युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनं झालय ते जुनच की>>>> हो उघडलेला, वास येणारा डबातर टाकुनच दिलाय. शिवाय बाळाचे वेगळे कढवलेय घरी. दुसरा दोन किलोचा फेकवत नाहिये गं.

नवर्‍याला सांग फेकायला Proud माझ्याकडनं तूप जळालं होतं एकदा. आठ स्टिक्सच चांगलं मोठा डबाभर तूप इथल्या बायांना विचारुन फेकुन दिलं Sad आपण काही नेहेमी फेकाफेकी करत नाही. एकदा डबा उघडुन बघ, वास लागला असेल तर खराब झालेलं काही पोटात जाण्यापेक्षा खरच टाकून दे.

ज्ञाती, त्या न उघडलेल्या डब्यातल्या तुपाचं शतधौत घृत कर. तुला येत असेलच ना? नाहीतर ईमेल टाक, सांगते कसं करायचं ते. उष्णतेच्या सगळ्या विकारांवर, डोळ्याखाली ड्रायनेस, काळेपणा इ. साठी, पुरळ, दाह कुठेही लावायला उपयुक्त आहे.

नवर्‍याला सांग फेकायला >>>> सिन्डी, तुझ्या युक्त्या म्हणजे Blush (पाठीवर लाडिक थाप मारणारी बाहुली), सुचलेच नाही मला Wink Wink

कुत्रे तूप आवडीने खातात. पण २ चमचे दिवसाला जास्त नाही. थोडे टेस्ट करून खात असतील तर डॉग कुकीज करता येतील.

वास आला म्हण्जे त्यात केमिकली बदल झाला आहे. फॅट्स च्या कंपोझिशन मध्ये बदल झाला आहे ते रॅन्सिड झाले असेल तर न खाल्लेले बरे. स्टिल २ केजी इज अ लॉट ऑफ घी. वाती करून संपवावे लागेल.

तूप वाया जावू नये वाटतच असेल तर लिंबू रस तूपाच्या १/४ टाकून आटवून रोज अंगाला फसले तर चक्चकीत होइल काया. Happy चेष्टा नाय हां...

(मायबोली कै च्या कै स्लो चाललीय, १५ मिनीटे झाली एक पेज रीफ्रेश व्हायला. कंटाळा येतोय टायपायला.)

..

चक्चकीत होइल काया. >>>चला निम्मे शतधौत आणि निम्मे असे सम्पवणार. (स्वप्नाळू बाहुली)

वास येणारे तूप पायाला तळव्यांना वगैरे लावा, अंगाला लावू नका,
अंघोळ केल्यावरही वास जात नाही हो Sad

हसरी ४ वाट्या कणिक घेतली तर अर्धीवाटी कच्चा रवा घालून कणिक घट्ट मळायची. पुर्‍या लाटताना तेल जास्त लावू नको, पुर्‍या हलक्या हाताने लाटून, झार्‍याने निपटून मग मोठ्या तसराळ्यात (खाली टिपकागद ठेवून त्यावर) काढाव्यात.

विरजण नसताना दही लावायची काही युक्ती आहे का? आमसूल कोळून त्याचे पाणी दुधात घातल्याने दही तयार होते, असे 'सुगरणीचा सल्ला' वाचल्याचे आठवते. पण, नक्की आठवत नाहीये. Sad
कोणी मदत करेल काय? मला 'पोह्याची उकड' बनवायचीय. Proud

अंघोळ केल्यावरही वास जात नाही हो>>>> वाटलेच होते मला, आता कन्फर्म झाले.
दक्षिणा तु केव्हा लावलेस गं Wink

पुर्‍या चांगल्या तापलेल्या तेलात भराभरा तळल्या तरी तेलकट होत नाहीत. मंद आचेवर तळलेल्या पुर्‍या हमखास तेलकट होतात.

प्रीती !
मी असं ऐकलय कि ते तेल परत तापवू नये. भाजी साठी वापरले तर ते परत गरम होईल नं !

Pages