जलराशी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मे महिन्यातील रखरखत्या उन्हात एक मेंढा विहिरीवर आला...

विहिरीत पाणी फक्त नावाला शिल्लक होतं... मेंढ्याला पाण्यात उडी मारणं किंवा उगाच दगड टाकून पाणी गढूळ करण आवडल नाही... बिच्चारा सरळ दुसरी विहीर शोधत निघून गेला... जाताना विहिरीत न टाकलेल्या दगडावर ठेचकाळून पडला...

थोड्या वेळाने मागुन बैल आला... पाणी आटलेलं पाहुन निराश न होता एकलव्या सारखे भात्यातून स्ट्रॉ काढून विहीरीत फेकून एक मोठी स्ट्रॉ बनवली... आणि गटागट थंडा मतलब फेको कोलाची अ‍ॅड करत निघून गेला...

पैंजणांचा लाडीक आवाज करत मिथुनेची ललना त्या विहीरवर पाणी भरण्यासाठी आली... एका टाचेवर उंच उभ राहून तिने विहिरीतील खोलीचा अंदाज घेतला... मग वेणीशी चाळा करत, मनाशी गुणगुणत विहीरीला प्रदक्षिणा घालू लागली... विहीरी शेजारील सोनचाफ्यातून अलगद एक फूल काढून केसात गुंफू लागली... .... ... ... ... शेवटी ब्युटी पार्लर मधे गेली...

काही वेळाने कर्क राशीची काकू विहिरी जवळ आली... पाणी पिण्याच सोडून आटलेली विहिर पाहून तिच्याच डोळ्यात पाणी आलं... आपणं पाणी पियालो तर विहीरीतील पाणी संपून जाईल या काळजीत ती निघून गेली...

सिंहाला पाणी काय नी पिपाणी काय दोन्ही सारखेच... आयत्यावर कोयता... रखरखत्या उन्हाला शिव्याशाप देत विहिरी जवऴ आला आणि खाली डोकावून पाहतो तर काय प्रतिबिंब गायब... मग काय उचलली शेपूट आणि लागला हलवायला... पाणी काय ह्याचा बा देणार आणून...

मी हजार चिंतांनी हे डोकं खाजवतो... तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो.... करण जोहरची पोरं माफ करा... कन्येची पोरं तशी लई खट्ट्याळ बघा... पाणी राहिला बाजूला आत मासे आहेत की बेडूक? ते पाणी पितात की नाही पित.... विहिरीचा कठडा पक्का आहे की कच्चा... विहिरीच्या कठड्याच बांधकाम चिमाजी अप्पांनी केलं की माधवरावांनी... वाकून बघितलं तर आपण पडू की बुडू.... जल्ला नको नको त्या चिंता....

मध्यंतरा नंतर हायकोर्टातला एक व्हाईट कॉलर नी काळा कोट विहिरीवर आला... बिसलरीच पाणी शुद्ध की विहिरीच? अ‍ॅक्वागार्डच्या फिल्टर मधे कचरा अडकू शकतो तर मग विहिरीच्या झर्‍यातील पाणी कसे काय शुद्ध असू शकते याची तुलना करीत बसला... मागून एक विंचू आला तसा त्याने लगेच पळ काढला...

नांगी नाचवत आलेल्या विंचवाची गत 'बोलल्या शिवाय रहावेन, आणि टोचल्या शिवाय करमेना' अशी झाली... पाण्या पर्यंत पोहचायची काही भिड नाही... तरी आव मात्र इंग्लिश खाडी पोहून आल्याचा... उचलली नांगी बांधली कमरेला... मनातल्या मनात म्हणतो कसा... नांगी पेक्षा पुंगी बरी... अडला हरी विंचवाचे पाय धरी...

टापांनी धुळीचे लोट उडवित एक घोडा धापा टाकत विहिरी जवळ आला... विहीर पाहून आनंदलेला घोडा पाणी नाही हे बघताच दोन पाय वर करून निषेध नोंदवू लागला... ना घाट का ना शतरंज का... अश्या काहीश्या द्विधा मनःस्थीतीत तो चौखूर उधळू लागला... ते पाहून झाडावरील चिमण्या घाबरून उडू लागल्या...

चिडिया उडती है गगन मै... मगर रहेती है कहा?.... सोप्पय विरार में... आपलं ते विहीर में.... काय कल्ला... नाही ना... एक ना धड भाराभर कोड... जल्ला मला कोड्यात टाकून ही मगर मिठी नदीत निघून गेली...

कुंभ घेऊन एक विद्वान पाणी भरण्यासाठी विहिरीवर आला... पाणी म्हणजे जिवन... जिवन म्हणजे पाणी... जिवन वर डॉक्टरेट करता करता रिकामा कुंभ तिथेच पेंगुळला... विहिरीतल्या माश्याने मग शेपटीने पाणी उडवून त्याला जागं केलं तेव्हा घरी निघून गेला....

पण विहिरीतील माश्याला काही केल्या विहिरीत करमेना... विहिरीच्या बाहेर पडण्यासाठी तो देवाची प्रार्थना करू लागला... आता तरी देवा मला पावशील का? ब्रेड ज्याला म्हणतात ते देशील का? शेवटी देवाने त्याच्यावर कृपादृष्टी दाखवून त्याला रमेश देवच्या फिश टँक मधे जागा दिली...

विषय: 
प्रकार: 

पहिले बारा राशिचे बारा प्रतिसाद आले क्रमाक्रमाने धन्यवाद लोक्स >>>>मग राशिचक्रकार करा सुरवात ह्या बारांच्या राशी कोणत्या ते सांगायला Wink Proud

पण विहिरीतील माश्याला काही केल्या विहिरीत करमेना... विहिरीच्या बाहेर पडण्यासाठी तो देवाची प्रार्थना करू लागला... आता तरी देवा मला पावशील का? ब्रेड ज्याला म्हणतात ते देशील का? शेवटी देवाने त्याच्यावर कृपादृष्टी दाखवून त्याला रमेश देवच्या फिश टँक मधे जागा दिली...

>> Rofl इंड्रा !!

व्हॉट्स योर राशी, हा प्रियांका आणि हरमन चा बकवास सिनेमा होता. त्यात तिने बारा रोल्स केलेत. आशुतोष गोवारीकरचा होता.

आशुतोष गोवारीकरचा होता. >>> आ. गो. पण :p

निंबुडा.. केवळ नाम साधर्म्य आहे... बाकी काहीच संबंध नाही...

Pages