बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥
जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥
लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
१) नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल
२) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
...................................................................
मुटे साहेब, पुर्ण कविताच
मुटे साहेब,
पुर्ण कविताच झ्यक्यास.
(No subject)
फँटॅस्टीक !!!!
फँटॅस्टीक !!!!
(No subject)
, , , , ,
, , , , ,
शाम्यानं इचीबैन, कहरच
शाम्यानं इचीबैन, कहरच केला
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते,
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघड पडते
>> लै लै भारी
सुपर्ब कविता... छान झलिये ...
सुपर्ब कविता... छान झलिये ...
मस्तच!
मस्तच!
बिपाशाले लुगडं भाषा जरा
बिपाशाले लुगडं भाषा जरा वेगळी बरी वाटली वाचताना.
लै भारी
लै भारी
मस्त
मस्त
जबरी हो
जबरी हो
सर्वांचा सहृदय अभिप्रायाबद्दल
सर्वांचा सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे...!!
मस्त्..आज मायबोलीवर आल्या
मस्त्..आज मायबोलीवर आल्या आल्या एकदम झकास तडका..भारी ..:)
जीएम मस्तंच कविता आहे.
जीएम मस्तंच कविता आहे.
इम्यॅजिन करून जाम हसले..
भारी..
भारी..
गंगाधर, झकास बॅटिंग. सॉल्लेड
गंगाधर,
झकास बॅटिंग. सॉल्लेड तडका.
आता आणखी नवे खमंग पदार्थ पायजेत भौ
(No subject)
सोल्लिड....
सोल्लिड....
एकदम झक्कास भाऊ!!!
एकदम झक्कास भाऊ!!!
हीहीही
हीहीही
लै भारी!
लै भारी!
व्वा व्वा!
व्वा व्वा!
त्याच्यापुढचा एपीसोड... काय
त्याच्यापुढचा एपीसोड...
काय सांगु राजेहो..
शाम्याचं लुगड बिपाश्या
फेटा म्हणुन बांधे भों ..
बिपाशाचा तिथंच झाला
नटरंग ...
पब्लिक तिले पाहुन
झाली मग दंग...
ब्रेक के बाद चालु ठेवु
तोवर वाजवा रे म्रुदुंग.....
लै भारी .
लै भारी .
बिपाशाला लुगडं नेसवायची
बिपाशाला लुगडं नेसवायची कल्पना आवडली.
बिपाशाला लुगडं >>> बिपाशा
बिपाशाला लुगडं >>>
बिपाशा त्या लुगड्याचे छोटे छोटे तुकडे करुन ( काटकसर , शक्य तिथे आणि तेवढी ) आयुष्यभर वापरेल .
सर्वांचा सहृदय अभिप्रायाबद्दल
सर्वांचा सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे...!!
मजा आली.
मजा आली.
भारीये व्हो!!!!!
भारीये व्हो!!!!!
Pages