१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
वर्षा, ती प्रोसेस उलटवता
वर्षा, ती प्रोसेस उलटवता येणार नाही. त्यात भरीला तांदळाचे वा गव्हाचे पिठ वा रवा घालून, डोसा, उत्तप्पा, आप्पे, वगैरे करता येईल. किंचीत साखर वा कोबी, गाजर सारख्या भाज्या घालून, आंबटपणा कमी करता येईल.
फक्त वापरण्याआधी पिठ खराब झाले नाही, याची खात्री करावी लागेल.
भांडी/उपकरणे हा धागा मिळाला
भांडी/उपकरणे हा धागा मिळाला नाही म्हणून इथे माहिती देतोय.
कूकरची शिट्टी होऊ देऊ नका!
आजकाल जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात प्रेशर कूकर वापरला जातो. परदेशी जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये पहिल्यांदा हा कूकर स्थानापन्न होतो, बाकीच्या वस्तू त्यानंतर येतात. कूकरमधील पदार्थ शिजला की नाही, याविषयी प्रत्येक गृहिणीचा आडाखा हा शिट्टय़ांच्या संख्येशी निगडीत असतो. भातासाठी दोन, डाळीसाठी तीन, राजम्यासाठी चार किंवा अधिक शिट्टय़ा झाल्या की कूकर बंद केला जातो. कधीकधी आठ-दहा शिट्टय़ासुद्धा होताना आढळतात. पण ही पद्धत अतिशय अवैज्ञानिक आहे, हे लक्षातच घेतले जात नाही.
पूर्ण लेख :
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61077:2...
पनू >>तेलात दूध घातल्यावर ते
पनू >>तेलात दूध घातल्यावर ते पाण्यासारखे उडत नाही का?<<< वाटलं तर अजून दूध घाल. पण नाही ऊडत कारण लगेच त्यात कांदा घालायचा :)
रंगासेठ - मी वर्गात "विज्ञान आणि समाज " हा विषय शिकवताना आवर्जून हे सांगायची. पण कधी घाई असली की माझ्याकडून ही चूक होतेच बरका
रंगसेठ उत्तम माहिती.
रंगसेठ उत्तम माहिती. कुठल्याही कुकरच्या मॅनुअलमधे शिट्ट्या करा असे लिहीलेले नसते.
मी तर नेहमीच हे लिहित असतो,
मी तर नेहमीच हे लिहित असतो, पण बहुतेक सगळ्या पाककृति लेखिका, अमूक इतक्या शिट्या करा, असेच लिहित असतात. बर्याच जणी कूकरमधे वाळू टाकून केक भाजा, असेहि लिहितात, तेही चूकच आहे.
एक वर्ष जुना मध आहे. फ्रीजमधे
एक वर्ष जुना मध आहे. फ्रीजमधे ठेवला गेले दोन्-तीन महीने तर घट्ट झाला आहे. वास वगैरे येत नाहीये. एक्स्पायरी डेट १८ महीन्यानंतर आहे, वापरता येइल का ? काल फ्रीजच्या बाहेर काढून ठेवला आहे. बॉटल मोठी आहे म्हणून वाया जावं असं वाटत नाही
मधाला एक्स्पायरी डेट ??????
मधाला एक्स्पायरी डेट ??????
असेलही, तसा मी अज्ञानीच आहे ह्या सगळ्या बबतीत.
माझ्या मते तरी जुना मध
माझ्या मते तरी जुना मध वापरायला काही हरकत नसावी. फ्रिज मध्ये ठेवल्यामुळे घट्ट झाला असेल, किंवा विकतचा असेल तर प्रिझर्व्हेटिव्हज् मुळे पण असेल. फार घट्ट होऊन निघत नसेल तर पातेल्यात गरम पाणि घालून मधाची बाटली त्यात ठेवून पहा. आता वरंच ठेव आणि रोज सकाळी उठुन एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबु आणि एक चमचा मध असं घेतलंस तर वजन कमी होईल, एका दगडात दोन पक्षी
शिवाय कधी पोळिशी, कधी कॉफित (साखरेऐवजी) घालूनही मध खाता येतो...
पण आता उन्हाळा आहे तेव्हा जपून, नाहीतर उष्णता होईल.
दीपूर्झा..मी परवा अगदि हाच
दीपूर्झा..मी परवा अगदि हाच प्रश्ण स़काळच्या फॅमिली डॉ. पुरवणी मध्ये वाचला.. तुम्हिच विचारला होतात का..
हा तो प्रश्ण आणि उत्तर -
आमच्याकडे 15-20 वर्षांपूर्वीचा चांगला मध पडून आहे. त्याचा आता खाण्यासाठी उपयोग करता येईल का? तसेच मध काचेच्या बाटलीत घट्ट बसला आहे. तो बाहेर काढण्यासाठी सुरक्षित उपाय काय?....
उत्तर - मध जुना झाला तरी खराब होत नाही, त्यामुळे 15-20 वर्षांपूर्वीचा मध खायला काहीच हरकत नाही. तसेच मध जुना झाला की घट्ट होणेही स्वाभाविक असते. पण चमच्याने काढता यावा किंवा खायला सोयीचा जावा यासाठी मधाची बाटली थोडा वेळ उन्हात ठेवता येईल किंवा गरम पाणी ठेवलेल्या भांड्यात ठेवता येईल.
माझा भाचा दुध पित नाही
माझा भाचा दुध पित नाही त्यासाठी दुधात बदाम्,काजु , खारीक, यांची पावडर आणि केसर घातले तर चालेल का ? कि अजुन काही घालु ? पावडर किती दिवस टिकेल (तो बोरमिटा किंवा ईतर खात नाही)
आज रात्री छोलेची भाजी करायची
आज रात्री छोलेची भाजी करायची आहे रेसिपी नेट वरुन घेतली आहे पण त्याची ग्रेव्ही साठी काय करु मला होटेल मध्ये मिळते तशी हवी आहे आणि त्या बरोबर फुलके चालतील ना ? प्लिज सांगा
आता कुकरच्या शिट्ट्यांचा विषय
आता कुकरच्या शिट्ट्यांचा विषय इथे चाललाय म्हणुन विचारतेय..
फक्त डाळ भात लावला तर किती वेळ थांबावे? मी जर प्रेशर पॅनमध्ये खिचडी केली तर प्रेशर पुर्ण भरे पर्यंत थांबते आणि मग गॅस कमी करुन ३-४ मिनिटे जाऊ देते आणि मग गॅस बंद करते. (चिकनसाठी पण सेम, पण तेच मटण असेल तर मग ४-५ शिट्ट्या काढल्या नाहीत तर शिजत नाही मटण)
मी कडधान्ये असतील तर ४ तरी शिट्या काढते. पण बिन शिट्टीचे (चणे/वाटाणे सारखी कडधान्ये, जी कठीण आहेत शिजायला) शिजवायचे असेल तर काय करावे? किती वेळ वाट पाहावी??
डाळ भात डब्यामधे (सेपरेटर्स )
डाळ भात डब्यामधे (सेपरेटर्स ) ठेवला तर प्रेशर आल्यानंतर १० मिनिटे पूरेशी आहेत. डायरेक्ट कूकरमधे केला तर ८ मिनिटे पूरेत. हा वेळ नेहमी, पुर्ण प्रेशर आल्यानंतर मोजायचा असतो. पूर्ण प्रेशर आले कि गॅस मध्यम केला तरी चालतो. गॅस इतकाच ठेवायचा कि प्रेशर कायम राहिले पाहिजे.
चिकन, मटणाचे तूकडे लहान आहेत कि मोठे त्यावर वेळ ठरते.
शिजायला सोपे कडधान्ये, जसे मूग वा मसूर शिजायला २ मिनिटेही पूरतात. अर्थातच ती भिजवलेली असली पाहिजेत. चणे, वाटाणे भिजवलेले असले तर ८ मिनिटे लागतात. कडधान्य नेहमी भिजवूनच घेणे श्रेयस्कर असते. माखी दाल साठी ज्यावेळी आपण अख्खे उडिड व राजमा ( न भिजवता ) शिजवतो, त्यावेळी ५० मिनिटे लागतात.
कडधान्ये आपल्याला कितपत मऊ शिजलेली आवडतात, त्यावर वेळ अवलंबून आहे.
कूकरबरोबर जे पूस्तक येते, त्यात या वेळा अचूक दिलेल्या असतात. जर पुस्त्क मिळाले नसेल, तर तो मिळवणे ग्राहकाचा हक्क आहे. किंवा डिलरकडून ते विकतही घेता येते.
साधना, मी कधीच कुकरच्या
साधना, मी कधीच कुकरच्या शिट्ट्या होउ देत नाही. किंवा एखादी झाली कि लगेच गॅस बारीक करते.
साध्या डाळ तांदुळासाठी १० मि. बारीक आचेवर कुकर ठेवायचा. कडधान्य जसेकी छोले, राजमा असेल तर १५-२० मि. ठेवते.
नॉनवेजचा मात्र काही अनुभव नाही.
हसरी, छोल्यांबरोबर फुलके छान लागतात. रेसिपीनुसार छोले कर नाहितर इथेही असेल रेसिपी ती पहा.
कोणत्याही उपकरणांबरोबर आलेली
कोणत्याही उपकरणांबरोबर आलेली मॅन्युअल्स किती जण वाचतात्,जपून ठेवतात हा सर्वेक्षणाला चांगला विषय आहे. पण काही मॅन्युअल्स वाचायला भिंग घ्यावे लागते. अत्यंत हलक्या कागदावर विविध भाषांमधले मॅन्युअल छापलेले असते.
माझ्याकडे असलेल्या कुकरच्या पुस्तकात दिले आहे की कुकर लावताना शिटी लावू नये, तर वाफ बाहेर येऊ लागली की लावावी (आणि हात भाजून घ्यावा?) वाफेचे तापमान पाण्यापेक्ष्क्ष बरेच जास्त असते ना? दिनेशदा कंटेनर ठेवून शिजवताना कुकरमध्ये तळाला किती पाणी घातले यावर पण शिजण्याचा वेळ बदलत असेल ना? जास्त पाणी घातले तर उगाच जास्त वेळ, आणि पाणी कमी पडले तर कदाचित पुरेसे प्रेशरच जमणार नाही.
याच मालिकेतला लोकसत्तामधला दुसरा लेख फ्रीजच्या वापराबद्दल आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=628...
यातल्या सूचना पाळल्या तर बहुधा फक्त थंड पाण्यासाठीच फ्रीज वापरला जाईल.
फ्रीज मधे ठेवण्यापूर्वी पदार्थ सामान्य तापमानाला (रूम टेंपरेचरला) असावा म्हणजे वीज वाचेल असे कुणी सांगतात, तर उष्ण तापाला जंतूंची वाढ झपाट्याने होते, आणि उष्ण पदार्थ घेण्याची फ्रीजची क्षमता असते असा दुसरा प्रवाह आहे.
पाणी कमी पडले तर कदाचित
पाणी कमी पडले तर कदाचित पुरेसे प्रेशरच जमणार नाही.
मी मन्युअल्स टाकत नाही, ठेवते. कारण माझ्या स्मरणशक्तीवर माझा विश्वास नाहीये
कुकरचे मॅनुअल नाहीये माझ्याकडे, पण त्यात एक ग्लास पाणी टाकायचे असे होते. १० मिनिटे मध्यम आचेवर ठेवायचा तर एवढे पाणी पुरेल ना??
खरे तर शिट्टीची जी नळी (वेंट)
खरे तर शिट्टीची जी नळी (वेंट) असते, त्यातून जोमदार वाफ बाहेर यायला लागली किच शिट्टी (वेंट वेट) ठेवायचे असते. ती जास्त शास्त्रीय आणि योग्य पद्धत आहे. असे केल्याने त्या ट्यूबमधे काहि अडकलेले नाही, याची खात्री होते. (त्यासाठी आधी झाकण प्रकाशाच्या दिशेने ठेवून, प्रत्यक्ष डोळ्याने बघणे, हि एक चांगली सवय आहे.) असे करताना हात भाजत नाही. शिट्टीला पक्कडीनेही धरता येते.
कंटेनर ठेवताना तळाशी आणि आवश्यकता असेल तर डब्यातही पाणी ठेवावे लागते. जर या पाण्याचे प्रमाण कमी झाले तर ते संपून सेफ्टी व्हॉल्व्ह वितळतो, ( हा व्हॉल्व्ह खास धातूंच्या मिश्रणाचा असतो. हा धातू, वाफेच्या जास्त दाबाने आणि जास्त तपमानानेही वितळतो. ) हे तूमच्या सुरक्षिततेसाठीच असते. हल्ली, झाकणाला एक खास भोक, किंवा गास्केट रिलि़ज सिस्टीम बसवलेली असते. (प्रेशर आहे कि नाही हे दाखवण्यासाठी, व्हॉल्व्ह थोडा वर उचलला जाण्याची पण सोय असते.)
पाणी किती ठेवायचे ते बघून, मेझरिंग कपने मोजून टाकणे चांगले. ग्लास आणि कपाचा आकार प्रमाणित नसतो.
पाणी जास्त झाले तर ते उसळून डब्यातले पदार्थ बाहेर सांडतात.
एखादा नविन पदार्थ शिजताना, आपल्या अंदाजापेक्षा मिनिटभर आधीच गॅस बंद करावा. आतील प्रेशरने पदार्थ शिजतोच. समजा कमी शिजला तर परत कूकर आचेवर ठेवता येतो. पण जास्त शिजला, तर काही करता येत नाही.
फ्रीजमधे गरम पदार्थ कधीच ठेवू नयेत. एकतर त्याने जास्त वीज खर्च होते. आणि जंतूची वाढ होते.
मायक्रोवेव्हचे असेही उपयोग
मायक्रोवेव्हचे असेही उपयोग :
लसणाच्या साली सोलण्यासाठी पाकळ्या सुट्या करून एक गड्डीला ३०-४० सेकंद मा.वे.करावे.
लिंबातून अधिक रस मिळण्यासाठी १० सेकंद (रूम टेंपरेचरच्या लिंबाला) मा.वे. करावे.
लोणी कढवून तूप काढता येते.
स्वयंपाकघरातील विज्ञान -गॅस
स्वयंपाकघरातील विज्ञान -गॅस शेगडीची निगा आणि वापर.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=64644:2...
ओव्हन मध्ये भताचि वांगि खरपुस
ओव्हन मध्ये भताचि वांगि खरपुस भाजलि जाण्याचि काहि युक्ति आहे का कुणाकडए? मी ४५ मि. ब्रॉइल करुन बघितलेत तर वरतुन कडक पण खालच्या बाजुने चिवट होतात साल विस्तवाव्र भाजल्या सारखा खरपुस्पणा काहि येत नाहि, काप करुन भाजलेत तर खुप कडक होतात आणि त्यामुळे खुप वाया जात. माझ वेळ आणि तपमानाच गणित काहि केल्या निट होत नाहीये.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116386.html?1103231312
रमा इथे पहा पूर्वी जुन्या माबो वर चर्चा झाली आहे. पहा काही उपयोग होतो का
रमा, अगं स्टोवटॉप वर जाळी
रमा, अगं स्टोवटॉप वर जाळी ठेऊन त्यावर वांगी मस्त खरपूस भाजली जातात जवळपास तेवढ्याच वेळात.
रमा अव्हन ४५० डीग्री फॅ ला
रमा
अव्हन ४५० डीग्री फॅ ला प्रीहीट करून घे. भरीताच्या वांग्यांना तेलाचा हात लाव आणि बेकींग ट्रे मध्ये घालून ४०-४५ मिनीटे मधल्या रॅक वर ठेऊन बेक कर. शेवटी अगदी ५ मिनीटे ब्रॉइल कर. माझ्यामते तरी ह्या पद्धतीने चांगली होतात. तुला हवी तेवढी खरपूस होतात की नाही हे मात्र तुला स्वतः करूनच ठरवावे लागेल. ह्या पद्धतीचा फायदा म्हणजे गॅसवर वांगी भाजतांना त्यातले पाणी गळून जो सगळा राडा होतो तो होत नाही.
ठांकु ग तिघिंना पण, रुपालि
ठांकु ग तिघिंना पण, रुपालि करुन बघते आणि सांगते तुला.
मी माझ्या पद्धतीने हा
मी माझ्या पद्धतीने हा वांग्याचा प्रॉब्लेम सोडवला .... मी हे घेउन आले. वांगी अप्रतीम भाजली गेली!!!
बटाट्यामधला एक बटाटा
बटाट्यामधला एक बटाटा कुजलाय... तो टाकुन दिला बाकिचे चांगले बटाटे स्वच्छ धुतले तरी त्यांना वाईट वास येतोय
आता साबणाने धुवु का? कि शिजवल्यावर जाईल तो वास??
अमृता उरलेले बटाटे बाहेर
अमृता उरलेले बटाटे बाहेर बाल्कनीत हवेशीर ठिकाणी ठेऊन बघ २-३ तास. कदाचित मोकळ्या हवेत, उन्हात ठेवल्याने वास जाईल.
थँक्स रुनी... चांगली आयडीया
थँक्स रुनी... चांगली आयडीया वाटत्ये. करुन पहाते.
वास नक्की बटाट्यानाच आहे ना?.
वास नक्की बटाट्यानाच आहे ना?.
होय हो भाई एक कुजका टाकला
होय हो भाई
एक कुजका टाकला पण. ह्या बटाट्यांकडे दुसरे आणले गेल्यामुळे जरा दुर्लक्षच झालेल माझ. इ.ग्रो. मधे मागे बरे दिसले म्हणुन गरज नसताना घेतलेले. 
Pages