एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
नाही. त्याने मला भेटण्यासाठी
नाही.
त्याने मला भेटण्यासाठी भरपूर वेळ दिला.
त्याने मला भेटण्यासाठी दुपारी तीनची वेळ दिली.
चिनुक्स धन्यवाद , वर दिलेल्या
चिनुक्स धन्यवाद ,
वर दिलेल्या यादीत काही शब्द थोडेसे वेगळे जाणवले , जसे ,
चूक - बरोबर
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
हे बरोबर आहे का ?
धन्यवाद सर्वांना. होय,
धन्यवाद सर्वांना. होय, शर्मिलाचा संदर्भ बरोबर आहे.
चूक - बरोबर १. नेतृत्त्व -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
यापैकी ठळक केलेले शब्द परत तपासून पहावेत असे मला वाटते.
शरद
शरद, १. लघु + तम = लघुतम महत्
शरद,
१. लघु + तम = लघुतम
महत् + तम = महत्तम
म्हणून लघुतम हेच रूप योग्य.
२. (मनस्) मनः + कामना = मनःकामना
३. अल्पसंख्या + क = अल्पसंख्याक
४. हृषीक (इंद्रिय) + ईश = हृषीकेश (इंद्रियांचा स्वामी)
५. नि + पात = निपात
६. मथित + अर्थ = मथितार्थ
७. स्वादु + इष्ठ (तमभाववाचक) = स्वादिष्ठ
८. कार्यकर्तृ + ई = कार्यकर्त्री (अभिनेत्री, धरित्री, सावित्री, सर्वपित्री, धात्री, इ.)
'आपण दिलेला वेळ आणि केलेल्या
'आपण दिलेला वेळ आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'
'आपण दिलेल्या वेळासाठी आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.'
>> दुसरं बरोबर
खालच्या रचनेनं पहिलं बरोबर होईल:
आपण दिलेला वेळ आणि केलेला प्रयत्न ह्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
सेम गोज फॉर इंग्लिश. 'आणि' नंतर कन्सिस्टंन्सी राखा..
कार्यकर्ती -
कार्यकर्ती - कार्यकर्त्री
उच्चार कसा करायचा ?
कार्यकर् त्री
कार्यकर् त्री
१०. मनोकामना - मनःकामना - मला
१०. मनोकामना - मनःकामना - मला नाही वाटत मनोकामना चुकीचं आहे.
दोन वेगळे शब्द आहेत असं माझं मत.
३२. अनावस्था - अनवस्था --> अनावस्था (माझ्या मते)
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत --> अनावृत्त..
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री --> कार्यकर्ती
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय --> दोन्ही ठीक.. विशेष नाम आहे ना.
४२. दुराभिमान - दुरभिमान --> दुराभिमान.
४३. देशवासीयांना - देशवासींना - देशवासीय (देशवासी हिंदीकरण वाटतय शब्दाचं)
४६. निर्माती - निर्मात्री --> निर्माती.
४९. पारंपारिक - पारंपरिक--> पारंपारिक.
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन -> पुनरावलोकन (पुनः अवलोकन - आ होतं ह्या संधीत अ रहात नाही माझ्या माहितीप्रमाणे)
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व --> पुरुषत्व चुक.
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक --> बुद्ध्यांक (एकत्र बुद्धी आणि अंक म्हणायचा प्रयत्न करा. बुद्ध्यांकच येतं तोंडातून)
५४. बेचिराख - बेचिराग -> बेचिराख
५५. मतितार्थ - मथितार्थ --> मतितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक --> भाषक मराठीत नाही ऐकला.. पण माझं ज्ञान लिमिटेड असू शकेल
५८. मुद्याला - मुद्द्याला --> मुद्दा म्हणजेच डबल द आला ना.. मग मुद्द्याला असावं
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी --> षष्ठ्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य -> सहकारी.. सहाय्य असावं
६२. संयुक्तिक - सयुक्तिक - दोन वेगळे वेगळे शब्द.
६३. सांसदीय - संसदीय --> मराठीत संसदीय. हिंदी सांसदीय.
६४. सुतोवाच - सूतोवाच -> सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ -> स्वादिष्ट म्हणताना म्हणतात - लिहिताना बरोबर काय माहित नाही.
६६. सुवाच्च - सुवाच्य - लिहिताना सुवाच्य, उच्चार सुवाच्च (थोड्या - कळेल न कळेल अशा य बरोबर)
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी - हत्येप्रकरणी आणि हत्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या कोनोटेशन मध्ये वापरतात - उदाहरण आठवून सांगेन. पण हत्याप्रकरणी जास्त हिंदीचा संस्कार झालेलं वाटतय.
आणखीन एक. महत्व नाही बरोबर.
आणखीन एक.
महत्व नाही बरोबर. शब्द महत्त्व असा लिहिला पाहिजे.
नानबा, १. अन् + अवस्था =
नानबा,
१. अन् + अवस्था = अनवस्था
२. अनावृत हेच बरोबर. याच बाफलकावर या शब्दाबद्दल चर्चा झाली आहे.
३. दत्त + आत्रेय = दत्तात्रेय
४. दुर् + अभिमान = दुरभिमान
५. देशवासीयांना हा प्रयोग चूक. देशवासी + ना = देशवासींना
६. निर्मातृ + ई = निर्मात्री
७. परंपरा या शब्दाला इक हा प्रत्यय लावून पारंपरिक हा शब्द होतो.
८. पुनर् + अवलोकन = पुनरावलोकन
९. पौरुषत्व ही द्विरुक्ती आहे. पुरुषत्व/पौरुष ही योग्य रुपे आहेत.
१०. बुद्धि + अंक = बुद्ध्यंक
११. बेचिराग हाच मूळ शब्द आहे. बेचिराख हा अपभ्रंश. बे+चिराग = बेचिराग
१२. षष्टि + अब्दी = षष्ट्यब्दी
१३. सहाय + य = (वृद्धी) साहाय्य
१४. स + युक्तिक = सयुक्तिक
बाकी इतर शब्दांबद्दल पूर्वीच लिहिलं आहे.
बरं झालं हा बीबी वर आला..
बरं झालं हा बीबी वर आला..
इथे अनेक जण आपल्या लेखनावर आलेल्या प्रतिसादांना उत्तर देताना "सर्वांचे धन्यवाद" असं लिहितात.. ते बरोबर आहे का? सर्वांना धन्यवाद असं हवं ना ? की दोन्ही बरोबर आहे?
सर्वांचे आभार बरोबर वाटतं ऐकायला पण सर्वांचे घन्यवाद खटकतं थोडं.. कृपया सांगा..
चिनुक्स, मला वाटतं निर्मात्री
चिनुक्स, मला वाटतं निर्मात्री आणि निर्माती हे दोन शब्द असावेत.
निर्माण कर्ती - निर्माती.
तसं नसल्यास निर्माता शब्दाचा उगम काय?
चिनुक्स बाकीच्या शब्दांबद्दल मला अजुनही वाटतय की मी वरती लिहिलेलं बरोबर आहे..
ह्याच मुख्य कारण दुर् + अवस्था नाहिये, दु: + अवस्था आहे = दुरावस्था
पुन: + अवलोकन = पुनरावलोकन
विसर्ग आल्यानं हे बदलत असं मला वाटतं..
अर्थातच मी १००% माझंच बरोबर असा क्लेम टाकत नाहिये.
टाकू शकत नाही कारण १. असं म्हणण्यापूर्वी सपोर्टिंग डॉक्युमेंटेशन द्याव लागतं - जे मी दिलं नाहिये.
२. माझं म्हणण चुकीचही असू शकतं
एका मराठीच्या प्राध्यापकाशी संपर्क साधला आहे (मराठी व्याकरणाच्या नियमांकरता) - त्यांचं उत्तर आलं की कळवतेच. मग पुन्हा पुढच्या चर्चांच्या फैरी झडवू..
पग्या, तुझं बरोबर आहे..
पग्या, तुझं बरोबर आहे.. 'सर्वांचे आभार' आणि 'सर्वांना धन्यवाद'
आणखीन एक शब्द अनावधान - अन +
आणखीन एक शब्द
अनावधान - अन + अवधान अनावधानच होतं - अनवधान नाही. तसच अनावस्था ही..
http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/downloads/list ह्या ठिकाणी गुगलच्या शब्दकोशातले मराठी शब्द आहेत.
निर्माता हे निर्मातृ शब्दाचे
निर्माता हे निर्मातृ शब्दाचे रूप आहे.
आणि पुनः, दु:, अन असे प्रत्यय नाहीयेत.. .
असो. मी वर स्पष्टीकरण दिलंच आहे.
वर दिलेला कोश हा open source आहे. त्यामुळे त्यात चुकीच्या शब्दांचा शिरकावही होऊ शकतो.
माझ्याकडे असलेल्या आर्यभुषण शब्दकोशात (संपा. श्रीधर गणेश वझे) अनवधान व अनवस्था हीच रुपे दिली आहेत.
नानबा,
आपल्याला एक विनंती. चूक दिसल्यास कृपया लक्षात आणून द्या. मात्र एखादा शब्द चूक ठरवताना त्याला व्याकरणाचा आधार आहे किंवा नाही, हे पहा. तसंच, त्याचं स्पष्टीकरण द्या. म्हणजे उगीच इतरांचा गोंधळ होणार नाही.
मला राहुल / राहूल यातलं काय
मला राहुल / राहूल यातलं काय बरोबर.. ते सान्गा प्लीज...
गौतम बुद्धाच्या मुलाच नाव राहुल / राहूल होत, याशिवाय या नावाचा अजुन काय अर्थ होतो?
राहुल हे योग्य. दुर्गाबाई
राहुल हे योग्य.
दुर्गाबाई भागवतांच्या 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'मध्ये राहुल या शब्दाचा अर्थ 'बाधा', 'बेडी' असा सांगितला आहे.
चिनुक्स , मुलीला मराठी
चिनुक्स ,
मुलीला मराठी शिकवताने तिने विचारलेले काही प्रश्ण , ज्याच उत्तर मला माहिती नाही
जस मराठीत वेलांटी, उकार ,काना,मात्रा जस म्हणतो तस
वृषाली मधे व च्या खाली जे चिन्ह देतो किंवा प्र मधे आलेला र , किंवा राष्ट्र मधे ट च्या खाली आलेल चिन्ह त्याला मराठीत काय म्हणतात ?
हे इथे विचारण योग्य आहे का म्हणजे विषयाला धरुन ???
आपल्याला एक विनंती. चूक
आपल्याला एक विनंती. चूक दिसल्यास कृपया लक्षात आणून द्या. मात्र एखादा शब्द चूक ठरवताना त्याला व्याकरणाचा आधार आहे किंवा नाही, हे पहा.
>> नक्की नक्की.. म्हणून तर मी व्याकरणाचे नियम मिळवण्याच्या मागे लागली आहे अरे..
आणखीन एक - तो जो गुगलचा शब्दकोश आहे ना, त्यात जर चुकीचे शब्द सापडले, तर आपण बग टाकू शकतो.
सृजनशील आणि सर्जनशील हे भिन्न
सृजनशील आणि सर्जनशील हे भिन्न अर्थी शब्द आहेत का?
विशद /विषद (?)करून सांगा
माझ्या माहितीप्रमाणे सृजनशील
माझ्या माहितीप्रमाणे सृजनशील आणि सर्जनशील ह्या शब्दांचा अर्थ एकच आहे. सर्जनशील हे सृजनशीलचे अपभ्रष्ट रूप आहे.
योग्य शब्द खरं तर 'सर्जनशील'
योग्य शब्द खरं तर 'सर्जनशील' असा आहे. 'सृज्-सृजति' (अर्थ : उपजवणे, निर्मिणे, जन्मास घालणे) या संस्कृत धातुपासून बनलेलं धातुसाधित नाम म्हणजे 'सर्जन' (अर्थ : निर्मिती, उपज). 'सर्जनशील' हा शब्द जातीने विशेषण असून त्याचा अर्थ 'सर्जन हेच शील (= प्रकृती/स्वभाव/पिंड) असलेला/असलेली/असलेले असा/अशी/असे', असा होतो.
याच 'सृज्-सर्जति' धातुचे इतर भाईबंद 'विसृज् (विसर्जन, विसर्ग)', 'उपसृज्(उपसर्ग)', 'उत्सृज् (उत्सर्ग, उत्सर्जन)', 'संसृज् (संसर्ग)' आपण बर्याच वेळा वपरत असतो; त्यांच्या धातुसाधित नामांवरून 'सर्जनशील' हे रूप योग्य असल्याचं पडताळता येईल.
वा.गो. आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील नोंदीनुसार 'विशद' हाच शब्द योग्य आहे; अर्थ : स्वच्छ, शुभ्र, निष्कलंक.
संकल्प, अनेक धन्यवाद
संकल्प,
अनेक धन्यवाद
'वाहन' चं अनेकवचन वहाने की
'वाहन' चं अनेकवचन वहाने की वाहने ?
असं अनेकवचन होणारे अजून काही शब्द आहेत का?
विरुद्ध शब्द लिहिताना अर्धा द + ध आहे
पण वाचताना तो अर्धा ध + द असा दिसतो.
असं का ?
<<<'सर्जन' (अर्थ : निर्मिती,
<<<'सर्जन' (अर्थ : निर्मिती, उपज). >>> सर्जन हा तर कापाकापी करतो. तो काय निर्मिती करणार? हां! एखादं इंद्रियरोपण केले तर गोष्ट निराळी!!
१) 'अंघोळ' बरोबर की
१) 'अंघोळ' बरोबर की 'आंघोळ'?
२) युगांत = युगांमध्ये, सत्रांत = सत्रांमध्ये, वेदांत = वेदांमध्ये
वरील उदाहरणांमध्ये, अनेकवचन दर्शविताना, अनुस्वार द्यावा की 'मध्ये' प्रत्यय लावावा? अनुस्वार दिल्यास ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का?
१. अंघोळ. २. अनुस्वार द्यावा.
१. अंघोळ.
२. अनुस्वार द्यावा.
चिन्मय, 'युगांमध्ये',
चिन्मय, 'युगांमध्ये', 'सत्रांमध्ये' वगैरे व्याकरणाच्यादृष्टीने चूक आहे का?
नाही.. 'देवळांमध्ये',
नाही.. 'देवळांमध्ये', 'नद्यांमध्ये' किंवा 'अनेक घरांमध्ये पाणी शिरलं' असं आपण म्हणतोच.
'मध्ये' हा संस्कृतातला प्रत्यय म्हणून विचारतो आहेस का? तरी मी उद्या बघून सांगतो. शासनाच्या नियमांत 'मध्ये' प्रत्यय लावलेल्या शब्दांमध्ये अनुस्वार आहे.
Pages