मधेच एकदा झटका येऊन मी माझ्या मैत्रिणींना एक इमेल पाठवल होत त्यातलाच एक भाग इथे कॉपी पेस्टतेय
त्याआधी हे थोडसं (?) निवेदन..
-----------------------------------------
आपल्या पैकी बहुतेक सर्वांना कधी ना कधी किंवा नेहमीच हे प्रश्न पडले असतील. मंजुडीने मला तेव्हाच म्हणजे इमेल केल तेव्हा "हे तू संगोपन मधे टाक ना" अस सुचवल होत. पण बर्याचदा ही नाव पाण्यात सोडल्यावर "वादळ वार्यात" किंवा अजुन अनेक परिस्थितीत कुठच्या किनार्याला लागेल, मुळात ती किनार्याला लागेल की नाही की तिची टायट्यानिक होईल हे आपल्या हातात रहात नाही. ह्याच भितीने मी तिला पाण्यात सोडायला घाबरत होते.
स्मिताच्या लेखावर पालकगृप सुरु करुयात ह्या माझ्या इच्छेला तसेच सकारात्मक एको आले, ज्यामुळे विचार आला "पुढे कधी तरी वादळात नाव हरवेल ह्या विचारात मी तिच वहाणं कशाला रोखू अत्तापासुनच...? कदाचित जाईल की ती तरुन्....आणि वर्स्ट कम वर्स्ट झालीच तिची टायट्यानिक तरी निघेलच की काहीतरी त्यातुन चांगल....
हाच विचार करुन ह्या होडीला/नौकेला/तराफाला जे काय म्हणाल त्याला देतेय सोडुन प्रवाहात....
-----------------------------------------------------------
काय जास्त कठिण आहे?
प्रसुती वेदना साहुन बाळाला जन्म देण? अर्थात आईसाठी तो "पुनर्जन्म" मानतात पण आता बाळ
जस जस एक एक वर्ष मोठ होतय तस तस कळतय "ह्या प्रसुती वेदना" ही तर परिक्षे मधली एक
सुरुवात होती, आईपण निभावणं...एक पालक होण हे ह्याहुन मोठं (आवडत असल तरी) कसरतीच
काम आहे.
जसं अती उन किंवा अती सावली, जरुरी पेक्षा जास्त पाणी, खत हे रोपाच्या वाढी साठी वाईट आणि
प्रत्येक रोपासाठी "अती म्हणजे किती/ जरुरी पेक्षा कमी अधीक ठरवताना जरुर किती" हे वेगवेगळ
तसच मुलांचही ना?
मग हे ठरवायच कसं?
शिक्षा करायची? करायची तर कधी?कशी? किती?
"लेट गो" करायच तर किती प्रमाणात?
शिक्षेने किंवा लेट गो ने उलटा परिणाम तर नाही होणार ना?
पालकांपैकी दोघांच्या दोन भुमिका असतील तर..? कसा साधायचा सुवर्ण्मध्य?
"छडी लागे छमछम" ह्या तालावर वाढलेली आधीची पिढी कुठे कशात कमी आहे? आणि मी
अजिबात मार न खाऊन देखील कुठे वाया गेलेय?
मुळात इतका विचार करायची खरच आवश्यकता आहे मुलांना वाढवताना? आपल्या आधीच्या पिढीने
केलेला का इतका विचार? जर नव्हता केला अस मानल (कारण माझ्या आईच नी साबाईंच उत्तर असच आहे--"कधी मोठी झाली मुल ते कळलच नाही") तर वाढलोच की आपण.
माझ्या माहितीतल्या काहिंचा "रट्टा" देऊन "ठिक" करण्याकडे कल दिसला मला.
मला हे "ठिक करण" म्हणजे काय तेच कळत नाही आहे. मुलांनी "आपल्या आखलेल्या मार्गाप्रमाणे केलं
म्हणजे ठिक का?" अर्थात म्हणनु काही त्यांना "शॉक बसे पर्यंत " वीजेच्या बटणांशी खेळू द्याव असा
नाही. पण मारुन, धमकावुन, भीती घालुन मुलं पुढे पुढे शक्य असेल तेव्हा काही गोष्टी आपल्या
पासुन लपवायचा प्रयत्न करतात. पालक म्हणुन हे जास्त वाईट नाही का?
मग शिक्षा असावी तर ती कशी असावी? एखादी गोष्ट केली गेली तर ती का केली गेली ह्यावर विचार केला तर?
ओरडण्याने, मारण्याने मुलं control मधे रहातात अस म्हणतात. खर आहे का ते? आणि असेल तर
ह्याचा इफेक्ट किती काळ रहाणार? जोपर्यंत आपण "बळी तो कानपिळी" मधले "बलवान" आहोत
तोपर्यंतच ना?
नुसत कंट्रोल ठेवण्यापेक्षा त्यांनाच विचार करायला का शिकवल तर? रस्ता कठीण म्हणजे लाँगकट वाला असेल पण फायद्याचा नाही का? शिस्तत हवी पण नुसती धाकाने आलेली नको ती आतुन
यायला हवी. ह्यासाठी धाकदपटशाचा शॉर्टकट कामाचा नाही, संवादच हवा.
म्हणजे असं काही झालं की मुल रडतय----तर त्याला नुसतच आंजारण्यापेक्षा किंवा ओरडुन "रडू
नकोस" अस सांगण्यापेक्षा "काही तरी सांगण्यायासाठी/व्यक्त होण्यासाठी" ते रडतय तर तेच सांगण/व्यक्त होण दुसर्या मार्गने म्हणजे बोलनु वगरै करता येईल त्याला/तिला हे त्याला/तिला का नाही पटवुन देऊ शकत आपण?
अर्थात दरवेळी ते आपल ऐकतील अस होणार नाही. "heart & head" चा बॅलन्स जमायला हवा इतपत
सध्या जाणवतय, बघुयात बाकी तिच्या बरोबर मी ही एकेक गोष्ट शिकत जाईनच.
बाकी राहीला मुद्दा शिक्षा करण योग्य का? जर हो तर काय करावी? किती करावी? वगैरे वगैरे वर
अजुन माझा विचार चालुच आहे. येव्हढ नक्की शिक्षा करताना ती "bad things/behaviour" साठी
असावी कारण "bad boys/ bad girls" हे माझ्यामते कोणीच नसतात.
शिकायच तिने नाहीच आहे. ते काम माझ आहे. सुवर्णमध्यय साधता यायला हवा अगदी दरवेळेस नाही
तरी बर्याच वेळेस मुळात मी ही चुकत माकतच शिकणार हे आधी मीच मान्य करायला हव.
तुमचा काय अनुभव आहे?
------------------------------------
(ता.क.:
१)अब्राहम लिंकनच ते फेमस पत्राची इकॉपी कधीतरी वाचलेली आठवतेय्...तेच तर सगळ हवय/वाटतय आपल्याला हे देखील कळतय्...पण कस? किती जमेल? अर्थात ते काळच ठरवेल पण प्रयत्न तर नक्कीच आपल्या हातात आहेत्..(तुम्ही वाचलय हे गृहीत धरुन लिहीतेय्..नसेल वाचल तर "गुगल देवीकी जय" म्हणुन गुगला नक्की मिळेल्...आणि नक्की वाचा..)
२)हे संगोपनमधे सकाळ पासुन पोस्ट करत होते पण येव्हढ सगळं पोस्टच होत नव्हतं (माझ्या अपेक्षा आणि संगोपनाच्या मर्यादा ह्यामुळे होत होतं बहुतेक :P) (तरी शेवटी पोस्टल बुवा हे धनुष्य इथे...हुश्श!....पोस्टताना येव्हढी दमछाक झाली तर उचलताना किती होत असेल
3)एकाच बोटितुन प्रवास करणार्यांनो ..करायचा का "पालकगृप" आपला?
४) स्मिता खास तुझ्या साठी --"तू वर्कशॉप अॅरेंज करतेस मुलांसाठी तसेच एकत्रित करता येतील का आपल्याला? म्हणजे आपल्या आपल्या विभागात असे समविचारी एकत्र येऊन काही चांगल करु शकतील. बर्याचदा करायची इच्छा असते पण एकतर नीट कल्पना नसते काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल अॅरेंज असा वर्कशॉप. तुझ्या अनुभवाची मदत होऊ शकेल. मी पुर्वीही तुला खाजगीत हे सांगितलय आता इथे पुन्हा जाहिर पणे सांगतेय. तू ही गोष्ट मनावर घेच."
आपण आपला मूड चांगला असला की
आपण आपला मूड चांगला असला की वाट्टेल ते चालवून घेतो आणि नसला की डाफरतो>>>>>>रैना हे खुपच खर आहे .
मी अजुन तरी १००% पालकग्रुप
मी अजुन तरी १००% पालकग्रुप मध्ये येत नाही पण मोस्ट्ली नेक्स्ट वीक पसुन असेन...
मला काही गोष्टींच खरंच टेन्शन आलय... (ते कित्पत योग्य आहे महित नाहि)
त्या म्हण्जे :
१. होऊ घातलेल्या आजी आजोबांची एक्साईट्मेंट कशी कंट्रोल करावी... खासकरुन बाबाकड्च्या.... कारण आपल्या आजी अजोबा होण्याच्या उत्साहात आम्ही आई बाबा होणार याच त्यांना भान नाही.
२. आमचच ऐका किंवा आमचे अनुभवच तेवढे ग्रेट , बाकी कोणाला काही नाही कळ्त ही व्रुत्ती..
३. स्वच्छता आणि शिस्त दोन्ही विशेश नाही.
--- यामुळे येणा-या बाळाला सांभाळ्ताना आणि आजी आजोबाना बॅलन्स करताना काय करायच कळत नाहीय...
सध्या लोकसत्ता मधे अनघड अवघड
सध्या लोकसत्ता मधे अनघड अवघड ह्या नावाने मिथिला दळवी ह्यांच्या लेखांशी सीरीज येते आहे.
ह्या ग्रूप मधे कुठे टाकावे ह्या संभ्रमात खूप दिवस होते. हा धागा उपयुक्त आहे असे वाटल्याने लिंक्स इथे शेअर करते आहे:
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...
ह्या सीरीज मधील लेखांची शीर्षके इथे देते आहे:
अनघड.. अवघड : वय वर्षे तेरा ते एकोणीस - मिथिला दळवी , शनिवार , ७ जानेवारी २०१२
अनघड अवघड : लैंगिकता : जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी - मिथिला दळवी , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
अनघड अवघड : योग्य वेळ.. - मिथिला दळवी - शनिवार, ३ मार्च २०१२
अनघड अवघड : बाळ येतं कुठून ? - मिथिला दळवी , शनिवार, ७ एप्रिल २०१२
अनघड अवघड : संवाद वाटा - मिथिला दळवी , शनिवार , ५ मे २०१२
अनघड अवघड : कोलाहल... - मिथिला दळवी , शनिवार , २ जून २०१२
अनघड अवघड : मुलगा आहे म्हाणून... मिथिला दळवी , शनिवार , ७ जुलै २०१२
अनघड अवघड - संवादसेतू - मिथिला दळवी ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
अनघड अवघड : ‘पार्किंग लॉट’ मिथिला दळवी , शनिवार , १ सप्टेंबर २०१२
@अबक, तुझ्यासाठी धागा
@अबक, तुझ्यासाठी धागा सार्वजनिक केला आहे
खूपच सुंदर धागा… पालक ग्रुप
खूपच सुंदर धागा… पालक ग्रुप मध्ये सहभागी व्हायला मलाही खूप आवडेल. या बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का? अजूनही हे पालक ग्रुप सुरु आहेत का? माझा पिल्लू म्हणता म्हणता ३ वर्षांचा झाला पण समज एवढी छान कि आजी-आजोबांना बोलण्यात हरवेल… logical thinking आणि logical actions. मला असे पालक ग्रुप कार्यरत असतील तर नक्की कळवा…
छान लेख!
छान लेख!
सुंदर लेख... मला सुद्धा आवडेल
सुंदर लेख... मला सुद्धा आवडेल असा पालक ग्रुप जॉईन करायला...
रोज रात्री झोपताना ठरवते ,
रोज रात्री झोपताना ठरवते , उद्या पसून पिल्लावर चिडचिड करयची नाही , मारायाच नाही .
पण इतका हट्टीपणा आणि मस्ती करतो की ताबा सुटल्याशिवाय रहात नाही .
परत रात्री झोपताना कुशीत शिरतो आणी म्हणतो , मम्मा मी तुझ छोटास बाळ आहे ना मग तु माझ्यावर रागावते का ?
मी परत मनाशी ठरवते .... पण ... परत ये रे माझ्यअ मागल्या .
कविन , अगदी योग्य शब्द 'शिवधनुष्य'
स्वस्ति + १००० हट्टीपणा आणि
स्वस्ति + १०००
हट्टीपणा आणि मस्ती सुद्धा कसली तर न खाण्याची हेच नको तेच दे आत्ताच दे टीव्हीच पाहायचाय झोपायच्च नाहीये मग माझ्याकडूनही बसते पिल्ल्याला एक चापट.
पन एक आपण मुलांना आपल्या मनासारखं वागायला सांगतो म्हणून हे होत असेल.
आताचाच किस्सा . मॅनेजर बरोबर
आताचाच किस्सा .
मॅनेजर बरोबर स्काईप कॉल चालू होता म्हणून हेडफोन लावून बसले होते.
थोड्या वेळाने चिर.न्जीव आले.
मला खत्री होती कि त्याला वाट्नार की आई गाणी ऐकत बसलीय आणि तो हेडफोन खेच्णार .
तो जवळ आला तसे मी डोळे वटारले आणि जवळ्पास दमच भरला की जा इथुन .
त्याने गळ्याला मीठी मारली " मम्मा , मी हे नाही घेत आहे "
आणी माझा चेहरा , मान , गाल वाकड्तिकड खेचत एक गोड पापी दिली.
"मी तर तुला पापी द्यायला आलेलो ना
"
किती किती उतावळेपणा करतो आपण कधिकधी.
स्वाति किती गोड आहे पिल्लु..
स्वाति किती गोड आहे पिल्लु.. खरच कधी कधी आपण फारच ग्रुहीत धारतो पिल्लुच वागण...
माझाही पिल्लु अस्साच बोलतो... मी तुझा छोटा बाळ आहे ना... 
अगदी! पुस्तक फेकले म्हणुन मी
अगदी! पुस्तक फेकले म्हणुन मी माझ्या ३ वर्श्याच्या मुलीशी १० मिनिटे बोलले नाही. तर पूर्ण घरभर माझ्या मागे मम्मा मम्मा करत फिरत होती. मी लक्ष देत नाहीये कळल्यावर डबडबलेल्या डोळ्यानी मला सान्गितले मम्मा thats not right! I was trying to say sorry to you!
नन्तरचा अर्धा तास मग मी रडत होते. रोज day care मधे सोडताना पण घट्ट मिठि मारुन मला सोडुन जाऊ नको असा म्हणते तेव्हा वाटते सगळे सोडुन तिच्याजवळ रहावे.
अगदी अगदी. मला घरी जायचय
अगदी अगदी.
मला घरी जायचय आत्ता पिल्ल्याला मिस कर्तेय मी.
अगदी अगदी. मला घरी जायचय
अगदी अगदी.
मला घरी जायचय आत्ता पिल्ल्याला मिस कर्तेय मी.
Pages