसा १५ मिनीटाचा बॅड पॅच सोडर्लिंगबरोबर फायनलमधे नादालला भारी पडेल कारण सोडर्लिंग क्ले कोर्टवर मेल्झरपेक्षा खुपच चांगला खेळाडु आहे.
अरे हिमांशु.. त्या १९८९ च्या फ्रेंच ओपन फायनलमधल्या एडबर्गच्या चेहर्यावरच्या एक्स्प्रेशनपेक्षा.. तु त्याच वर्षीच्या चौथ्या फेरीतली चँग विरुद्ध प्रथम सिडेड लेंडल ही मॅच आठव. त्या मॅच मधे पहिले दोन सेट घेउनसुद्धा बलाढ्य लेंडल ती मॅच.. चिवट चँगविरुद्ध हरला होता. त्या मॅचमधे संपुर्ण दमलेल्या व एक्झॉस्ट झालेल्या चँगने लेंडलला चक्क अंडरहँड सर्व्ह केली होती.. त्यावेळचे लेंडलच्या चेहर्यावरचे.. आय कांट बिलिव्ह धिस!.. चे भाव अगदी बघण्याजोगे होते..:) पण हे मात्र मान्य केले पाहीजे की १९८९ चे फ्रेंच ओपन विजेतेपद मिळवताना. चँगने आपल्या चिवटपणाच्या बळावर.. त्याच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचे पासिंग शॉट्स व लॉब्स.. आपले शुज.. इथल्या लाल मातीवर..ऑन द रन घसरवत... हंट डाउन केले होते.
पराग.. अरे जिम करिअरचा चेहरा सदानकदा एरंडेल घेतल्यासारखाच असायचा.. कद्धी कद्धी म्हणुन तो हसत असताना मला आठवत नाही..:)
बाय द वे.. पौर्णिमा व नंदिनी.. तुमच्यासारख्या मायबोलिवरच्या दोन प्रथितयश लेखिकेंना टेनीस बीबीवर बघुन आनंद झाला...:)
सोडर्लिंगने गेल्या फ्रेंच ओपन
सोडर्लिंगने गेल्या फ्रेंच ओपन पासून या फ्रेंच ओपन पर्यंत काय केले? (मलामाहीत नाही म्हणून विचारतोय) तो ग्रास कोर्ट, हार्ड कोर्ट वर तसाच खेळतो का?
>>
काहीतरी केलंच असेल त्याने.. गेल्या फ्रेंच ओपनला त्याचा रॅन्क २५ होता. ह्यावेळी ७ आहे.
मुकुंद, तुमच्या पोष्टी वाचून मजा आली. मला मायकल चॅंग आवडायचा नाही तो फार बुटका होता म्हणून. पण तेव्हा मी लहान होतो त्यामुळे खेळाबरोबर इतर गोष्टींमुळेसुद्धा खेळाडू आवडते नावडते व्हायचे. पण जिम कुरिअर चांगलं खेळायचा. मला त्याची स्टाईल आवडायची.
मॅच बघताय का कोणी ? बरी
मॅच बघताय का कोणी ? बरी चाललीये तशी.
पहिला सेट शिवोने (?) ने जिंकला. स्टोसूरच्या अनफोर्स्ड एरर पण व्हायला लागल्यास अचानक.
मी पाहतोय रे. स्टोसूर खरंच
मी पाहतोय रे. स्टोसूर खरंच अनफोर्स्ड एरर खूप करत आहे.
समालोचक बाई स्कॅवोने असा उच्चार करत आहे.
आमचा गाढव केबलवाला स्टार
आमचा गाढव केबलवाला स्टार स्पोर्ट्स वर बांग्लादेश इंग्लंड दाखवतोय. आणि भारत श्रीलंका टेन स्पोर्ट्स.
स्कीवोनी चांगलीच अॅटॅकिंग
स्कीवोनी चांगलीच अॅटॅकिंग खेळतेय!
जिंकली
जिंकली
पुरुष दुहेरीच्या अंतिम
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात समालोचक सतत लिअँडरवर टीका करत होते. अगदी त्याच्या खिलाडूपणावरपण. चौघांमधे तो सर्वात कमजोर सर्व्हिस असलेला खेळाडू आहे हा त्याचा मुद्दा सोडला, तर बाकी पूर्वग्रहदूषित वाटले मला. सगळे समालोचन नेस्टर नेनाद यांच्या बाजूने होते.
कालच्या सामन्यात नेहमीचा लिअँडर दिसला नाही हेही खरे. ड्लोहीचा खेळ अगदी टॉपच्या डबल्स प्लेअर सारखा होतोय.
सॉडर्लिंग विंबल्डन २००९ मधे
सॉडर्लिंग विंबल्डन २००९ मधे ४थ्या फेरीत फेडररकदून हरला.
यु एस ओपन २००९ मधे क्वार्टर फायनल मधे पुन्हा फेडरर कडून हरला.
ऑस्ट्रेलियन ओपेन २०१० मधे पहिल्याच फेरीत ११३ व्या क्रमांकाच्या खेळाडूकडून ५ सेट मधे हरला.
कोण कोण पाहत आहे
कोण कोण पाहत आहे मॅच?
आत्तापर्यंतचा खेळ पाहून मला नदाल जिंकेल असे वाटते. सोड्या फारच बेभरवशाचा आहे. त्याच्या खेळात सातत्य नाही असे वाटते.
Pages