Submitted by नानबा on 10 February, 2010 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पोहे (पातळ - जाड कुठलेही चालतील)
दही
कढीपत्ता
२ हिरव्या मिरची
कोथिंबीर,जीरे,मोहोरी, हळद
मीठ
क्रमवार पाककृती:
१ वाटी पोहे भिजवून घ्या. त्यात दोन मोठे चमचे दही (जेवढ आंबट तेवढ चांगलं) घाला.
ह्यात जीरे, मिरच्या, मीठ आणि जराशी कोथिंबीर घालून मिक्सर मधून फिरवा.
जीरे, मोहोरी कढीपत्ता, जराशी हळद घालून चळचळीत फोडणी करा आणि त्यात हे सगळं मिश्रण घाला.
एकदा हलवून झालं की एक वाफ येऊद्या.
वाफ आली की बाऊलमध्ये घालून थोडं तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खा.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे सव्वा माणूस ;)
अधिक टिपा:
आवडत असेल तर जराशी साखरही घालू शकता.
ह्याची कृती जवळपास तांदळाच्या उकडीसारखीच असली तरी चव वेगळी लागते (पोह्यांच्या स्वत:च्या चवीमुळे आणखीन छान!)
गरम गरमच भारी लागतं.
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सालपापड्या आणि पापडाची आयडीया
सालपापड्या आणि पापडाची आयडीया मस्त आहे! मला पोह्याचे पापड प्रचंड आवडतात - असे करून बघायला पाहिजेत!
मस्तय रेसिपी. मी करुन खाल्ली
मस्तय रेसिपी. मी करुन खाल्ली आजच ब्रेफाला.
नानबा मस्त झाले होते बरं हे
नानबा मस्त झाले होते बरं हे पोहे. गरम गरम खायला चांगले लागले आणि पट्कन झाले.
आता मी केले ते असे (सिंडी वॅनिला आइसक्रिम नाही घातले बरं :डोमा:)
घरी कल्यापाक नव्हता म्हणुन ते कट, मिरच्यापण नव्हत्या तर आपले बेडेकराचे मिरच्याचे लोणचे घातले,एक्स्ट्रा अद्रक घातले.
पोहे नीट भिजले नव्हते का जास्तच दगडु होते माहित नाहि पण मिक्सी मध्ये नीट ग्राइंड झाले नाहित मी जादे पोहे घेतले होते. पण तरीही चवीला एकदम ए-वन.
नानबा,भारी पदार्थ आहे
नानबा,भारी पदार्थ आहे हा.आम्ही फॅन झालोत.
एक्स्ट्रा अद्रक घातले >> आलं
एक्स्ट्रा अद्रक घातले
>> आलं सगळ्यात मस्त लागतं! माझंही फेव आहे.. आता पुढच्या वेळेस म्या बी घालून बघेन!
पूर्वा, म्या बी फॅन.. आणि एकदा एक पदार्थ आवडला की मी तो वीट येईपर्यंत करते!
सावनी, सायो आणि सगळेच.. इतक्या पटापट करून बघितल्याबद्दल धन्स!
सायो, त्याला थोडीफार फोपो (फोडणीचे पोहे) सारखी चव आली का ग, दही नव्हतं तर.. कदाचित दही कमी असेल तर सबस्टिट्युट म्हणून लिंबूही चांगलं लागेल (मी धिरडी/रवा डोश्याकरता तसच करते!)
मी ह्याच्यात कांदा,कोथींबीर
मी ह्याच्यात कांदा,कोथींबीर बारीक चिरून हाताने थापून थालीपिठ करून बघितली.
ती ही मस्त लागली. आताच चहा व थालीपिठ. (मला उकड विशेष आवडत नाही...)
नानबा, नाही, फोपोची चव नाही
नानबा, नाही, फोपोची चव नाही आली. पण दही जास्त घातलं तर दही पोह्यांसारखे पण जरा वेगळं वर्जन लागलं असतं.
>>>आणि एकदा एक पदार्थ आवडला
>>>आणि एकदा एक पदार्थ आवडला की मी तो वीट येईपर्यंत करते!
कुठुन नवर्या कडुन का?
शँकी,
शँकी,
कुठुन नवर्या कडुन का? >>
कुठुन नवर्या कडुन का?
>> येस्स! वर्षभर दर शनिवारी डोसे केल्यावर नवर्यांनं खरंच शेवटी वीट फेकायची बाकी ठेवलेली!
आज केली उकड. मस्त झाली आहे
आज केली उकड. मस्त झाली आहे
शनिवारी केली होती उकड.. भारी
शनिवारी केली होती उकड.. भारी लागते एकदम.. मला साध्यापेक्षा हीच आवडली..
धन्यवाद..
मी पण केले हे पोहे काल! मस्तच
मी पण केले हे पोहे काल! मस्तच झाले होते. धन्यवाद नानबा !
ज्याना आवडली त्यांच्याकरता
ज्याना आवडली त्यांच्याकरता सहीच..
पण ह्या उकडीच्या नादात माझा मिक्सर फुटला (माझ्या आणि नवर्याच्या संयुक्त वेंधळेपणानं!)
आता नवीन येईपर्यंत उकड बंद.
आणि हो!
डिस्क्लेमरः
जर उकड करताना घाईघाईने मिक्सर ओट्याच्या कडेवर ठेवलात आणि नवर्याने धावपळ करून तो फोडला तर नानबा जवाबदार नाहीत
पोहे जर जास्त वेळ भिजवुन
पोहे जर जास्त वेळ भिजवुन ठेवले तर मिक्सरची गरज भासणार नाही. हातानेच मॅश करता येतील. मिरच्या बारीक चिरुन आणी आलं अगदी बारीक किसुन तरीही छान लागेल ही उकड !
माझा मिक्सर फुटला >> म्हणुन
माझा मिक्सर फुटला >> म्हणुन मी मिक्सरच वापरला नाही
मिक्सर फुटला
मिक्सर फुटला
मी पण केली रविवारी. आवडली
मी पण केली रविवारी. आवडली
मीही मिक्सर नाही वापरला. हाताने मस्त मॅश होतात. मी पातळ पोहे घेतले होते. पा.पोचा चिवड्याव्यतिरिक्त उत्तम उपयोग झाल्याने भरून आले
मी गेले ४-५ दिवस आज करु उद्या
मी गेले ४-५ दिवस आज करु उद्या करु करतेय. आज नाष्टा / जेवण हेच करायचे ठरवले होते. आत्ता बघितलं रात्री मुद्दाम लावलेलं दही अजून नीट विरजलं नाहीये. ( पीठाच्या डब्ब्यात दह्याचं पातेलं ठेवायचा कंटाळा करून फक्त मावे मध्ये ठेवलं होतं, त्याचा परिणाम.) आता उद्या करेन.
मी आज परत ही उकड केली . मात्र
मी आज परत ही उकड केली . मात्र आज मिक्सर न वापरता हातानीच ते काम केल
हा फोटु. ननबा झिदाबाद.
मनिषा, मस्त दिसतेय फोटूतली
मनिषा, मस्त दिसतेय फोटूतली उकड!
मी पण करुन बघणार....
मी पण करुन बघणार....
वा ! मस्तं झाली उकड.. मी पण
वा ! मस्तं झाली उकड.. मी पण पातळ पोहे घेतले चमचानेच मस्त मॅश होतात.
खाताना वरुन भरपूर लसूण घातलेली फोडणी /तेल टा़कली ..यम्मी..
थॅक्स.. सोपी व झट्पट होणारी रेसिपी.
आज केली. मस्तच .
आज केली. मस्तच .
नानबा: सही आहे हे. आजच केली
नानबा: सही आहे हे. आजच केली होती. यम्मी....
आवडली ग. खात खातच लिहीत आहे.
आवडली ग. खात खातच लिहीत आहे. आलं घातल मिरची बरोबर.
पा.पोचा चिवड्याव्यतिरिक्त
पा.पोचा चिवड्याव्यतिरिक्त उत्तम उपयोग झाल्याने भरून आले >>>>> मलाही माझे पातळ पोहे संपायला हातभार लागणार या कल्पनेने भरुन आलेय. जियो नानबा!!
नानबा, तू एक जबरदस्त रेसिपी
नानबा, तू एक जबरदस्त रेसिपी जन्माला घातली आहेस. मी जाडे पोहे वापरले. जास्त वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवले त्यामुळे हातानेच सहज मॅश करता आले. दही खूप आंबट वाटलं नाही म्हणून दह्याबरोबर थोडं सावर क्रीम घातलं. आमच्याकडे उकडीत लसूण बारीक चिरुन घालतात म्हणून आज लसूणच घातलं. नेहेमीची उकड आवडतेच पण ही जास्त आवडली. पोह्याची अंगभूत चव आणि त्यात खमंग फोडणी दिलेले दहीपोहे / तांदूळाच्या पिठाची उकड / फोडणीचे पोहे ह्या सगळ्याच्या मधलीच खूप सुरेख चव आली होती. खूप खूप धन्यवाद
मी पण फोडणीत लसूण घातली होती.
मी पण फोडणीत लसूण घातली होती. नेहमीपेक्षाही ही उकड लुसलुशीत, हलकी लागली.
अश्वे घरी खायला. काल केलेली
अश्वे घरी खायला. काल केलेली अजुन बरीच उरलीये.
Pages