१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
अम्मू, बटाटेवडे कर लवकर.. ऊन
अम्मू, बटाटेवडे कर लवकर.. ऊन असेल, तर कीस कर आणि संपव चटचट
असो. इडल्या बर्याच उरल्या, (तयार, पीठ नव्हे), तर दहीवड्याला करतो तसे दही तयार करा (तिखट, आलं, मिरची, कोथिंबीर वगैरे घालून), कढईत जिरं, कढीपत्ता घालून फोडणी करा, त्यात एका इडलीचे दोन भाग करून परता आणि ह्या दह्यात घाला. फ्रीजमध्ये तासभर ठेवून 'दही इडली' सर्व्ह करा. (मूळ कृतीत इडली तळायची आहे चक्क
मी मात्र शॅलॉ फ्रायच केली) मस्त मऊ इडलीत दही झक्क मुरतं. छान लागतं.
तसंच, इडली चाटही करू शकता. उकडलेला बटाटा, टमॅटो, कांदा, चिंचेची चटणी, तिखट, कोथिंबीर आणि फरसाण/ शेव यात इडलीचे छोटे तुकडे करून एकत्र करायचे. (मी उरलेल्या इडल्यांसाठी सांगतेय म्हणून, नाहीतर फक्त इडली चाट करण्यासाठी 'मिनी इडली स्टँड'ही मिळतात)
अजून एक म्हणजे तवा इडली. ह्यात तवा पुलावला करतो तसे आवडतात त्या सर्व भाज्या आणि मसाले तव्यावर तेलात परतत रहायचे. थोडे कच्चे असतानाच इडली तुकडे करून तव्यावर परतायची. हा प्रकार थोडा तिखट/ स्पायसी होतो.
सहसा, हकु, मुलांचे वाढसिवस इ. ला इडल्या बर्याच केल्या/ आणल्या जातात, त्या उरल्या की त्यांना खपवण्यासाठी हे पर्याय.
उरलेल्या पदार्थांचा वापर
उरलेल्या पदार्थांचा वापर करण्याच्या युक्त्या सुचवा.
भात उरला तर कांदा, बेसन घालून भजी.
उसळ उरली तर भाजणी घालून थालिपीठ.
काकड्या गाजर, इ. जास्त झाल्यास व कोशिंबीर खाऊन कंटाळा आल्यास थलिपीठ.
पूनू, काल पराठे खाउन संपवले
पूनू, काल पराठे खाउन संपवले ग... बटाटेवडे करायला हवे होते नै??
इडल्यांच्या आयडीया छानेत.
काही वेळा पदार्थ शिजवताना
काही वेळा पदार्थ शिजवताना त्यावर झाकण ठेवून त्यात पाणी घेतले जाते व त्याची वाफ पदार्थाला मिळते. भांड्यावर ठेवलेल्या झाकणातल्या पाण्याने पदार्थ कसा शिजतो याचे शास्त्रीय कारण कुणी सांगेल का?
झाकणातील पाण्याने, पदार्थाची
झाकणातील पाण्याने, पदार्थाची वाफ थंड होऊन परत पदार्थातच पडते, त्यामुळे पदार्थ कोरडा पडत नाही. तसेच थोडाफार वाफेचा दाब निर्माण झाल्याने पदार्थ शिजतो. झाकणातले पाणी गरम होत जाते आणि थोड्या वेळाते, बहुतेक वेळा ते पाणि पदार्थातच टाकले जाते. हे पाणि गरमच असल्याने पदार्थाचे तपमान कमी होत नाही (जे थंड पाणी घातल्याने होते ) व पदार्थ लवकर शिजतो.
कोणत्या कंपनीचा सांबार मसाला
कोणत्या कंपनीचा सांबार मसाला चांगला आहे ?
कोणत्या कंपनीचा सांबार मसाला
कोणत्या कंपनीचा सांबार मसाला चांगला आहे ?
मला तरी मजिठिया चे सर्वच मसाले चांगले वाटतात. चांगली चव येते.
MTR चा सांबार मसाला मस्त आहे.
MTR चा सांबार मसाला मस्त आहे.
निंबुडा वाण्याकडे मिळेल ना ?
निंबुडा वाण्याकडे मिळेल ना ? मि पहिल्यादां नाव ऐकतेय मला फक्त एवरेस्ट्,बादशहा माहित आहे
MTR, Everest हे एक्दम ओरिजिनल
MTR, Everest हे एक्दम ओरिजिनल आहेत.
निंबुडा वाण्याकडे मिळेल ना ?
निंबुडा वाण्याकडे मिळेल ना ?
नक्की मिळेल....... विचारून तर बघ......
हे बघः http://www.majithiamasala.co.in/
निंबुडा वाण्याकडे
निंबुडा वाण्याकडे (???????)
मी वाणी कधी पासून झाल्ये?
धन्यवाद तुमच्याकडुन घ्यायला
धन्यवाद
तुमच्याकडुन घ्यायला आवडेल
एमटीआरचा सांबार मसाला बेस्ट
एमटीआरचा सांबार मसाला बेस्ट आहे.
एमटीआर ऑल टाईम फेव्हरिट आणि
एमटीआर ऑल टाईम फेव्हरिट आणि ब्येष्ट! सांबार ओरपून प्यावे ते एमटीआर मसाला घालून केलेले
उरलेल्या सांबाराला खिचडीत
उरलेल्या सांबाराला खिचडीत (मुगाच्या डाळीऐवजी) वापरता येते....खमंग खिचडी!
Eastern म्हणुन एक केरळी
Eastern म्हणुन एक केरळी ब्रांड येतो त्यांचा सांबार मसाला मस्तच असतो.
लोणच्याचा खार टाकुन कणिक
लोणच्याचा खार टाकुन कणिक मळुन त्याच्या पोळ्या करायच्या. खुप छान लागतात.
घरि मोड आलेली मटकि आणि हिरवे
घरि मोड आलेली मटकि आणि हिरवे मुग पडले आहेत. उसळ खावुन कंटाळले आहे. अजुन दुसरे काय करता येइल?
जादू, - भेळ कर = कांदा,
जादू,
- भेळ कर = कांदा, टॉमअॅटो, कोथिंबीर, हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि मस्त तिखट शेव.\\
- कटलेट्स = कडधान्य मिक्सर मधे भरड वाटुन घे. कमीत कमी पाणी घाल. त्यात आवडीप्रमाने सिरवे तिखट, आलं लसुण पेस्ट आणि बाईंडिंग साठी ब्रेड किंवा उकडलेला बटाटा. शॅलो फ्राय करुन सॉस, चिंचेची चटणी बरोअबर खा.
- किशिंबीर = कडधान्य एकत्र करुन वरतुन चाट मसाला, कांदा, टॉमेटो, लाल तिखट आणि हव असेल तर थोड लिंबु पिळ किंवा दही घाल.
- कडधान्य उकडुन मॅश करुन कणिक/बेसन्/तांदुळ पीठ्/बाजरी पीठ्/ज्वारी पीठ, हिरवे तिखट, आल लसुण पेस्त कांदा वगैरे घालुन धपाटे/पराठे/धिरडी.
तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो ,
तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो , लिंबु पिळुन खाणे किंवा मिक्सरमधुन काढुन धिरडी.
पराठे खूप छान लागतात मोड
पराठे खूप छान लागतात मोड आलेल्या मुगाचे. उकडून मॅश केल्याने जास्त मूग खपतात पराठ्यात. इथे नव्या मायबोलीतच मटकी पुलावची कृती दिली होती कुणीतरी. झटपट आणि मस्त होतो पुलाव.
तेलावर कांदा, आले-लसूण
तेलावर कांदा, आले-लसूण पेस्ट,धणे जिरे पूड, हळद, तिखट, पावभाजी/गरम मसाला इ. घालून, टोमॅटो घालून मोड आलेल्या मूग, मटकीला चांगले परतणे , त्यात उकडलेला बटाटा कुस्करून, मीठ घालून थोडे अजून परतणे व गार करणे. ब्रेड स्लाईसना लोणी लावून त्यावर हे मिश्रण घालणे व टोस्ट/ ग्रिल करणे. हवे असल्यास वरून चीझ
सिंडरेला, मुगाच्या पराठ्यांची
सिंडरेला, मुगाच्या पराठ्यांची रेसिपी लिहि नं. छान वाटतायेत.
मोड आलेले मूग घालून खिचडीपण
मोड आलेले मूग घालून खिचडीपण छान होते.
मोड आलेल्या मुगाचे आणि मतकीचे
मोड आलेल्या मुगाचे आणि मतकीचे वडे मस्त होतात. एकदम कुरकुरीत आणि खमंग. (बरीक कांदा, आलं, कोथिंबीर, आणि मिरची वाटून, बायडिंगसाठी बेसन.)
लाजोने दिलीये तिच: कडधान्य
लाजोने दिलीये तिच: कडधान्य उकडुन मॅश करुन कणिक, तिखट, आल लसुण पेस्ट वगैरे घालुन पराठे.
मी कोथिंबीर बारीक चिरुन, ओवा किंवा जिरं पण घालते. मुग उकडले की त्याच पाण्यात कणिक भिजवायची. आरती फार छान करते हे पराठे. तिला सांगते क्रमवार कृती लिहायला.
थँक्यु सिंडरेला. नक्कि करुन
थँक्यु सिंडरेला. नक्कि करुन बघेन.
मोड आलेल्या मुगाचा
मोड आलेल्या मुगाचा पुलाव.
http://maayboli.com/node/14892
मिसळ पण करता येईल दोन्हीची मिळून.
मोड आलेली कडधान्ये आलं, लसूण,
मोड आलेली कडधान्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर आणि पाणी घालून मिक्सर मधून काढायची आणि त्याची धिरडी घालयची. मस्त लागतात.
Pages