एक सुगंधी, प्रसन्न सकाळ..
आजची सकाळ म्हणजे तसं पाहिलं तर अगदी नेहेमीसारखीच सकाळ. सिद्धार्थला शाळेत पाठवायचंय, आवरुन काकांकडे पूजेला जायचंय या विचारात उठून आवरायला सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे एकीकडे चहा टाकला, एकीकडे ओट्यावरचा सगळा पसारा आवरणं चालू होतं. चहा होत आला आणि पेपरवाल्याने पेपर टाकल्याचा आवाज आला. पेपर उचलायला म्हणून दरवाजा उघडला. गम्मत म्हणजे, बाहेरच्या सेफ्टी डोअरला आतून एक पिशवी बांधलेली होती. पिशवी आईकडचीच! लगेच ओळखलं मी. पेपर उचलायचे सोडून अर्थातच आधी ती पिशवी सोडली. आत काय असेल............? पंधरावीस ताजी, टवटवीत सोनचाफ्याची फुलं. त्याक्षणी कसलं निरागस, निर्मळ, प्रसन्न, झकास वाटलं! नक्की काय वाटलं ते शब्दात सांगणं सुद्धा कठीण. पिशवी उघडताच चाफ्याच्या घमघमाटानी आमच्या संपूर्ण घराचाच ताबा घेतला. अर्थात हा उद्योग बाबांचा ..! आपल्या नातवाला शिक्षकदिनासाठी बाईंना चाफा देता यावा, गणपतीला ताज्या चाफ्याचा हार मिळावा म्हणून हा सगळा खटाटोप.
त्या एका क्षणानी सगळा दिवस कसा चाफ्यासारखा बनला सुंदर, सुगंधी, टवटवीत! खूपवेळा वाटतं मला की माझ्या बाबांचं माणसांपेक्षा जास्त प्रेम फुलांवर, फुलझाडांवर आहे. आज सकाळी त्या चाफ्यानी असा काही आनंद दिला आणि वाटलं, का नसावं.... ? आपल्या नुसत्या असण्यानी जो चाफा इतका आनंद देऊन जातो, त्याच्यावर नाही प्रेम करायचं तर कुणावर....?
हा बाबांच्या बागेतला चाफ्याचा फोटो..
माझ्या बाबांनी टेरेसवर केलेली फुलबाग पहायचीय?
http://picasaweb.google.com/meenakshi.hardikar/MyDadSBeautifulGarden?aut...
वा! काय
वा! काय भाग्यवान आहेस!! सोनचाफा अन सोनटक्का दोन्ही गच्चीवरच आहे का? मला बिया / कंद / कटींग पाहिजे मग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच गेला
मस्तच गेला असणार दिवस...खरचं भाग्यवान आहेस....मला पण चाफा खुप आवडतो, कित्येक वर्ष झाली चाफा पाहुन![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कसली सही
कसली सही बाग आहे! सोनचाफा पाहून मस्तच वाटलं.
आईशप्पथ ...
आईशप्पथ ... सकाळी सोनचाफा !! दिवस एकदमच मस्त गेला असणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या 'विचारपूस'मधे कळवशील का की तुझ्या बाबांचं घर कुठे आहे?
माझी आईही खूप बागकाम करते. ती चार महिने इथे होती तर घरासमोर झेंडू आणि बाल्समची छोटी बागच फुलवून पुण्याला परत गेलीय
मिनु, काय
मिनु, काय सुरेख बाग केली आहे तुझ्या बाबांनी. अशी लोकं रिटायर झाली तरी त्यांचा वेळ इतका छान जातो न.
शोनु नक्की
शोनु नक्की मिळेल. आणि बाबांच्या फुलबागेतल्या फुलांची यादी करायची म्हणजे मला माहिती हवीत ना सगळ्या फुलांची नावं..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्या फुलांचे एकाहून जास्त प्रकार आहेतः गुलाब, कण्हेर, मोगरा, शेवंती, जास्वंद, जर्बेरा, कमळ, कर्दळ
त्याशिवाय: रातराणी, सोनटक्का, अबोली, जाई, जुई, सोनचाफा, अनंत, रानजाई, कवठी चाफा हेही आहेत. मला ज्यांची नावं माहित नाहित असे अजुन काही.. अधुनमधुन हुक्की आली की कधी तरी मेथी, कोथिंबीर, हेही असतात. वडीचा अळू मात्र नेहेमीच असतो.
प्रिती इकडे आलीस की ये.. हवा तितका सोनचाफा देते.
संदीप आमच्या बाबांची बाग कोथरुडात आहे. तुला कळवते पत्ता. बाबांना त्यांची बाग दाखवायला अर्थातच खूप आवडतं.
झेलम तुला आणि सगळ्यांनाच प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद..!
आर्च, बाबा या बागेसाठी जवळजवळ रोज चार पाच तास खपतात. जीवापलिकडे जपतात बाग.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
मस्त बाग
मस्त बाग अगदी!! आणि हा सोनचाफ्याचा फोटोही एकदम छान आहे!
सही!
सही! भाग्यवान आहेस मीनु. बाबांना green thumb लाभलेला दिसतो.
कित्ती छान
कित्ती छान बाग!
मीनु, सगळी
मीनु,
सगळी बाग बघीतली. खूपच छान आहे. गच्चीवरच्या बागेत कमळ वगैरे म्हणजे कमालच. एकदा पुण्यात आले की नक्की बघेन ही बाग. कितीतरी दिवसांनी मोगरा रातराणी अशी आपल्याकडची खास झाड बघायला मिळाली.
काय सुरेख
काय सुरेख बाग आहे.. मला पण वाटते थोडीतरी फुलझाडे लावावित पण थंङी मूळे जगतील की नाही वाटून नाही लावू शकत.
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वा:! काय
वा:! काय सुरेख बाग आहे!! फोटो क्र. १६ मध्ये अनंताचं फूल आहे का?
व्वा,
व्वा, माझीही सकाळ प्रसन्न, सुगंधी झाली एवढी फुलं पाहून
खास करून अनंत आणि सोनटक्का दिसत नाही हल्ली जास्त कुठे.
लहानपणी होती सगळी झाडं घरी.
आताही अशी बाग करायची माझी इच्छा आहे. पाहू कसं जमतय ते.
सुधीर
हो गं ते
हो गं ते अनंताचंच ... मला नाव आठवत नव्हतं...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
~~~~~~~~~
काय मस्तच
काय मस्तच मीनू! सोनचाफा एकदम मोहक असतो.
काश अशी जागा मिळेल तर. मला ही gardening करायला खूप आवडते पण असे तपमान नी जागेचा अभाव. ह्याच्यावरून आठवले फुलाझाडाना माया नी प्रेम द्यावे लागते ती जर फुलत रहावी असे वाटते तर्(इती माझे आबा) तेव्हा उगाच नाही तुझे बाबा चार पाच तास खपतात.
सोनटक्क्याच बी वगैरे कुठे मिळते का कुठे? इथे लावायला मिळाला तर काय मज्जा. मी आमाच्याकडची फुले टीचरला द्यायची. आता कीती वर्षाच बघितली नाही.
मीनू यु र लकी तुझ्या बाबांमूळे.
खुप छान
खुप छान बाग आहे मीनु
मीनू,
मीनू, फुलबागेतील फुलांचा सुगंधा पोचला म्हणून सांग..
मीनू,
मीनू, वाचुन अगदी सुगंधीत आणि प्रसन्न वाटलं...
बागही खुप आवडली. मी पण बाग केलीय पहिल्या मजल्यावर टेरेसमध्ये केलीय, आधी बरीच मोठी होती, आता खुप कमी केलंय. तळमजल्यावरील लोकांना त्रास होतो ना...
साधना
किती सुंदर
किती सुंदर बाग!
पुन्हा पुन्हा बघाविशी वाटते..
अनंताचं
अनंताचं फूल मला अतिशय प्रिय आहे! किती सुंदर सुवास असतो त्याचा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाग खरोखर सुंदर आहे ग! (कमळ तर अप्रतिम!) बागेत फुलपाखरं, पक्षीपण येत असतील ना
अवांतरः फोटो पाहून मला आमच्या जुन्या सोसायटीची आठवण आली...प्राजक्त,चाफा (लाल व पांढरा),गुलाबी कण्हेर,अनंत, तगर (सिंगल, डबल),तांब्याची शेंग,गुलमोहोर,शिरीष,जांभूळ,पेरु (गुलाबी, पांढरा)तुती,जास्वंद,अबोली,उंबर,बदाम,अशोक,फणस,चिकू,बाभूळ इतकी सगळी झाडं होती...पोपट,हळद्या,तांबट,वटवाघूळ,शिंपी,लालबुड्या बुलबुल असे पक्षीही यायचे...
खूप जुन्या स्मृती जाग्या झाल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहिच अन
सहिच अन प्रेरणादायी सुद्धा
गोदेय
खूपच मस्त.
खूपच मस्त. तुझ्या बाबांची माझ्या बाबांशी गाठ घालुन दिली पाहिजे
त्याची पण फार माया आहे बागेवर, शेतीवर. नातवंडांच्या जन्मानंतर झाला नसेल एव्हढा आनंद त्यांना एका एका झाडाला फळ्/फुल लागले की होतो ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बागेची आवड
बागेची आवड असणारे खूप जण आहेत की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांना धन्यवाद.
~~~~~~~~~
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
मीनू सोनटक
मीनू
सोनटक्क्याची अन सोनचाफ्याची झाडं कशी लावली ते विचारून सांगशील का? कन्द किंवा बिया मिळत असतील तर पुढच्या भेटीत आणीन म्हणते.
शोनु,
शोनु, सोनचाफ्याच्या झाडाभोवती पावसाळ्यानंतर रोपे उतरतात. मी बहुतेक जणांना रोपं लावताना बघितले आहे. पण उन्हाळ्याच्या सुरुवातीपासुन फळं तडकुन बिया सुटायला लागतात. त्या लावल्या तरी रोप उतरायला हवे. मी माझ्यासाठी एका मैत्रिणीच्या आईला बी काढुन ठेवायला सांगितले आहे. मिळाले तर तुला पण देईन.
अंधेरी स्टेशनजवळच्या Shoppers Stop बाहेर एक लहानशी नर्सरी होती. तेथे चाफ्याची बोन्साय केलेली झाडे मिळायची. आता आहे की नाही माहिती नाही. तेथे एकदा सोनचाफ्याचे १२-१५ फुले आलेले बोन्साय बघितले होते. त्यांच्याकडे बी पण मिळायचे.
मीनू, ही
मीनू, ही बाग बघून मागच्या आठवड्यात निळू दामले यांचं 'माणूस आणि झाड' वाचलेलं त्याची आठवण झाली....
तुझ्या बाबांना पण आवडेल हे पुस्तक. त्यात अशीच गच्चीत्/बाल्कनीत झाडं लावण्यावर माहीती आहे.
शोनु
शोनु सांगते गं विचारुन. भाग्या धन्यवाद. पहाते मी पुस्तक.
~~~~~~~~~
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
मी आजच
मी आजच बघितलि बाग. खुपच सुंदर आहे. मोगर्याच्या कळ्या बघुन एकदम नॉस्टॅलजिक वाटल. गच्चिवर अशि बाग करायचि म्हणजे किति कष्ट असतिल. नुसतिच देखणि नाहि तर प्रेरणादायि पण आहे हि बाग. पुण्यात आले कि बघायला नक्कि आवडेल.
जरुर
जरुर ये.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~
~~~~~~~~~
सहीच!! टेरे
सहीच!!
टेरेस वर अशी बाग आहे, अस विश्वास तु म्हणते आहेस म्हणुन ठेवते.
बाग अप्रतिमच.
******************************
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.
Pages