Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
त्यातही तो घाबरलाय का क्रुद्ध
त्यातही तो घाबरलाय का क्रुद्ध आहे का त्याला कॉन्स्टिपेशन झालंय हे कळत नाही >>>
>>त्यातही तो घाबरलाय का
>>त्यातही तो घाबरलाय का क्रुद्ध आहे का त्याला कॉन्स्टिपेशन झालंय हे कळत नाही>>

😂
हा हा हा, याचाही फोटो आला होय
हा हा हा, याचाही फोटो आला होय
हेच ते अद्भूत एक्सप्रेशन
हो, मी पण छावा बघायला घेतला
हो, मी पण छावा बघायला घेतला आणि कंटाळवाणा झाला.
त्यातले अ आणि अ सीन्स पाहता दिग्पाळ लांजेकरचे पिक्चर बरे म्हणावेत असे आहेत. मुळात त्यांचा प्लॅन बनताना असं दाखवलंय की मुघलांना इथल्या डोंगराळ मुलखाची सवय नाही त्यामुळे गनिमी कावा वापरू. पण प्रत्यक्षात टेरेनचा काहीही फायदा न घेता उगीचच पाण्यातच लपून राहा, जमिनीखाली गाडून घ्या असल्या फालतू अ आणि अ युक्त्यांची मदत घेतली आहे. तो मुघलांचा एक अगडबंब माणूस मराठे आल्यावर मूर्खासारखा तसाच उघडा लढायला जातो आणि मार खातो व पुढे औरंग्याला भेटायला मात्र कपडे घालून जातो. इतका बावळट जर शत्रू असेल तर त्याविरुद्ध जिंकण्यात काय विशेष पराक्रम आहे, असं वाटेल ते बघून. उलट प्रतिपक्ष तुल्यबळ दाखवला तर राजांचा पराक्रम नीट लक्षात येईल ना! आवरा ह्या पिक्चरवाल्यांना.
संतोष जुवेकरच्या प्रसिद्ध मुलाखतीमुळे तो कुठे कुठे दिसतो याकडे जास्त लक्ष होतं. मला बऱ्याच ठिकाणी काही मायक्रो सेकंदासाठी दिसला, जो एरवी बघितला गेला नसता.
छावा मधे भाऊ, बहीण, भाची बघून
छावा मधे भाऊ, बहीण, भाची बघून आले, मला विचारलं होतं, मी म्हणाले की शेवट बघवणार नाही. त्यामुळे मला बघायचा नव्हताच. विकी आवडतो तरीही नाही. हल्ली काही हलकं फुलकं बघायला जास्त आवडतं.
वरचा जुवेकर फोटो, हाहाहा. जरा लढाई जोश हवा होता.
भारतीय दिग्दर्शकांनी फक्त
भारतीय दिग्दर्शकांनी फक्त टिपिकल बॉलिवूड स्टाईल चित्रपट बनवावेत. ऐतिहासिक चित्रपट त्यांना बनवता येत नाहीत आणि त्यांनी तसा प्रयत्न ही नको करायला.
आशुचँप सारखेच मत आज आस्ताद
आशुचँप सारखेच मत आज आस्ताद काळे याने मांडलंय.
तोही या सिनेमात काही मायक्रोसेकंदासाठी आहे म्हणे !!
छावा सिनेमात अभिनय केलेल्या मराठी अभिनेत्याचाच छावा सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. छावा सिनेमात काम केलेला अभिनेता आस्ताद काळे याच्याकडून फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेता आस्ताद काळे म्हणाला, ‘औरंगजेबाचं वय आणि आजरपण बघता तो या वेगानं चालू शकेल का? सोयराबाई राणींचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी कसे केले?’ पुढे तो असेही म्हणाला, “मी आता खरं बोलणार आहे. ‘छावा’ वाईट सिनेमा आहे. सिनेमा म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे”. असं आस्ताद काळेनं म्हटलंय. इतकंच नाहीतर त्याने पुढे म्हटलं की, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं?. काय पुरावे आहेत याचे?”, असा सवालही त्याने केला.
त्याने पोस्टच्या शेवटी असेही लिहिलंय की, जे सत्य आहे, ते सांगणं गरजेचं आहे, मग ते कोणालाही त्रासदायक का ठरू नये, या सडेतोड घेतलेल्या भूमिकेमुळे अस्ताद काळे सध्या चांगलाच चर्चेत आल्याचे पाहायला मिळतंय.
यालाही जुवेकर कडे बघून सुचलं
यालाही जुवेकर कडे बघून सुचलं असेल हे असं
काहीतरी करून वाद ओढवून घ्यायचा
म्हणजे लोकं तुटून पडतात आपल्यावर
लोकांना फुकट वेळ आणि माफक दरात इंटरनेट आहे त्यामुळे मुबलक प्रसिद्धी
बरं त्यातून तो सिनेमाबद्दल बोलला आहे म्हणजे कुणा दैवताचा अपमान नाही, बदनामी नाही, पोलीस तक्रार नाही, कुणी घर, स्टुडिओ फोडणार नाही
फुकटात प्रसिद्धी मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग
छावा एकंदरीत बराच सुमार सिनेमा आहे, ज्यांना सिनेमा बघून संभाजी महाराज कळत असतील त्यांना कळू द्या बापडे
पण ज्यांना आधीपासूनच माहिती आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा असह्य आहे
बरेच लोकांकडे चुकीची आणि
बरेच लोकांकडे चुकीची आणि बदनामीकारक माहिती होती. ती पुसली बदलली जात असेल तर ते चांगलेच आहे.
चित्रपट एक निमित्त. माहिती मिळवायचे सोर्स इतर सुद्धा असतात हे मान्य पण बहुतांश जनता मुद्दाम ती शोधायला जात नाही. चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली की ते होण्याची शक्यता वाढते
म्हणजे हा सिनेमा काढला नसता
म्हणजे हा सिनेमा काढला नसता तर आयुष्यात कधी या लोकांनी कष्ट घेतले नसते आपल्या राजांच्याबद्दल खरे काय ते जाणून घ्यायचे
सिनेमा आल्यावर त्यांना एकदम जागृती आली अरेच्या हे ते आपले महाराज, आपण कधीतरी यांच्याबद्दल वाचलेलं शाळेत असताना
त्यानंतर कधी इच्छा ही झाली नाही वाचायची पण आता सिनेमा आलाय त्यात कसले मस्त ते उडत बीडत जातायत बाहुबली सारखे
आता मात्र खरा इतिहास वाचलाच पाहिजे
हे अस का?
आता मात्र खरा इतिहास वाचलाच
आता मात्र खरा इतिहास वाचलाच पाहिजे>>> हे वाक्य सोडून सगळे बरोबर आहे. ज्यांना सिनेमा बघून महाराज कळले ते खरं इतिहास वाचण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
म्हणजे हा सिनेमा काढला नसता
म्हणजे हा सिनेमा काढला नसता तर आयुष्यात कधी या लोकांनी कष्ट घेतले नसते आपल्या राजांच्याबद्दल खरे काय ते जाणून घ्यायचे
>>>>>>>>>>>>>
नसते घेतले. सामान्य माणूस आधी आपल्या कुटुंबासाठी कष्ट घेतो. जगण्यासाठी धडपड करतो. त्यातून जो जीव वाचतो त्यात आपले छंद जोपासून चार घटका मनोरंजन शोधतो. अशावेळी वाचन हा ज्याचा छंद नाही त्याकडून फारसे वाचले जात नाही. आणि वाचले गेले तरी किती विषयांवर आणि किती प्रमाणात वाचले जाणार. कारण वाचण्या साठी इतिहास हा एकच विषय नाही किंवा त्यातही काही हे एकच चरित्र नाही.
ऋन्मेष, तो सामान्य माणूस
ऋन्मेष, तो सामान्य माणूस वेगळा
दिवसभर मोबाईलवर रील्स पासून ते पिक्चर्स पर्यंत बघणारे व बहुतांश रिकामटेकडे आळशी लोक यावरून "आम्हाला खरा इतिहास समजला" म्हणून एखाद्या जातीबद्दल किंवा धर्माबद्द्ल घाउक समज करून घेतात व स्वतः माहितीचा शोध घ्यायचा प्रयत्न करत नाहीत त्यांच्याबद्दल चालले आहे.
तुझ्या "सामान्य माणसा"ला असल्या प्रकारांत इंटरेस्ट नसतो. कोण कसा आहे याचे अनुभव तो रोजच्या धकाधकीत प्रत्यक्ष घेतच असतो. नेटकर्यांसारखा तो स्वतःच्या बबल मधे नसतो.
बाकी "खरा इतिहास"ची सध्याच्यी व्याख्या आपले जे समज आहेत त्यांना दुजोरा देणारी माहिती अशी आहे.
बाकी "खरा इतिहास"ची सध्याच्यी
बाकी "खरा इतिहास"ची सध्याच्यी व्याख्या आपले जे समज आहेत त्यांना दुजोरा देणारी माहिती अशी आहे.>>>>
हो सगळ्यांची खऱ्या इतिहासाची आपापली व्हर्जनस आहेत
ऋन्मेष, तो सामान्य माणूस
ऋन्मेष, तो सामान्य माणूस वेगळा Happy
>>>>
हो पण या सामान्य माणसापर्यंतदेखील हा चित्रपट पोहोचतो ना..
ज्यांना जाणून घ्यायचं नाही त्यांचा विचार करायचाच का?
पण ज्यांना जाणून घ्यायला आवडू शकते, आवडते, पण शक्य होत नाही, किंवा रोजचे धकाधकीचे आयुष्य जगण्यात इतर काही करायला वेळ मिळत नाही अश्यापर्यंत चित्रपट माध्यमातून काही पोहोचत असेल तर ते चांगलेच आहे ना..
हो सगळ्यांची खऱ्या इतिहासाची
हो सगळ्यांची खऱ्या इतिहासाची आपापली व्हर्जनस आहेत Happy
>>>>>>
इतिहासच का? वर्तमान बद्दल सुद्धा प्रत्येकाची वेगळी वर्जन सापडतील. एखाद्या राजकीय धाग्यावर चक्कर टाकली तरी समजेल. तिथले दहा रँडम आयडी घेऊन त्यांना श्री नरेंद्र मोदी यांच्या बद्दल निबंध लिहायला लावला तरी दहा वर्जन सापडतील. त्यातली पाच या टोकाची तर पाच त्या टोकाची असतील. हे तर राहणारच... पण मग निदान महापुरुषांची वीरपुरुषांची गौरवगाथा तरी पुढे येऊ दे.
लोकांकडे चुकीची आणि
लोकांकडे चुकीची आणि बदनामीकारक माहिती होती. ती पुसली बदलली जात असेल तर ते चांगलेच आहे. >>> म्हणजे काय ? कुठली माहिती होती लोकांकडे ?
'काही पोहोचणं' आणि 'काहीही
'काही पोहोचणं' आणि 'काहीही पोहोचणं' या दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्यात प्रचंड फरक आहे.
आणि या दोन कॅटेगरीपैकी वेगवेगळ्या गटातल्या लोकांना एकमेकांचे विचार पटणं अवघड आहे.
विशेषतः 'काहीही पोहोचलं तरी चालतंय की' या गटातल्या लोकांना दुसरी बाजू समजण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यातून ते करमणुकीसाठी वाद घालणारे/निर्माण करणारे, आत्मकेंद्रित मनोवृत्तीचे, स्वयंतुष्ट असतील तर या चर्चेस अर्थ नाही.
प्रचंड अनुमोदन अनिरुध्द
प्रचंड अनुमोदन अनिरुध्द
यापेक्षा चपखल काही असूच शकत नाही
लोकांकडे चुकीची आणि
लोकांकडे चुकीची आणि बदनामीकारक माहिती होती. ती पुसली बदलली जात असेल तर ते चांगलेच आहे. >>> म्हणजे काय ? कुठली माहिती होती लोकांकडे ?
>>>>>
माझे सोशल मीडिया वाचन कमी असल्याने ती नेमकी कुठली माहिती हे माहीत नाही पण या चित्रपटाच्या निमित्ताने असे वाचनात आले की संभाजी महाराजांबद्दल तशीच चुकीची माहिती आणि समज पसरले होते.. या धाग्यावर सुद्धा काहींनी तसे लिहिले होते. मागे जाऊन शोधावे लागेल.
माझे सोशल मीडिया वाचन कमी
माझे सोशल मीडिया वाचन कमी असल्याने ती नेमकी कुठली माहिती हे माहीत नाही >>>>
'काही पोहोचणं' आणि 'काहीही
'काही पोहोचणं' आणि 'काहीही पोहोचणं' या दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्यात प्रचंड फरक आहे.
>>>>>
अगदी बरोबर!
पण...
जे पोहोचत आहे ते खरेच काहीही आहे का हे न बघताच ते केवळ चित्रपट माध्यमातून पोहोचते आहे म्हणून त्याला दुय्यम ठरवणे हे चूकच.
कारण पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा चुकीचा इतिहास पोहोचवला जातोच...
या चित्रपटाच्या निमित्ताने
या चित्रपटाच्या निमित्ताने असे वाचनात आले की संभाजी महाराजांबद्दल तशीच चुकीची माहिती आणि समज पसरले होते >>> आणि या पिक्चरमुळे अशी काय माहिती मिळाली की त्यात काही फरक पडला?
जे पोहोचत आहे ते खरेच काहीही
जे पोहोचत आहे ते खरेच काहीही आहे का हे न बघताच ते केवळ चित्रपट माध्यमातून पोहोचते आहे म्हणून त्याला दुय्यम ठरवणे हे चूकच. <<
हे बरोबर आहे पण याने माझाच मुद्दा स्पष्ट होतोय.
ज्यांचं सोशल मिडीयाचं वाचन कमी आणि अन्य वाचन नगण्य असेल त्यांनी विषयाची कोणतीच माहिती नसताना 'अश्यापर्यंत चित्रपट माध्यमातून काही पोहोचत असेल तर ते चांगलेच आहे ना..'
असं विधान करुन चित्रपटामधून काहीतरी माहिती पोहोचतेय याची भलावणही करु नये.
कारण पुस्तकांच्या माध्यमातून
कारण पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा चुकीचा इतिहास पोहोचवला जातोच...
म्हणूनच वाचणारे एकच पुस्तक वाचून थांबत नाहीत
या विषयावर "चुकीची" माहिती
या विषयावर "चुकीची" माहिती देणारी पुस्तके आहेत तशी "बरोबर" देणारीही आहेत. इथे चुकीची किंवा बरोबर म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे चुकीचे किंवा बरोबर वाटेल ते. इतिहासाच्या दृष्टीने नव्हे.
किंबहुना इतिहासाच्या बाबतीत "पुस्तकांतून चुकीची माहिती पसरवली आहे" म्हणणार्या बहुतेकांनी इव्हन ती सपोजेडली चुकीची माहिती देणारी पुस्तकेही वाचलेली नसतात. हे बहुतांश लोक कोणाच्यातरी सोमिवरची रॅण्डम पोस्ट वाचून हे असले ज्ञान पुढे ढकलत असतात. मग त्या पोस्टकर्त्याने व्यवस्थित अॅनेलिसीस केला असो किंवा संदर्भ सोडून काहीतरी लिहीलेले असो. आपल्या समजाला बळकटी देणारे असले म्हणजे झाले.
पिक्चरमुळे कायच्या काय माहिती
पिक्चरमुळे कायच्या काय माहिती पोचते किंवा नेमके गुण पोहोचत नाहीत याबद्दल सहमत.
पण संभाजी राजांच्या चरीत्राबाबत पूर्वी आक्षेपार्ह लिखाण/चित्रीकरण झालेले आहे. कवी कलश व त्यांच्या मैत्रीबद्दल नाराज असलेल्यांनी कलश यांनी संभाजी राजांना बिघडवल्याची भुमका उठवलेलीच होती.
छावा चित्रपटाने किमान हे गैरसमज खोडले असावेत.
खुद्द ते मुगलांना जाऊन मिळाल्याचा डाग तर आहेच. पण एकदा त्यांनी स्वराज्याची धुरा हातात घेतल्यावर त्यासाठी बाहुबली + रोहित शेट्टी स्टाईलने का होईना अपार कष्ट केले हे तर दाखवले.
शिवाय ऋन्मेष म्हणतो तसं वाचन त्यातही इतिहासाचं वाचन व मराठी साम्राज्याचा इतिहास ही काही सगळ्यांची, शेवटच्या केसमध्ये नॉन मराठी माणसांची आवड नसते. मग त्यांच्यापर्यंत स्वराज्य राखण्यासाठी संभाजीराजांनी जीवापाड प्रयत्न केले एवढी किमान माहिती पोहोचत असेल तर काय हरकत आहे?
छावा चित्रपटाने किमान हे
छावा चित्रपटाने किमान हे गैरसमज खोडले असावेत. >> हे वाक्य म्हणजे "सिनेमाने खरे सत्य दाखवले" , " खरा इतिहास सिनेमा पाहून समजला" असे म्हणण्यासारखेच आहे . सिनेमा हिट झाला म्हणजे त्यात दाखवलेले ते बरोबर असे नसते ना!
बाजीराव, संभाजी अशा व्यक्तिमत्त्वांची या सिनेमांमुळे नॉन मराठी लोकांना निदान 'ओळख झाली' इतके मात्र खरे.
बाहुबली + रोहित शेट्टी
बाहुबली + रोहित शेट्टी स्टाईलने का होईना अपार कष्ट केले हे तर दाखवले>>>
आक्षेप यालाच आहे, यातून महाराजांचा अपमान होतोय हे कुणाच्या गावीच नाहीये
ही सुद्धा एक प्रकारची बदनामीच म्हणायची
अगदी चकचकीत वेष्टनात गुंडाळून दिली असली तरीही
ना शिवाजीराजे ना संभाजी राजे ना मावळे
अजिबात बाहुबली नव्हते, ते सर्वसामान्य शेतकरी मराठा कुणबी आणि अठरापगड जातीचे लोक होते त्यांच्यात स्वाभिमानाची फुंकर घालून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हे पोचवा म्हणलं तर ते डोकॅयमेंट्री आहे म्हणून नाक मुरडणार
थोडक्यात लोकांना ना कुणाशी घेणेदेणे, त्यांना दोन घटका मनोरंजन हवे आहे, बाहुबली रोहित शेट्टी स्टाईल दे दणादण मारामारी हवी आहे
मग त्यासाठी कोणीही असलं तरी चालतंय
बाजीराव असो वा बाजीप्रभू वा संभाजी राजे
सगळ्यांनी गाणी म्हणली पाहिजेत, नाच केला पाहिजे, उडत जाऊन 500 लोकांना दे दणादण जमिनीवर आपटून मारलं पाहिजे
तरच लोकांना त्यांच्या कष्टाची जाणीव होणार अन्यथा नाहीच
आणि या पिक्चरमुळे अशी काय
आणि या पिक्चरमुळे अशी काय माहिती मिळाली की त्यात काही फरक पडला?
>>>>>
हे प्रत्येकाबाबत वेगवेगळे असू शकते.
एखाद्याला संभाजी राजे हे निव्वळ शिवाजी महाराजांचे मुलगे म्हणून माहीत असतील पण ते सुद्धा एक पराक्रमी राजे होते याची जराही कल्पना नसेल.
कारण शाळेत त्यांच्याबद्दल फार इतिहास शिकवला गेला असे मला वाटत नाही. चित्रपटात शाळेतील इतिहासाच्या पुस्तकाच्या पलीकडे माहिती आहे असे मला वाटते.
Pages