युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळ्यांना लावु शकता. नाहीतर सरळ फेकुन द्यावे. वाईट परीणाम असतात एकदा तापवलेले तेल परत तापवण्याचे. नक्की काय ते माहीत नाही.

पोळ्यांना तर मुळीच वापरु नये. पोळ्यांना वास येतो कै च्या कै च. मग घरात्ले त्या पोळ्या खात नाहीत Sad

काही गोष्टी टाकण जीवावर येतं खरं पण आत्ता त्या वाचवायच्या आणि मग डॉक्टर आणि औषधावर जास्त पैसे घालवायचे Sad त्यापेक्षा टाकलेलं बरं.

अन्ना टाकताना जीवावर येत खरं पण उद्या जीवावर बेतण्यापेक्षा वेळीच टाकलेल बरं

आईसक्रीमपेक्षा, कुल्फीचे मिश्रण जास्त आटवावे लागते, त्यात पाण्याचा अंश कमीत कमी हवा. ते बासुंदीपेक्षाही दाट असावे. तसेच कुल्फी ठेवण्यापूर्वी फ्रीज कोल्डेस्ट वर ठेवावा.

प्राची, विरजण नसताना दही लावण्यासाठी वाटीभर गरमसर दूध घेऊन त्यात तुरटीचा खडा ४-५ वेळेला एकाच दिशेने फिरवावा... आणि मग ते भांडं हलवू नये.
दही लागेल....

बर्फ न होण्या करता साधारण पणे ३ तासांनी मिश्रण बाहेर काढून चर्न केलं तर उपयोग होईल. त्याच प्रमाणे स्टेबिलायझर पावडर चा पण उपयोग व्हावा. अमेरिकेत मिळते का स्टेबिलायझर पावडर मला माहित नाही. नुकतंच ऐकलं की ही पावडर घालताना थोड्या साखरेत मिसळून घालावी म्हणजे आईसक्रीम चिकट होत नाही.

आमसुलं भिजवून ठेवून मग ते पाणी (आमसुलं काढून) दुधात मिसळावे म्हणजे दही लागते.>>>
पण दह्याचा रंग नाही क चेंज होत ह्या मुळे?

पण दह्याचा रंग नाही क चेंज होत ह्या मुळे?>>> थोडा बदलतो रंग. मी एक वाटीभर दही असे तयार करून मग ते विरजण म्हणून वापरते.

एका पॉटलकसाठी ५ कप मुगडाळ (मुगभजी साठी) भिजवली होती. भिजल्यावर फुलुन ती बरिच जास्त झाली होती. भिजलेल्या डाळितली २ वाट्या डाळ आणी वाटलेले २ कप भजीच तयार पिठ उरलय त्याच (अजुन मुगभजी,पराठे ई आणी अजुन)काय करता येतिल?

प्राजक्ता,

- भिजलेली डाळ वाटुन ढोकळे कर.
- डाळ वाटुन भाजुन कोरडी करुन त्याचा गोड शिरा, उपमा, लाडु करता येतिल.
- डाळ वाळवुन मग तळुन त्यावर मीठ भुरभुरुन तळलेली मुगाची डाळ (हल्दीराम स्टाईल) करता येइल.
- डाळ वाटुन त्यावर हिंग, मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता यांची फोडणी घालुन 'चटका' करता येइल. हवं असल्यास दही घालायच.
- भिजलेली डाळ भाज्यांमधे - पालेभाजी, दुधी, ढोबळी मिरची इ. - घालता येइल.
- पीठाची धीरडी घालता येतिल.

अजुन काही आठवले तर सांगिन Happy

उकळत्या दूधात लिंबू पिळून पनीर केले आहे. ते पनीरचं पाणीही कशाकशात वापरता येतं ना? कशात वापरतात? कृपया माहिती असल्यास सत्वर लिहा. धन्यवाद.

पूनम, मला माहिती असलेले उपयोग - कणिक भिजवायला, वरण / आमटीत, थोडे पाणी पुढच्या वेळेस पनीर बनवायला (फ्रिजमध्ये ठेवावे लागेल). हे पाणी वापरुन पनीर थोडे सॉफ्टर बनते लिंबापेक्षा.

लहान बाळांना पाजतात पनिरचे पाणी, डायरिया वगैरे रोखायला. मुलांना त्या पाण्यात कणिक भिजवून पराठे देतात.

पूनम माझ्या मैत्रिणीची आई क्लासेस घेते बंगाली मिठाई शिकवायचे ती हे पाणी बाटलीत भरुन ठेवते पुढच्या वेळी पनीर बनवायला. त्या सांगायच्या पनीर वॉटर नसताना आधी अर्धी वाटी दुध लिंबु घालुन फाडुन घ्या मग त्या पाण्यानी बाकीच दुध फाडा म्हन्जे रसगुल्ले,मलई सन्ड्वीच बनवायला योग्य अस मऊ पनीर तयार होईल.

ग्रेट! धन्स सगळ्यांनाच. ह्या सर्व टीप्स लक्षात ठेवेन.
म्हशीच्या दूधाचं पनीर केलं होतं. त्यामुळे त्या पाण्यात बराच स्निग्धांश होता, म्हणून टाकवत नव्हतं. मस्त मधुर चव होती त्याला. त्यात मी आंबट ताक घातलं, चवीला मीठ-साखर आणि वरून तूप-जिरं-मिरचीची फोडणी देऊन अगदी थोडं गरम केलं. थोडक्यात त्याची कढी केली (न उकळवता). मस्त लागली Happy
आर्च म्हणते तसं, त्यातलं थोडं पाणी पनीरची भाजी केली होती त्यातही वापरलं. फारच मलईदार झाली भाजी.
ते पाणी मी संपवून टाकलं, कारण नेहेमी असं पनीर करत नाही. मग पुढच्या सहा महिन्यांनंतर होणार्‍या पनीरसाठी ते उगाचच फ्रीजची धन करायला ठीक वाटलं नाही.

आईने भाकरीसाठी दिलेल्या टिप्स इथे एक-दोघींना उपयोगी पडल्या म्हणून इथे देते आहे:
प्लॅन A : ज्वारी अथवा बाजरीचं पीठ कोमट पाण्यात भिजवायचं. एका भाकरीचा गोळा घेऊन त्याला पाण्याचा हात लावत भरपूर मळायचं (माकाचुच्या भितीने मी अगदी मनगटाला रग लागेतो मळते ;)). मग ताटात कोरडं पीठ घ्यायचं आणि पीठाच्याच हाताने हलके हलके गोल फिरवत भाकरी थापायची. भाकरी थापताना भेगा पडल्या तर पीठ नीट मळलं गेलं नाही असं समजायचं. अजिबात गोल फिरत नसेल आणि हाताला चिकटत असेल तर पीठ सैल आहे. मग त्यात अजून थोडं कोरडं पीठ घालुन मळुन घ्यावं लागेल. भाकरी थापुन झाली की उचटण्याने/पिझा सर्वरने कडा हलके उचलत हातावर घ्यायची. ज्या बाजूस पीठ जास्त ती बाजू वर येइल अशा बेताने भाकरी तव्यावर टाकणे (ह्याला शॉर्टकट म्हणजे सरळ ताट उलटं करुन भाकरी हातावर घ्यायची. ताटातलं पीठ सांडुन रहाडा होतो. पण आधीच एक कागद खाली पसरुन ठेवायचा). वरुन पाण्याचा हात फिरवायचा. एक बाजू चांगली भाजली गेली की आच वाढवून दुसरी बाजू भाजायची. इलेक्ट्रिक स्टोव्ह असेल तर दुसरी बाजू भाजताना तवा काढून पापड भाजायची जाळी ठेवायची. तवा चांगला तापला असेल तर नुसत्या तव्यावर भाजून सुद्धा छान फुलते भाकरी. अगदीच नाही तर पापुद्रा तर येतोच.

प्लॅन B : भाकरी अजिबात थापली जात नाहीये असं वाटलं की पीठ चांगलं मळुन थालिपीठासारखं तव्यावर थोडं तेल लावुन थापायची आणि एक बाजु झाकण घालुन तर एक बाजु तशीच भाजुन घ्यायची.

सिंडरेला, मी करुन पाहीली तु दिलेल्या पद्धतीनी. पण भाकरी भाजल्यवर ज्या बाजुने पाणी लावतो, ती बाजु पाहील्यावर दुष्काळ ग्रस्त जमीनीची आठवण झाली. मा.का. चु,? हा प्रश्न मा. का.चु. मधेही टाकते आहे. पण ईथेच वरील चर्चा सुरु असल्यामुळे ईथेही घालते आहे.

स्प्रिन्ग रोल जर सारण भरून तयार करून न तळता फ्रीझर मधे ठेवले आणि आयत्या वेळी तळले तर चालतील /टिकतील का? ते फ्रीझर मधे साठवून ठेवताना ची काही विषेश युक्ती आहे का?म्हणजे हवाबन्द डबा/फॉईल/झिप लॉक ई.

Pages