Submitted by हर्ट on 16 May, 2010 - 05:38
प्रत्येकालाच मिळालेली वाईट वागणूक सहन होते असे नाही? वाईटांना धडे शिकवणे, त्यांना उलटून बोलणे, त्यांची तक्रार करणे, शाब्दीक मार देणे -- यापैकी कुठलीच वागणूक देणे प्रत्येकालाच जमते असे नाही. उदा - मला वाईटाशी कसे वागावे बोलावे हे कळत नाही. परिणाम मला त्याचा आणखीनच जास्त त्रास होतो. टाळता येत तेवढे मी त्या व्यक्तीला टाळतो पण रोजचं ज्या व्यक्तीशी संबंध येतो अशा व्यंक्तींशी कसे वागावे कळत नाही. तुमचे विचार तुमचे उपाय कदाचित मला उपयोगी पडतील आणि माझ्यासारख्या अनेकांना!!!!!!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नानबा अगदी खरंय....... अशा
नानबा
अगदी खरंय....... अशा आवाजात देवाला पुकारल्यावर देवदेखील कानात कापसाचे बोळे घालून, त्रस्त चेहर्याने, कपाळाला बाम लावून डोके बडवत नाही बसला तरच नवल!
आणि नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती, कोणतेही सण-उत्सव आणि लग्ने हा काळ तर लाऊडस्पीकर्स बडव-बडव बडवायचा काळ! भले मग कोणाला काही का त्रास होईना..... मी स्वतः अनेकदा पोलिस कंट्रोल रूमला फोन करून रात्री १२:३०, १:३० वाजता गस्तीची गाडी बोलावली आहे.... पण उपयोग शून्य गं! फक्त एकदा.... आणि एकदाच जवळच्या देवळात रात्रभर लाऊडस्पीकर वरून देवीचा गोंधळ आणि जागरण चालू होते तेव्हा पोलिसांनी येऊन माईक्स बंद करायला लावलेत. नाहीतर स्थानिक राजकीय पुढार्यांचीच प्रजावळ असते अशा कार्यक्रमांना बिनदिक्कत रात्री बेरात्री माईक्स चालू ठेवणारी.... पोलिस त्यांचे काय वाकडे करणार??!!! शिवाय ''आम्हाला कोणी बोलायचं न्हाय, हा आमच्या मराठी अस्मितेचा प्रश्न हाय'' असला पवित्रा! आता कायद्याचं उल्लंघन करून रात्रीबेरात्री लोकांना त्रास देण्यात कस्ला आलाय डोंबलाचा मराठी बाणा व संस्कृतीचा पुळका!!!!! आणि वर्षातले कमीतकमी ५० ते ६० दिवस कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ही मुजोरगिरी चालू असते!
""""""माझ्या धार्मिक भावना
""""""माझ्या धार्मिक भावना दुखावल्या. तुम्ही हे फक्त आमच्याच धर्माच्या बाबतीत का बोलता? """""""
आजूबाजूला आमच्याच धर्मीयांची
आमच्या इथे ३ वर्षांपुर्विचि
आमच्या इथे ३ वर्षांपुर्विचि घटना, बाजुला रहाणार्या एक काकु कॅन्सर् ने आजारि होत्या. शेवटचे काहि दिवस राहिले होते. त्यांच्या शेवटच्या दिवशि, त्यांच्या मागे रहाणार्या माणसाच्या (युपिचा आहे) मुलाचा पहिला वाढ्दीवस होता म्हणुन त्याने जोरात अगदि दिवसभर लाऊडस्पीकर वर गाणि लावलि होति. शेवटचि घटका भरलि तेंव्हा त्या काकू काहितरि सांगायचा प्रयत्न करु लागल्या. पण त्या काय बोलत आहेत हे कळतच नव्हते कारण या माणसाचा लाऊडस्पीकर जोरात चालु होता.कोणितरि त्याच्या घरि जावुन त्याला सांगितले कि बाजुला आजरि बाई आहेत जरा गाणे बंद करा नाहितर आवाज तरि कमि करा, तर हा माणुस वाद घालु लागला कि वर्षातुन एक दिवसच तर लावलि आहेत वगेरे सुरु केले म्हणुन एका काकांनि स्वतः जावुन त्याच्या लाऊडस्पीकरचा आवाज कमि केला आणि नंतर जसे ते त्याच्या घरुन बाहेर पडले ह्याने पुन्हा लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केला. त्या काकु गेल्या त्यादिवशि. बिचार्या शेवटच्या क्षणी त्यांच्या लहान मुलांना काय सांगत होत्या हे सुद्धा त्यांच्या मुलांना कळु शकले नाहि. या लाऊडस्पीकर लावणार्यांचा भयंकर राग येतो.
Insesntive पणाचा कहर असतात
Insesntive पणाचा कहर असतात लोकं..
सेलफोन जॅम करता येतात, तसे
सेलफोन जॅम करता येतात, तसे स्पिकर जॅम करण्याचे तंत्र हवे असे वाटायला लागले आहे.
आमच्या वरच्या लोकांकडे(३रा
आमच्या वरच्या लोकांकडे(३रा मजला) लग्न होते ८-१० दिवसांनी तर त्यांनी बिल्डिंगभर माळा लावल्या दिव्यांच्या. हे कधी माझी आई गेली त्याच्या दुसर्या दिवशी. लोक आमच्याकडे भेटायला येत होते आणि बिल्डिंगला बाहेरून रोषणाई. निदान आमच्या गॅलरीच्या(१ला मजला) बाहेर तरी सोडायच्या नाहीत ना माळा. पण तेवढी अक्कलच नाही. सांगावं लागलं जाऊन बाबांना तेव्हा अगदी नाईलाज असल्यासारख्या माळा थोड्या वर सरकवल्या दुसर्या मजल्यापर्यंत.
नी
नी![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एकदा रात्री आम्ही सगळे (आणि
एकदा रात्री आम्ही सगळे (आणि परिसरातील बहुतेक लोक) गाढ झोपेत असताना रात्री बारा वाजता अचानक प्रचंड दचकून जागे झालो. आमच्या समोरच्या सोसायटीतल्या एका घरातून जोरजोरात झांजा आणि ढोल वाजवल्याचा आवाज ऐकू आला. बघतो तर 'गोंधळ' होता. गावाकडे ठीके असले प्रकार, पण इथे शहरात भर वस्तीत रात्री बारा वाजता एवढा आवाज?
एक सूचना: सहकारी गृहनिर्माण प्रकल्पातील (हाऊसिंग सोसायट्यांतील) समस्या असा धागा आहे का? नसल्यास कुणी सुरू करील का?
मंदार, सहकारी गृहसंस्थांमधील
मंदार, सहकारी गृहसंस्थांमधील समस्या यावर लोकसत्ताच्या शनिवारच्या वास्तुरंग पुरवणीमधे लेख येतात. तिथे आदर्श उपनियमांचा(model byelaws) चाही उहापोह होतो.
हो भरत वाचतो मी ते, पण
हो भरत वाचतो मी ते, पण मायबोलीवर ती चर्चा सुरु झाल्यास विचारांचे आदानप्रदान होणे सोपे जाईल.
नीधप मला हे वाचून वाईट वाटले
नीधप मला हे वाचून वाईट वाटले आणि रागही आला. जे काम तुमच्या वडिलांना करायला लागलं ते खरं तर तुमच्या अन्य शेजार्यांना करता आले असते.
नीधप, कुणी गेलं इमारतीत तर
नीधप, कुणी गेलं इमारतीत तर आपल्याला घरी बंद दाराआड सुद्धा काही गोडधोड करावंसं वाटत नाही. आणि ह्या XXXX लोकांनी दिव्यांच्या माळा सोडल्या? संताप संताप झाला वाचून.
होहो. कान जॅम करायला काही
होहो. कान जॅम करायला काही असेल तर तेही.
भयानक असते हे ध्वनीप्रदुषण. आणि ते बंद करायला जितकं भांडायला लागतं त्याने आपलं बीपी वाढतं फुकट. आणि हे भांडायला कोणी जायचं यावरून घरी भांडणं होतात ती वेगळीच.
रैना
रैना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गेल्या साताठ महिन्यांपूर्वीच
गेल्या साताठ महिन्यांपूर्वीच हा अनुभव घेतला... नवरा सिंगापूरला गेल्याने मी माझ्या आधीच्या (रूमीज) मैत्रीणींबरोबर राहत होते. तो परत आल्यानंतर "नवीन घर शोधेपर्यंत आपण माझ्या मावशीकडे राहूया" हा त्याचा सल्ला मी मनाविरूद्ध मानला. (थोडासा स्वार्थी विचार करून की बाहेरच्या पेक्षा कमी पैशात राहता येईल तोपर्यंत स्वतःचा फ्लॅट घेता आला तर छानच! तोपर्यंत अॅडजस्ट करूया म्हणून :)) चार दिवस गेल्यानंतर त्यांच्या कुरबुरी चालू झाल्या. मी सकाळी रोज दोन्ही टॉयलेटस, बाथरूम्स, बेसिन्स धुवून पाणी भरून, कपडे भिजवून मिरारोड ते दादर जॉबला जायचे. घरी आल्यावर पूर्ण स्वयंपाकाचा ताबा माझ्याकडेच घ्यायचे. सकाळचा माझा डबा त्या द्यायच्या (त्यांच्या मुलाला द्यावा लागायचा म्हणून. माझा नवरा ऑफीस कँटीनमध्येच जेवायचा सकाळी.) कपडे, भांडी, केर-लादी ला बाई होती. संध्याकाळी नवर्याने घरात पाय टाकताच (अक्षरशः बूट उतरवेपर्यंत) माझ्या दिवसभराच्या चूका सांगायच्या. मला देवपूजा करायची असते तर हीच कशी आधी अंघोळीला घुसते, थोडा वेळ असेल तर माझ्याशी न बोलता पुस्तकच कसं वाचत बसते, आज भाजीत तेल कित्ती जास्त टाकलेलं... मी आल्यावर चपला काढेपर्यंत हा पाढा माझ्यासमोर रिपीट!
उपास सोडतानाचे रात्रीचे जेवण करताना माझ्या माहेरी कांदालसूण वापरत असत. इथे मी माझा एकटीचा उपास असल्याने टाकायचे. तर असा उपास करायचा असेल तर माझ्या घरात करायचा नाही, नाहीतर बिनाकांद्याच्या भाज्या कर अशी तंबी मिळालेली! मी निमूटपणे बिना कांद्याची दूसरी भाजी करायला सुरूवात केली. आठवड्यातील दोन दिवस उपवास असल्याने भेंडी, बटाटा आणि कोबी या कांद्याशिवाय खाऊ शकेन अशा भाज्या करायचे. "येऊन जाऊन भेंडी आणि बटाटा. बाकी काही येतच नाही" हे होतंच!
माझ्या पद्धतीने मासे, चिकन, उसळी करू म्हटलं तर ते दादा(त्यांचा धाकटा मुलगा) खाणार नाही. आणि सतत नावं ठेवण्यामुळे घाबरून मीठ, तिखट, हळदीचा अंदाज चुकायचा.
त्यांना दोन सुना. एक सून बोलत नाही आणि दुसरी बोलते पण ती काहीच करत नाही. म्हणजे नोकरी नाही, नवर्याला डबा नाही, मुलांची तयारी नाही त्यामुळे नवरा, नातवंडं आईकडेच असतात जेवायला वगैरे. मी त्यांच्या नातवांना भरवण्यापासून, त्यांना बाहेर, दवाखान्यात, त्यांच्या नातेवाईकांकडे, गावी नेण्यापासून सगळं केलं. पण सतत माझ्या चूका शोधत राहायच्या. तुझं जेवण बरोबर नसतं माझ्या दोन्ही सूना चांगल्या करतात (तरी मुलगा तुमच्याकडेच जेवायला असतो हे वाक्य महत्प्रयासाने आवरलं मी. आणि तसंपण तिची धाकटी सून जवळपास माझ्या आईच्या वयाची आहे, या वयातपण जेवण येत नसेल तर काय फायदा!)
"माहेरी जायचं तर आधी सांगता येत नाही का? आणि नवर्याला टाकून कसली माहेरी जातेस? हेच शिकवलं का आईने...?" हे ऐकल्यावर मात्र पारा चढला. मी पहील्यांदा उलट उत्तरं दिली की "माझ्या सासू सासर्यांना आणि नवर्याला विचारूनच चाललेय आणि आईने चांगलंच शिकवलंय म्हणून आजपर्यंत गप्प बसले." तर नंतर नवर्याला सांगत होत्या कमावते म्हणून अशी फडाफडा बोलते, नोकरी सोडायला लाव नाहीतर डोक्यावर मिर्या वाटेल. नवर्याने तेव्हा मात्र बाजू घेतली!!! (नशीब माझं!!!)
एक दिवस नवरा आणि मी डिस्कस करत होतो की गुजरातला त्याला नोकरीची चांगली संधी आहे. मी म्हणाले मला नाहीये. तोपर्यंत "असंच सडं राहणार आहात काय, मुलं नकोत...?? नोकरी करणार तर त्यांना कोण सांभाळणार??" वै. ("तुमची सून नोकरी न करूनही नवरा, मुलं तुम्हाला सांभाळायला लावतीय..." मनातलं दुसरं वाक्य...!)
"तुमच्या सोबतच लग्न झालेल्या शेजारच्या जोडप्याला मुलगा झाला" हे वाक्य त्या मुलाचे पेढे देताना, बारश्याच्या वेळी वगैरे असे जवळपास तीनवेळा ऐकवून झालेले. मी हसून टाळलं.
त्यांची सून (जी घरी असते काही करत नाही), रिसॉर्टला चार दिवस राहून आली त्या रात्री दमलेली(:अओ:) म्हणून मी ऑफीसातून आल्यावर मला तिला फोन करून तिच्यासाठी पण कूकर लावायचा का ते विचारायला सांगितलेलं (पण मी रागाने की सांगेल तीच फोन करून गरज असेल तर ! आणि नंतर खरोखरच विसरले म्हणून नाही लावला) तर नंतर खेकसल्या.
अती झाल्यावर न राहून नवर्याला बडबडले तू राहा इथे नी कर गुलामी, मला नाही जमणार! मी मैत्रीणीच्या रूमवर जाते घर भाड्याने मिळेपर्यंत... तर ते ऐकून पुन्हा बडबडल्या की काय भांडणं झाल्यावर अशीच माहेरी नी मैत्रीणीकडे पळणार काय नवर्याला टाकून?? आणि नवर्याशी यावरून मी भांडून अबोला धरला की मुद्दाम त्याची जास्त काळजी घ्यायच्या माझी चिडचिड होण्यासाठी. मग एक दिवस अशाच चुकांचा पाढा वाचत असताना मी मोठ्ठं भांडण करून सासू सासरे (तोपर्यंत त्यांनी जुळवून घ्यायला सांगितलं होतं मला), नवरा, त्या सगळ्यांना ऐकवून नवर्याला म्हटलं दोन आठवड्यात घर मिळालं पाहीजे काहीही कर!
हे सर्व रामायण १ महिन्याच्या आतच घडलेलं... अजूनही अधूनमधून चालू असतं कुठे गेलेलीस? मला का नाही सांगितलं सुटी टाकली ते? काय काम करायला अमूक अमूक ठिकाणी गेलेली??? आता मीही जाणं कमी केलेंय आणि नवर्यालाही तंबी दिलेय, जायचं नाहीस, गेलास तर आपल्या संसारात ढवळाढवळ होणार नाही ते बघ. पूर्णपणे तोडता येणार नाही असं ऐकवून नवरा जातो अधून मधून पण कमी केलेय सध्या! अशाही व्यक्ती असतात ज्यांना नवराबायकोच्या संसारात नाक खुपसायला आवडते आणी माझ्या आणि माझ्या नवर्यासारखे मुखदुर्बल (आणि मूर्ख) त्यांना खरमरीत सुनावून उडवून लावू शकत नाहीत.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ड्रीमगर्ल तुमचं स्वतःच घर
ड्रीमगर्ल तुमचं स्वतःच घर लवकरात लवकर व्हावं या शुभेच्छा.
एखाद्या गोष्टीची किंमत पैशातच का मोजता येते, कधी कधी भावनिक, मानसिक किंमतही मोजावी लागते.
ड्रीमगर्ल, 'मुंबईसारख्या'
ड्रीमगर्ल,
'मुंबईसारख्या' ठिकाणी तुमचे स्वतःचे घर आहे व तुम्ही तुमच्या पद्धतीने चालवता आहात. तुमच्या खाण्यापिण्याच्या एक विशिष्ट सवयी ठरल्या आहेत. व अश्या वेळी 'बराच काळ' तुमच्या नात्यातले जोडपे( एक नाही तर दोन व्यक्ती) तुमच्या कडे रहायला आले तर तुम्ही काय केले असते?
तेव्हा तुम्ही फक्त 'एक' मिनीटे त्या जागी स्वतःला ठेवून पहा.
१) तुमचा पेशन्स राहिला असता का? चला एक वेळ मान्य करुया कि तुम्ही टोमणे वगैरे नसते मारले पण घराचा खर्च कमी करायचा होता तर हि किंमत ( जे काय वरती तुम्ही लिहिलत ना की तुम्हाला किती कामं करावी लागायची, त्या मावशीने केलेला तुमचा मानसिक छळ ढवळाढवळ सहन केली वगैरे वगैरे) द्यायला लागणारच ना? हिसाब बरोबर ना...
जाता जाता एक कुतुहल की तुम्ही दोघेही पैसे कमवत असताना, दुसर्यांकडे रहायचा निर्णय घेतलात मग थोडे फार सोसले तर काय बिघडले? हे तर होणारच.
काहि का असूदे तुम्हाला त्यांनी मदत केली आपल्या पद्धतीने. शेवटी तिथे रहायचा निर्णय हि तुमचा स्वतःचाच होता, त्यांनी जबरदस्ती नाहि ना केली? धन्यवाद म्हणावे व निघावे तिथून योग्य वेळी.
पण तुम्ही 'त्याच जागी' असता तर दुसर्यांचे किती व कसे केले असते तो हि विचार करायचा ना इथे असे धाडधाड लिहण्याआधी.
आता तुमचे घर झाले ना कि मी पाठवते एका जोडप्याला रहायला.. चालेल ना तुम्हाला?..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला पण खर तर तसंच वाटलं ,
मला पण खर तर तसंच वाटलं , "चार दिवस गेल्यानंतर त्यांच्या कुरबुरी चालू झाल्या." >>> याचा सरळ अर्थ त्यांना तुमचे तिथे येऊन राहणे पसंत नाही असा नाही का वाटला? त्यापुढच्या वागण्याचेही तेच स्पष्टीकरण नाही का?
ध्वनी, पटलं काही प्रमाणात...
ध्वनी, पटलं काही प्रमाणात...
मान्य करते मी की मी स्वार्थीपणे हो म्हणाले... पण![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१. आमच्या घरातील बरेचसे निर्णय त्यांना सांगून-विचारून घेण्याचा परिपाठ खूप आधीपासून आहे, सासूबाईंच्या मोठ्या बहीण असल्याकारणाने! ज्याला मी अलिकडे प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही असा मोडता घातला, याचा राग असेल
२. मी तिथे राहत नव्हते, आमचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं तेव्हाही ही कामे (टॉयलेट्-बाथरूम धुणे आणि पाणी भरणे सोडून:)) म्हणजे त्यांच्या नातवंडांना भरवणे(कारण माझा त्यांच्यावर व त्यांचा माझ्यावर खरंच जीव आहे म्हणजे त्यांच्या नातवंडांवर!), मावशींना दवाखान्यात वा नातेवाईकांकडे घेऊन जाणे असे रविवारी भेटायला गेले की मी विनातक्रार (खरंच विनातक्रार !!!) करायचे. कारण मुंबईमध्ये आपलं म्हणावं असं जवळपास कोणी नव्हतं, सासू-सासरे आणि आईवडील गावी.. हक्काने काही सांगावं असं घर असावं म्हणून अशी (पुन्हा काहीप्रमाणात सापेक्ष किंबहूना स्वार्थी) मदत केली.
पण ती अंगाशी आली. असा स्वार्थी विचार करणे पण चूकीचेच! कोणी कितपत ढवळाढवळ करायची हे एकदा हक्काने जवळचं मानलं की तुम्ही ठरवू शकत नाही, मी परत चूक केलेली, त्यामुळे तक्रार करण्यात काहीच पॉईंट नाहीये.
३. कामे करण्याचा प्रश्न नव्हता ती मी आधीही करायचे! प्रश्न हा की त्यांनी त्यांच्या सुनांशी कंपेअर करायला नको होतं कारण सुनांनी ह्यांची कामे करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं(असं ह्यांनीच मला एकदा सांगितलं) म्हणून त्या मला सांगायच्या कामं करायला... मी करायचेही जमतील तशी! आणि आपण एखादे दिवस म्हणालो की जरा वेळ लागेल सध्या नाही जमत ऑफीसवर्क मुळे, तर लगेच माझ्या साबांकडे तक्रार करायच्या.
४. हाच प्रकार त्यांनी त्यांच्या वहीनीबरोबरही (नवर्याच्या मामी) केलेला. मामींनी आधी सांगितले होते, पण त्यांचा तो अनुभव म्हणून मी कशाला वाईटपणा घेऊ म्हणून मी दुर्लक्ष केलं होतं... असो ही अवांतर गोष्ट झाली, कदाचित त्यांचा तो स्वभावच होता!
५. मी चांगुलपणाने करायचा प्रयत्न करूनही त्यांनी कायम दुखावलं. त्यांच्या सूना काहीही न करता त्यांची बाजू घेऊन मला टोमणे मारत राहील्या त्याने जास्त वाईट वाटलं. मग वाटलं यांच्या सूनांसारखंच वागायला हवं होतं का? मानसिक त्रास कमी झाला असता... पण नंतर वाटलं आधी गप्प बसले तेच बरं झालं. आता निदान थोडेतरी संबंध चांगले आहेत. अगदीच तोडून टाकण्याने कोणालाच फायदा झाला नसता..
६. जाता जाता एक कुतुहल की तुम्ही दोघेही पैसे कमवत असताना, दुसर्यांकडे रहायचा निर्णय घेतलात मग थोडे फार सोसले तर काय बिघडले? हे तर होणारच.>> थोडेफार सोसण्याचा प्रॉब्लेम नव्हताच मुळी! कामे करणे वगैरे कोणीही स्त्री करेल, मीपण केलं, त्यात काही विशेष केलेलं नाही, ते करणं आवश्यकच होतं! पण कामे करूनही टोमणे कोण सहन करेल?? बरं यांची कामे करते तर त्या त्यांच्या सूनेचीही कामं करायला लावायच्या.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी दहावीपासून हॉस्टेलला राहते. मुंबईमधे आल्यापासून मैत्रीणींबरोबर अपार्टमेंट शेअर करायचे. छोट्यामोठ्या कुरबूरी व्हायच्या पण अॅडजस्ट करायचे. माझं सर्वांशी पटते, कारण मी खूप तोडून बोलू शकत नाही लगेच, एक्स्ट्रीम केसपर्यंत सहन करते. इथे ती संपली आणि तेही नवर्याला परोपरीने विनवून की घर बघ लवकर मला नाही सहन होत. त्याने का टाळलं त्याचं त्यालाच माहीत
७. पण तुम्ही 'त्याच जागी' असता तर दुसर्यांचे किती व कसे केले असते तो हि विचार करायचा ना इथे असे धाडधाड लिहण्याआधी.>> हे मात्र १०० % पटलं, मी आधीच जमणार नाही म्हणून सांगितलं असतं. किंवा जमलं असतं तरी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत केलं असतं नंतर मानसिक त्रास न देता किंवा शांतपणे का जमत नाहीये ते सांगून दिलगीरी व्यक्त केली असती.
शेवटी तिथे रहायचा निर्णय हि तुमचा स्वतःचाच होता, त्यांनी जबरदस्ती नाहि ना केली?>> माझ्या सासर्यांनी आणि आईने सांगितलं होतं की राहू नका शक्यतो. पण साबांनी, नवर्याने आणि मावशींनी स्वतः (!) जोर धरला की तिथे २ महीने राहणं कसं फायदेशीर आहे. तोपर्यंत दुसरं घर शोधा. मग मीही स्वार्थीपणा केला.. हे चुकलंच माझं!!! त्यांच्या मनाविरूद्ध राहायला गेलो नव्हतो. त्यांनी कदाचित विचार केला असेल की मदत होईल. ती तर मी करायचा प्रयत्नपण केला.. पण टोमणे प्रकरण झेपलं नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
८. पण तुम्ही 'त्याच जागी' असता तर दुसर्यांचे किती व कसे केले असते तो हि विचार करायचा ना इथे असे धाडधाड लिहण्याआधी. आता तुमचे घर झाले ना कि मी पाठवते एका जोडप्याला रहायला.. चालेल ना तुम्हाला? >> त्यांचे केले म्हणून किमान अपेक्षा ठेवली चांगलं वागण्याची! त्यांना आवडत नव्हतं जमत नव्हतं तर त्यांनी तसं सांगायला हवं होतं की जा बाबांनो, मला नाही जमत. त्या बोलू शकत नाही संकोचतात असं काही नाहीये. पण यावेळेस त्यांनी स्वतः जोर धरल्यामुळे त्यांना फसल्यासारखं झालं असेल.
माझ्याकडे कोणी राहायला आलं असतं तर जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस केलं असतं... जमेनासं झाल्यावर तसं व्यवस्थितपणे सांगितलं असतं पण टोमणे वगैरे नसते मारले. मी कोणालाही तोडून नाही बोलू शकत... आता प्रत्येकाचा स्वभाव असतो.. त्यांचा तो आहे. ठीक आहे.
मी तिथे जाणं कमी केलेंय कारण मग पुन्हा अतिपरिचयात अवज्ञा नको. पण संबंध पूर्णपणे नाही तोडून टाकलेत. शिफ्ट झाल्यानंतरही दोन तीनदा त्यांना अंधेरीला सोबत जाणे, एका लांबच्या नातेवाईकाकडे जाणे, दादरवरून भाजी आणून देणे अशी जमण्यासारखी कामे करतेच कारण तो माझा स्वभाव आहे!! (आता टोमणे मारणं हा त्यांचा स्वभाव आहे हे समजल्याने जास्त दिवस त्या मानसिक फ्रस्ट्रेशनची कटुता न दाखवता) कुठे गेलेली? कशाला गेलेली? माहेरी काय काम होतं अशा अजूनही येणार्या प्रश्नांना मात्र आता एंटरटेंट करत नाही. लांब राहून गोड राहावं हेच चांगलं!!! कदाचित स्वतःच्या सूना ऐकत नाहीत म्हणून माझ्यावर हक्क दाखवण्याचा तो प्रयत्न असावा.. मी समजून घ्यायला चुकले असेन. पण "अतिपरिचयात अवज्ञा" हे सर्वार्थाने पटलं त्यामुळे यापुढे कोणाला मदत हवी तर जमेल तशी करेन पण त्याच्याकडून मदतीची अपेक्षा नको!!
शेवटी काय तर हा सगळा त्रास मी तिथे राहील्यामुळे झाला... माझ्याही स्वभावाच्या चूका होत्याच ना की जर एखादी गोष्ट पटत नाही तर समजावून सांगायला हवं होतं की मला टोमणे मारलेले आवडत नाहीत वगैरे.. स्पष्ट बोलण्याने कदाचित ही तेढ तेवढ्यापूरती वाढली असती पण नंतर आपोआप कमी झाली असती! कारण यात नवरा, मी, मावशी सगळ्यांच्याच ५०-५०% चूका आहेत!
हे प्रामाणिकपणे कबूल करते. (आधीच करायला हव्या होत्या खरं तर!
परत त्रयस्थपणे वाचल्यावर समजलं पूर्णपणे एकांगी मत आणि तक्रारीचा सूर आहे म्हणून पुन्हा लेखनप्रपंच की माझ्याही निम्म्या चूका होत्याच! :))
तरीही मैत्रेयी, ध्वनी धन्स नाण्याची दुसरी बाजू दाखवण्यासाठी! स्पष्टपणे न बोलण्याचा अभाव, गैरसमज, मनातच धूसफूस करणे, सापेक्ष मदत! बस्स और कुछ नही था!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भरत धन्स. गरज आहे सदिच्छांची, प्रयत्न चालू आहेतच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मावशींनी स्वतः (!) जोर धरला
मावशींनी स्वतः (!) जोर धरला की तिथे २ महीने राहणं कसं फायदेशीर आहे >>> हं , असं असेल तर मात्र नंतरचे वागणे अतर्क्य आहे ! असो.
बी तू / तुम्ही हळवे आणि
बी
तू / तुम्ही हळवे आणि एकलकोंडे आहात का ?
सतत मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे हा एक चांगला उपाय असू शकतो.
बी तुम्हाला काय प्रॉब्लेम
बी
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही सांगितलेलंच नाही. कोण, काय, कसं वाईट वाटलं याची एक दोन उदाहरणं द्यावीत
जशास तसं म्हणायचंय का
जशास तसं म्हणायचंय का ?
प्रत्येकाने आपल्या स्वभावाच्या मर्यादेतच वागावं. आडातच नसेल तर पोह-यात नाही येणार. ओढूनताणून प्रयत्न केला तर .... होत.
ड्रीमगर्ल, अहो मावशींनी जोर
ड्रीमगर्ल, अहो मावशींनी जोर धरला म्हणून काय झाले? कुरुबुरी सुरु झाल्यात ह्याचा अंदाज आला की आपल्या मानात बाहेर पडायचे खूप कडू व घाण संबध होण्याआधी. एपत होती ना मग कशाला सहन करून इथे तक्रार?
आर या पार..
तेच तर चुकलं!! मी नवर्याशी
तेच तर चुकलं!! मी नवर्याशी यावरून रोज भांडायचे, जबरदस्तीने माझ्या मामांच्या सोसायटीमधील फ्लॅट्सपण दाखवायला नेलेले... त्या जागा खास नव्हत्या तरी राहायला तयार झालेले, पण त्याने नाही म्हटले
धमकी दिली घरी जाईन, किंवा मैत्रीणीकडे जाईन, घर बघ आधी मगच बोलाव तर... तेही नाही ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नंतर १-२ बघितले फ्लॅटस तर मावशींनी सांगितलं एकाला मी शब्द दिलाय त्यांच्याच घरात राहावं लागेल आता. नवरा १टाच बघून आलेला तो... मी माहेरी गेलेले २ दिवस शांततेत जावेत म्हणून! त्यांच्या शब्दाखातर आता २ BHK फ्लॅटमध्ये राहतोय...
मी परतल्यावर सांगितलं शब्दाचं काय एवढं नाही परवडणार सांगा. तर म्हणाल्या तुम्ही काल आलात इथे माझी इमेज काय होईल सोसायटीमध्ये? आता १ महीना काढा इथे नंतर जायचेय तिथे जा.. मग नंतर गावावरून सामान येईपर्यंत, अग्रीमेंट, रेजीस्ट्रेशन, पोलीस NOC होईपर्यंत दीड महीना गेला... मग नवरा म्हणाला आताच ४००० भरून रेजि., अॅग्रीमेंट केलेय तर ६ महीने तरी काढूयात! राहणारी माणसे २ जागा २ BHK ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आता कानाला खडा... नातेवाईकांकडे राहाणे नाही!!!
कशाला सहन करून इथे तक्रार?>> ध्वनी तक्रार नव्हती करायची खरं तर पण सूर तो लागला तेव्हाचं फ्रस्ट्रेशन आठवून.. अजून संबंध चांगले ठेऊन आहे मी... पण जाणं कमी केलंय... मग म्हणतात... तिला इगो आहे म्हणून रोज येत नाही भेटायला! दादर्-मिरारोड लाच जाते ना, बायका विरारवरून ये जा करतात हिलाच काय धाड भरली
स्वभावाला औषध नसतं हेच खरं!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ड्रीमगर्ल, अहो, गतमं न शौचमं.
ड्रीमगर्ल, अहो, गतमं न शौचमं. लोकं काय हजार बाजूनी(पण एकाच तोंडाने) बोलतील. एकावे व सोडावे. अहो हिच लोक जेव्हा त्यांची वेळ अशीच येते तेव्हा त्यांच्या मनासारखे करतात.
काय करा इथे मायबोलीवर रोज येत चला, तुमचे मन मजबूत करायला मायबोलीची मदत होइल. इतर चांगल्या बाबींबरोबर टोमणे मारणे, बोलायचे एक-करायचे एक वगैरे तुम्हीच शिकाल मस्तपैकी काहिंकडून. मग एकदा आत्मविश्वास आला की मावशीची खास भेट घ्या व हसून बोलून टाका, रोज रोज आले तर उगाच कशाला त्रास... असे रोज बोलवलत तर पुन्हा इथे रहायला येइन तुमच्या प्रेमाखातर.. मग चालेल ना... हसा दात दाखवून आणि जा पुढे.. हाय काय नाय काय..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एवढी मोठी जागा बरी ना, पकडापकडी खेळायला घरातच. नाहितर रागवला असाल तर लपाछपी खेळा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्तंय आयडीया!!! पण मी
(हे उशीरा आलेलं शहाणपण आहे...:) आता मी नवर्याला घेऊन जाणारेय मराठी पिक्चरला शहाणपण देगा देवा :फिदी:!!)
माबो वर रोज असतेच!! त्यामुळे माहीतीही मिळतेय भरपूर.. सारखं सारखं मावशींना विचारायला जायला नको. त्याच विचारतील बहुतेक १ दिवस, तुम्हाला हल्ली काही प्रॉब्लेम्स येत नाहीत?? मग मी त्यांना माबो जॉईन करायला सांगेन... कदाचित माबोकरांना बिघडवतील किंवा कदाचित स्वतः बिघडतील (म्हणजे टोमणे मारायचं सोडून देतील :D)
ड्रीमगर्ल, तुमच्या त्या
ड्रीमगर्ल, तुमच्या त्या मावशींसारख्या व्यक्ती भरपूर असतात, आणि तशी परिस्थितीही (एखाद्या कुटुंब कबिल्यात झाडाचे पान हलण्यासाठीसुद्धा कुणा एकाची परवानगी लागणे टाइप) अनेक ठिकाणी असते. तुमच्या गोतावळ्यात तुमच्याशिवाय आणखीन कुणालाच ते खटकत नाही का? बरेचदा इतर कुणी बोलत नाही, तर आपण बोलून वाईटपणा कसा घ्यायचा म्हणून बरेच जण गप्प बसतात. मी पण आमच्या गोतावळ्यातल्या अशा एका व्यक्तीच्या दादाधिकाराचा (सुदैवाने तिथे टोमणे नव्हते) अधिक्षेप करून भरपूर वाईटपणा पदरात घेतला. काही काळानंतर माझ्या पावलावर पाऊल टाकून आणखी एक जण निघालाय.(अशा लोकांचं परवलीचं वाक्य - हो पण आम्ही सांगतोय ते तुमच्या भल्यासाठीच ना?)
बघा कदाचित, पहिल्या क्रांतीकारक तुम्ही ठराल.
कदाचित तुमच्या सासरचे सगळे एकत्र कुटुंब पद्धतीत ( सगळ्यांचे निर्णय कुणी एकाने घ्यायचे बाकीच्यांनी माना डोलवायच्या ;वेगवेगळे रहात असले तरी) जगत असतील.
एक रूम मध्ये पीजी ठेवता आले
एक रूम मध्ये पीजी ठेवता आले तर मदत होईल ड्रीमगर्ल. मला असे काही त्रास झाले की मी काही दिवस फक्त माझे काम , माझे जीवन यावरच फोकस करते. तसे करून बघा. मावशींना दूर फोनवर ठेवा. तुम्ही व पती यांच्यातील संवाद व एकत्र राहणे, थोडा आराम आनंद असे झाले तर तुम्हाला भासणारा ताण कमी होईल.
एखाद्या वीकांताला फोन करत जावे फक्त. रोज का बरे भेटायला जायचे तुम्हा दोघांना तुमचे जीवन नाहीका.
लोकलने प्रवास करूनच तुम्ही थकत असाल मग घरची कामे वगिअरे असतातच की. पती बरोबरील जीवन व नाते तसेच तुमचे काम यावरच फोकस करा म्हणजे त्रास आपोआप जाईल. अगदी त्यांच्याकडे इमरजन्सीच आली तर मदतीला जावे. तीही त्यांच्या इमिजीएट फॅमिलीची जबाबदारी आहे.
तुमचे उमलते जीवन आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. उद्या एक छोटी ड्रीमगर्ल आली की मग तुम्हाला तुमच्याच फॅमिली वर लक्ष द्यायला हवे.
बेस्ट लक.
Pages