Submitted by नानबा on 10 February, 2010 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पोहे (पातळ - जाड कुठलेही चालतील)
दही
कढीपत्ता
२ हिरव्या मिरची
कोथिंबीर,जीरे,मोहोरी, हळद
मीठ
क्रमवार पाककृती:
१ वाटी पोहे भिजवून घ्या. त्यात दोन मोठे चमचे दही (जेवढ आंबट तेवढ चांगलं) घाला.
ह्यात जीरे, मिरच्या, मीठ आणि जराशी कोथिंबीर घालून मिक्सर मधून फिरवा.
जीरे, मोहोरी कढीपत्ता, जराशी हळद घालून चळचळीत फोडणी करा आणि त्यात हे सगळं मिश्रण घाला.
एकदा हलवून झालं की एक वाफ येऊद्या.
वाफ आली की बाऊलमध्ये घालून थोडं तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खा.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे सव्वा माणूस ;)
अधिक टिपा:
आवडत असेल तर जराशी साखरही घालू शकता.
ह्याची कृती जवळपास तांदळाच्या उकडीसारखीच असली तरी चव वेगळी लागते (पोह्यांच्या स्वत:च्या चवीमुळे आणखीन छान!)
गरम गरमच भारी लागतं.
माहितीचा स्रोत:
प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम सही पाकृ आहे नानबा.
एकदम सही पाकृ आहे नानबा. ह्याचा शोध कसा लागला कोणी लावला त्याची माहीती दे बघू. काल नव-याला ही पाकृ फोनवर समजावून सांगत होते तर म्हणाला सरळ सांग की दहीपोहे लसणीच्या फोडणीत घालायचे म्हणून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मने, उरली उकड? कैच्याकै केलीस
मने, उरली उकड? कैच्याकै केलीस की काय?
आमच्याकडे तर कढई खरवडून खाल्ली.
हुश्श, एकदाचा कालचा मुहुर्त
हुश्श, एकदाचा कालचा मुहुर्त लागला उकड बनवायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मस्त मस्त!!!!
ह्याचा शोध कसा लागला कोणी
ह्याचा शोध कसा लागला कोणी लावला त्याची माहीती दे बघू![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>> पोह्याचे डोसे करायला म्हणून वरचं रॉ पीठ (पोहे, दही, मिरच्या वगैरे) एकत्र केलेलं..
पण अचानक डोसे घालत बसायचा कंटाळा आला.. मग काय! उकड करून बघितली!
धन्स रे सगळ्यांना!
आणखीन एक सांगायचच राहिलं, मी फक्त पातळ पोहे आणि फक्त जाड पोहे वापरून पाहिले, मला असं जाणवलं की मला जाड पोह्यांची चव जास्त आवडतीये.
ओक्के करून सांगतो तुला प्रयोग
ओक्के करून सांगतो तुला प्रयोग यशस्वी झाला की नाही ते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नानबा, मस्त रेसिपी !! गरम गरम
नानबा, मस्त रेसिपी !! गरम गरम खाल्ली करून आत्ताच.
या पीठाचे डोसे कसे करायचे ?
भिजवलेले पोहे + दोन मोठे चमचे दही+ जीरे, मिरच्या, मीठ आणि कोथिंबीर -> मिक्सर -> १-२ तास भिजवून डोसे घालायचे का ?
भिजवलेले पोहे + दोन मोठे चमचे
भिजवलेले पोहे + दोन मोठे चमचे दही+ जीरे, मिरच्या, मीठ आणि कोथिंबीर -> मिक्सर -> १-२ तास भिजवून डोसे घालायचे का ?
>> होय.. तेल जरा जास्त पितात पण..
मस्त ... आज केली होती
मस्त ... आज केली होती सकाळी... डब्यला पण नेली मुलाने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान रेसिपी नानबा ! आजच करून
छान रेसिपी नानबा ! आजच करून खाल्ली. नेहेमीच्या तांदूळाच्या पिठीच्या उकडीपेक्षा जास्त आवडली. ती जरा चिकट लागते म्हणून की काय पण नवरा तिला कधीच हात लावत नाही, चव पहाणं तर राहिलं दूरच! त्याच पिठीचं (भरपूर तेल घालून कढईत कुरकुरीत केलेलं) थालिपीठ मात्र मिटक्या मारत खातो.. आता पोह्याची उकड खातो का बघते. एक दिवसाच्या ब्रेकफस्ट चा प्रश्न मिटेल..
मी पण जाड पोह्याची करुन
मी पण जाड पोह्याची करुन बघितली. छान लागली. पातळ पोहे विरघळून जातील असे वाटते.
आणि हो, मी कच्च्या शेंगदाण्याचे कूट फोडणीत परतले.
मी पण केली... झकास... दहि
मी पण केली... झकास... दहि पोह्यापेक्षा आता हेच करत जाणार.
.. परवा मी फोडणीत कांदा व उडदाची डाळ पण खमंग परतुन घेतली व मगच्ग दहि-पोहे मिश्रण घातले. ते पण छान लागले.
सही आहे.. खूप व्हेरिएशन्स
सही आहे.. खूप व्हेरिएशन्स झाल्यात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल आणि व्हेरिएशन्स कळवल्याबद्दल धन्स रे सगळ्यांना!
मस्तच मि हि करुन बघनार नानबा.
मस्तच मि हि करुन बघनार नानबा.:)
आत्ताच केली उकड. खातच
आत्ताच केली उकड. खातच टाईपतोय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्त, लय भारी!
नानबा क्लास रेसीपी आहे ग ही.
नानबा क्लास रेसीपी आहे ग ही. परवा करुन पाहिली आणि खुप आवडली . आता तु म्हणतेस तस "वीट" येईपर्यंत करणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी हे शोधत होते.. सार्वजनिक
मी हे शोधत होते..
सार्वजनिक कर. तुझ्या सगळ्या रेसिप्या सार्वजनिक करायला हव्यात.
लगेच करुन पाहिली. मस्त होते
लगेच करुन पाहिली. मस्त होते उकड. थॅन्क्यु सो मच. एकट्या माणसासाठी ब्रेफा एकदम पर्फेक्ट.
( फोड्णीत बारीक चिरलेला लसुण हवाच.)
मी नेहमी करते हि उकड....मस्त
मी नेहमी करते हि उकड....मस्त लागते आणि पटकन होते... धन्स नानबा
लोलानी रेसेपी वर आणल्यामूळे
लोलानी रेसेपी वर आणल्यामूळे आज आठवण झाली आणि बरेच दिवसांनी केली. आज नाश्त्याला गरम गरम पोह्याची उकड.
मस्त. मजा आली.
मस्त. मजा आली.
आताच करुन पाहिली ही उकड,
आताच करुन पाहिली ही उकड, मस्तच झाली होती फक्त रेसीपी काल वाचली होती म्हणुन त्यात कांदा घालायचा की नाही ते आठवत नव्हते मग फोडणीत थोडा कांदा घातला पण सुंदर लागला. पोहे मिक्सरला लावायचा कंटाळा केला पण चांगले भिजले होते त्यामुळे चमच्यानेच बीट केलं.....ब्रेकफास्टला नविन पदार्थ मिळाला..... धन्यवाद!
आत्ताच करून खाल्ली. ग्रेट
आत्ताच करून खाल्ली. ग्रेट रेसिपी. आभार नानबा.
एक चवळट्टबा प्रश्न : दगडी
एक चवळट्टबा प्रश्न : दगडी पोहे म्हणजे काय?
रेसिपी समजल्या पासुन
रेसिपी समजल्या पासुन आठवड्यातुन एकदातरी करतेच मी.... सोप्या रेसिपीसाठी नानबा खूप आभार आणि रेसिपी वर काढल्याबद्दल लोलाला पण धन्यवाद!
![2012-05-10 10.53.41.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2012-05-10%2010.53.41.jpg)
अरे, ही सार्वजनिक नाही हे
अरे, ही सार्वजनिक नाही हे माहित नव्हतं.. लोलाची प्रतिक्रिया वाचल्यावर कळलं..
लोक्स काळजी करु नका. तूपाने
लोक्स काळजी करु नका. तूपाने वजन वाढत नाही, लोण्याने वाढतं
आज कित्येक महिन्यांनी केलीय
आज कित्येक महिन्यांनी केलीय ही उकड नाश्त्याला ! सुरुवातीला वीट येईपर्यंत केली नव्हती तरीही कसे काय विस्मरण झाले होते कुणास ठाऊक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भयंकर चविष्ट होते ही रेसिपी. आता परत वरचेवर करायला लागणार
सोपी आणि चविष्ठ वाटते आहे...
सोपी आणि चविष्ठ वाटते आहे...
आज केली होती संध्याकाळी
आज केली होती संध्याकाळी खायला. थंडीमध्ये खायला इतकी अफाट सुंदर लागतेय गरमगरम उकड! लव्ह्ड इट!
Pages