वाईटाशी वाईट!!!!

Submitted by हर्ट on 16 May, 2010 - 05:38

प्रत्येकालाच मिळालेली वाईट वागणूक सहन होते असे नाही? वाईटांना धडे शिकवणे, त्यांना उलटून बोलणे, त्यांची तक्रार करणे, शाब्दीक मार देणे -- यापैकी कुठलीच वागणूक देणे प्रत्येकालाच जमते असे नाही. उदा - मला वाईटाशी कसे वागावे बोलावे हे कळत नाही. परिणाम मला त्याचा आणखीनच जास्त त्रास होतो. टाळता येत तेवढे मी त्या व्यक्तीला टाळतो पण रोजचं ज्या व्यक्तीशी संबंध येतो अशा व्यंक्तींशी कसे वागावे कळत नाही. तुमचे विचार तुमचे उपाय कदाचित मला उपयोगी पडतील आणि माझ्यासारख्या अनेकांना!!!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, तुम्ही म्हणता ते अगदी खरंय पण इथे हे एकत्र कुटुंब नाहीय. पण मावशींनी साबांना लहानपणापासून स्वतःच्या मुलांसारखं सांभाळलेलं (दहा-अकरा वर्षांनी मोठ्या आहेत त्या...)त्यामुळे साबा त्यांच्या उपकाराखाली आहेत. तिने खूप कष्ट काढले आमच्यासाठी, तिला दुखवू शकत नाही इ. इ. मामा (साबांचे भाऊ) यांची केसपण सेम! मग मामींना याचा त्रास झाला. पण त्या पराकोटीच्या सहनशील. ब्र ही न काढता सहन करत गेल्या. बापरे! मग २ वर्षात लांब घर घेतलं. पण यांची आई (म्हणजे मामींची साबा) मामांकडे होती. मग आईला भेटायला यायच्या निमित्ताने येऊन मामींविरूद्ध कान भरणे, आईला कशी सांभाळत नाहीये ते सांगणे... तुझी धाकटी मुलगी कसे कपडे घालते कसं चालतं तुला मग मामा मामी व मुलींवर राग काढणार. मुली बोलल्या तर म्हणणार मी बहीणीला नाही दुखवू शकत!

अरे तुम्ही नका दुखवू पण त्या बाकीच्यांना दुखवतात ना... आणि तुमचं त्यांनी केलं तर तुम्ही त्यांचं करा, बाकीच्यांनी सगळ्यांनी का सहन करावं बरं केलं तरी या यांच्या मुलं-सूना-नातवंडांची नेहमी बाजू घेणार्!(ते कसेही वागो) पण त्या लहानपणच्या उपकाराखाली बाकी सगळ्यांना वेठीला धरणार! त्यांना क्रेडीट घ्यायला आवडतं. मदत केल्यासारखी दाखवायची! मदत केल्यावर त्या उपकाराच्या ओझ्याखाली राहीलेला माणूस त्यांना उलटून बोलूच शकणार नाही!

मी त्याला सुरूंग लावला, साबांना साबूंना स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला लावणे, आपले निर्णय शक्यतो काम न होईपर्यंत गुप्त ठेवणे, नवर्‍याचे अकाऊंट, बँका व्यवहार वगैरे कामं स्वतःकडे ठेवणं, साबांशी, साबूंशी मुलीसारखे संबंध ठेऊन त्यांच्याबरोबर सगळी कामे करायला जाणं अशी क्रांतीकारी सुरूवात केलीच मी. यामुळे त्यांना त्यांचं महत्व कमी झाल्यासरखं वाटलं असेल.. म्हणूनही असेल राग! माझ्या साबांचं १ मस्तय, त्यांना तक्रार केली की या मला फोन करणार आणि समजवणार, अगं मला माहीतेय तुला त्रास होतोय पण थोडं सहन कर... तिला दुखवून नकोस, भांडू नको. तिच्या सून ऐकत नाहीत ना.. तू ऐक! इत्यादी. मी त्यांना व माझ्या घरच्यांना सांगायचेच नाही त्यांना टेन्शन नको म्हणून. यावेळी माझ्या नवर्‍यानेच त्यांना सांगितलं की मला किती आणि कसा त्रास दिला ते.

एकत्र कुटुंब नसताना ही तर्‍हा, एका कुटुंबात काय केलं असतं काय माहीत! म्हणून मला त्या सूनांचाही राग येत नाही. अती अधिकार गाजवलेला कोणालाही नाही आवडत. खरंय की मग अशा व्यक्तीच्या कलानी घावं बाकीच्यांनी, पण त्या व्यक्तीलाही कधीतरी रियलाईज झालं पाहीजे ना आपण इतरांशी खाष्टपणा करूनही ते अजून तरी आपल्याशी चांगलंच वागायचा प्रयत्न करताहेत. पण नाही असे लोक मऊ लागलं की कोपरानी खणायला बघतात, मग दुखलं की सहन होत नाही!

असो आता मला कळालं की कसं डिप्लोमॅटिकली वागावं ते...(स्त्रियांना ते उपजत असतं म्हणे... Happy मी ब्रश अप केलं! :फिदी:) त्रागा खूपच कमी झालाय! त्यांना वाचायला आवडतं, तर माबो वर्च्या कथा नेते प्रिंट काढून! झी मराठी वरचे स्वप्ना ने केलेले विडंबन वाचतात! कधी एखादी भाजी न्यायची, कच्चे पेरू, किंवा नातवांना चॉकलेट, नातवांचं खूप खूप कौतूक करायचं एखादे दिवस मग स्वारी जाम खूष असते पुढचा १ दिवस तरी... मग तिसर्‍या दिवशी याची आवर्तने! हाकानाका Proud

नव्या कामांमध्ये जुंपून घेतलंय... घराचं काम तर आहेच! वेळच मिळत नाही आता या भानगडींवर विचार करायला. Happy फक्त धागा बघितला, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, लिहिण्याचा मोह टाळू शकले नाही! असो आता माझ्या मनातील तो एक महीना सोडून बाकी फारशी कटूता नाहीय!

<< "गतमं न शौचमं" म्हणजे काय? >>
बहुधा शौचास न जाणार्‍यांविषयी कायतरी असाव... Wink

त्याचा खरा अर्थ "(होउन) गेलेल्याचा शोक करु नये." असा आहे.

माझ्या घरातला एक मेंबर वृत्तीने वाईट आहे.एकाच कुटुंबात राहत असल्याने टाळता येणे शक्य नाही.हा मेंबर सतत वाकडे बोलणे,मुद्दाम त्रास देणे,चांगले वागले तरी वाईट वागणे असे प्रकार करत असतो.घरातले इतर सदस्य त्याचा दबाव घेऊन गप्प असतात पण मला गप्प बसता येत नाही.सतत खटके उडत असतात.अशा व्यक्तीशी कसे वागावे.सतत वाईट वागण्याने निगेटीव्हीटी वाढत आहे व शांत बसले तर सहनशक्तीचा अंत पाहतात .काय करावे?

काय करावे?
नवीन Submitted by अभय गिरी on 18 December, 2020 - 07:12 >> तुम्हाला त्रास होतोय म्हणून ती व्यक्ती अजून त्रास देणार.. म्हणून ती व्यक्ती उपस्थित असतानाही कसं आनंदी राहता येईल ते बघा.. ती व्यक्ती तुम्हाला टोचून बोलत असेल तर अगदीच दुर्लक्श करून नेमक्या त्याच वेळेस घरातील इतरांशी कोणत्या तरी वेगळ्याच टाॅपिकवर गप्पा मारायला सुरूनात करा.. पण स्वत: त्रास करून घेऊ नका.
माझ्या सासूचं एक वाक्य मी नेहमी लक्शात ठेवते “टेंशन लेने का नही, देने का“ Happy

रोजच्या कटकटीत आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा शक्य असेल तर दुसरीकडे राहायला जा. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.

.हा मेंबर सतत वाकडे बोलणे,मुद्दाम त्रास देणे,चांगले वागले तरी वाईट वागणे असे प्रकार करत असतो.घरातले इतर सदस्य त्याचा दबाव घेऊन गप्प असतात पण मला गप्प बसता येत नाही.सतत खटके उडत असतात.अशा व्यक्तीशी कसे वागावे.
>> हा प्रश्न प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोबद्धल असतो...

एकाच कुटुंबात राहत असल्याने टाळता येणे शक्य नाही>> तरीही सगळ्यांनी त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे बोला. म्हणजे वाकडे बोलायच्या संधी कमी होतील.

सफरचंदावर सुरी चालविली तर सफरचंद कापले जाते.
सुरीवर सफरचंद चालविले तरीही सफरचंदच कापले जाते.

आईने अकबरी बद्दल माहिती नाही म्हणून हर्टना ट्रोल केले गेले (अजूनही त्यांच्या अज्ञानाचे दाखले दिले जातात हे विशेष.)
हर्टनी अमोरासमोर हा शब्द वापरला ज्याबद्दल इतरांना माहिती नव्हती (पण असा शब्द प्रमाण भाषेत आहे https://www.google.com/search?hl=mr&sxsrf=ALeKk01xl6snvRfrVkcah8-d3I00Vo...) तरीही इतरांच्या अज्ञानाबद्दल देखील पुन्हा हर्ट यांनाच ट्रोल केले गेले.

अचानक हा धागा वर पाहून हे आठवलं आणि इथे पोस्ट करावसं वाटलं.

अचानक हा धागा वर पाहून हे आठवलं आणि इथे पोस्ट करावसं वाटलं.
>>>>>

मलाही बी यांच्याबद्दल आजही आठवले की वाईट वाटते. पण जिथे दिनेशदा गेले तिथे बी यांच्या जाण्याचे काही नवल वगैरे वाटले नाही...
असो, जिथे असतील आनंदात असतील Happy

@ टॉपिक,
वाईटाशी वाईट नाही तर चांगले वागायचे असते किंवा इग्नोर करायचे असते, दोघांपैकी जे उत्तम जमेल ते करायचे असते. जर पहिले जमले तर क्या बात ! त्यामुळे पहिला प्रयत्न तोच हवा,

वाईटाशी वाईट नाही तर चांगले वागा. स्वतंत्र लेखाचा विषय आहे खरे तर हा..

<< हा प्रश्न प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोबद्धल असतो... >>>>> मग बायकोचे काय? Proud

आईने अकबरी बद्दल माहिती नाही म्हणून हर्टना ट्रोल केले गेले (अजूनही त्यांच्या अज्ञानाचे दाखले दिले जातात हे विशेष.)
हर्टनी अमोरासमोर हा शब्द वापरला ज्याबद्दल इतरांना माहिती नव्हती (पण असा शब्द प्रमाण भाषेत आहे https://www.google.com/search?hl=mr&sxsrf=ALeKk01xl6snvRfrVkcah8-d3I00Vo...) तरीही इतरांच्या अज्ञानाबद्दल देखील पुन्हा हर्ट यांनाच ट्रोल केले गेले.

अचानक हा धागा वर पाहून हे आठवलं आणि इथे पोस्ट करावसं वाटलं.>>>>>>बिपीनचंद्र, तुमचा हा गैरसमज आहे. बी खूप हट्टी होता. जितका तो प्रेमळ व हळवा होता तितकाच दुराग्रही होता. आपल्या चूका मान्य करायच्या नाही, दुसर्‍यावर आरोप करायचे, माझेच खरे. या मुळे तो मागे पडला. आणी इथे बर्‍याच जणींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर उलट त्या प्रत्येकीच्या विपु मध्ये जाऊन हा भांडला, धमक्या दिल्या. मग कोण सहन करेल ? आपले चूकले तर मान्य करुन पुढे जावे हे त्याच्या गावीच नव्हते. मी खेड्यातला व हे शहरातले म्हणून मला टारगेट करतायत असा त्याचा गैरसमज होता. आता जिथे असेल तिथे आनंदी रहावा.

ऋन्मेषा, मायबोलीकर वागतातचकी तुझ्याशी चांगले Wink Light 1 >>> हे मात्र खरंय! ईतके चांगले तर बायकोही अभावानेच वागते माझ्याशी. उगाच का मी ईथे पडीक असतो Happy

@ रश्मी,
बी लोकांशी वाईट वागला कारण त्याला वाटायचे लोकं आपल्याशी वाईट वागताहेत,
लोकं बी शी वाईट वागले कारण त्यांना वाटायचे की बी हा वाईट वागतोय,
थोडक्यात दोन्हीकडून वाईटाशी वाईट वागा हेच धोरण अवलंबले गेले आणि एक लूप तयार झाला. ज्यामुळे अखेरपर्यत दोन्ही बाजूचे एकमेकांशी वाईटच वागत राहिले, ज्याचा शेवट वाईटच होणे अपेक्षित होते.

म्हणून तर मी म्हणतो की आपल्याला जरी वाटले की समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट वागलीय तरी त्याच्याशी चांगले वागून बघा. कदाचित ती व्यक्ती वाईटाशी वाईट वागा या मताची असेल. आपण वाईट आहोत असा त्यांचा समज झाल्याने ती आपल्याशी वाईट वागत असेल. जर त्यांना आपले चांगले वागणे दिसले आणि पटले तर कदाचित ते आपल्याशी चांगले वागू लागतील. आणि या वाईटाशी वाईट वागा लूपमधून दोघांना बाहेर पडता येईल.

जर त्यांना आपले चांगले वागणे दिसले आणि पटले तर कदाचित ते आपल्याशी चांगले वागू लागतील. आणि या वाईटाशी वाईट वागा लूपमधून दोघांना बाहेर पडता येईल.>> तु तो देवमाणूस निकला रे

आशु,
मी योग्य मार्ग सांगितला, सोपा नाही Happy
कल्पना आहे की वाईटाशी चांगले वागणे सोपे नसते. पण म्हणून जे वागायला सोपे आहे तसे वागावे का..

अजून एक म्हणजे माणसाचा मूळ स्वभावच स्वार्थी आहे. सूक्ष्म विचार केले तर लक्षात येईल की बरेचदा आपण चांगल्याशी चांगले आणि वाईटाशी वाईट वागत नसून आपल्या सोयीनुसार वा फायद्यानुसार एखाद्याशी चांगले वागावे की वाईट वागावे हे ठरवत असतो.
सर्वात सोपे उदाहरण एखादा राजकारणी वा सरकारी अधिकारी घ्या, भले तो वाईट आहे हे आपल्याला माहीत असेल तरी त्याच्यापासून आपल्याला काही फायदा आहे हे लक्षात येताच आपण त्याच्याशी शक्य तितके चांगले वागतो.
याऊलट बरेचदा एखाद्यापासून काही नुकसान वा त्रास होणार असेल तर आपण त्याच्याशी वाईट वागतो आणि त्या वागण्याचे समर्थन करायला त्याच्यातील दुर्गुण लोकांना ठळक करून सांगतो.
आणि यात अवघड काहीच नसते. कारण सद्गुणांचा पुतळा जगात कोणीच नाही. प्रत्येकात काही ना काही दुर्गुण असतातच. तसेच गुणही असतातच. आपण आपल्या सोयीने एखाद्यातील गुणांवर बोट ठेवायचे की दुर्गुणांवर हे सहज ठरवू शकतो.

शेवटी काय, तर वाईटाशी वाईट वागतो असे म्हणताना समोरची व्यक्ती वाईट आहे हे ठरवतो आपणच ना..

तु तो देवमाणूस निकला रे
>>>
देव या संकल्पनेनुसार तो चांगल्याशी चांगले वागत त्यांचे भले करतो आणि वाईटाशी वाईट वागत त्यांना शिक्षा करतो.
म्हणून कोण वाईट आहे हे ठरवून त्याच्याशी वाईट वागायचे काम देवावर सोडून आपण सर्वांशी चांगलेच वागावे. नाहीतर त्या तटस्थ देवाच्या नजरेत आपण कोणाशी तरी वाईट वागतोय हे यायचे Happy

भेजा फ्राय नावाचा एक चित्रपट आहे. त्या मध्ये काही सुखवस्तू पुरुष आठवड्यातून एकदा भेटत असतात आणि एक खेळ खेळत असतात. खेळ असा असतो की ज्याच्यावर राज्य असतं त्याने त्या दिवशी एका नमुन्याला खेळाच्या ठिकाणी आणायचं असतं आणि त्याची नामुनेगिरी बघत सगळ्यांची करमणूक करायची असते. नामुन्याला माहीतच नसते की तो त्यांच्या करमणुकीचे साधन बनत आहे.
मायबोली पण तशीच आहे. फरक इतकाच आहे की चित्रपटात पुरुष हा खेळ खेळत असतात आणि इथे स्त्रिया. इथे काही स्त्री आयडीचा चमू/ कंपू आहे जो अशे नमुने शोधत असतो. बी आणि दिनेश त्याचीच शिकार होते
तुमचा होतो खेळ पण एखाद्याचा जातो....

>> शेवटचि घटका भरलि तेंव्हा त्या काकू काहितरि सांगायचा प्रयत्न करु लागल्या. पण त्या काय बोलत आहेत हे कळतच नव्हते कारण या माणसाचा लाऊडस्पीकर जोरात चालु होता.
>> Submitted by प्रिया७ on 18 May, 2010 - 22:59

हे भगवान! किती दुर्दैवी आहे हे. अशी दुर्दैवी घटना खरेच घडली आहे? कारण "आवाजाचे प्रदूषण" या थीम वर मी एक शॉर्ट फिल्म बनवली होती. आणि त्यात मी नेमके असेच काहीसे दाखवले होते. अर्थातच ते काल्पनिक होते. पण हे वाचून मला ते आठवले.

Pages