Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाटीभर?
वाटीभर? अगं संपूर्ण अंघोळ नाही करायचीये.
अज्जुका, तु
अज्जुका,
तुला शतशः धन्यवाद. मला खुपच फायदा झाला ह्या उपायानि. केस मऊ आणि चमकदार तर झालेच शिवाय अजुन एक फायदा झाला. गेले काहि दिवस माझे केस तेलकट आणि त्याखलचि त्वचा कोरडि अशि विचित्र परिस्थिति होति, आणि विंचरताना खुप दुखायचे. मी तेलाचा मसाज इ. उपाय करुन बघित्लेत पण फारसा फायदा झाला नव्हता.
मला वाटत नारळाच दुध आणि लिंबाचा रस एकत्र लावण्याने लगेच परिणाम झाला. कारण नंतर अजिबात दुखले नाहि. मी लिंबाच्या रसात साधारण बरोबरिने मध घातले होते (मधाने काळे आणि डार्क शेड्स चे केस चमकदार होतात अस कुठेतरि वाचल होत). केसांच आरोग्य चांगल ठेवण्यासाठि हा खुपच सोपा आणि खात्रिचा उपाय वाटतोय. पुन्हा एकदा तुला धन्यवाद.
अज्जुका,
अज्जुका, तुझा उपाय एकदम hit झाला बरं का... मी पण काल मस्त नारळाच्या एका वाटीचं दूध केसात मुरवलं आणि नंतर लिंबू चोळलं. आज सकाळी केस धुतले.... मस्त झालेत केस.. सहीच एकदम.
.
मधाने केस पांढरे होतात असं मी कुठेतरी वाचलं होतं....
लिंबाने पण
लिंबाने पण त्वचा कोरडी होऊन नंतर कोंडा होतो असा माझा अनुभव आहे... केस पांढरे होतात त्यातल्या सायट्रिक ऍसिड मुळे असंही माहिती आहे..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है
हा उपाय
हा उपाय रोजचे रोज करण्याचा नाहीये. महिन्यादोन महिन्यातून एकदा करायचाय. आणि केस कोरडे होऊ नयेत म्हणूनच तर पोषणासाठी नारळाचं दूध लावायचंय.
असो मी कधी मधी करते. मला उपयोग होतो.
-नी
नीरजा,
नीरजा, तुझा उपाय करुन बघणार आहे. कोणाला डॉ. अपुर्व शहांच्या 'रिच फिल' बद्दल काही माहिती आहे का? म्हणजे मी त्यांची वेबसाईट बघितली पण कोणाला काहि अनुभव आहे का?
हो कोणी जर
हो कोणी जर डॉ. अपूर्व शहांच्या रिच फीलचा अनुभव घेतला असला तर सांगा. (केसांसाठी)कारण त्यांची जहिरात खूपच इफेक्टिव्ह आहे.
अज्जुका,
अज्जुका, काल मी नारळाचे दुध लावुन, भरपुर मसाज करुन, १/२ तासानंतर लिंबु चोळुन केस धुतले. मस्त झालेत केस! मऊ, मुलायम, चमकिले बाल!!
.
आज दोन फिरंगी मैत्रिणींनी मला कॉम्प्लिमेंट पण दिलिये की केस मस्त सिल्की दिसतायत म्हणुन! कुठला शांपु/कंडिशनर वापरतेस विचारत होत्या त्यांना "राज की बात" सांगितली तर मोठ्ठा "आ" वासला दोघींनी!!
पन्ना, कॅन
पन्ना, कॅन मधलं लावलेलं का नारळाचं दूध?
हो ग. स्वता
हो ग.
स्वता काढायचा कंटाळा केला. कॅन मधल्या मधे प्रिझर्वेटीझ आहेत, सायट्रीक ऍसिड पण आहे. फ्रिझ मधे ठेवलेलं होतं दुध, त्यामुळे वरचा वरचा दाट थर लावला फक्त केसांना.
अग मग फोटो
अग मग फोटो टाक की म्हणजे रेसिपीबरोबर फोटो असला की कशी पट्कन कल्पना येते तसंच!!! अज्जुकाला 'फोटो देखा हाल' दिसेल.
You will get Urjita Jain's
You will get Urjita Jain's products at Dadar opposit to D'Silva High School there is one lane take right from Chanderkar Sweet shop or ask sai babas mandir its opposit to that.
निलेश म्ह्स्के
ह्या
ह्या उपायातलं नवीन आलेलं शहाणपण..
महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदाच हे करायचं. अजून चांगला आणि टिकणारा परिणाम होण्यासाठी आदल्या रात्री भरपूर तेल लावून चोळून चोळून मुरवायचं.
सकाळी नारळाचं दूध चांगलं मुरवून मधे भरपूर वेळ जाउ द्यायचा पण लिंबू लावल्यावर मात्र लगेच ५ - १० मिनिटात धूवून टाकायचं.
शॅम्पू खूप कोरडा करणारा वापरायचा नाही.
हे करू त्या दिवशी जास्वंद जेल वापरायचं नाही.
-नी
नी ... वा छान.
नी ...
वा छान. मस्त आठवण करून दिलिस.. मी पण आता उपाय करून बघते. माझे केस खूप पातळ झाले आहेत.
आज पार्लर मधे गेले हेअर कट करायला.. पण जीव धजावला.. लांब केस कापायला.. परत आले न कापताच.
ही आमची
ही आमची जुनीच डॅफो आहे की नवीन कुणी? नवीन असलीस तरी स्वागतच आहे पण केवळ माहितीसाठी विचारलं!
-नी
हा हा हा हा
हा हा हा हा
तुमचिच जुनी डॅफोडिल्स आहे हो .. नव्या मायबोलीवर पुन्हा रुळतिये..
अज्जुका,
अज्जुका, धन्यवाद
तुझा नारळाचे दुध लावायचा formula एकदम हिट आहे. फक्त मी लिंबू नाहि लावले. पण केस एकदम सुळसुळित झालेत. आणि मऊ हि.....
पिकणारे केस काळे करण्यासाठि कोणीतरी कढीपत्ता वैगरे टाकून तेल करायला सांगितले होते. त्यात मंडुर पावडर पण टाकायची का??
मला
मला कोंडयाचा फार त्रास होत आहे. एका मैत्रीणिने तिच्यामते हिट होणारा एक उपाय सांगितला. मेथ्या पावडर्,दही,अंडयाचा पांढरा भाग मिक्स करुन ३०मि. केसांना लावुन ठेवायचे आणि मग धुउन टाकायचे.मी केलं हे पण काही फरक नाही पडला.कोंडा तसाच आहे.
नुसतं दही ही लाउन पाहिलं. head and shoulder 4महिने झाले वापरत आहे. कोमट तेल लाउन रात्रभर किंवा किमान ४-५ तास ठेवते.परिणाम शून्य.
जुन्या हितगुजवरची याबाबतची चर्चा वाचली. कुणीतरी सांगितल आहे की, मेथ्या पाण्यात भिजवुन मोड आणुन्,पेस्ट करा आणि लिंबुसोबत मिक्स करुन केसांना लावा. बर्याच जणींना त्यामुळे फरक पडला. मेथ्याची मोड आणुन केलेली पेस्ट आणि मेथ्या पावडर यात काही फरक असतो का? मी चुकीची पद्धत अवलंबली का? अजुन काही उपाय जो अमेरिकेत शक्य होईल, कोणाला माहित आहे का?
सुप्रिया, क
सुप्रिया,
कोंड्याच्या उपायाबद्दल मला नक्की खात्रीशीर असे काही माहीत नाही पण माझा अनुभव हा आहे की अमेरीकेत आपल्या केसांना हवे तेवढे ऊन मिळत नाही आणि त्यामुळे बर्याचदा बाकी सगळे करुनपण कोंड्याचा त्रास होतोच. उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जरा जास्तच होतो. म्हणजे भारतात जे उपाय यशस्वी ठरतात ते इथे यशस्वी होतीलच असे नाही. मी जेव्हा जेव्हा भारतात जाते तेव्हा आपोआप माझा कोंडा कमी होतो काही न करता.
सुप्रिया,
सुप्रिया, तो कोंडाच आहे की पाण्यातला रेसिड्यू आहे ते पहा. इथे काही ठिकाणी हार्ड वॉटर असते. अश्या पाण्यात शांपूचा फेस कमी होतो. तसं असेल तर 'Nioxin' चे शांपू आणि स्काल्प थेरपी वापरुन बघ.
आईशप्पथ मी
आईशप्पथ मी आज हेच विचारायला आले होते इथे. ! आमच्या इथले पाणी फार हार्ड आहे. प्रचंड डिपॉझिट्स दिसतात.. प्यायला ठीके, फिल्टर वगैरे लावता येतो.. पण बाथरूममधे कुठे लावायचा फिल्टर!?
पण केस फार खराब झालेत.. आधीच माझे केस प्रचंड कुरळे आणि जाड होते. थोडी ड्राय स्किन आहे. त्यामुळे कोंडा होतो कधी कधी..
पण आता, जाडपणा कमी झालाय.. आणि कोंडा पण असतो कधी कधी..
नवर्याचेही केस असेच जाड आणि कुरळे होते. मात्र गेल्या ६ वर्षात फार कमी झालेत. त्यामुळे मी लिटरली घाबरलीय!
अधुन मधुन कोमट तेलाने मसाज.. स्ट्रेटनिंग आयर्न न वापरणे , शक्यतो हर्बल शांपू वापरणे इ. गोष्टी करते मी.. काय केले म्हणजे केस नीट टिकतील/राहतील ?
shower filters एका
shower filters एका मैत्रिणीने सांगितले होते. पण माहित नाही हे वापरुन किती फरक पडतो.
http://www.filter-outlet.com/product.php?product=112182, http://www.filtersfast.com/Brita-disposable-bath-faucet-filter.asp
सुप्रिया,
सुप्रिया, कोंड्यासाठी ४ टे.स्पू. पाणी + १ टि.स्पू. व्हाइट व्हिनेगार- २० मि. लावून वाफ घेउन धुणे.
bsk, केस गळणे थांबविण्यासाठी कोरफड gel/ जास्वंद gel १५ मि. आधी लावुन केस धुणे. किंवा उर्जीता जैन यांचे new crop हा hair pack लावा.
धन्यवाद
धन्यवाद अमृता.
आणखी एक, मी केस धुतल्यावर २-३ दिवस मला कोड्याचा त्रास होत नाही. चौथ्या दिवशी सुरु होतो. असं का?
कोरफड जेल अमेरिकेत कुठे मिळेल?Alow Vera म्हणतात का त्याला?
हो कोरफड
हो कोरफड जेल ला Aloe Vera म्हणतात. ती walmart मध्ये मीळते.
सुप्रिया,
सुप्रिया, २-३ दिवसांनी परत केस धुवायचे. हा का ना का
मि मागे मायबोलिवरच वाचले
मि मागे मायबोलिवरच वाचले होते, कोण्डा असताना कापुर लावल्याने फायदा होतो.
जास्वन्दाचे तेल घरी करता येते, अगदि सोपे आहे. जास्वन्दाचि फुले पाण्यात टाकुन उकळायची. चार भाग पाणी टाकून एक भाग उरवायचे. मग एक भाग तेल टाकून फक्त तेल उरेपर्यन्त पुन्हा उकळायचे. सुन्दर रन्ग हवा असेल तर थोड्या मन्जिश्ठाच्या काड्या टाकायच्या.
केसान्च्या जनरल हेल्थ साठी बदामाचे तेल गरम करून रात्री लावायचे. मस्त होतात केस.
नमस्कार, मल
नमस्कार,
मला सुद्धा कोंड्याचा खुप त्रास होत आहे. मला प्ल्झिज नारळाचे दुध कसे करायचे कुणि सान्गेल का?
केसान्ना मध लावणे खरच योग्य आहे का? मि कुठेरि वचले कि दहि+मध याने केस खुप मउ होतात.
निकिता, नार
निकिता,
नारळाच्या दुधाची कॅन मिळते. grocery store madhye or supermarket madhye.
हाय
हाय सुप्रिया, खुप दिवसांनी उत्तर देतीये, पण परत कोंडा होतोय तर फंगल इन्फेक्शन तर नाहीये न ते चेक कर. कंगवा दर २ दिवसांनी धु आणि उशीचे अभ्रे पण, आणि जर कोरफड नसेल मिळत तर सरळ लाल जास्वन्दीची फुले घे मधला पराग काढुन मिक्सर वरुन पाणी न घालता फिरव, चिकट जेल मिळेल (पानांची पण होते)हीच जास्वंद जेल. ट्राय कर!!
Pages