बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवून गेला ....॥१॥
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला ....॥२॥
जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला ....॥३॥
लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेवून, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहूनच गेला ....॥४॥
.
........ गंगाधर मुटे
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
.....................................................................
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकूल = पुर्णपणे.
....................................................................
१) नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल
२) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका
...................................................................
लय भारी तडका. -हरीश
लय भारी तडका.
-हरीश
(No subject)
मस्तच!
छान. आणी भाषापण एकदम फिट्ट
छान. आणी भाषापण एकदम फिट्ट बसली आहे.
नाद्खुळा
नाद्खुळा
सही !
सही !
नागपूरी तडका लैच भारी आहे ...
नागपूरी तडका लैच भारी आहे ...
गंगाधर तुमची कविता
गंगाधर तुमची कविता आवडली.
बिपाशा काटकसरी पोर आहे, संपुर्ण अंगभर लुगडे घालुन पैशांची उधळपट्टी मान्य नसेल. पण शाम्या धावण्यासाठी निमीत्त शोधतच होता.
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा..!!
(No subject)
अहो मुटे, नुसतं बिपाशाला
अहो मुटे, नुसतं बिपाशाला लुगडं नेसवून काय उपयोग? तिच्यासारख्या बर्याच बाया आहेत. सगळ्यांना नेसवायला निघालात तर दिवाळखोरी जाहीर करावी लागेल. आणि बाप्यांमध्येही शहारुख, शाहिद, सलमान ह्यांना त्याच कापडातून शर्टही लागतीलच की.
सायो, शहारुख, शाहिद, सलमान
सायो,
शहारुख, शाहिद, सलमान यांना शर्ट घालुन द्यायला शाम्या गेला तर हे बलदंड,बलभिम श्याम्याला ठेचुन-ठेचुन त्याचा वर्हाडी ठेचा बनवतील व बिपाशाच्या कुत्रीला खाऊ घालतील.
मस्तच, आवडली
(No subject)
(No subject)
Mast Ahe.
Mast Ahe.
कम भारी बे... वाचून बम मजा
कम भारी बे... वाचून बम मजा आली
मजा आली वाचुन
मजा आली वाचुन
तिले काउन बाप्पा लुगडी
तिले काउन बाप्पा लुगडी नेशिवताय .
शरद
शरद
मस्त !!
खास्सच !
खास्सच !
लई झ्याक बघा
लई झ्याक बघा
धमाल आहे..आवडलं.
धमाल आहे..आवडलं.
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा..!!
प्रतिसाद वाचुन जाम हसलो.....
च्या मायला ! विदर्भातले गडी
च्या मायला ! विदर्भातले गडी लै च सज्जन दिसतात.
विदर्भातले गडी लै च सज्जन
विदर्भातले गडी लै च सज्जन दिसतात.
--- बिपाशाला धन्यवाद द्या (तिच्यामुळे गड्याला सज्जनपणा मिळतो).
मुटे साहेब... एकदम झकास....
मुटे साहेब... एकदम झकास....
झक्कास......मस्त ...
झक्कास......मस्त ...
त्याले वाटलं मायबाप, भलते
त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन,
म्हुन तिले आंगभर, कपडे भेटत नसन,>>>>>>>>>>:हाहा: बिचार्या आई बापाला वाटत असेल की अजुन पाळण्यातच बघतोय की काय आपण पोरीला...
Pages