Submitted by बस्के on 31 January, 2010 - 22:59
ग्रीन टी बद्दल कोणाला काही माहीती आहे का? कोणी मायबोलीकर घेतात का? - म्हणजे ग्रीन टीबद्दल विचारतीय मी..
नेटवर वाचल्यावर अगदी सोन्याची खाण सापडल्यासारखे वाटतेय. अॅन्टीऑक्सिडंट, मेटॅबॉलिझम सुधारते, चेहरा क्लीन होतो, स्लिम वगैरे होतो. कॅन्सर अन अल्झायमर आणि काय ते वेगळंच!
हे सगळं खरंच होतं की फॅड आहे !?
(फॅड नसावं असं जॅपनीज व चायनीज मुलींकडे पाहून वाटते. )
(मी वाचलेल्या काही लिंक्स.. )
http://chinesefood.about.com/library/weekly/aa011400a.htm
http://www.umm.edu/altmed/articles/green-tea-000255.htm
http://www.greenweightlosstea.com/
http://www.webmd.com/food-recipes/features/health-benefits-of-green-tea
इत्यादी....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस्के क्रॅनबेरी जुस पी. ग्रीन
बस्के क्रॅनबेरी जुस पी. ग्रीन टीचं आणि माझं कै जम्ल नै
नुसतं गरम पाणी ओतण्यापेक्षा
नुसतं गरम पाणी ओतण्यापेक्षा उकळतं पाणी वापरणं अधिक चांगलं कारण चहातली रसायनं अधिक प्रमाणात पाण्यात उतरतात.
पण ते पित्ताचं काय करायचं!
पण ते पित्ताचं काय करायचं!
<पण ते पित्ताचं काय
<पण ते पित्ताचं काय करायचं!>
आवळा खा
अश्वे मस्तपैकी कोकमसरबत पी
अश्वे मस्तपैकी कोकमसरबत पी त्यावर
पण ते पित्ताचं काय करायचं!>>
पण ते पित्ताचं काय करायचं!>> पित्ताचा बीबी है की. थितं लिवा.
टेट्ली वाफेचा सुगंध मस्त आहे. चव जरा कडवट आहे. पण चलेश. आफ्टर टेस्ट चांगली आहे.
पित्ताचा बीबी है की. थितं
पित्ताचा बीबी है की. थितं लिवा.>>>. गपे अमा, हा चहा प्यायल्यावर होणार्या पित्ताबद्दल इचारलंय मी. रोज चहा म्हणजे रोज पित्त. अगं थोड्यावेळातच मला चहा चढला (म्हणजे डोकं पित्ताने चढलं). येस्स, चहा पिताच चिमुटभर आवळा मावा किंवा सुतशेखर गोळी.
अश्वे एक काम करून पहा.... एक
अश्वे एक काम करून पहा.... एक टी बॅग घेऊन गरम पाण्याच्या कपात एकदा किंवा फारतर २ दा बुडव आणि जे पाणी (थोडा लाईट ग्रीन टी) होईल ते पी.. ती टी बॅग जपून ठेव, आणि एक तासाने परत तसंच कर... म्हणजे तुला पित्त ही होणार नाही. टेस्ट पण डेव्हलप होईल... आणि टी बॅग वाया सुद्धा जाणार नाही.
मी गेल्या ग्रोसरी शॉपींगला
मी गेल्या ग्रोसरी शॉपींगला आणला हा टी. आणि अधूनमधून घेत आहे तर मला टेस्ट आवडली.. म्हणजे नॉट बॅड. चहा समजुन नाही प्यायले एव्हढंच. \
आणि हो कोमट झाल्यावर मध मीही टाकला होता. मध गरम पाण्यात घालू नये माहीत होते..
शिवाय त्यात कॅफेन आहे , त्यामुळे रोजचा कॅफेनचा डोस त्यातून मिळेल. व कॉफीला बाय बाय करता येईल..
पण खरंच इतके फायदे आहेत का? हे पाहायचे होते! बहुतेक चांगलाच दिसतोय.
थँक्स सगळ्यांना..
मी रोज पीते ग्रीन टी. मी
मी रोज पीते ग्रीन टी. मी कधीच चहा पीत नाही. पण चायनीज कलीगने ग्रीन टी प्यायलाच पाहिजे असं कन्व्हीन्स केलं त्यामुळे लिप्टनच्या ग्रीन टीच्या बॅग्ज ऑफीसमध्ये आणून ठेवल्या आहेत आणि रोज लंच नंतर पीते गेली दोन वर्षं. अजिबात आवडत नाही पण औषधासारखा पीते १० औंस. मला आपला चहापण आवडत नाही. तोटातर नाही न काही म्हणून पीते. आता तरुण दिसायला लागले की नाही त्यासाठी आधीचा आणि आताचा फोटो टाकायला पाहिजे.
माझे इशानच्या जन्माआधीचे फोटो
माझे इशानच्या जन्माआधीचे फोटो बघुन इशान "मावशीचा फोटो" म्हणतो. आता ग्रीन टी पिते सहा एक महिने आणि मग फोटो काढुन त्याला विचारते कोणाचा फोटो आहे
काढ आणि इथे टाक हो आर्च.
काढ आणि इथे टाक हो आर्च. आम्हालाही कळेल कीती फायदा होतो ते.
चांगला बाफ चालू केलास बस्के,
चांगला बाफ चालू केलास बस्के, मला पण हीच शंका होती ग्रीन टी चांगला की नाही. १-२ वेळाच घेतला आहे आतापर्यंत. फारसा आवडला नाही. पण आता परत चालूकरेन
मलापण ग्रीन टी पीववत नाही.
मलापण ग्रीन टी पीववत नाही. खुपदा ट्राय केले. आणि पॅकेट शेवटी फेकुन दिले.
मी मागे ग्रीन टी प्यायला होता
मी मागे ग्रीन टी प्यायला होता २ दिवस ऑफिसमधे.. दुपारच्या कॉफीच्या ऐवजी...
काहितरी विचित्रच झालं.. गरगरल्यासारखं... मग नाद सोडला..
आता इतके वाचल्यावर मी पण पिउन
आता इतके वाचल्यावर मी पण पिउन बघु काय?? खरेतर मला कल्पनेनेच ढवळल्यासारखे होतेय, पण तरीही धीर करुन छोट्यातला छोटा पॅक आणते आणि बघते..
काहितरी विचित्रच झालं..
काहितरी विचित्रच झालं.. गरगरल्यासारखं... मग नाद सोडला.>>अरे औषध म्हणून घ्यायचा, तेंव्हा "इतर" काही न घालता घ्यायला हवास.
पग्या, अगदी अगदी. मला पण
पग्या, अगदी अगदी. मला पण गरगरल्यासारखं झालं. ते पित्ताने झालं असं वर वाचून मला आज कळलं. त्यावर एक आवळा खा
अरे औषध म्हणून घ्यायचा >>>>
अरे औषध म्हणून घ्यायचा >>>> म्हणजे नॉर्मल चहासारखा कप / पाऊण कप नाही प्यायचा???
आताचं इथे वाचून साध्या चहा
आताचं इथे वाचून साध्या चहा ऐवजी ग्रीन टी करून आणलाय
ग्रीन टी + मिंट टी अश्या दोन्ही टी बॅग्स एकत्र गरम पाण्यात टाकल्या आणी २ मि मधे काढल्या.
बरं लागतं आहे कॉम्बिनेशन.
असा टी कितीवेळा घेऊन चालतो? मी २दा नेहेमीचा चहा घेते ऑफिसमधे. दोन्ही वेळा ग्रीन टी चालेल का घेऊन?? ( जमलं तर ;))
मी रोज पिते ग्रीन टी. मी एक
मी रोज पिते ग्रीन टी. मी एक कल्पना पाहीली होती टीव्ही वर. रात्री झोपताना र्थमास मध्ये गरम पाणी भरुन ठेवायचे त्यात ग्रीन टी बॅग्ज अडकवून वरुन झाकण लावुन टाकायचे मग सकाळी जीम मध्ये जाताना पाण्याच्या बाटलीएवजी हा ग्रीन टी न्यायचा.:-) मी दिवसभर पिण्यासाठी असे करुन ठेवते म्हणजे सारखे सारखे टी करत बसायला नको. आणि कुठेतरी वाचले आहे अॅंटीऑ़क्सिडंट्स सकाळच्या वेळी घेतल्याने जास्त फायदेशिर असतात. कोणी ह्यावर प्रकाश टाकु शकेल का?
आपल्या नेहेमिच्या काळ्या
आपल्या नेहेमिच्या काळ्या चहापेक्शा ग्रीन टी पिणे कधिहि चांगले. आणि व्हाईट टी हा सगळ्यात चांगला असे वाचले आहे. काळ्या चहात ग्रीन टी आणि व्हाईट टी पेक्शा कॅफिन जास्त असते म्हणुन कमि पिणे कधिहि चांगले. काळ्या चहाचि पाने फर्मेंट केलेलि असतात प्रोसेसिन्ग च्या वेळि. ग्रीन टी चि पाने अजिबात फर्मेंट केलेलि नसतात. ग्रीन टी चि गवतासारखि चव व्हाईट टीला नसते. त्यामुळे जरा चांगला लागतो ग्रीन टी पेक्शा. ग्रीन टी चि टेस्ट डेव्हलप होइपर्यंत हर्बल टी किंवा फ्लेवर असलेले ग्रीन टी ट्राय करुन बघा. ग्रीन टी पिऊन त्याचा impact लगेच तर कळत नाहि पण काळ्या चहातिल दुध आणि साखर कमि झाल्याने एक long term investment नक्कि होते तुमच्या आरोग्यातिल.
मी एकदा मिंट टी घेऊन पाहिला
मी एकदा मिंट टी घेऊन पाहिला होता.
व्याक, ब्यॉक, यॉक, !@#$%^&*()_+|{}:"<>?
त्यामुळे मला मेन हायवे सोडून
त्यामुळे मला मेन हायवे सोडून सर्वीस रस्त्यावरून आता आपली गाडी चालू आहे कि काय असे वाट्ते आहे. >> लै भारी.
ग्रीन टीच्या गोळ्या घेणं
ग्रीन टीच्या गोळ्या घेणं कितपत योग्य आहे ? त्यातही फायदे असतील तर ग्रीन टीची चव न आवडणार्या लोकांची सोय होईल.
>>अॅंटीऑ़क्सिडंट्स सकाळच्या
>>अॅंटीऑ़क्सिडंट्स सकाळच्या वेळी घेतल्याने जास्त फायदेशिर असतात. >> हो हे मी पण ऐकलं आहे. संमाम सकाळी रिकाम्या पोटी अॅंटीऑ़क्सिडंट्स घेतल्यास मेटॅबॉलिझम चा रेट चांगला होतो, त्यामुळे दिवसभर खाल्लेल्ल्या अन्नाचे फॅट्स मध्ये रूपांतर होत नाही. (चूभूद्याघ्या. जाअप्रटा)
हाणा हाणा बस्केला हाणा. अरे
हाणा हाणा बस्केला हाणा.
अरे माबोमुळे कसल्या कसल्या साथी येतात राव. आधी ते एरंडेल (केसांसाठी) आणि आता ग्रीन टी.
सगळेच तरूण दिसून कसं चालेल? कोणीतरी आपल्या वयाचं प्रौढ आणि प्रगल्भ दिसलं पाहिजे म्हणुन जनकल्याणार्थ मी उदार मनाने ग्रीन टी पिणार नाही (खरं कारण हे की नाक दाबून प्यायला लागतो :फिदी:)
मी आज अर्धा कप प्यायले.
मी आज अर्धा कप प्यायले. हापिसात २ बॅगा घेऊन आलेय. आज अजून पित्तं नाही झालंय
पर्फ्यूम वाले एरंडेल
पर्फ्यूम वाले एरंडेल झिन्दाबाद.
अश्विनी के अगं पित्ताला इतर कारणे असतील कदाचित. चेककर.
मी ग्रीन टी नेहेमी पिते गेले
मी ग्रीन टी नेहेमी पिते गेले कित्येक वर्षे! कडू, वाईट वगैरे काही लागत नाही हे असले वाचुन आज पिताना लक्ष देउन प्याले पण काही वेगळे वाटले नाही ....
Pages