बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥
जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥
लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
१) नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल
२) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
...................................................................
बिचार्या आई बापाला वाटत असेल
बिचार्या आई बापाला वाटत असेल की अजुन पाळण्यातच बघतोय की काय आपण पोरीला..Vaibhavayare12345
लई भारी ना भौ... मज्जा आली...
लई भारी ना भौ... मज्जा आली...
हे... लै भारी....
हे... लै भारी....
झकास.. प्रिय बिपाशा, नागपूरला
झकास..
प्रिय बिपाशा,
नागपूरला जाऊ नकोस. तुला साडी चोळी करतील हे लोक. मला माहीत आहे हा व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला आहे. पण हे विदर्भ म्हणजे अवघड जागचं दुखणं बघ. वेगळे करा म्हणावं तरी बोंब आणि राहू दे महाराष्ट्रात म्हटलं तरी बोंब..
तुझ्याबाबतीतही असेच होतेय. नेसूदे अंगभर म्हटलं तर मानवी अधिकाराचा संकोच होतो म्हणून आमचा निषेध होणार आणि फिरू दे तशीच म्हटलं तर स्त्री-मुक्ती वाले मोर्चे काढणार.
म्हणूनच तुला हा प्रेमाचा सल्ला देत आहे. शक्यतो नागपुरी लोकांपासून दूरच रहा. संत्री देखील नागपूरची नको खात जाऊस...आणि विदर्भाच्या वा-याला तर उभीदेखील नको राहूस !!
कळावे
तुझा(च)
हितचिंतक
नोट : प्रिय हा शब्द पत्राचा मायना लिहिण्याची सभ्य पद्धत म्हणून वापरला आहे. माबोकर समजून घेतील यात शंका नाही.. पण जे कुणी अधूनमधून माझा आयडी वापरून माबोवर वावरत असते त्या अज्ञात व्यक्तीसाठी हा खुलासा !
(No subject)
झ्याक !
झ्याक !
लै भारी बगा. लै भारी लिहुन
लै भारी बगा. लै भारी लिहुन राह्ता बगा तुम्हि.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार..!!
नागपुरी तडका खमंग बसला.
नागपुरी तडका खमंग बसला.
त्याले वाटले मायबाप भल्ले
त्याले वाटले मायबाप भल्ले गरिब असन
म्हुन आंगभर झाकाले तिले कपडे भेटत नसन
लई भारी हो भाऊ
लै भारीये राव...
लै भारीये राव...
गंगाधर, कविता मस्त आहे
गंगाधर,
कविता मस्त आहे हो...पण बिपाशालेच लुगड नेसवावस का वाटल?
<< कविता मस्त आहे हो...पण
<< कविता मस्त आहे हो...पण बिपाशालेच लुगड नेसवावस का वाटल? >>
सुती कापडाचा वापर वाढला तर कापसाला बरे भाव मिळतील म्हणुन.....
जबरदस्त
काय साहेब !
काय साहेब !

Hello
Hello
ते पण एक वय असतं दिवसभर
ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
काय साहेब, परत वाचली कविता.
काय साहेब, परत वाचली कविता.
भारीये ...
पर येक सांगा...
बिपाशाला लुगडं दिल्तसा, पन तिच्या जॉनीला?
त्ये पन बेनं उगडच फिरतंय की हो! त्याला न्हाई का काई धोतर जोडी??
दोगांची जोडी मात्र लै झ्याक बगा.. दोगंबी उगडे...
नागपूरी भाषेत सान्गायचं तर
नागपूरी भाषेत सान्गायचं तर "माहोल" आहे ही कविता
<< त्ये पन बेनं उगडच फिरतंय
<< त्ये पन बेनं उगडच फिरतंय की हो! त्याला न्हाई का काई धोतर जोडी?? >>
खराय तुमचं. पण त्याला धोतर नेसवायला जायचं कुणी?
त्या पहेलवानाला धोतर नेसवायला किमान दहा-पाच जण तरी लागतील.
हा हा हा...... एकदम झकास.
हा हा हा......
एकदम झकास.
हा हा हा..... एकदम झकास.
हा हा हा.....
एकदम झकास.
हा हा हा..... एकदम झकास.
हा हा हा.....
एकदम झकास.
आवमाय्.......काय कविता हाय का
आवमाय्.......काय कविता हाय का काय!!!!!
लैच भारी!!
आप्ल लै जमन मले ते कविता
आप्ल लै जमन मले ते कविता आव्द्ते अन हे बि
लै भारी.... इची भन बिपाशा
लै भारी.... इची भन बिपाशा लुगळं कामून नेसत नै बाप्पा.....
डॉ.कैलास
मुटे सर, कठीण शब्दांचे अर्थ
मुटे सर, कठीण शब्दांचे अर्थ सांगितलेत ते बरं झालं,
पण नसते सांगितलेत तरी तेवढंच हसू आलं असतं
खि खि खि .... लय भारी !
खि खि खि .... लय भारी !
इचीबैन, लय भारी..........
इचीबैन,
लय भारी..........
ही कविता आता आपण ऐकू
ही कविता आता आपण ऐकू शकता.
.
ऐकण्यासाठी क्लिक करा.
Pages