डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
अरे व्वा इतकी सन्ख्या? अशी
अरे व्वा इतकी सन्ख्या? अशी ही प्रवास वगैरेची आकडेवारी?
अरे स्वतन्त्र बीबी काढून सगळ्यात वरती लिहा हे सगळ रिअली अ माइलस्टोन!
सगळ्यान्चेच अभिनन्दन!
पराग मलाच तू सीमा का विचारलं
पराग मलाच तू सीमा का विचारलं होतस आणि मी तुला खर्या सीमाला दाखवलं होतं
सायो, आम्ही Drive करून आलो होतो. जाताना ५.५ तास, येताना ४.५ तास.
अरे व्वा, इतक्या मोठ्या
अरे व्वा, इतक्या मोठ्या प्रमाणावर गटग आयोजित करणारी लालू आणि ते यशस्वी करणारे सहभागी सगळ्यांचं अभिनंदन.
खादाडी काय केलीत तेही लिहा वृत्तांतात
बापरे, खादाडी ही संख्येला
बापरे, खादाडी ही संख्येला साजेलशी होती. मी निम्म्या गोष्टी खाल्ल्या ही नाहीत.
स्टार्टर्सः कचोरी, चिप्स, कांदा भजी, श्री. लालूंनी बनवलेली कॉकटेल्स.
जेवणः भेंडीची भाजी, भरली वांगी, पुलाव,सॅलड, दही वडे, रायता, नान, परागने आणलेल्या खव्याच्या पोळ्या, आणखीन दोन चार डेझर्टसही होती म्हणे. पण मी ती खाल्ली नाहीत.
मी माझे पहिलेच पोस्ट एडित करत
मी माझे पहिलेच पोस्ट एडित करत राहीन आता आठवेल तसं. गरजूंनी वाचत रहा
सीमा म्हणजे ती, जी सारखी कपडे
सीमा म्हणजे ती, जी सारखी कपडे बदलत होती >>> काय सीमा मुंज, लग्न, साखरपुडे उरकुन घ्या. हा सल्ला फारच मनावर घेतलास की काय?
श्री. लालू आणि लाल्वक्का,
श्री. लालू आणि लाल्वक्का, अभिनंदन!! अभिनंदन!!! ख्ररंच इतक्या मोठ्या प्रमाणावर, तेही घरी, एवेएठी आयोजीत करून यशस्वी करायचं म्हणजे केवढी मेहेनत! तुम्हाला इथूनच <०[]< !!
वृत्तांत येऊ द्या.
न येऊ शकल्याचं प्रचंड वाईट वाटलं.
आता पुढलं महाएवेएठी कधी? कुठे??
अभिनंदन लालु व कुटुंबीय ! आणि
अभिनंदन लालु व कुटुंबीय ! आणि महाजीटीजीला उपस्थित असलेल्या सर्व माबोकरांचही अभिनंदन !
मला पन कल सग्ल्यन्ना भेतुन
मला पन कल सग्ल्यन्ना भेतुन फर्फर छन वत्ले.
लालू व श्री लालूंचं अभिनंदन.
लालू व श्री लालूंचं अभिनंदन. लेकीने ऐनवेळी ताप काढल्याने आमचे येणे बारगळले. पण सर्वांनी अशक्य मज्जा केल्याचे वाचून खूप छान वाटले.
देसायांनी अजून वृत्तांत टाकला नाही? अजून रंपाचा असर आहे का?
काल खूप म्हणजे खूपच धमाल आले.
काल खूप म्हणजे खूपच धमाल आले. त्याबद्दल नंतर सविस्तर लिहीनच. आज उरलेल्या मायबोलीकरांसोबत डीसी दर्शनाचा कार्यक्रम आहे.
हजर असलेले मायबोलीकर
व्हर्जिनिया (० मिनीट ते १ तास प्रवास)
लालू, रूनी पॉटर, झक्कास, कार्टा, स्वाती दांडेकर, सुमंगला
बोस्टन (विमानाने १.५ तास प्रवास)
वेबमास्टर/अजय, भावना
पेन्सेल्वेनिया (३.५ तास प्रवास)
मेधा, ज्ञाती
डेलावेअर (२.५ तास प्रवास)
स्वाती
बागराज्य (न्यु जर्सी) (५-७ तास प्रवास )
झक्की, सायो, मैत्रेयी, वैद्यबुवा, परदेसाई, स्वाती आंबोळे, मंगेश डेशपांडे, अनिलभाई, वृंदा, राजश्री कुलकर्णी (जयावीची बहीण)
कनेक्टीकट (६-७ तास प्रवास)
सिंडरेला, किरण, अमृता, पन्ना, चमन
न्यु यॉर्क (६-७तास )
फचिन
नॉर्थ कॅरोलायना (५-६ तास प्रवास)
अंजली
नानबा
बारीशकर
जॉर्जीया (१०-१२ तास प्रवास)
राहुल
एस्जे
विनायक
पूर्वा
मो
विजीगिषु
मिनी
सुमीत
पराग
चुकीचा किनारा (कॅलीफोर्निया, विमानाने ५ तास प्रवास)
अॅडमीन
झाशीची राणी
सशल
टेक्सास (विमानाने साधारण ५ तास प्रवास) सीमा आता तुझा 'एक प्रॉब्लेम' मिटला का मी माझी चूक सुधारली आहे
सीमा
आणि त्यांचे कुटूंबीय असे मिळून ६०+ लोकांनी हजेरी लावली. लालूनी एकदम झक्कास व्यवस्था ठेवली होती. तिने वारंवार असे गटग आयोजित करावेत यावर सगळ्यांचे एकमत झाल.
डीसीत मुक्काम करणार्यांनी लालू कडून निघून परत रात्री हॉटेलात जाऊन रात्री २ वाजेपर्यंत गटगचा दुसरा राऊंड केला. त्यास अॅडमिन आणि वेबमास्टरांनीपण हजेरी लावली. त्याचा वेगळा वृत्तांत लिहीला जाईलच.
बापरे, केवढ्या दुरवरुन आलेत
बापरे, केवढ्या दुरवरुन आलेत सर्व जण मायबोलीप्रेम महान आहे.
रूनी, तुझ्या वरील पोस्ट करता
रूनी, तुझ्या वरील पोस्ट करता धन्यवाद
निदान माहिती तरि होते, किती किति अन्तरावरुन लोक एकत्र जमतात, केवळ मराठी म्हणून ग्रेट, रिअली ग्रेट!
अन, होस्ट श्रीवसौ लालुन्चे खास अभिनन्दन तुम्हाला लिम्बीच्या शेतातले (धावीस किलो) तान्दुळ बक्षिस
जबरी मज्जा केलेली दिसत्ये..
जबरी मज्जा केलेली दिसत्ये.. लालू सचित्र वृ चालेल
मला शेवट पर्यंत वसंता काही
मला शेवट पर्यंत वसंता काही भेटला नाही!
असो, लालु आणि धनंजय तुफान अरेंजमेंट! मी तर किती दिवस लालूच्या हिमतीलाच दाद देत होतो, इतक्या लोकांना बोलवलं तिनी त्याबद्दल. नाही म्हणता मी ही लालूच्या घरी इतके लोकं मावतील का असा विचार केला होता. आता जाताना श्री लालू ( मी तर त्यांना फोटो काढताना "राजे साहेब" अशी हाक मारली, जाचक बाफं लढवैयांनी नोंद घ्यावी!) आणि लालू ला मी त्यांच्या घराला एक हत्ती दरवाजा सुद्धा बसवुन घ्या म्हणजे शोभुन दिसेल असं ही सांगुन आलो.
बाकी वर झक्कास यांच्या या पोस्टीची सगळ्यांनी अगदी विशेष नोंद घ्यावी!!!
"पण काय आहे की सूर्य ऊगवला हे कस समजायच? तर कोंबड आरवल की सूर्य ऊगवला. तस गटग एकझॅट सुरू कधी झाल अस समजायच? तर बागराज्याचा मोठा कळप आला की गटग सुरू झालं. आणी गटग कधी संपल अस समजायचं तर बागराज्याचा मोठा कळप परतीला लागला की गटग अधिकॄतरित्या संपल. तसा तो कळप आय ९५ च्या मार्गाने निघाला आहे म्हणून म्हट्ल की गटग संपल" झक्कास, तुम्हाला जे कळलं ते सगळ्यांना कळलं तर किती गैरसमज दुर होतील ह्यांची तुम्हाला कल्पना नाही.
तर या पुढे कोणाची बस लवकर पोहोचते असल्या क्षुद्र गोष्टींवरुन "गटग" किंवा "धमाल" चा खरा दादा कोण आहे ह्याचे अनुमान काढू नये!
प्रचंड धमाल आली! मी आणि डी मंगेशराव एकदम वेळेत सायो कढे पोहोचलो. रस्त्यात झक्कींना त्यांची जुनी कंपनी बघुन एकदम गहिवरुन आलं आणि त्यांना सायोच्या घरचा रस्ता सोडुन डायरेक त्या कंपनीच्या आवारा भोवती चकरा मारायला सुरवात केली. त्यांच्या मागोमागच मी येत होतो त्यामुळे मी त्यांना इंटेरसेप्ट करुन परत सायो च्या घराकडच्या रसत्याला लावलं. म्हंटलं आता फक्त झक्कींच्या गाडीतुन पुस्तकांचं खोकी उचलुन माझ्या गाडीत टाकली की झालं, सगळे देसायांकडे जायला निघु तर कसलं काय? सायोनी चहा करायचा घाट घातला ( आम्ही गेल्यावर). खरं तर सायो, एका हातात चहाची किटली, खांद्यावर फडकं आणि दुसर्या हातात पोह्यांचा डबा घेऊन दारात उभी असेल अशी आमची अपेक्षा होती पण .... जाऊद्या. मग सायो कडे जाऊन सगळे चहा प्यायले अन मग शेवटी नॉर्थ जर्सीच्या बसनी ६.१५ ला देसायांकडे प्लेन्सबोरोच्या दिशेने कूच केली. तिथुनच गप्पांना जो ऊत आला तो आम्ही त्याच जागी रात्री १.३० वाजता परत येऊस्तोवर कायमच होता (ढणाणा!). ७.०५ ला आम्ही (सायो,मी, मंगेशराव, स्वाती आणि झक्की) देसायांकडे पोहोचलो. सगळे तयार होते फक्त मैत्रेयी पार्लर.... नाही नाही कॉर्नरवरच आहे अशी वार्ता(फक्त) आली होती. मैत्रेयी आली (एकदाची) अन मगं बाराची बस निघाली! बशीत, डायवरः अनिलभाई, किन्नरः देसाई, त्यांच्या मागे (डायवर च्या मागुन लेफ्ट टू राइट) सायो, स्वाती, राजश्री. त्या मागच्या शिटावर वृंदा, प्राची, मैत्रीयी. त्याच्या मागच्या शिटावर, मी, शेजारी मंगेशराव आणि सगळ्यात मागच्या शिटावर झक्की! इतक्या मागे बसण्याचा निर्णय झक्कींनी स्वतःच घेतला होता. भाईंनी, घोड्याला एक जोरदार टाच दिल्यवर कसा घोडा खिंकाळत बुंगाट पळायला सुरवात करतो तशी आमची जर्शी बस असली हाकली म्हणुन सांगु! पहिल्या टर्नातच रसत्याच्या कडेच्या ४ ट्रॅश कॅना १ इंचानी भेदायच्या हुकल्या.
रस्तत्यात आता काय विषयांवर बोलणी झाली हे काही आठवत नाही, कमीत कमी १००-१५० विषय तरी हाताळले गेले, ठराव नाही पण मायबोलीवरच्या काही इरिटेटींग आयड्यांच्या सुपार्या देण्यात आल्या. मैत्रीयी नी एका आयडीची सुपारी काढली पण त्याचा गेम वाजवताना त्याला पोत्यात घालुन बुकलायचा अशी अट ठेवली. रसत्यात वृंदाताईंनी खाण्याची असली रेलचेल ठेवली होती की बास! एक एक पदार्थ त्यांच्या पोटलीतुन निघत होते की मला त्यांना "पोटलीवाल्या ताई" आयडी घ्या असं सांगावस वाटत होतं. वृंदाताई आणि प्राची ह्या मायबोलीवर रोमात असतात हे माहित होतं पण त्या किती जबरदस्त रोमात असतात ह्याचा प्रत्यय आला. दोघींना माबो वर चालणार्या सगळ्याच विषयांची अगदी बारिक तपशीलवार माहिती सुद्धा आहे हे बघुन आम्ही सगळेच थक्क झालो. भाई सनाट गाडी हाकत होते. आम्ही जर्शी सोडलं पण नव्हतं तेव्हा पन्ना चा शिट्टी कंपुतुन फोन आला. तुम्ही कुठ पर्यंत आलात हा सवाल सारखा विचारला जात होता. मी आधीच पन्ना जे काही सांगेल त्या पेक्षा आपण वाढवुन सांगायचं हे ठरवलं होतं (मानसिक खच्चीकरणाकरता). मी थाप मारुन दिली की बाराची बस अर्ध्या तासातच लालू महालात पोहोचणार आहे. पन्नानी सुद्दा मग ब्ल्फ पुढे नेत आम्ही तुमच्या पेक्षा पुढे आहोत असं सांगितलं. नंतर कळलं की तेव्हा शिट्टी कंपु दारातुन बाहेर सुद्धा पडलेला नव्हता. मजल दर मजल वगैरे ची भानगड न ठेवता भाईंनी बाराची बस ११.०५ ला थेट लालू महलाच्या पायथ्याशीच नेऊन उभी केली, रसत्यात एकदा सुद्धा गाडी थांबली नाही (अन गप्पा ही).
गाडीतुन उतरताच आम्हाला लांब घराच्या दारातून चालत येणार्या लालूचं दर्शन घडलं, आम्ही मागच्या शिटंवाली मंडळी बाहेर निघुस्तोवर बाराचं महिला ब्रिगेड गाडीतुन उतरुन लालू ला सोबत घेऊन घरात गायब झालं. बाकी आम्ही उरलेले सगळे आता जातानाच रसत्यात सशलचं दर्श्न घडलं. बॅकग्राऊंड ला गाणं नसल्यामुळे तिला चटकन ओळखता नाही आलं. तिला "आज गाणं म्हणत एंट्री नाही का" असं विचारल्यावर तिनी नेहमीच्याच सफाइनी "मला गाणं टायपता येतं गाता येत नाही" असं सांगुन टाकलं. आता गेल्यावर आधीच सगळी लोकं गोल करुन लालू च्या दिवाणखान्यात (खरच हा शब्दच फक्त चपखल बसु शकतो) उभे होते. तिथे सुमंगलताई, श्री भंडारी, स्वाती दांडेकर, सीमा ह्यांच्याशी ओळखी झाल्या. शिट्टी कंपुचा अजुन पत्ता नव्हता.
लालू नी इशारा केला अन सारी मंडळी, तळघरा कडे वळली. हळू हळू लोकं जमत होते.
जोरदार झालेलं दिसतय महागटग
जोरदार झालेलं दिसतय महागटग
मैत्रेयी, रुनी, वैद्यबुवा झकास माहिती व वृत्तांत.
अजून येऊ देत!
अरे वा, आमच्या बे एरियाचा प्रतिनिधी पण होता का
लालू महान आहेस -^-
झाला का महाकल्लोळ
झाला का महाकल्लोळ ग्रेट!!
खरच कमाल वाटते लालू आणि कुटुंबियांची.
६० लोक! आणि १० तास
६० लोक! आणि १० तास अंतरावरुन!
लय भारी! अजुन वृत्तांत द्या लोक्स आणि जमल्यास फोटु.
जर शक्य असेल तर गटगचं एखादं
जर शक्य असेल तर गटगचं एखादं video shooting कुणी केलं असेल इथे अपलोड करा.
व्हॉट्टे महाजीटीजी!! लालू
व्हॉट्टे महाजीटीजी!!
लालू आणि कुटुंबियांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
इतक्या लांबलांबून एकमेकांना भेटायला आलेल्या मायबोलीकरांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहेच, पण त्यांना असं भेटावसं वाटावं ही मायबोलीची महती आहे!!
काल प्रचंड मजा केली. आज या जाणीवेने भारावून जायला झालं आहे.
सविस्तर वृत्तांत लिहायचा प्रयत्न करते.
व्हाड्डा प्लेया - लालू -
व्हाड्डा प्लेया - लालू - व्हाड्डा प्लेया !!!
आय मिस्ड ईट !
लालू तुला एक कडक सॅल्युट
लालू तुला एक कडक सॅल्युट
इतका मोठा सोहळा इतका सुरेख अरेंज केलास......मानावं लागेल तुला. हळुहळु वृत्तांत आकार घेतोय....पण आतापर्यंत जे काही वर्णन वाचलं त्यावरुन एकदम जबरी झालेलं दिसतंय जीटीजी
लिहा आता पटापट आणि फोटो सुद्धा येऊ द्या.......आम्ही वाट बघतोय.
थ्री चिअर्स फॉर अवर मायबोली.......हिप हिप हुर्रे..........हिप हिप हुर्रे.......हिप हिप हुर्रे
बुवा
बुवा
असा जिटीजी गेल्या १० हजार
असा जिटीजी गेल्या १० हजार वर्षात झाला नाही. अधिक माहीती बाकी लोक देतीलच..
बुवा, लालू नी अनिरुद्ध कोण?
बुवा, लालू नी अनिरुद्ध कोण? आणि ७.०५ ला आम्ही सगळे देसाईंकडे पोचलो म्हणालात त्यात माझं नाव कुठाय?
सहीच आयोजक आणि सामील
सहीच आयोजक आणि सामील प्रतिनिधीसुद्धा. लालू तुस्सी ग्रेट हो.
मलाही यायची खूप इच्छा होती, पण लालूकडे केवढी लोकं मावतील माहित नव्हतं म्हणून आले नाही.
>>केवढी लोकं मावतील माहित
>>केवढी लोकं मावतील माहित नव्हतं म्हणून आले नाही
आडो - नोटेड. पुढच्या वेळेस तुला बोलवताना, दरवाजाचे माप मोजलेले बरे
आडो, वर बुवांनी लालूच्या
आडो, वर बुवांनी लालूच्या घराला 'हत्ती दरवाजा' बसवायची विनंती केली आहेच. ती अंमलात आणली की येण्याचे करावे.
नक्की नक्की. फक्त गटग
नक्की नक्की. फक्त गटग ठरविण्याच्या आधी मला ७-८ महिने सांगा, म्हणजे व्हिसा अप्लाय करेन.
लालूच्या घराला 'हत्ती दरवाजा'
लालूच्या घराला 'हत्ती दरवाजा' बसवायची विनंती केली आहेच. >>> सायो पुढच्यावेळेस बाराकर बसऐवजी हत्तीवरुन जाणार आहेत का ?
Pages