Submitted by बस्के on 31 January, 2010 - 22:59
ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..
नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!
हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. )
(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/
http://www.webmd.com/food-recipes/features/health-benefits-of-green-tea
इत्यादी....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी अधूनमधून घेतो. इथे
मी अधूनमधून घेतो. इथे सिंगापुरात तर खूप जण ग्रीन-टी पितात. ज्याच्या त्याच्या क्यूबिकल मधे पाहिले तर ग्रीन-टीचे पाकिटं दिसतात.
ग्रीन-टी चे फायदे मी ऐकून आहे पण जी लोक ग्रीन-टी पितात इथे त्यांच्याकडे पाहून ते खूप सुदृढ वगैरे आहे असे मला तरी कधी वाटलेले नाही.
हा चहा पिला की म्हणे वजन उतरायला मदत होते. म्हणून बरेच जण हा चहा पितात. थोडा कडवट लागतो. मला या चहापेक्षा जास्मिन चहा जास्त आवडतो.
मला कालच ते प्रिस्क्राइब केले
मला कालच ते प्रिस्क्राइब केले आहे. भूक कमी होते ते पिवून. दूध घातलेला चहा व कॉफी सोड्ण्यास सांगितले आहे. त्यामुळे मला मेन हायवे सोडून सर्वीस रस्त्यावरून आता आपली गाडी चालू आहे कि काय असे वाट्ते आहे.
ग्रीन टीत अॅण्टी एजिन्ग प्रॉपर्टीज पण आहेत म्हणे.
हूड तुमचे पोस्ट अपेक्षित आहे.
मी पण अपोलो फार्मसीची B +ve
मी पण अपोलो फार्मसीची B +ve ब्रांडची पाकिटं आणलीत. पण २दाच प्यायला कारण जाम कडू काढा लागतो. फायदे बरेच आहेत असं वाटतं पण चवीचं काय करायचं? पुढे २-३ तास माझ्या तोंडावर कडू चव राहिली होती.
मी पिते ग्रीन टी नेहमी.
मी पिते ग्रीन टी नेहमी. त्यासाठी एक वेगळा मधे नेट असलेला मोठा मग मिळतो. त्यात चमचाभर पाने घालून त्यावर उकळतं पाणी ओतून पाच मिनिट ठेवायचं. फिकट सोनेरी रंग यायला लागला की प्यायचं. हवं तर त्याच पानांवर नंतर परत गरम पाणी घालायचं. सुरुवातीला चव लागते कडवट पण हनी घातला तर तितकासा कडवट लागत नाही. ग्रीन टीची चव हळूहळू डेव्हलप व्हायला लागते. हा एकदम प्यायचाच नसतो आपल्या नेहमीच्या चहासारखा. एक एक घोट अगदी सावकाश लिहिण्याची वगैरे कामं करत असताना प्यायचा. फ्रेश नक्की वाटतं. कॉम्प्लेक्शन विजिबली क्लिअर होतं लगेच. मेटॅबॉलिझम सुद्धा निश्चित सुधारतं. बाकी फायद्यांची कल्पना नाही.
शर्मिला, बरं झालं मध घालायला
शर्मिला, बरं झालं मध घालायला सांगितलास ते !
एक एक घोट अगदी सावकाश लिहिण्याची वगैरे कामं करत असताना प्यायचा. फ्रेश नक्की वाटतं. कॉम्प्लेक्शन विजिबली क्लिअर होतं लगेच. मेटॅबॉलिझम सुद्धा निश्चित सुधारतं. >>>>> अरे वा ! (अजून रेग्युलर हा चहा न पिताच कल्पनेत रंगलेली मुंगेरीलाल बाहुली)
अश्विनी पण मध अगदी
अश्विनी पण मध अगदी सुरुवातीलाच जोपर्यन्त टेस्ट डेव्हलप होत नाही तोपर्यन्तच घाल. कारण मधातही कॅलरीज असतातच. जर वजन कमी करण्याच्या हेतूने ग्रीन टी पिणार असशील तर मधाची सवय करु नकोस.
खूप स्ट्राँग केला तर कडवट
खूप स्ट्राँग केला तर कडवट लागतो. एक कप पाणी, एक छोटा चमचा ग्रीन टी उकळून घेऊन त्यात लिंबु पिळून प्या, कडू अज्जिबात लागत नाही उलट सुरेख चव लागते त्याची.
कुठे मिळतो हा? अश्वे कुठुन
कुठे मिळतो हा?
अश्वे कुठुन घेतलास ग ठाण्यातुन?
ओक्के. अगं मी गोड व्यवस्थित
ओक्के. अगं मी गोड व्यवस्थित खाते. तळलेल्या पदार्चांची मुळातच आवड नाहिये. त्यामुळे थोडा मध अजिबात माझ्या वजनावर परिणाम करणार नाही. पण तू म्हणतेस तसं सुरुवातीला घालेन व नंतर एकंदरच गोड कमी करेन.
मने, अपोलो फार्मसीच्या दुकानात मिळतो. बाकीच्या केमिस्ट्सकडेही मिळेल.
दक्षे, मी लिंबू पिळूनही माझं तोंड वाकडं झालं होतं
हिरव्या चहात भरपूर
हिरव्या चहात भरपूर antioxidants असतात. मात्र या चहात मध घालू नये, कारण, ५५ अंश से.च्या वर तापवल्यास मधाचं विघटन होतं.
काळ्या चहातही ही antioxidants असतात, मात्र प्रमाण कमी असतं. आपण काळ्या चहात दूध घालून त्यात असणारी antioxidants नष्ट करतो. कारण दुधातील प्रथिनं या polyphenolsशी संयुगं तयार करतात.
अरे देवा ! मध कॅन्सल पण
अरे देवा ! मध कॅन्सल
पण चिन्मय, माझं गरम गाराचे नखरे नाहियेत. मग हिरवा चहा आधी तयार करुन गार करुन थोडा मध घातला तर अॅऑ जाणार नाहीत ना? तसं असेल तर मी गारच पिईन.
मधात अल्प प्रमाणात प्रथिनं
मधात अल्प प्रमाणात प्रथिनं असतात. ही प्रथिनं antioxdantsशी संयुग तयार करतात. पण प्रथिनांचं प्रमाण अतिशय अल्प असल्यानं काही फरक पडत नाही.
मात्र, गरम पाण्यात / दुधात मध कधीही घालू नये.
पण गरम पाण्यातून मध आणी
पण गरम पाण्यातून मध आणी लिम्बू घेतल्यावर वजन कमी होते असे म्हणतात.नक्की कोणते बरोबर?
पण गरम पाण्यातून मध आणी
पण गरम पाण्यातून मध आणी लिम्बू घेतल्यावर वजन कमी होते असे म्हणतात.नक्की कोणते बरोबर?<<<<
मध्यंतरी मीपण वाचलं होत की अशा प्रकारे गरम पाण्यातुन मध घेऊ नका.
जपान मधे असताना अगणित वेळा
जपान मधे असताना अगणित वेळा हिरवा चहा प्यायला आहे.
क्लाएंट मिटींग ला गेलो की एका चिनिमातीच्या वाडग्यात असा चहा आणून द्यायचे.
थंडीच्या दिवसात गरम, आणि उन्हाळ्यात गार चहा.
सुरूवातीला मला चव आवडली नव्हती ...
वेगवेगळ्या जातीच्या झाडांची पाने गोळा करून त्याचा काढा बनवल्यासारखे वाटायचे.
उरोन चहा (oolong tea) नावाचा एक चहा मला फार आवडायचा.
लाकडाचा भुस्सा पाण्यात टाकून खुप उकळवून दिल्यावर लागेल तशी चव असते.
आणि हा चहा चॉकलेटी रंगाचा असतो.
कालांतराने हिरवा चहा पण आवडू लागला.
जपान मधल्या हिरव्या चहाची माहिती खालील दुव्यावर मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Green_tea#Japanese_green_teas
एक सांगायच राहिलच. या चहा मधे
एक सांगायच राहिलच. या चहा मधे दुध, साखर, मध, लिंबू, इ. काही घालत नाहीत.
आपल्या चहा सारखा एक चहा असतो त्यामधे हे सगळे लाड करू शकता.
त्याला कोउच्या म्हणतात. (जपानी भाषेत चहाला च्या म्हणतात)
वि.सू. : चहा आणि मारीची बिस्किटे एकत्र करून मागू नयेत.
हिरव्या चहात जर उपरिनिर्द्रिष्ट वस्तू घालून पिण्याचा उद्योग केला तर,
जपानी लोक कार्ल्याचा रस प्यायल्यासारखा चेहरा करून पहातील.
ओह, हे गरम पाणी आणि मधाचं
ओह, हे गरम पाणी आणि मधाचं माहितच नव्हतं. अॅक्चुअली दोन तीन दिवसांतच टेस्ट होते डेव्हलप ग्रीन टीची. ताज्या पुदिनाची पानं किंवा तुळशीची पानं असंही सोबत घातलं तर एक वेगळी चव येते. मी कधी कधी घालते. किंवा थाईम हर्ब सुद्धा घालते. ते चालत असेल नां?
पण चिनूक्स बर्याचदा लोक सकाळी गरम पाण्यात मध लिंबू घालून पितात असं ऐकण्यात येतं. तेही चुकीचंच असणार मग.
महेश- मी हेच लिहायला आले होते
महेश- मी हेच लिहायला आले होते अगदी.
ग्रीनटी मॅटॅबोलिझम, वाढीव आयुमान, आणि चिरतारूण्य राखण्यात मदत करतो असे वाचून आहे.
ग्रीन टी ला चहा का म्हणावे इथपासून ते पृथ्वीवरील अमृत इथपर्यंत सर्व ऐकण्यात येते.
त्याच्या चवीची सवय व्हायला वेळ लागतो हे खरंच.
भारतात TWINNINGS या ब्रँड्चा ग्रीन टी सर्वत्र मिळतो.
हो, ट्वायनिंग्जचा चहा मिळतो.
हो, ट्वायनिंग्जचा चहा मिळतो. तो 'चहा' म्हणून प्यायला तर गुळचट, काढा, मांजरXXXX वगैरे सर्व विशेषणं त्याला बहाल कराल हे नक्की. पण औषध म्हणून, आणि होणारे फायदे बघता अर्धा कप सहज पिऊ शकतो. त्यावर पाहिजे तर आपला अमृततुल्य चहा प्यावा
अवांतर- १) माझ्या आधीच्या कंपनीतले एक संचालक चीनला गेले होते. आले ते ह्या चहाचे चाहते होऊनच. त्यानंतर दिवसभर स्वतःजवळ ग्रीनटीचा फ्लास्क बाळगायचे. कोणी भेटायला आले की हाच चहा, बोर्ड मीटींगमध्येही बाहेरच्या संचालकांनादेखील! अवांतर गप्पाही ह्याच चहाबद्दल करायचे. शेवटी एका वयस्कर संचालकाने विनंतीच केली त्यांना 'आम्हाला नको हा छळ' टाईप तेव्हा सुटका झाली
२) मध कोमट पाण्यातून घेतला तरी चालतो. पण कोमटच- जस्ट 'गार'चं गरम व्हायला लागलं की पाणी उतरवायचं. गरम पाण्यातून मध कधीही घेऊ नये. त्याचे लाँग टर्म ईफेक्ट्स फार वाईट होतात.
हो. TWINNINGS विथ लेमन
हो. TWINNINGS विथ लेमन फ्लेवरपण मिळतो.
जास्तीत जास्त polyphenols
जास्तीत जास्त polyphenols मिळावेत म्हणून ही पद्धत आम्ही प्रयोगशाळेत वापरतो -
सुरुवातीला पाणी उकळून घ्यायचं, आणि या उकळत्या पाण्यात हिरवा चहा टाकायचा. मोजून २ मिनिटं चहा उकळू द्यायचा, मग गाळून ते चहाचं पाणी फेकून द्यायचं. आता हा चहाचा चोथा परत उकळत्या पाण्यात ५-७ मिनिटं ठेवायचा. या चहात सर्वाधिक प्रमाणात antioxidants असतात.
सुरुवातीला उकळलेल्या चहात सर्व aldehydes, ketones निघून जातात, आणि polyphenols तेवढे शिल्लक राहतात.
हिरव्या चहामुळे पित्ताचा त्रास होत असेल, तर आवळा, शेंगदाण्याची सालं किंवा रंगीत सालांची फळं (काळी द्राक्षं, blueberries इत्यादी) यांतही हीच polyphenols असतात.
हिरव्या चहामुळे पित्ताचा
हिरव्या चहामुळे पित्ताचा त्रास होत असेल, >>>> अरे मला झालं पित्त तो चहा प्यायल्यावर. मला वाटलं मलाच झालं व ते दुसर्या कशाने तरी झालं. मग हा चहा प्यायल्यावर सूतशेखर मात्रेची गोळी घ्यावी काय?
सुरुवातीला उकळलेल्या चहात सर्व aldehydes, ketones निघून जातात, आणि polyphenols तेवढे शिल्लक राहतात. >>> पण टी बॅग्ज वापरुन केलेल्या चहाचं काय करायचं? तो ऑलरेडी अल्डेहाईड्स व कीटोन्स घालवलेला असतो का?
म्हणजे दुसर्यांदा त्याच
म्हणजे दुसर्यांदा त्याच चोथ्यावर टाकलेल्या पाण्यात सर्वात जास्त अॅन्टीऑक्सिडन्ट्स असतात तर! मी पानं उकळून नाही घेत. नुसतं उकळतं पाणी घालून ठेवते मुरवत. मग ह्या पाण्यात उतरलेली किटोन्स, अल्डीहाईड्स वगैरे अपायकारक असतात कां? ते पाणी कंपल्सरी फेकूनच द्यावं कां?
मला अत्ता टेट्लीचा ग्रीन टी
मला अत्ता टेट्लीचा ग्रीन टी पावडर व बॅग्स दोन्ही मिळाले. पावडर घरी नेणार व ब्याग्स इथे हपिसात. त्यात लेमन व हनी फ्लेवर घातलेले आहेत. त्या प्याकेट वर लिहीले आहे की एक बॅग पर कप. पाणी उकळून मग थोडे थंड होउ द्यायचे. ८५ डि. सें ला पर्फेक्ट होतो म्हणे. २ मिनिट इन्फ्युज करायचे. हवे तर हनी वा शुगर घाला असे इथे आहे. पण गरज नाही. दुधाशिवाय बेस्ट म्हणे. करून बघते काय नवतारुण्याचा साक्षात्कार होतो आहे ते. आता रेड लेबल ला बाय बाय नेस्काफीला पण. एक जी टी पन ब्रॅन्ड आहे म्हणे. १० ब्यागा ४२ रु. ? I better feel young.
<मग ह्या पाण्यात उतरलेली
<मग ह्या पाण्यात उतरलेली किटोन्स, अल्डीहाईड्स वगैरे अपायकारक असतात कां? ते पाणी कंपल्सरी फेकूनच द्यावं कां?>
यात अपायकारक असं काहीच नसतं. मात्र antioxidants खूप कमी असतात. चीनमध्येही हे सुरुवातीचं पाणी फेकून देतात कारण त्याला कडवट चव असते. आम्ही प्रयोगशाळेत फेकून देतो कारण त्यात antioxidants खूप कमी असतात.
अमा, मला अपोलोच्या २५ बॅगा ७५
अमा, मला अपोलोच्या २५ बॅगा ७५ रु. ना मिळाल्या.
आता मन घट्ट करतेय हा चहा प्यायला चवीमुळे. बॅगांमधला चहा अॅऑने रिच असेल ना?
बघ ना आरोग्याचा मार्ग
बघ ना आरोग्याचा मार्ग महाग
आणि वडापाव पाच रुपयात.
किती हा फरक चहा चहात.
बनविणारे आपल्याला उकळतात.
चहावर काही प्रक्रिया केली
चहावर काही प्रक्रिया केली नसेल तर अॅऑ असतीलच.
ओके थॅन्क्स चिनूक्स. पण फक्त
ओके थॅन्क्स चिनूक्स. पण फक्त एकच सांग अजून. अॅक्चुअल तु म्हणतोस तसं २ मिनिट उकळवण्याच्या क्रियेत आणि नुसतं गरम पाणी ओतण्याच्या क्रियेत काही फरक पडू शकतो कां?
अरे पण टीबॅग्स मधला चहा
अरे पण टीबॅग्स मधला चहा प्रक्रिया केलेलाच असणार ना २ मिनिटात नुस्त्या गरम पाण्यात शिजतो म्हणजे?
Pages