भारतीय कलेतून 'चॅरीटी बझार'
भुकंपग्रस्त लोकांकरीता निधी उभारण्यासाठी माझ्या कार्यालयात 'चॅरीटी बझार' हा उपक्रम अलिकडेच राबविण्यात आला. आम्ही काही भारतीयांनी फार कष्ट आणि पैसे खर्च न करता जास्तीत जास्त निधी कसा उभारता येईल म्हणून भारतीय कलेचे प्रदर्शन भरविले. यातून ३००० सिंगापूर डॉलर अर्थात जवळ जवळ ९० हजार भारतीय रुपये मिळालेत. प्रत्येक १ $ मागे कंपनीकडून आणखी १ $ असे ऐकून ६०००$ निधीसाठी प्राप्त झालेत. हे सर्व कसे केले याचे हे सचित्रमय वर्णन.
वरच्या चित्रात आहे कँटीनमधील ती जागा जिथे जेवणाचे वापरलेले ट्रे ठेवतात. इथली टाईल्स काळ्या रंगाची आहे हे पाहता आम्ही इथे ३ रांगोळ्या काढल्यात. त्यापैकी एक फुलांची रांगोळी होती.
इतक्या छोट्या आणि चिंचोळ्या जागेत फक्त ३ रांगोळ्या काढता आल्यात. खरे तर यापेक्षा अधिक रांगोळ्या काढण्यासाठी वेळ नव्हता. आदल्या दिवशी रात्री ६ ते ११ च्या वेळेस आम्ही दोन रांगोळ्या काढून घेतल्यात. फक्त फुलांची रांगोळी दुसर्या दिवशी ताजी फुले वापरुन काढली. त्यासाठी ऑफीसमधे अगदी रामप्रहरी सर्वांनी हजेरी लावली.
भुईचाफा, झेंडू, कमळ, गुलबक्षी, मोगरा अशा रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या-पाकळ्या सुट्या करताना अभिरामी, पुनिथा, वनिथा, रिझवाना आणि इतर आम्ही:
रांगोळी काढतानाची आणखी काही चित्रे. ओला लाकडी भुसा अंथरुन मग त्यावर फुले रचून फुलांची रांगोळी काढण्याची खरीखुरी पद्धत मला पहिल्यांदाच दाक्षिणात्य भारतीयांकडून कळली.
रांगोळी काढून दमल्यानंतर वनिथा आणि पुनिथा यांच्या चेहर्यावर प्रसन्न भाव उमटले होते:
एकमेका सहाय्य करुन अवघे धरु सुपंथ अर्थात टीम-वर्क यातून साकारलेल्या ३ रांगोळ्या:
ह्या ३ रांगोळ्या बघण्यासाठी २$ चे कुपन ठेवण्यात आले. या २$ मधे रांगोळीबद्दल माहिती, रांगोळी कशी काढतात त्याचे प्रात्यीक्ष. फोटो हवा असल्यास रांगोळीसोबत फोटो इतके काही समाविष्ट होते. अभारतियांना हे प्रदर्शन फार आवडले. बघा तर...
भिंतीवर रांगोळीबद्दल ठळक अक्षरात माहिती लिहिली होती.
रांगोळीबद्दल काढून दाखविताना पुनिथा आणि चायनीज मुलगा:
टेबलावर रांगोळीच्या काही डिझाईन्स देखील ठेवल्या होत्या आणि काही छापे:
आता काही मेंदीची चित्रे. याला देखील खूप प्रतिसाद मिळाला. सुरवातीला मेंदीचा कोन कुणालाच वापरता येत नव्हता. मेंदीच्या डिझाईन्स देखील फारशा माहिती नव्हत्या. मग जेवणाच्या वेळेतून अर्धा तास वापरुन आपल्याच हातावर आठवडाभर सराव केला तेंव्हा आपण इतरांच्या हातावर मेंदी गिरवू शकू असा विश्वास प्रत्येकाला आला.
अभिरामी मेंदी काढण्यात दंगः
शेवटी शेवटी मेंदी काढण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत चालले होते इतकी गर्दी झाली होती:
प्रदर्शन पहायला आलेली मोना... आम्ही तिलाही आमच्यात मेंदी काढण्यासाठी सामावून घेतले. तिनेही आनंदाने आमचे निमंत्रन स्विकारले:
मेंदी आवडल्याची पावती:
टेबलावर अंथरलेली चादर देखील भारतीय कलेचा नमुनाच होती. खूप जणांना ती चादरचं विकत हवी होती
मेंदीसाठी आम्ही फक्त २$ आकारले होते. चेन्नपटनाहून येताना एकाला खेळणी आणायला सांगितली होती. ती खेळणी तासाभरात विकल्या गेली. ही पहा ती खेळणी:
आमच्या दुकानाचे नाव आम्ही 'कलर्स ऑफ ईडिया' असे ठेवले होते:
सर्वांनी भारतीय पोषाख परिधान केला होता. वनिथानी माळलेला गजरा आणि त्याचा परिमळ जिथे तिथे रेंगाळत होता. थ्री-ईन-वन अगरबत्तीचा सुगंध, पहाटेचे झुजुमुंजू वातावरण, फुले आणि नवीन कपडे जणू सण वा लग्नकार्य आहे की काय असेच वाटतं होते.
एका अभारतीय दुकानात झाडांची विक्री होती. मला ही कल्पना आवडली पण जरा महागडी वाटली. तर एका दुकानात जुने अंक होते जसे की रिडर्स डायजेस्ट, जिऑग्राफी वगैरे. तीही कल्पना छान होती आणि सर्व पुस्तके पटापट विकली गेली:
युरपातील लोकांनी मिनि-गोल्फ ठेवला.
काचेतून दिसणारे बझाराचे चित्र असे होते:
तर मंडळी तुम्ही पाहिलंत ना स्त्रियांचा पाठिंबा असेल तर पुरुष-प्राणी काहीही करु शकतो. मायबोलीवर सयुंक्ता सुरु झाल्यानंतर मला बझाराबद्दल इथे लिहायची ईच्छा झाली. इथे मायबोलीवर कितीतरी जणांना कला अवगत आहे. आपल्या देशात कदाचित तिचे मोल कमी असेल कारण जिथे पिकते तिथे विकल्या जात नाही म्हणतात. सुदैवाने बरेच मायबोलीकर देशाबाहेर राहतात. जर त्यांनी मिळूनमिसळून आपली कला जर अभारतीयांपर्यत पोचवली तर त्यातून खूपशी मिळकत चांगल्या कामासाठी उपलब्ध करता येऊ शकते. वर मी चित्रातून हेच दर्शविण्याचा प्रयास केला आहे की अगदी साध्याशाचं रांगोळ्या, साधीशीचं मेंदी, जेमतेम खेळणी यातून आमच्या सारख्या सामान्यांना जर ३००० $ मिळवता आले तर इथे तर इथे केवढे तरी कलाकार आहेत, त्यांच्यातली कलाकुसर आणि नीटनेटकेपणा असे उपक्रम राबविण्यासाठी मदतील येऊ शकतात. तेंव्हा आपल्या कलेचा आणि ज्ञानाचा अवश्य विचार करा. एकमेकांना सहाय्य मिळेलचं...
अरे वा मस्तच बी.. छान
अरे वा मस्तच बी.. छान उपक्रम..
मागे आम्ही ऑफिसमधल्या भारतीयांनी असच एक प्रदर्शन भरवलं होतं.. अर्थात ते गुढीपाडव्यानिमित्त होतं.. त्यात चॅरीटी वगैरेचा हेतू नव्हता.. एकंदरीत अश्या उपक्रमांना प्रतिसाद मस्त मिळतो..
चांगला उपक्रम्...छान लिहलय.
चांगला उपक्रम्...छान लिहलय.
मस्त उपक्रम..
मस्त उपक्रम..
बी, खूपच छान उपक्रम राबवलात.
बी, खूपच छान उपक्रम राबवलात. आणि भरपूर निधीही जमा केलात. फोटो, वर्णन सुंदर.
एक सांग, फुलांच्या रांगोळीत लाकडी भुसा अंथरुन फुलं रचण्याने काय फरक पडतो.?
उत्तम उपक्रम! मागे तुम्ही
उत्तम उपक्रम! मागे तुम्ही मराठी फराळाचे पदार्थ ऑफिसमधल्या लोकांना खिलवले होते आणि त्यांना ते आवडले होते त्याची आठवण झाली
अतिशय स्तुत्य उपक्रम. लाकडी
अतिशय स्तुत्य उपक्रम. लाकडी भुसा वापरण्याबद्दल प्रथमच कळले.
सायो माझ्यामते ओला भुसा खाली टाकल्यावर ओलाव्यामुळे पाकळ्या जास्त वेळ न कोमेजता, ताज्या रहात असतील.
अभिनंदन बी ! खुपच छान उपक्रम
अभिनंदन बी ! खुपच छान उपक्रम !!
काही फोटोज आडवे आहेत त्यांना उभे करता येईल का ?
बी, छान उपक्रम. सुरेख
बी, छान उपक्रम.
सुरेख रांगोळ्या.
अप्रतीम! कल्पना खरोखर उत्तम!
अप्रतीम! कल्पना खरोखर उत्तम!
मस्त कल्पना एकदम! सगळ्यांचं
मस्त कल्पना एकदम! सगळ्यांचं अभिनंदन.
वनिता, पुनिता अशी लिही नावं. त्यांनी टी एच लिहिलं तरी उच्चार वनिता, सुनिता असाच करतात.
( आपल्या पद्धतीने लिहिलेल्या नावांचा उच्चार जर दाक्षिणात्य लोकांनी स्वाटी, मिनोटी असा केला तर )
स्वाती, मिनोती :दिवे:
रुनी, मला वाटलं ओला भुसा खाली
रुनी, मला वाटलं ओला भुसा खाली अंथरुन वर पाकळ्या टाकल्याने त्या उडून जात नसाव्यात.
उपक्रमाची संकल्पना खूप आवडली.
उपक्रमाची संकल्पना खूप आवडली. सहभागी झालेल्यांचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
बी, खूप छान कल्पना, आणि
बी, खूप छान कल्पना, आणि तुम्ही त्यातून बराच निधी गोळा केलात, अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे. रांगोळ्याही सुरेख दिसत आहेत. मेंदीची कल्पना खूप आवडली. ती लाकडी खेळणीही मस्त आहेत. आपल्याकडच्या सावंतवाडीकडच्या खेळाण्यांसारखी आहेत.
बी अगदी चांगला
बी अगदी चांगला उपक्रम.
तिसर्या फोटोतली रांगोळी तेलुगु लोकांची आहे ना.
छान उपक्रम, माहिती आणि फोटो
छान उपक्रम, माहिती आणि फोटो बी!
खुप छान.
खुप छान.
सहि आयडिया आहे ..आवडला उपक्रम
सहि आयडिया आहे ..आवडला उपक्रम
बी खरंच खूप छान उपक्रम
बी खरंच खूप छान उपक्रम राबवलात आपल्या देशासाठी!
खुपच छान उपक्रम...!!
खुपच छान उपक्रम...!!
खूप मस्त उपक्रम, रांगोळ्या पण
खूप मस्त उपक्रम, रांगोळ्या पण सुंदर आहेत.
बी उत्तम उपक्रम. रांगोळ्या
बी उत्तम उपक्रम. रांगोळ्या सुन्दर आहेत. आज त्यांचा मान डेस्कटॉप वर. प्रसन्न वातावरण फोटोतही दिसते आहे.
मला मायबोलीवरील कलाप्रकार बघून असे नेहमी वाटत आले आहे कि एक मायबोली कॅफे असेल तर इथे असेच काही विक्रीला ठेवता येइल. हस्तकला, मातीची भांडी, मेन्दीच्या मेणबत्त्या. चांगले लेख सीडी स्वरूपात
व कॅफेत आपल्या पाकक्रुती विभागातील पदार्थ अदलून बदलून ठेवता येतील. एक पर्मनंट जीटी जी व्हेन्यू सारखे. कल्पना करा.
----------------------------------------------------------------------------------------------
Every good product/ concept was once just a gleam in someone's eyes.
वा! कमळाची रांगोळी सुरेख आहे.
वा! कमळाची रांगोळी सुरेख आहे.
रांगोळी तेलुगु लोकांची
रांगोळी तेलुगु लोकांची म्हणजे?
ती मद्रदेसीय पद्धत आहे.(त्यात मी तामिळ लोकांना मी ज्यास्त पाहिलेय. पण बहुतेक सर्व दाक्षिणात्य लोक तांदूळाच्या पिठीपासून घालतात रांगोळी. माझी शेजारीण तामिळ काकू पटपट हाताने ती तांदूळाची पिठी पाण्यात भिजवून घालायची. माझी आई शिकली होती तिच्या कडून).
बी, स्तुत्य उपक्रम !
वा वा खूपच चांगलं काम केलंत
वा वा खूपच चांगलं काम केलंत तुम्ही. तीनही रांगोळ्या खूपच सुंदर. वनिता आणि पुनिताला नक्की सांग. त्यांनी ती तिसरी रांगोळी (समई ठेवलेली) कशी काढली ते विडीओमधे दाखवता आलं तर शिकायला आवडेल. तसेच तुम्ही बोर्डवर लिहीलेली या रांगोळ्यांबद्दलची माहीती खास करुन समईवाल्या, इथे लिहीता येईल का तुला?
पुन्हा एकदा धन्यवाद हे उत्तम काम उत्तम फोटोसहीत आमच्यापर्यंत आणल्याबद्दल..
छानच उपक्रम. धन्यवाद.
छानच उपक्रम. धन्यवाद.
छानच उपक्रम बी. धन्यवाद तुला!
छानच उपक्रम बी. धन्यवाद तुला!
मस्त उपक्रम बी. रांगोळ्या
मस्त उपक्रम बी. रांगोळ्या कसल्या मस्त काढल्यात!
वा... छानच उपक्रम व माहिती
वा... छानच उपक्रम व माहिती बी.
खूप स्तुत्य उपक्रम बी... खूप
खूप स्तुत्य उपक्रम बी... खूप आवड्ला
सुंदर उपक्रम बी. त्या
सुंदर उपक्रम बी. त्या रांगोळीच्या विडीओचं मनावर घे बाबा. मलाही शिकायची आहे. आई कानीकपाळी ओरडत असते शिकत नाही म्हणून.
Pages