सप्रेम नमस्कार - प्रवेशिका २ (साधना)

Submitted by संयोजक on 3 February, 2010 - 05:07

माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.

-साधना

hastakshar_entry_2_1.jpghastakshar_entry_2_2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिच्या विचारप्रक्रियेची सुस्पष्टता एकदम भारीये >> एकदम जबरी. ९ वी त असा विचार करु शकते ह्याचे कौतूक.
त्याशिवाय साधनाने तिच्या मुलीला असे स्वंयप्रकाशी वाढवले म्हणून साधनाचे कौतूक. हे एक पालक म्हणून नक्की शिकायला आवडेल.

साधना पत्र आवडलं , स्पष्ट विचार आहेत तिचे ,तिला जर आर्ट आवडतं तर आर्टच करु द्या , हल्लीच्या मुलांच खुप कौतुक वाटतं , पुढे जाऊन काय करायचं हे बर्‍यापैकी ठरलेलं असतं , नाही तर आम्ही, कोणी विचारलं की फक्त म्हणायचो " मोठा होऊन इंजिनियर बनणार" , अरे पण कशाचा ? काय ? काही पत्ता नव्हता ! Proud

साधना.. इतक्या कमी वयात कसले स्पष्ट विचार आहेत ग लेकिचे.. खरच तिच्या मना सारखं होऊ दे.. फार छान लिहिलय.. खास करुन मराठी पण किती छान आहे तिचं.. Happy

खरंच खूप मॅच्युअर विचार आहेत तुझ्या लेकीचे. स्वतःचीच अशी एक पर्सनॅलिटी आहे तिची.हे कर, ते कर, म्हणून जबरदस्ती करण्यात काही अर्थच नाही नी ती करु देणारच नाही.

छान पत्र.. सुस्पष्ट विचार आणि मांडणी.

साधना. तिला भरपूर वाचन करू दे. उत्तम लेखिका नक्की बनेल. तिला माबोची मेंबर बनव आणि तिचे फोटो तिलाच अपलोड करू दे. Happy

बर्‍याच वर्षांनी टीनएजर मुलीचं पत्र वाचायला मिळालं. अक्षर तर सुरेख आहेच पण त्यापेक्षा जास्त जाणवलं की विचार अगदी स्पष्ट आहेत. तिची स्वप्नं, भविष्याबद्दलच्या अपेक्षा सगळं कसं लख्ख उतरलंय. अजून वय अल्लड आहे हे ही जाणवतं आहे. पण तिचं व्यक्तीमत्व अगदी ठाम वाटतं त्याचं खूपच कौतुक वाटलं. आणि इतक्या मोकळेपणाने तुम्हाला लिहू शकतेय ह्याबद्दल तुमचं ही कौतुक. आई मैत्रिणीसारखी वागत असेल तरच असं पत्र लिहिता येईल आईला.

Pages