मधेच एकदा झटका येऊन मी माझ्या मैत्रिणींना एक इमेल पाठवल होत त्यातलाच एक भाग इथे कॉपी पेस्टतेय
त्याआधी हे थोडसं (?) निवेदन..
-----------------------------------------
आपल्या पैकी बहुतेक सर्वांना कधी ना कधी किंवा नेहमीच हे प्रश्न पडले असतील. मंजुडीने मला तेव्हाच म्हणजे इमेल केल तेव्हा "हे तू संगोपन मधे टाक ना" अस सुचवल होत. पण बर्याचदा ही नाव पाण्यात सोडल्यावर "वादळ वार्यात" किंवा अजुन अनेक परिस्थितीत कुठच्या किनार्याला लागेल, मुळात ती किनार्याला लागेल की नाही की तिची टायट्यानिक होईल हे आपल्या हातात रहात नाही. ह्याच भितीने मी तिला पाण्यात सोडायला घाबरत होते.
स्मिताच्या लेखावर पालकगृप सुरु करुयात ह्या माझ्या इच्छेला तसेच सकारात्मक एको आले, ज्यामुळे विचार आला "पुढे कधी तरी वादळात नाव हरवेल ह्या विचारात मी तिच वहाणं कशाला रोखू अत्तापासुनच...? कदाचित जाईल की ती तरुन्....आणि वर्स्ट कम वर्स्ट झालीच तिची टायट्यानिक तरी निघेलच की काहीतरी त्यातुन चांगल....
हाच विचार करुन ह्या होडीला/नौकेला/तराफाला जे काय म्हणाल त्याला देतेय सोडुन प्रवाहात....
-----------------------------------------------------------
काय जास्त कठिण आहे?
प्रसुती वेदना साहुन बाळाला जन्म देण? अर्थात आईसाठी तो "पुनर्जन्म" मानतात पण आता बाळ
जस जस एक एक वर्ष मोठ होतय तस तस कळतय "ह्या प्रसुती वेदना" ही तर परिक्षे मधली एक
सुरुवात होती, आईपण निभावणं...एक पालक होण हे ह्याहुन मोठं (आवडत असल तरी) कसरतीच
काम आहे.
जसं अती उन किंवा अती सावली, जरुरी पेक्षा जास्त पाणी, खत हे रोपाच्या वाढी साठी वाईट आणि
प्रत्येक रोपासाठी "अती म्हणजे किती/ जरुरी पेक्षा कमी अधीक ठरवताना जरुर किती" हे वेगवेगळ
तसच मुलांचही ना?
मग हे ठरवायच कसं?
शिक्षा करायची? करायची तर कधी?कशी? किती?
"लेट गो" करायच तर किती प्रमाणात?
शिक्षेने किंवा लेट गो ने उलटा परिणाम तर नाही होणार ना?
पालकांपैकी दोघांच्या दोन भुमिका असतील तर..? कसा साधायचा सुवर्ण्मध्य?
"छडी लागे छमछम" ह्या तालावर वाढलेली आधीची पिढी कुठे कशात कमी आहे? आणि मी
अजिबात मार न खाऊन देखील कुठे वाया गेलेय?
मुळात इतका विचार करायची खरच आवश्यकता आहे मुलांना वाढवताना? आपल्या आधीच्या पिढीने
केलेला का इतका विचार? जर नव्हता केला अस मानल (कारण माझ्या आईच नी साबाईंच उत्तर असच आहे--"कधी मोठी झाली मुल ते कळलच नाही") तर वाढलोच की आपण.
माझ्या माहितीतल्या काहिंचा "रट्टा" देऊन "ठिक" करण्याकडे कल दिसला मला.
मला हे "ठिक करण" म्हणजे काय तेच कळत नाही आहे. मुलांनी "आपल्या आखलेल्या मार्गाप्रमाणे केलं
म्हणजे ठिक का?" अर्थात म्हणनु काही त्यांना "शॉक बसे पर्यंत " वीजेच्या बटणांशी खेळू द्याव असा
नाही. पण मारुन, धमकावुन, भीती घालुन मुलं पुढे पुढे शक्य असेल तेव्हा काही गोष्टी आपल्या
पासुन लपवायचा प्रयत्न करतात. पालक म्हणुन हे जास्त वाईट नाही का?
मग शिक्षा असावी तर ती कशी असावी? एखादी गोष्ट केली गेली तर ती का केली गेली ह्यावर विचार केला तर?
ओरडण्याने, मारण्याने मुलं control मधे रहातात अस म्हणतात. खर आहे का ते? आणि असेल तर
ह्याचा इफेक्ट किती काळ रहाणार? जोपर्यंत आपण "बळी तो कानपिळी" मधले "बलवान" आहोत
तोपर्यंतच ना?
नुसत कंट्रोल ठेवण्यापेक्षा त्यांनाच विचार करायला का शिकवल तर? रस्ता कठीण म्हणजे लाँगकट वाला असेल पण फायद्याचा नाही का? शिस्तत हवी पण नुसती धाकाने आलेली नको ती आतुन
यायला हवी. ह्यासाठी धाकदपटशाचा शॉर्टकट कामाचा नाही, संवादच हवा.
म्हणजे असं काही झालं की मुल रडतय----तर त्याला नुसतच आंजारण्यापेक्षा किंवा ओरडुन "रडू
नकोस" अस सांगण्यापेक्षा "काही तरी सांगण्यायासाठी/व्यक्त होण्यासाठी" ते रडतय तर तेच सांगण/व्यक्त होण दुसर्या मार्गने म्हणजे बोलनु वगरै करता येईल त्याला/तिला हे त्याला/तिला का नाही पटवुन देऊ शकत आपण?
अर्थात दरवेळी ते आपल ऐकतील अस होणार नाही. "heart & head" चा बॅलन्स जमायला हवा इतपत
सध्या जाणवतय, बघुयात बाकी तिच्या बरोबर मी ही एकेक गोष्ट शिकत जाईनच.
बाकी राहीला मुद्दा शिक्षा करण योग्य का? जर हो तर काय करावी? किती करावी? वगैरे वगैरे वर
अजुन माझा विचार चालुच आहे. येव्हढ नक्की शिक्षा करताना ती "bad things/behaviour" साठी
असावी कारण "bad boys/ bad girls" हे माझ्यामते कोणीच नसतात.
शिकायच तिने नाहीच आहे. ते काम माझ आहे. सुवर्णमध्यय साधता यायला हवा अगदी दरवेळेस नाही
तरी बर्याच वेळेस मुळात मी ही चुकत माकतच शिकणार हे आधी मीच मान्य करायला हव.
तुमचा काय अनुभव आहे?
------------------------------------
(ता.क.:
१)अब्राहम लिंकनच ते फेमस पत्राची इकॉपी कधीतरी वाचलेली आठवतेय्...तेच तर सगळ हवय/वाटतय आपल्याला हे देखील कळतय्...पण कस? किती जमेल? अर्थात ते काळच ठरवेल पण प्रयत्न तर नक्कीच आपल्या हातात आहेत्..(तुम्ही वाचलय हे गृहीत धरुन लिहीतेय्..नसेल वाचल तर "गुगल देवीकी जय" म्हणुन गुगला नक्की मिळेल्...आणि नक्की वाचा..)
२)हे संगोपनमधे सकाळ पासुन पोस्ट करत होते पण येव्हढ सगळं पोस्टच होत नव्हतं (माझ्या अपेक्षा आणि संगोपनाच्या मर्यादा ह्यामुळे होत होतं बहुतेक :P) (तरी शेवटी पोस्टल बुवा हे धनुष्य इथे...हुश्श!....पोस्टताना येव्हढी दमछाक झाली तर उचलताना किती होत असेल
3)एकाच बोटितुन प्रवास करणार्यांनो ..करायचा का "पालकगृप" आपला?
४) स्मिता खास तुझ्या साठी --"तू वर्कशॉप अॅरेंज करतेस मुलांसाठी तसेच एकत्रित करता येतील का आपल्याला? म्हणजे आपल्या आपल्या विभागात असे समविचारी एकत्र येऊन काही चांगल करु शकतील. बर्याचदा करायची इच्छा असते पण एकतर नीट कल्पना नसते काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल अॅरेंज असा वर्कशॉप. तुझ्या अनुभवाची मदत होऊ शकेल. मी पुर्वीही तुला खाजगीत हे सांगितलय आता इथे पुन्हा जाहिर पणे सांगतेय. तू ही गोष्ट मनावर घेच."
हुर्ये...सकाळपासुन ट्रायत
हुर्ये...सकाळपासुन ट्रायत होते आत्ता व्यवस्थित पोस्ट झाल एकदाच
कवे खुप छान उपक्रम ! नक्कि
कवे खुप छान उपक्रम ! नक्कि करुयात पालक ग्रुप ! :स्मितः
मलाबी घ्या त्यात
मलाबी घ्या त्यात
मला हि आवडेल त्यात सामिल
मला हि आवडेल त्यात सामिल व्हायला..पण सर्वानि मिळुन काहितरी चर्चा व्हायला पहिजे चांगलि..कारण वरति तु मांडले आहेस ते विचार प्रत्येकाच्याच मनात कधि ना कधी येउन गेलेले असतात...खरच एखादे ई वर्कशॉप करता येइल का?
छान लेख! >> "काही तरी
छान लेख!
>> "काही तरी सांगण्यायासाठी/व्यक्त होण्यासाठी" ते रडतय तर तेच सांगण/व्यक्त होण दुसर्या मार्गने म्हणजे बोलनु वगरै करता येईल त्याला/तिला हे त्याला/तिला का नाही पटवुन देऊ शकत आपण? <<
अगदी शक्य आहे... मी प्रत्यक्ष उदाहरण पाहातोय... माझा एक मित्र आणि त्याची ३ वर्षाची मुलगी. तो अगदी लॉगिकली तिला सगळं समजाउन सांगतो. भोकाड पसरण्यापरेंत केस कधी जातच नाही. आतातर ती उलटं तिच्या आइ-बाबांना लॉजिकली समजावते की एखादी गोष्ट तिला का हवी/नको ते!! आकांडतांडव बिल्कुल नाही कारण तिला कळुन चुकलय त्याचा काही उपयोग नाही.
पण ह्यासाठी पालकांची इच्छा, तयारी आणि संयम लागतो...
कवे मस्तच मांडलयस ग मनोगत ,
कवे मस्तच मांडलयस ग मनोगत , अगदी पर्फेक्ट शब्दात,प्रत्येकाच्या मनात असणार अगदी नेमक उतरवलयस
धन्यवाद सर्वांनाच. चला बरेच
धन्यवाद सर्वांनाच. चला बरेच प्रवासी आहेत म्हणायचे माझ्यासारखेच
@सॅम ---मी देखील असाच प्रयत्न करत असते सतत. कधी इफेक्ट होतो कधी वेळ लागतो. अर्थात माझी तयारी आहेच पेशन्स वाढवायची (तो वाढवावच लागतो म्हणा ;)) पण तुमचा मित्र कशा पद्धतीने समजावतो ते जाणुन घ्यायला आवडेल. वर मी रडण्याच्या बाबतीत लिहीलय ते एक उदाहरण म्हणुन लिहीलय. असे बरेच प्रसंग असतात "पारा आत्ता फुटेल की मग" ह्याची टेस्ट घेणारे
@मृ - इवर्कशॉप ची कल्पना खरच खुप छान आहे. ती कशी अमलात आणता येईल ह्याबद्दल काही सुचवता येईल का? सध्या माझ्या डोक्यात फक्त मुलांच एखाद वर्कशॉप घेता येईल का हाच विचार आहे. पालकांच्या इवर्कशॉपसाठी मला वाटत जर कोणा कौंन्सलरचा लेख, सल्ला मिळु शकल तर फायदा होऊ शकेल (हे एक सध्या सुचलय)
@थंड, मने त्या स्मिते ला जाग करा कुणितरी जाऊन. तिने यशस्वी वर्कशॉप घेतलय मुलांच पुण्यामधे. आपण तिघी मुंबईच्या आहोत, इथे अस वर्कशॉप घ्यायला तिचीच मदत होईल.
स्मिते बाई नुसत मांडुन काय
स्मिते बाई नुसत मांडुन काय उपयोग. तो शेवटचा ता.क. तुझ्यासाठी आहे, त्याच काय ते बघ
तुला इमेलुन, फोनुन सांगितल पण काय हलली नाय गाडी म्हणुन इथेच मांडल आता 
पालकांच्या इवर्कशॉपसाठी मला
पालकांच्या इवर्कशॉपसाठी मला वाटत जर कोणा कौंन्सलरचा लेख, सल्ला मिळु शकल तर फायदा होऊ शकेल >>>> ह्या साठी जुईली आपल्याला नक्की मदत करेल
शी इज द पर्फेक्ट पर्सन फोर धिस. मी बोलते तिच्याशी ह्या शनीवारी. 
का तुम्हाला आयडीया देऊ वेगवेगळ्या, त्या भरपूर आहेत माझ्या कडे. ह्या रविवारी पण माझ्या कडे आहे एक छोट वर्क्शॉप मुलांसाठी 
कवे म्हणजे मी मुंबईला येऊन वर्क्शॉप घेऊ का ??
@मृ - इवर्कशॉप ची कल्पना खरच
@मृ - इवर्कशॉप ची कल्पना खरच खुप छान आहे. ती कशी अमलात आणता येईल ह्याबद्दल काही सुचवता येईल का? सध्या माझ्या डोक्यात फक्त मुलांच एखाद वर्कशॉप घेता येईल का हाच विचार आहे. पालकांच्या इवर्कशॉपसाठी मला वाटत जर कोणा कौंन्सलरचा लेख, सल्ला मिळु शकल तर फायदा होऊ शकेल (हे एक सध्या सुचलय)
---- कौंन्सलरचा लेख, सल्ला हे तर मस्तच...पण सुरुवातिला मायबोलिकरां मध्येच पालक मुलांच्या उत्तम संगोपनासाठी काहि वेगळे करतात का? जसे वर सॅम ने मांडलय..
किंवा वेगळ्या वेगळ्या सिचुएशन्स ते कसे हाताळतात्..याचि माहिती शेअर करु शकतो..
आणि प्रत्येकाच्या मुलांच्या वयोगटा प्रमाणे वर्कशॉप ठरवु शकतो..
कारण ०-५ , ५-१० आणि १०-१८ आणि त्यावरिल वयोगट या मुलांच्या पालकांच्या गरजा वेगळ्या असु शकतात..
जे जे मनात आले ते लिहिलेय.. अजुन जरा विचार करुन मग पोस्टेन..
कविता मस्त विचार. ते भोकाड न
कविता मस्त विचार.


ते भोकाड न पसरुन देणे प्रकरण हे रोज निस्तरायला लागतय त्यामुळे एकदम हृदयाला हात घातलास बघ. माझा मेंदूच बंद पडतो वाढता भोंगा ऐकुन. हुकुमी नक्राश्रु .
सॅम तुझ्या पोस्टीने हुरुप आला बघ. अजून १० महिन्यात लेकीला न भोंगा पसरता नीट सांगायला शिकवू शकले तर खरं.
खरं म्हणजे अनिलअवचटांसारखे पालक व्हायचा मानस आहे. प्रयत्न चालु आहेत. कोपीष्ट स्वभाव मात करतो.
तुझ्या यादीत हेही अॅड करावसं वाटलं तर कर कविता. हा माझ्या नणंदेचा मंत्र आहे.
"तिने चूक केली म्हणून तिला जरुर रागवं पण तुला राग आला म्हणून तो तिच्यावर काढला असं कधी करु नकोस. आणि हेच खूप अवघड असतं. आपण आपला मूड चांगला असला की वाट्टेल ते चालवून घेतो आणि नसला की डाफरतो."
तुला यायला जमत असेल स्मी तर
तुला यायला जमत असेल स्मी तर मी कशाला नाही म्हणु
ये की, माझ्याच घरी ये रहायला 
आयडिया दिल्यास तरी खुप मदत होईल. पण आयडीया देताना अगदी बालवाडितल्या मुलाला कस अक्षर गिरवुन घेतो किंवा गिरवायला तुटक रेघा असलेल पुस्तक असत. तस अगदी स्टेप बाय स्टेप समजाऊन सांग
म्हणजे तू म्हणायचीस त म्हणजे ताकभात आणि आम्ही समजायचो त म्हणजे तंदुर चि.
तस नको 
कविता... मस्त लिहिलं आहेस ग
कविता... मस्त लिहिलं आहेस ग
मला पण घ्या की तुमच्यात 

ह्या रविवारी पण माझ्या कडे आहे एक छोट वर्क्शॉप मुलांसाठी >> स्मि.. कोणत्या लिमिटेड ग्रुपसाठी आहे का? सगळ्यांसाठी असेल तर मलाही कळवत जा नक्की
छान लेख अगदी
छान लेख
अगदी मनासारखे.
सॅम... तुमचा मित्र कशाप्रकारे समजावतो ते जाणून घ्यायला खरच उत्सुक आहे.
परत एकदा ... पालकवर्ग व्हावा अशी माझीदेखील ईच्छा...
@रैना हो तुझ्या नणंदेचा
@रैना हो तुझ्या नणंदेचा सल्ला आहे ना तो तर मी नेहमीच स्वतःशी घोकत असते
सल्ला मसलत इथे मिळतेच संगोपन मधे.
पालकगट डोक्यात आल ते ह्यासाठी की बर्याचदा मुलांसाठी/पालकांसाठीही (स्वतःदेखील आलोच त्यात) करावस वाटत. वर्कशॉप म्हणा, एखादी माहीती देणारी सहल (जस ह्या रविवारी पर्यावरण दक्षता मंचा तर्फे ठाण्यात पालक्+विद्यार्थ्यांसाठी नर्सरीची सहल आहे २ तासाची ज्यात माहीती मिळेल मुलांना त्या विषयाची) तशी सहल आयोजित करता येऊ शकली तर्...म्हणजे आपल्या माबोवरच बरिच लोक वेगवेगळे छंद असलेली आहेत, माहिती देऊ शकणारी आहेत ..जर जवळपास रहाणार्या अशा पालकांचा/लोकांचा ऑफलाईन गृप होऊ शकला तर महिन्यातुन एखादवेळी मुलांसाठी एखादा असा कार्यक्रम ठरवता येऊ शकेल आपल्याला (जवळ रहाणारे एकत्र येऊन जस गटग करतो तस्..पण एखाद उद्दिष्ट ठेऊन)
उदा.१)आपल्यातला/ली कोणी विज्ञान/गणित्/भाषा खेळातुन्/गमती जमतीतुन मुलांना उलगडुन दाखवु शकत असेल तर...
२)एखाद वर्कशॉप - क्राफ्ट्/क्रिएटिव्हिटी वरच (जस स्मिताने पुण्यात या आधीही घेतलय)
आपण आपला मूड चांगला असला की
आपण आपला मूड चांगला असला की वाट्टेल ते चालवून घेतो आणि नसला की डाफरतो. >> रैना, हे खरय ग, होतं असं कधीकधी, नंतर त्या गोष्टीचं खूप वाईटपण वाट्ट मला
समस्या आणि सल्ले ह्यावरुन
समस्या आणि सल्ले ह्यावरुन ह्या इमेलची सुरुवात कशी झाली ते लिहायचा धीर करतेय
माझ्या लेकीने (वय वर्ष ६) घरी आजी जरा दुपारची लवंडली असताना किचन मधुन कात्री घेऊन स्वतःचे कपाळावरचे केस कापले.
मी घरी यायच्या आधी आजी, आजोबा, बाबा ह्या सगळ्यांच ओरडुन झालेल.
मला हा पसारा (म्हणजे कापलेले खाली पडलेले केस एका कोपर्यात असा) ठेवलेला. मी आल्याबरोबर सगळे आणि अपराधी अशी ती माझ्यावर नजर रोखुन....
मला तेव्हा तरी तिला ओरडण अप्रशस्त वाटल्...अर्थात तिला तसेच राहु दिले असते एक्-दोन दिवस तर तिची तिलाच कदाचित लाज वाटली असती स्वतःच्या दिसण्या बद्दल. पण मला तिला एकटीला समजवायचे असल्याने मी तिला पार्लर मधे जरा शेप देऊन आणते अस बोलुन (बाकीच्यांना कल्पना दिली होती की मला तिच्याशी बोलायच आहे) घरातुन बाहेर पडले. तेव्हा वन टु वन कम्युनिकेशन होऊन मी तिच्याशी नीट बोलु शकले.
"पार्लर मधेच बघुतलेल ना खुप सोप्प असत वाटल होत केस कापण. कालच क्राफ्ट करता क्रेप पेपर कट केला ना" हे उत्तर मिळाल.
घडायच ते घडून गेल होत. आता फक्त शांतपणे समजावुन कात्री लहान मुलांनी हाताळण कस्/किती धोकादायक आहे + केस कापायला देखील आधी शिक्षण घ्याव लागत त्या गोष्टीच हेच माझ्या हातात होत. मारुन काय फार फार तर ती रडली, रुसली असती पण कळल असतच अस नाही. अर्थात आता तिला हे कळलय म्हणजे ती दुसरा एखादा असाच उपद्व्याप करणार नाही असही नाही. (आणि कात्री हाताला जवळ अशीही नव्हती ठेवलेली)
मी शिकलेली गोष्ट म्हणजे
चला म्हणजे हे काही जगावेगळ संशोधन नाही आहे म्हणायच तिच 
१)तिची छोटी कात्रीही बाद करुन तिला प्लॅस्टिकचा कात्रीचा सेट मिळतो क्राफ्ट साठी तो आणायला हवाय हे कळल.
२)तिने पार्लर वाल्या मावशीला इमिटेट केल्....आता गोष्टी गोष्टी तुन अस करण कस धोकादायक आहे हे पटवुन द्यायला हव
३)तिसरी गोष्ट हे सगळ मी इमेल करुन मैत्रिणिंना कळवल्यामुळे हे पण कळल असा प्रकार मी कळवलेल्या ५ जणींपैकी २ घींच्या बाळांनी करुन बघितलाय ह्या पुर्वीच
मंजे पेशन्स वाढवायला आपण
मंजे पेशन्स वाढवायला आपण स्वतः लहानपणी केलेली मस्ती आठवायची
कवे.. बहुतेक सगळ्यांकडे हेच
कवे.. बहुतेक सगळ्यांकडे हेच प्रकार असतात
पण माझा अनुभव आहे मुलांना नीट पटवुन सांगीतलं / त्यांना ते पटलं की ती ऐकतात..
ईशान लहान होता तेंव्हा आम्ही नविन घरात रहायला गेलो.. त्याला कळायला लागल्यावर सांगीतलं की भिंतीवर पेनानी, खडुनी रेघा मारु नये, चित्र काढु नकोस, त्यासाठी कागद / वही वापरायचे, तुला भरपुर आणुन देते... हे त्याला पटल्यावर ईतरांचं पाहुन पण त्यानी बिल्कुल अनुकरण नाही केलं त्याच
मस्त.. खुप छान मांडलस... अगदी
मस्त.. खुप छान मांडलस... अगदी प्रत्येकीच्या मनातल
कविता छान लिहिलं आहेस. तुझ्या
कविता छान लिहिलं आहेस. तुझ्या लेकीने तरी स्वत:चे केस कापले. माझ्या लेकाने फचिनमामाचे (santino) केस कापले होते
तिची छोटी कात्रीही बाद करुन तिला प्लॅस्टिकचा कात्रीचा सेट मिळतो क्राफ्ट साठी तो आणायला हवाय हे कळल. >>>> मला पण
प्रयत्न चालु आहेत. कोपीष्ट स्वभाव मात करतो. >>> रैना, अगदी
पण प्रत्येक गोष्टीचं लॉजिक सांगणे, दिलेलं प्रॉमिस पाळणे, "तू जेवला नाहीस तर विडिओ दाखवणार नाही" असे प्रकार न करणे, नकारावर ठाम रहाणे, expectations सेट करणे (उद्या सुट्टी आहे मित्र भेटणार नाहीत, संध्याकाळी डॅडी घ्यायला येणार नाही ममा येइल), वेगवेगळे टाइम (डिनर टाइम, प्ले टाइम, बेड टाइम) समजावून सांगणे, त्याच्या कडुन अपेक्षित असलेल्या गोष्टी आपणही फॉलो करणे (उदा: बोलण्याचे टर्न्स इ.) ह्या सगळ्या गोष्टी सुरु आहेत आणि त्याचा फायदा होतो आहे. मंजु म्हणाली तसे अतिशय थकल्यावर किंवा इतर कारणांनी मूड नसल्यावर ओरडायला होतं. मग स्वत:विषयी खूप हॉरिबल वाटतं
त्याचे निगेटिव्ह परिणाम लगेचच दिसतात. इशान त्यानंतर त्याला न आवडलेल्या गोष्टींवर I told you so many times अशी आरडा ओरडी करतो 
पण प्रत्येक गोष्टीचं लॉजिक
पण प्रत्येक गोष्टीचं लॉजिक सांगणे, दिलेलं प्रॉमिस पाळणे, "तू जेवला नाहीस तर विडिओ दाखवणार नाही" असे प्रकार न करणे, नकारावर ठाम रहाणे, expectations सेट करणे (उद्या सुट्टी आहे मित्र भेटणार नाहीत, संध्याकाळी डॅडी घ्यायला येणार नाही ममा येइल), >>>>>
अगदी सिंडरेला, आमच्याकडे अश्या वाक्यांशिवाय काय पण काम होत नाही. मुलगा माँटेसरी मधे जातो इत्थे काय ते Positive Decipline Workshop असतं ते सांगतात अशी लाचलूचपत देऊ नका म्हणून. हे केलं तर हे नाही वगैरे.
आणी हल्ली उलटं ऐकायला मिळत " मम्मा डोण्ट शाऊट अॅट मी....." हे सगळं कस हॅन्ड्ल कराव??
कविता फारच चांगला ग्रूप केला आहेस. मी पण आहे नक्कीच ग्रूप मधे. किती बरं वाटल आपणच एकटे नाही यात हे बघून....:)
मलापण आवडेल इथे यायला.
मलापण आवडेल इथे यायला.

कदाचित इथे हे योग्य वाटेल का नाही माहित नाही. नसेल तर उडवुन टाका हे पोस्ट.
माझी केस थोडी वेगळी आहे. माझा मुलगा ६ वर्षाचा प्रचंड अॅक्टिव. सतत त्याच्या डोक्याला खाद्य पुरवावे लागते.
सध्या तो २ रीत आहे त्याला जास्तवेळ टिव्ही बघायला आवडत नाही. टिव्हिवर फक्त स्पोर्ट, व हिस्टरी बघेल.पुस्तके फक्त नॉन्-फिक्शनच वाचेल. त्यामध्ये आत्तापर्यंत डायनासोर, नासा, सोलर सिस्टिम वगैरे मन लावुन वचतो आणि सगळे लक्षात ठेवतो. सेम स्पोर्टसबद्दल. सतत इंटरनेट वर असतो. फुटबॉलची सगळी हिस्टरी त्याला माहित आहे. नविन शिकण्यासारखे नसेल तर त्याचे लक्ष लागणार नाही.
गेल्या इंडिया ट्रीपमध्ये आयपीएल मॅचेस होत्या तर तो प्रत्येक खेळाडु कुठ्ल्या देशाचा, त्याचे हायेस्ट स्कोर, रेकॉर्डस सगळे माहिती करुन घेतला होता आणि आम्हाला सांगायचा.
त्याच्या वयाला हे सगळं शोभत नाही, आम्ही कधीच त्याला कश्याचेही प्रेशर घालत नाही. मुळात त्याला या सगळ्याची आवड आहे.
पण राग आला की मग खुप सांभाळावे लागते. मी त्याला अश्यावेळी फक्त त्याचा हात हातात घेते, जवळ जाउन अगदी शांतपणे त्याला विचारते काय झाले. मग तो शांत होतो व सांगतो.
गवेगळे टाइम (डिनर टाइम, प्ले
गवेगळे टाइम (डिनर टाइम, प्ले टाइम, बेड टाइम) समजावून सांगणे >> हे अगदी खरय ग सिंडरेला, मी पण हेच फॉलो करते.. माझ्या मुलाची शाळा दुपारची असते त्यामुळे त्याची दुपारची झोप होत नाही कधीच, मग मी त्याला रात्री ९ - ९.३० वाजता झोपायची सवय लावली आहे, सुरवातीला तो चिडायचा की मी का झोपु अजुन सगळे जण जागे आहेत, मला खेळायचं आहे ... त्याला समजाउन सांगीतलं की ही तुझी झोपायची वेळ आहे, तु तुझं टाईमटेबल ते फॉलो करायचं.. मग अता तो बिल्कुल चिडचिड करत नाही, अभ्यास पण होतो रात्री, झोप पूर्ण होते त्याची
@ स्मितागद्रे, तुम्ही पुण्यात
@ स्मितागद्रे,
तुम्ही पुण्यात कुठे घेता वर्कशॉप ? आणि किति वर्षापासूनची मुले ?
माझी मुलगी दिड वर्षाची आहे.
ह्म्म्........ आपण सार्या
ह्म्म्........ आपण सार्या जणी एकाच नावेतल्या हे वाचून धीर आला. ह्या पालकग्रूपची नक्कीच मदत होईल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या बीबीवर एकाही पुरुष आयडीची अजूनपर्यंत पोस्ट नाहीये.
मंजुडे अस असल तरी एका
मंजुडे अस असल तरी एका लग्नेच्छुने मात्र हे वाचलय आणि मला विपु पण केलेय
धीर धर बाबा लोकही काळजी वाहु असतात. कदाचित त्यांना भिती वाटत असेल ह्या राणिमाश्या हैराण करतील वाट चुकलास काय विचारुन
बाबा लोकहो तुम्ही वाचताय हे गृहित धरुन लिहीते की पालकगट हा पालक असलेल्या सर्वांकरता म्हणतेय (आई बाबां बरोबर आजी आजोबा देखील येऊ शकतात त्यात)
प्राजक्ता मी साधारण १ ली ते ६
प्राजक्ता मी साधारण १ ली ते ६ पर्यंतच्या मुलांसाठी घेते, तुमची मुलगी फारच लहान आहे, एवढ्या लहान मुलांना माझ्या दृष्टीने तरी शिबीर वगरे पेक्षा फक्त मोकळे पणे भरपूर खेळू देण्याची गरज असते
निबंध, तू अगदी माझ्याच
निबंध, तू अगदी माझ्याच धाकट्या मुलाचे वर्णन करत आहेस असे वाटते. तो प्रत्येक विषय स्वतःच्या पद्धतीनेच समजून घेतो व त्याला दुसर्यांची पद्धत अजिबात आवडत नाही. तो गणित, सायन्स, भुगोलात २-३ वर्षे पुढेच असतो, पूर्वी इतिहास, वाचन, लिखाणातही असे, पण सध्या त्याला ते आवडेनासे झाले आहे असे वाटते. त्याला शाळेत शिकवलेले कित्येकदा पटत नाही व तो ते सोडून देतो. असे करताना ग्रेड खाली गेली की मग माझा ओरडा खातो. बरीच वर्षे मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की तुला दुसर्या मार्गाने कितीही येत असले तरी शाळेतल्या टेस्ट टिचरच्या पद्धतीनेच सोडवायला लागतात. आता तर तो मुळी दुर्लक्षच करायला लागला आहे. हल्ली हल्ली पर्यंत त्याला तरीही उत्तम मार्क मिळत, पण आता तो १० वर्षांचा आहे व वरच्या वर्गात असे भागणार नाही. याशिवाय त्याला मुले, मुली चिडवतात, मग तो आणखीच त्याच्या कोषात जातो.
काल त्याला माझ्या मोठ्या मुलाने चिडवण्याच्या बाबतीत काय करायचे ते थोडेसे समजावले. पण आता तो कॉलेजला गेला की माझ्यापुढे थोडासा प्रश्नच आहे.
अगदी स्वाती. माझ्याकडे पण
अगदी स्वाती. माझ्याकडे पण असेच होते तो खुप लहान असल्यामुळे सध्यातरी ग्रेड्स वर विशेष फरक पडत नाही. पण स्वत:च्या मनाविरुध्द जाणार नाही. त्याला प्रत्येकवेळी सांगावे लागते की तुझेही बरोबर आहे पण तुला टिचरच्या पध्द्तीनेपण शिकावे लागेल. त्याची टिचरही तेच म्हणते. पण अशी मुले भयंकर अॅक्टिव असतात.
उदा. विनस मार्सपेक्षा किती पटीने मोठा आहे, किंवा पृथ्वीपासुन किती अंतर आहे, तेच हाल डायनासोरच्या बाबतीत,त्याला ५० स्टेट त्यांच्या राजधान्या, प्रेसिडेंट्स विथ टर्म्स. असे अनेक विषय आहेत.
कधी कधी वाटते की अजुन लहान आहे पण त्याचे नॉलेज बघुन वाटत नाही की हा ६ वर्षाचाच आहे. तो आमची चालती बोलती एनसाक्लोपिडिया आहे
Pages