युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रेझी लाईन्स बेस्ट आहे. सगळीकडे रेघा मारून ठेवायच्या. डब्यांच्या बाहेरून वगैरे. एकदा रेघा मारल्या की चार दिवस ईफेक्ट टिकतो. नंतर परत मारायच्या. पण कटाक्षाने नंतर हात साबणाने धूणे.

लोणी पुराण Wink

मी सायीला दहि लावलं मग दुसर्‍या दिवशी वेळ नाही मिळाला म्हणुन रात्री लोणी काढायला घेतलं तर सगळा फेस येतोय. लोणी आहे कळतय पण येत नाही, काय करु?

मंजू, शुद्ध हिंग पाण्यात विरघळवून ते पाणी जिथून मुंग्या येत आहेत त्या भेगांमध्ये ओत.

लवंगाच्या वासाने पण मुंग्या येत नाहीत. त्या भाजून, पूड करुन टाकून द्यायची. गोव्याला पण मुंग्या फार त्रास द्यायच्या. मी त्यांचा माग ठेवून, त्या भेगा आणि छिद्रे, गरम मेणाने बुजवून टाकायचो. खात्रीशीर उपाय, पण बराच वेळ लागतो.

निकिता, ते सगळे घुसळलेले प्रकरण, फ्रीजमधे ठेवून द्यायचे. जर लोणी असेलच तर ते वर तरंगेल. मधे पाणी राहिल व ताक खाली बसेल. थोडाफार फेस विरेल पण काहि राहिलही. मग वरचे लोण्याचे बारिक गोळे, गाळणीने वेगळे काढता येतील.

फ्रिजात ठेऊन झालं असेल आणि जमलं नसेल तर...

उन्हाळ्यात लोणी काढायची आईची पद्धत
उन्हाळ्यात सायीचं भांड सकाळी उठल्या उठल्या काढून ठेवायचं एखादाच तास जाऊ द्यायचा..उन्हं व्हायच्या आत घुसळायचं, उन्हं झाली की लोणी न येता फेस येतो.. (स्वानुभव) जर असं होत असेल तर त्यात चक्क थोडासा बर्फ घालून घुसळावं लोणी येतं.

हिवाळ्यात..थोडंस गरम पाणी घालावं लागत

श्यामलीला अनुमोदन... बर्फ नाहीतर फ्रिजच थंड पाणी घालुन घुसळाव. लगेच लोणी वेगळ होत.

चिन्नु धन्यवाद.. Happy पोळी आपटली... २ दिवस बर्‍या होतायंत पोळ्या.. Happy
प्रिती आता अ‍ॅल्यूमिनियम फॉईल ट्राय करिन, किंवा झिपलॉक ची पिशवी ट्राय करू का? पण गरम पोळी आपटून लगेच त्यात टाकू का? घाम सुटेल का पोळीला? Uhoh

चांगली प्रगती आहे दक्शे... पोळीबरोबर तोंडीलावणेही जमते की नाही??? सगळे जमायला लागले की बोलव एकदा जेवायला Happy

लोणी आलं. थोडावेळ घुसळल्यावर.
दिनेशदा, ताकचे कुठ्ले पदार्थ?

ईथे बंगुत एक्तर गाइचे दूध.. आणि वर हाताने लोणी घुसळुन काढायचे म्हन्जे जाम वैताग यायचा.. म्हणुन मी सरळ फूड प्रोसेसर मध्ये घुसळायला सुरु केले.. आता बदाबदा लोणी नि बदाबदा तूप Proud

पण इथे स्पेशल नि ऑर्डिनरी असे वेगवेगळे दूध का मिळते काही समजले नाही.. मी स्पेशलच घेते म्हणा..त्याचा चहा चांगला होतो. Wink

>>आता बदाबदा लोणी नि बदाबदा तूप >> किट्टु Lol
जरा हिकडं लावून दे तूप... Wink

बेबे - तुला बोलवावं लागतं का? कधी पण ये, चांगलं तोंडीलावणं करून घालिन. पण फक्त व्हेज बरं.. Happy

बर्फी?

निकिता,
ताकाची कढी, पाटवड्या बि ने लिहिलेला एक महाशिवरात्रीचा प्रकार असे बरेच प्रकार आहे.

मुग्धा
खारकांची पुड घालून, मेथीचे लाडू, डि़काचे लाडू करता येतात.
आंबाडींच्या पानांचे लोणचे, खारकांची पुड घालून छान लागते. कुठल्याही तयार, तिखट लोणच्यात ती घालता येते. त्याचे सारण करुन पोळ्या करता येतील. (पण फार भाजू नयेत. कडवट लागतील )

मी ८/९ महिन्यापुरवी १० किलो बासमति तांदुळ घेतला होता...एक दोनदा तो वापरला, पण नंतर विसरन गेले..
४ दिवसापुर्वी पाहिला तर त्याला टोके लागलेले...

मी तो तांदुळ चाळुन घेतला...तरि टोके काहि गेले नाहित्..मग मी सरळ तो धुवुन काढला आणी वाळवला..
मी त्याचा भात करते सध्या...पण चव थोडी बदलली आहे...त्याचे काहि करु शकते का?

७/८ किलो शिल्लक आहे..काय करु ? एकदा वाटले कि दळुन भाकरी करु..पण जिवावर येतो..

तादूळ धुतल्याने त्याची चव बदलली. खरे तर उन्हात ठेवले असते वा पार्‍याच्या गोळ्या (पातळ कापडात गुडाळून ) ठेवल्या असल्या तर टोके गेले / मेले असते.
त्याचे करण्यासारखे अनेक प्रकार आहेत. पिठ करुन ते, मोदक, आंबोळ्या, शिरवळ्यासाठी वापरता येईल. भाकर्‍या पण करता येतील.
भाजून, दळून त्याचे तांबिटाचे लाडू करता येतील.
भाजून रवा काढून, त्याचा उपमा, कंदंबम. धोंडस, वाफोळॅ, खांडवी वगैरे करता येतील.

काल दुपारी दही वडे करायचे म्हणुन ३ वाटी उडीद दाळ भिजत घातली...दहीवडे करायला वेळ मिळाला नाही...
आज सकाळी ग्राईंड केले. आणि खराब होउ नये म्हणुन फ्रिज मध्ये ठेवले.
घरातली तळकट खाणारी मंडळी बाहेरगावी गेली आहे...त्यामुळे मेदु वडे अथवा दहीवडे करायचा काहीच चांस नाही.
फ्रीज मधलं ते पीठ किती दिवस टिकेल..?
मेदु वडे आणि दही वडे सोडुन त्याचं काय करता येईल..लो कॅल ऑप्शन असेल तर नक्की सांगा...

दिनेशदा,

डिंकाचे लाडु करायलाच ती पूड आणली होती बाबांनी..पण अजुन मुहुर्त नाही लागला कराय्चा..
पोळ्या करुन बघेन....पण त्यात साखरेचं किती प्रमाण घालायचं..?

धन्यवाद प्रिती,

नक्की करुन बघेन खारकेची खीर..

ते पीठ एक दिवस बाहेर ठेवून आंबू द्यावे. मग त्यात तांदळाचे पिठ, वा गव्हाचे पिठ वा मैदा मिसळून, अनेक प्रकार करता येतील (जसे डोसे, उत्तप्पा, इडली वगैरे ) काहि न मिसळता, कांजीवडे पण करता येतील. (ते तळलेले असले तरी तेलकट नसतात. )
ते पीठ सात आठ दिवस टिकेल.

त्या वडया च्या पिठात १ वाटी उरद डाळ तर २ वाटी इड्ली रवा असे मिसळून ८ तास बाहेर ठेवले तर इड्ली होइल.
इड्ली वडा चट्णी सांबार असे करता येइल.

रसम व वडा असे मोठ्या सूप बोल मध्ये - यासाठी नेहमी पेक्षा जरा मोठा वडा बनवायचा मध्ये भोक असलेला म्हणजे नीट तळला जातो. गरम रसम मध्ये सोडायचा. वरून लोणी हवे असल्यास. झकास कंफर्ट फूड.

वरील इड्ली पीठ व वडा पीठ - छोटया छोट्या इड्ल्या व वडे करून सांबारात सोडायचे.

पोंगल वडा चट्णी. अतिशय पोट्भरीचा ब्रंच मेन्यू.

उन्हाळ्यात अशी डाळ खूप बाहेर राहिली तर फार आंबते व वडे फार तेल पितात. लवकर संपवले तर बरे.

डोसे, उत्तपम आहेच.

रसम आणि वडा चा ऑप्शन आवडला....

प्रॉब्लेम असा आहे..की घरातले मला धरुन दोघं डाएट वर आहोत...आणि तळीव खाणारी पब्लिक घरी नाहीए...

नाहीतर रोजच वडे तळले असते..

माझ्या ऑफिसचे लोक येणार आहेत घरी दोन तीन दिवसा नंतर तोपर्यंत पीठ टिकलं म्हणजे झालं...

धन्यवाद दिनेशदा... ह्या पार्‍याच्या गोळ्या कुठे मिलतिल..
निदान पुढल्या वेळी असे झाले तर मी पुन्हा ति चुक करणार नाहि...

मी काल नाचणीच्या पिठाचे डोसे ट्राय केले. ते आमच्या भिड्याला (भिडे= घावण, आंबोळे करायचा बिडाचा तवा, आडनाव नाही) इतके आवडले की तो आम्हाला सोडवूच देईना डोसे. मग त्यात रवा घालून त्याचे अप्पे केले.मस्त झाले. भिड्याचा पचका झाला.मुग्धा तुम्हालापण अप्पे करता येतील्..तेल खूपच कमी किंवा नाहीच लागत.
नाचणीचे पीठ खूप बारीक असल्याने डोसे होत नाहीएत असे माझी आई म्हणते.

Pages