१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
गुलाबजाम, गोड लागायला हवे
गुलाबजाम, गोड लागायला हवे असतील तर तेवढा पाक लागतोच. मग ते पाकातुन निथळून काढून, फ्रीजमधे जरा सुकू द्यायचे. मग सुक्या खोबर्याच्या किसात किंवा ड्राय फ्रुट्स च्या चुर्यात घोळवायचे.
उरलेला पाक इतर पदार्थात वापरायचा.
पाक न करता, गुलाबजाम मिक्स चे (जरा छोटे ) गोळे करुन, तळून ते पुलाव मधे, भाजीत वगैरे घालता येतात.
खुप नाचणीचं पीठ (नाचणी सत्व
खुप नाचणीचं पीठ (नाचणी सत्व नाही) आणल्या गेलं ..काय करु?
डोसे करुन पाहीले आलं लसुण मिरची घालुन छान होतात पण अजुन काही करता येईल का?
'खूप रताळी आणि sweet potatoes
'खूप रताळी आणि sweet potatoes आहेत. त्याचं काय काय करता येईल?
किस (खिस) एक ऑपशन आहे. अजुन काय करता येईल?'
१) chowder with sweet potato : एक क्रीमी सूप . यात कांदा, गाजर, स्वीटकॉर्न, रेड पेपरही , व्हेज स्टॉक लागेल.
२) स्वीट पोटॅटो स्ट्यू यात कांदा, सेलरी, रेड पेपर, बेबिकॉर्न, टोमॅटो प्युरी लागेल.
३) कबाब : काजू व पनीर लागेल.
४) पारीमधे रताळे व थोडा बटाटा वापरून कचोरी, उपासाची कचोरी
५) गुलाबजाम पारीत रताळे वापरून
६) रताळ्याच्या फेण्या : किसाचा गोळा थालिपीठाप्रमाणे तव्यावर थापून तुपावर मंद आचेवर भाजून वरून पिठीसाखर घालून.
नाचणीच्या पिठाच्या वड्या.
नाचणीच्या पिठाच्या वड्या.
'खू.....प बारीक रवा आहे घरात.
'खू.....प बारीक रवा आहे घरात.
व्हेजइटेबल रवा इडली. गोड किवा तिखट आप्पे, करंजी.
कश्या करतात नाचणीच्या
कश्या करतात नाचणीच्या पिठाच्या वड्या?
आहे का पाककृती माबो वर?
भरत, आप्पे पात्र असणं आवश्यक
भरत, आप्पे पात्र असणं आवश्यक आहे नं आप्पे करण्यासाठी? इकडे आप्पे दोन प्रकारे करतात आप्पे पात्र वापरुन किंवा डीप फ्राईड..
रवा डीप फ्राईड मध्ये असं तेल पितो नं की तसे आप्पे करणं म्हणजे हजार कॅलरीज ना आमंत्रण..
खुप नाचणीचं पीठ (नाचणी सत्व
खुप नाचणीचं पीठ (नाचणी सत्व नाही) आणल्या गेलं ..काय करु
१) सुरळीच्या वडीसारख्या नाचणीच्या पिठाच्या गुलाबी वड्या
२) भाकर्या
३) नाचणी+रवा+दही यांचे अप्पे.माझे डोसे फसले तेव्हा मी हेच केले.
उरलेला पाक कशाकरता वापरता
उरलेला पाक कशाकरता वापरता येईल
माझ्याकडे चूकून सोयाबीन आणले
माझ्याकडे चूकून सोयाबीन आणले गेले आहे. काय करता येईल त्याचे?
सोयाबीनची भाजी..पहा नवीन पाककृती
सुरळीच्या वडीसारख्या
सुरळीच्या वडीसारख्या नाचणीच्या पिठाच्या गुलाबी वड्या>> पाककॄती आहे का?
नाचणी पिठाचे साजुक तुपातले
नाचणी पिठाचे साजुक तुपातले लाडू झकास होतात. सेम बेसन लाडूची रेसिपी. फक्त चॉकलेटी दिसतात.
पास्त्याची लिंक मिळेल का?
नाचणीचा पास्ता करायचाय का
नाचणीचा पास्ता करायचाय का तुला अश्विनी?
नाचणीच्या पिठाच्या सुरळीच्या
नाचणीच्या पिठाच्या सुरळीच्या वड्या नवीन पाक़कृती पहा.
मुग्धा डीप फ्राईड अप्पे पहिल्यांदाच ऐकतोय.
मायक्रोमधे रवा इडली किंवा उपमा छान होतात.
रव्याचासाधा सोपा मराठमोळा सांजा (तिखट शिरा) - वर खोबरे आणि दही घालून अहाहा
नाचणीचा पास्ता???? बादवे,
नाचणीचा पास्ता????
बादवे, काय हरकत आहे? काळा पास्ता होईल. भाकरी थापून कातण्याने शंकरपाळीसारखी कापायची. हाकानाका.
दे ना बाई लिंक असेल तर. पुतण्याने डोकं खाल्लंय काल पास्त्यावरुन. मी ते मॅगी पास्ता आणुन केलंय फक्त. उगीच मागासलेलं वाटायला नको म्हणून टेचात इथून रेसिपी घेऊन करुन घालणार.
उरलेला पाक सुधारस, बासुंदी,
उरलेला पाक सुधारस, बासुंदी, श्रीखंड ते चहा कॉफी कश्यातही वापरता येतो.
नाचणी चे दोदोल, शेवया, खीर, लाडू (कृती आहेत इथे ) करता येईल.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
आता भारतात उन्हाळा असेल ना ?
आता भारतात उन्हाळा असेल ना ? नाचणीची आंबिल करता येईल. इथे कृति आणि चर्चाही आहे.
ह्या वरच्या काही पोस्ट्स
ह्या वरच्या काही पोस्ट्स 'पाककृती हवी आहे' मधे हव्या न??
अरे वा! बरेच प्रकार करता
अरे वा! बरेच प्रकार करता येतील की रताळ्याचे. धन्यवाद सगळ्यांना.
अश्विनी, माझी पास्त्याची
अश्विनी, माझी पास्त्याची रेसिपी:
कुठल्याही प्रकारचा पास्ता (spagetti, shell, penne, bowtie etc.) उकळत्या पाण्यात शिजवून घेणे. शिजला कि चाळणीत घालून गार पाणी घालणे.
एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल तापवणे. त्यात कांदा मस्त ब्राऊन होइपर्यंत परतणे. त्यात चिरलेले गाजर, सिमला मिरची, मशरूम घालून परतणे. वाफ आणणे. त्यात शिजलेला पास्ता घालणे. आता अल्फ्रेडो सॉस, मीठ, मीरपूड घालणे. नीट गरम होईपर्यंत गॅस वर ठेवणे (भांड्याला खाली न लागता).
धन्स गं रजनीगंधा अमृता कान
धन्स गं रजनीगंधा
अमृता
कान पकडले हं (स्वतःचेच).
केक करता जर self rising flour
केक करता जर self rising flour वापरले तर बेकिंग पावडर घालायची गरज नाही ना? आणि असे whole wheat self rising flour मिळते का? मी बे एरियात आहे, कुठे मिळेल?
अलिकडे बाजारात, (साऊथ अफ्रिकन
अलिकडे बाजारात, (साऊथ अफ्रिकन उत्पादन ) तयार सॉस मिक्स मिळू लागले आहेत. त्यात क्रीमी चीज, फोर चीज, क्लासिक व्हाईट, हनी मष्टर्ड असे छान फ्लेव्हर्स आहेत. नुसते गरम पाणी टाकले कि हा सॉस तयार होतो. चव पण मस्त आहे. पास्ता साठी छान आहे.
sub च्या salad मधे जसे
sub च्या salad मधे जसे कुरकुरीत टॉमेटो, कांदे असतात, तसे करण्यासाठी काय करायचं?
गार करुन कापायचे की कापुन गार करायचे ?
गार करुन कापायचे
गार करुन कापायचे
दहा दिवसांपूर्वी फ्रिज मध्ये
दहा दिवसांपूर्वी फ्रिज मध्ये एक बास माश्याचा तुकडा अर्धा दिवस राहिला होता( फ्राय केलेला) अजून वास गेलेला नाही. फ्रिज अर्धा तास उघडा ठेवून मग साफ करून पाहिले. व्हॅनिला इसेन्स ची बाट्ली उघडी ठेऊन पाहिले. काय करावे तो वास घालवायला?
बेकिंग सोडा एका वाटीत घालून
बेकिंग सोडा एका वाटीत घालून ठेवा नेहमी फ्रिजमधे. महिन्या पंधरा दिवसांनी जुना टाकून नवा ठेवावा.
अक्वेरियम च्या फिल्टर करता अॅक्टिव्हेटेड चारकोल म्हणून कोळशाचा चुरा मिळतो. तो सुद्धा एका वाटित घालून ठेवावा फ्रीजमधे. वास शोषून घेतो म्हणतात.
व्हिनेगर अन पाणी मिसळून त्यात एक फडका बुडवून पिळून काढून त्याने फ्रीज आतून पुसावा.
मामी एक कांदा ठेवा कापुन...
मामी एक कांदा ठेवा कापुन... माश्याचा वास जाइल पण कांद्याचा येइल... तो घालवायल डेटॉल ने पुसुन घ्या फ्रिज.... आणि मग व्हॅनिल स्प्रे मारा.... वासाने वास काढणे (काट्याने काटा काढणे)
प्रयोग सफल झाला तर नक्कि सांगा...
धन्यवाद. खरेच वासाने डोके
धन्यवाद. खरेच वासाने डोके उठ्ले. आम्ही मोगरा गुलाब चंपक जूही वाले ना : )
Pages