सप्रेम नमस्कार - प्रवेशिका २ (साधना)

Submitted by संयोजक on 3 February, 2010 - 05:07

माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.

-साधना

hastakshar_entry_2_1.jpghastakshar_entry_2_2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय. साधना, तिच्या मनासारखं कर गं! Happy तिचे विचार किती स्पष्ट आहेत पहा- किती कमी खाडाखोड आहे. कौतुक वाटलं Happy अक्षरही सुबक, एकसारखं आहे.

साधना मुलीचं आणि तुझंही प्रचंड कौतुक वाटलं.
तिच्या विचारप्रक्रियेची सुस्पष्टता एकदम भारीये.
हेही जाणवलं की एखाद्या सिनेमाचा मुलांवर किती परिणाम होऊ शकतो.

अगं ती कसली भारी पत्र लिहिते. परवाच एक लिहिलेय चार पानी, त्यात मला तिच्या मैत्रिणीला पत्र पाठवण्याचा आग्रह केला होता. एकदा वाटले तेही पत्र टाकावे इथे, कारण तिची मैत्रिणीसाठीची तळमळ त्यातुन दिसते, पण मग खुपच पर्सनल वाटले म्हणुन टाकले नाही....

छान अक्षर आहे Happy
"सायन्स साईड घ्यायची होती"
होती ला अन्डरलाईन!
लक्षात घ्या हो साधनाजी......

बायदिवे, मुलान्पेक्षा बहुतेक मुलिन्ची अक्षरे छानच अस्तात का?
मुलान्ची पण असतात, पण माझ्या बघण्यात प्रमाण कमी आहे.

लक्षात घेतलेय.. Happy

तिच्या पुढच्या पत्रात तिने प्रत्येक च खाली दुहेरी रेघ मारलीय आणि आधीच लिहिलेय की दुहेरी रेघ अशासाठी की त्या च चे महत्व लक्षात यावे म्हणुन..... ती पत्रात व्याकरणाच्या चुका करते असे मी नेहमी लिहिते, म्हणुन माझ्यासाठी तिने लिहिलेय की व्याकरणापेक्षा content जास्त महत्वाचा असतो हे तु ध्यानात घेच.. इथे परत च खाली दुहेरी रेघ... Happy

वा.... एवढ्या लहान वयातही केवढे क्लिअर आहेत तिचे विचार. पत्रातून तुम्हां मायलेकीचे मैत्रीणीचे नातेही जाणवते.
साधना, लेकीला तिच्या मनासारखे सगळे मिळो, या माझ्या शुभेच्छा!

कसलं झक्कास पत्रं लिहीलंय ऐशूने... तिची मतं इतकी ठाम आहेत की तिच्या मनाविरुद्ध काही करता येणारच नाही. आणि विचार स्पष्ट आहेत तिचे, ती जी भूमिका घेईल तिला धरून राहण्याचं बळ तिच्यात व्यवस्थित आहे.

MA, BA करेन आणि जाईन जंगलात.... वाचून जाम हसले मी. Lol

खरंच काय स्पष्टपणा! साधना, तुम्ही मुलीला इतका स्वतंत्र विचार करता येण्याइतकं छान वाढवलंत म्हणून तुमचं कौतुक करु की लहानवयातच स्वतःचं मत ठामपणे मांडता येण्याबद्दल मुलीचं कौतुक करु?
दोघींचंही अभिनंदन!
आणि या उपक्रमाचा आनंद पहिल्याच पत्रवाचनातून मिळाल्याबद्दल संयोजकांचे अनेक आभार! Happy

साधना , काय सुरेख पत्र लिहीलय लेकीने!!! ९ वी तल्या मुलीचे इतके क्लिअर विचार पाहुन छान वाटलं. तिला पुढिल आयुष्या साठी शुभेच्छा Happy

बाप रे किती समजुतदार लेक तुमची, किती मस्त पत्र लिहिलयं! नक्की कुठे काय म्हणयचे आहे ते अगदी स्पष्टपणे मांडता आलयं तिला.

Pages