Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला एक माहिती हवी होती. एक
मला एक माहिती हवी होती. एक मुस्लिम रेसिपी आहे - दुधी भोपळा, तूर डाळ आणि तांदूळ असलेली. दाल चावल किंवा असंच काहीतरी नाव आहे. बहुधा बोहरी लोकांकडे करतात. कोणाकडे आहे का ही रेसिपी?
दालचा नावाने सर्च करा. भरपूर
दालचा नावाने सर्च करा. भरपूर सापडतील.
फेमस हैदराबादी व्हेज डिश आहे ही. भंडारा-सामुदायिक भोज असेल तर हमखास हाच मेन्यू.
Authentic Hyderabad Style हवी असेल तर इंस्टावर “अम्मी के खाने” नावाचे पेज बघा. कद्दू का दालचा नक्की असेल तिकडे.
Rmd,https://www.misalpav.com
Rmd,
https://www.misalpav.com/node/48654
ही पाकृ बघा बरं.
तुमच्या साठी त्याssssssss तिकडून शोधून आणली.
थँक्यू थँक्यू अनिंद्य आणि
थँक्यू थँक्यू अनिंद्य आणि धनवंती!
@धनवंती, स्पेशल थँक्यू, ही लिंक पाठवते माझ्या मैत्रिणीला जिला ही रेसिपी हवी आहे.
कालच्या मॅचला इनिंग ब्रेक
कालच्या मॅचला इनिंग ब्रेकमध्ये मी स्वहस्ते बनवलेला मेन्यू
यामुळेच भारत जिंकला असा कुठलाही दावा नाही
इडली फ्राय!!!!!!!! प्रचंड
इडली फ्राय!!!!!!!! प्रचंड लाडका पदार्थ आहे माझा. देखणी दिसतेय एकदम
इडली फ्राय माझा शाळेत
इडली फ्राय माझा शाळेत असतानापासून हॉटेलमध्ये जाऊन खायचा दुसऱ्या क्रमांकाचा आवडता पदार्थ होता.
पहिला मसाला डोसा.
जो आजही पहिलाच आहे
इडली फ्रायची सवय किंवा चटक मी माझ्या आजवरच्या एकूण एक गर्लफ्रेंडना लावली आहे. गप्पा मारायच्या आहेत तर कॉफी आणि दोघात एक इडली फ्राय.. संपल्यावर पुन्हा अजून एकदा दोघात एक इडली फ्राय.. असे मन भरेपर्यंत चालू राहायचे.
होळी आणि धुलीवंदनाच्या
होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा
यंदा होळीला घरची पुरणपोळी
यंदा होळीला घरची पुरणपोळी नव्हती नशिबात..
बघूया, पुढच्या वीकेंडला असेल..
तूर्तास यावरच समाधान..
शेफ - आपलीच लेक
(No subject)
माझेमन, पाव भाजी च्या रंगा
माझेमन, पाव भाजी च्या रंगा साठी थोडे बीट रूट घाल. शिवाय, काश्मिरी नविन मिरच्या लाल सुक्या पाण्यात भिजवुन, मग आलं लसणासोबत वाट. रंग चांगला येतो.
आई च्या हातची पुरणपोळी
आई च्या हातची पुरणपोळी
वाह.. हेच मिस केले यंदा
वाह.. हेच मिस केले यंदा
माझेमन, पाव भाजी च्या रंगा
माझेमन, पाव भाजी च्या रंगा साठी थोडे बीट रूट घाल. शिवाय, काश्मिरी नविन मिरच्या लाल सुक्या पाण्यात भिजवुन, मग आलं लसणासोबत वाट. रंग चांगला येतो.
>>> ओके. पुढच्या वेळी हे नक्की ट्राय करेन. थँक्स
पुपो आणि वाटीभर तूप हवंच.
पुपो आणि वाटीभर तूप हवंच. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी गटात.
सिमरन, नैवेद्याचं ताट भारी..! कौतुक.
सफेद ढोकळा आणि ऋ च्या लेकीचे ऑम्लेट प्रो एकदम.
रगडा पॅटिस
रगडा पॅटिस


कालची राजमा , वाट्याण्याची चर्चा वाचून सफेद वाटाणेही भितभितच भिजत घातले पण होपफुली पाच शिट्ट्यात शिजले आणि हवा तसा रगडा झाला
रगडा पॅटीस.. तोंपासू
रगडा पॅटीस.. तोंपासू
तिखट पुपो!
तिखट पुपो!
छान, पण हे काय असतं? पुरण
छान, पण हे काय असतं? पुरण करताना गुळ/साखरे ऐवजी मीरची मसला वगैरे?
मानव, माझ्या एका गुज्जु मैकडे
मानव, माझ्या एका गुज्जु मैकडे दोन्ही पुपो असायच्या मला तिखट आवडतात जास्त तर करतेच. डाळ शिजली की चाळणीतून गाळलेली थोडी डाळ काढून ठेवते मग साखर गूळ घालते. तिपुपोमध्ये आलं हिमि, ओवा व थोडीशी भरडलेली बडीशोप मीठ हळद. करून पहा अन सांगा.
गोपुपो
तिखट पुरणपोळी साउंडस
मंजूताई,
तिखट पुरणपोळी साउंडस इंटरेस्टींग. करून बघणार, आय मीन खाणार.
त्रिनिदाद आणि गयाना इथली
त्रिनिदाद आणि गयाना इथली मूळची भारतीय वंशाची मंडळी धाल-पुरी (धाल-परोटा) करतात. ही तिखट पुपो त्यासारखीच वाटते आहे.
धन्यवाद मंजुताई.
धन्यवाद मंजुताई.
पाडव्याला कर"वू"न बघतो.
किंवा करूनही बघेन.
मंजू पु पो मस्त दिसतायत.
मंजू पु पो मस्त दिसतायत. तिखट पू पो इंटरेस्टिंग वाटतायत. नक्की करून बघेन .
घ्या गुलाबजाम ...
आईग्गं कातिल गुजा! ताबडतोब
आईग्गं कातिल गुजा! ताबडतोब जमतील तेवढे फस्त करावेसे वाटत आहे
हा गुलाबजाम फोटो रेडीमिक्स
हा गुलाबजाम फोटो रेडीमिक्स पाकिटावर लावला तर खप दुप्पट होईल
तिखट पुरणपोळी इंटरेस्टिंग.. कधी खाल्ली ऐकली नव्हती.
पण तसेही गोड पुरणपोळी कटाच्या तिखट आमटी सोबतच आवडते त्यामुळे तिखट फ्लेवर बाय डिफॉल्ट येतोच
ममो गुलाबजाम फार मस्त दिसत
ममो गुलाबजाम फार मस्त दिसत आहेत. जरा इकडे पाठवून द्या
!!!
व्वा गुलाबजाम …. तोंडातून रस
व्वा गुलाबजाम …. तोंडातून रस गळायवा लागला.
गुलाबजाम, जबरदस्त आणि तिखट
गुलाबजाम, जबरदस्त आणि तिखट पुपो प्रकारही आवडला.
तिखट पुरणपोळी :
तिखट पुरणपोळी :
शिजवलेल्या हरभरा डाळीत नुसतेच तिखट मीठ मसाला टाकून विशेष चांगले लागणार नाही असे वाटते. पांचट लागेल.
त्याऐवजी मुगाची / हरभऱ्याची डाळ भिजवून, बारीक वाटून, मग तेलात फोडणी करून त्यात परतायची.
मग जिरे बडीशेप धने यांची पावडर, आले लसूण पेस्ट, मिरची मीठ, आमचूर, मिरेपूड असे टाकून सारण तयार करायचे. व त्याच्या तिखट पुरणपोळ्या मस्त लागतात. कचोरीच्या सारणासारखे.
Pages